سَأَلَ سَائِلٌ بِعَذَابٍ وَاقِعٍ(1) १. एका मागणी करणाऱ्याने त्या अज़ाब (शिक्षा - यातने) ची मागणी केली जो घडून येणार आहे |
لِّلْكَافِرِينَ لَيْسَ لَهُ دَافِعٌ(2) २. काफिरांवर, ज्याला कोणी हटविणारा नाही |
مِّنَ اللَّهِ ذِي الْمَعَارِجِ(3) ३. या अल्लाहतर्फे, जो शिड्या बाळगणारा आहे |
تَعْرُجُ الْمَلَائِكَةُ وَالرُّوحُ إِلَيْهِ فِي يَوْمٍ كَانَ مِقْدَارُهُ خَمْسِينَ أَلْفَ سَنَةٍ(4) ४. ज्याच्याकडे फरिश्ते आणि आत्मा चढून जातात एका दिवसात, ज्याची मुदत पन्नास हजार वर्षांची आहे |
فَاصْبِرْ صَبْرًا جَمِيلًا(5) ५. तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे धीर संयम राखा |
إِنَّهُمْ يَرَوْنَهُ بَعِيدًا(6) ६. निःसंशय, हे त्या (अज़ाब) ला दूर समजतात |
وَنَرَاهُ قَرِيبًا(7) ७. आणि आम्ही त्याला जवळ असल्याचे पाहतो |
يَوْمَ تَكُونُ السَّمَاءُ كَالْمُهْلِ(8) ८. ज्या दिवशी आकाश वितळलेल्या धातूसारखे होईल |
وَتَكُونُ الْجِبَالُ كَالْعِهْنِ(9) ९. आणि पर्वत रंगीत लोकरीसारखे होतील |
وَلَا يَسْأَلُ حَمِيمٌ حَمِيمًا(10) १०. आणि कोणी मित्र कोणा मित्राला विचारणार नाही |
يُبَصَّرُونَهُمْ ۚ يَوَدُّ الْمُجْرِمُ لَوْ يَفْتَدِي مِنْ عَذَابِ يَوْمِئِذٍ بِبَنِيهِ(11) ११. (जरी ते) एकमेकांना दाखविले जातील. अपराधी, त्या दिवसाच्या शिक्षा - यातनेच्या मोबदल्यात (दंड म्हणून) आपल्या पुत्रांना देऊ इच्छिल |
وَصَاحِبَتِهِ وَأَخِيهِ(12) १२. आपल्या पत्नीला आणि आपल्या भावाला |
وَفَصِيلَتِهِ الَّتِي تُؤْوِيهِ(13) १३. आणि आपल्या कुटुंबाला, जे त्याला आश्रय देत होते |
وَمَن فِي الْأَرْضِ جَمِيعًا ثُمَّ يُنجِيهِ(14) १४. आणि जमिनीवरील समस्त लोकांना, यासाठी की यांनी त्याला मुक्ती मिळवून द्यावी |
كَلَّا ۖ إِنَّهَا لَظَىٰ(15) १५. (परंतु) हे कदापि होणार नाही. निःसशय, तो (धगधगणाऱ्या) निखाऱ्यांची (आग) आहे |
نَزَّاعَةً لِّلشَّوَىٰ(16) १६. जी (तोंडाची व डोक्याची) त्वचा सोलून काढणारी आहे |
تَدْعُو مَنْ أَدْبَرَ وَتَوَلَّىٰ(17) १७. ती अशा त्या प्रत्येक माणसाला हाक मारील, जो मागे हटतो आणि विमुख होतो |
وَجَمَعَ فَأَوْعَىٰ(18) १८. आणि गोळा (जमा) करून सांभाळून ठेवतो |
۞ إِنَّ الْإِنسَانَ خُلِقَ هَلُوعًا(19) १९. निःसंशय, मनुष्य मोठ्या कच्च्या हृदयाचा बनविला गेला आहे |
إِذَا مَسَّهُ الشَّرُّ جَزُوعًا(20) २०. जेव्हा त्याला कष्ट - यातना पोहचते, तेव्हा भयचिंतीत होतो |
وَإِذَا مَسَّهُ الْخَيْرُ مَنُوعًا(21) २१. आणि जेव्हा त्याला सुख प्राप्त होते, कंजूसपणा करू लागतो |
إِلَّا الْمُصَلِّينَ(22) २२. परंतु ते नमाज पढणारे |
الَّذِينَ هُمْ عَلَىٰ صَلَاتِهِمْ دَائِمُونَ(23) २३. जे आपल्या नमाजचे वक्तशीर पालन करणारे आहेत.१ |
وَالَّذِينَ فِي أَمْوَالِهِمْ حَقٌّ مَّعْلُومٌ(24) २४. आणि ज्यांच्या धन-संपत्तीत निर्धारित हिस्सा आहे |
لِّلسَّائِلِ وَالْمَحْرُومِ(25) २५. याचकांचाही आणि याचना करण्यापासून अलिप्त राहणाऱ्यांचाही |
وَالَّذِينَ يُصَدِّقُونَ بِيَوْمِ الدِّينِ(26) २६. आणि जे न्यायाच्या दिवसावर विश्वास राखतात |
وَالَّذِينَ هُم مِّنْ عَذَابِ رَبِّهِم مُّشْفِقُونَ(27) २७. आणि जे आपल्या पालनकर्त्याच्या शिक्षेचे भय बाळगत राहतात |
إِنَّ عَذَابَ رَبِّهِمْ غَيْرُ مَأْمُونٍ(28) २८. निःसंशय, त्यांच्या पालनकर्त्याची शिक्षा यातना, निर्धास्त होण्याची बाब नाही |
وَالَّذِينَ هُمْ لِفُرُوجِهِمْ حَافِظُونَ(29) २९. आणि जे लोक आपल्या लज्जास्थानां (गुप्तांगां) चे (हराम कृत्यापासून) रक्षण करतात |
إِلَّا عَلَىٰ أَزْوَاجِهِمْ أَوْ مَا مَلَكَتْ أَيْمَانُهُمْ فَإِنَّهُمْ غَيْرُ مَلُومِينَ(30) ३०. पंरतु आपल्या पत्नींच्या आणि आपल्या दासींच्याखेरीज ज्यांचे ते मालक (स्वामी) आहेत, या बाबतीत ते निंदनीय नाहीत |
فَمَنِ ابْتَغَىٰ وَرَاءَ ذَٰلِكَ فَأُولَٰئِكَ هُمُ الْعَادُونَ(31) ३१. आता जो कोणी याच्याखेरीज (मार्ग) शोधेल, तर असे लोक मर्यादेचे उल्लंघन करणारे ठरतील |
وَالَّذِينَ هُمْ لِأَمَانَاتِهِمْ وَعَهْدِهِمْ رَاعُونَ(32) ३२. आणि जे आपल्या अनामती (ठेवी) ची, आणि आपल्या वायद्या-वचनांची व प्रतिज्ञेची कास बाळगतात |
وَالَّذِينَ هُم بِشَهَادَاتِهِمْ قَائِمُونَ(33) ३३. आणि जे आपल्या साक्षींवर सरळ (आणि अटळ) राहतात |
وَالَّذِينَ هُمْ عَلَىٰ صَلَاتِهِمْ يُحَافِظُونَ(34) ३४. आणि जे आपल्या नमाजांचे संरक्षण करतात |
أُولَٰئِكَ فِي جَنَّاتٍ مُّكْرَمُونَ(35) ३५. हेच लोक जन्नतमध्ये मान - प्रतिष्ठा राखणारे असतील |
فَمَالِ الَّذِينَ كَفَرُوا قِبَلَكَ مُهْطِعِينَ(36) ३६. तेव्हा, या काफिरांना झाले तरी काय की ते तुमच्याकडे धावत येतात |
عَنِ الْيَمِينِ وَعَنِ الشِّمَالِ عِزِينَ(37) ३७. उजव्या आणि डाव्या बाजूने, समूहासमूहाने |
أَيَطْمَعُ كُلُّ امْرِئٍ مِّنْهُمْ أَن يُدْخَلَ جَنَّةَ نَعِيمٍ(38) ३८. काय त्यांच्यापैकी प्रत्येकजण असे इच्छितो की त्यांना देणग्यांनी युक्त (ऐश-आरामाच्या) जन्नतमध्ये प्रवेश लाभेल |
كَلَّا ۖ إِنَّا خَلَقْنَاهُم مِّمَّا يَعْلَمُونَ(39) ३९. (असे) कदापि होणार नाही. आम्ही त्यांना त्या (वस्तू) पासून निर्माण केले आहे, जिला ते जाणतात |
فَلَا أُقْسِمُ بِرَبِّ الْمَشَارِقِ وَالْمَغَارِبِ إِنَّا لَقَادِرُونَ(40) ४०. तेव्हा मला शपथ आहे दोन्ही पूर्व आणि पश्चिम (दिशां) च्या पालनकर्त्याची की आम्ही निश्चतपणे समर्थ आहोत |
عَلَىٰ أَن نُّبَدِّلَ خَيْرًا مِّنْهُمْ وَمَا نَحْنُ بِمَسْبُوقِينَ(41) ४१. या गोष्टीवर की त्यांच्याऐवजी त्यांच्यापेक्षा चांगले लोक आणावेत, आणि आम्ही लाचार विवश नाहीत |
فَذَرْهُمْ يَخُوضُوا وَيَلْعَبُوا حَتَّىٰ يُلَاقُوا يَوْمَهُمُ الَّذِي يُوعَدُونَ(42) ४२. तेव्हा तुम्ही त्यांना भांडत-खेळत (असलेले) सोडा, येथे पर्यर्ंत की हे आपल्या त्या दिवसाला जाऊन मिळावेत, ज्याचा वायदा त्यांच्याशी केला जात आहे |
يَوْمَ يَخْرُجُونَ مِنَ الْأَجْدَاثِ سِرَاعًا كَأَنَّهُمْ إِلَىٰ نُصُبٍ يُوفِضُونَ(43) ४३. ज्या दिवशी कबरीमधून हे धावत पळत बाहेर पडतील, जणू काही ते साध्य-चिन्हाकडे वेगाने जात आहेत |
خَاشِعَةً أَبْصَارُهُمْ تَرْهَقُهُمْ ذِلَّةٌ ۚ ذَٰلِكَ الْيَوْمُ الَّذِي كَانُوا يُوعَدُونَ(44) ४४. त्यांचे डोळे (नजरा) झुकलेले असतील, त्यांच्यावर अपमानाचे सावट (पसरलेले) असेल. हाच तो दिवस, ज्याचा त्यांच्याशी वायदा केला जात होता |