إِذَا وَقَعَتِ الْوَاقِعَةُ(1) १. जेव्हा कयामत प्रस्थापित होईल |
لَيْسَ لِوَقْعَتِهَا كَاذِبَةٌ(2) २. जिचे घडून येण्यात काहीच असत्य नाही |
خَافِضَةٌ رَّافِعَةٌ(3) ३. ती वर-खाली करणारी असेल |
إِذَا رُجَّتِ الْأَرْضُ رَجًّا(4) ४. जेव्हा जमीन भूकंपासह हालवून टाकली जाईल |
وَبُسَّتِ الْجِبَالُ بَسًّا(5) ५. आणि पर्वत अगदी कण - कण केले जातील |
فَكَانَتْ هَبَاءً مُّنبَثًّا(6) ६. मग ते विखुरलेल्या धुळीसारखे होतील |
وَكُنتُمْ أَزْوَاجًا ثَلَاثَةً(7) ७. आणि तुम्ही तीन गटात विभागले जाल |
فَأَصْحَابُ الْمَيْمَنَةِ مَا أَصْحَابُ الْمَيْمَنَةِ(8) ८. तेव्हा उजव्या हाताचे, किती चांगले आहेत उजव्या हाताचे |
وَأَصْحَابُ الْمَشْأَمَةِ مَا أَصْحَابُ الْمَشْأَمَةِ(9) ९. आणि डाव्या हाताचे, काय अवस्था आहे डाव्या हाताच्या लोकांची |
وَالسَّابِقُونَ السَّابِقُونَ(10) १०. आणि जे पुढे जाणारे आहेत, ते तर आहेतच पुढे जाणारे |
أُولَٰئِكَ الْمُقَرَّبُونَ(11) ११. ते अगदी सान्निध्य प्राप्त केलेले आहेत |
فِي جَنَّاتِ النَّعِيمِ(12) १२. सुख-विलासाच्या जन्नतींमध्ये आहेत |
ثُلَّةٌ مِّنَ الْأَوَّلِينَ(13) १३. (फार मोठा) समूह तर पूर्वी होऊन गेलेल्यांपैकी असेल |
وَقَلِيلٌ مِّنَ الْآخِرِينَ(14) १४. आणि थोडेसे नंतरच्या लोकांपैकी |
عَلَىٰ سُرُرٍ مَّوْضُونَةٍ(15) १५. (हे लोक) सोन्याच्या तारांनी विणलेल्या आसनांवर |
مُّتَّكِئِينَ عَلَيْهَا مُتَقَابِلِينَ(16) १६. एकमेकांसमोर तक्के लावून बसले असतील |
يَطُوفُ عَلَيْهِمْ وِلْدَانٌ مُّخَلَّدُونَ(17) १७. त्यांच्याजवळ अशी मुले, जी नेहमी (मुलेच) राहतील, ये-जा करतील |
بِأَكْوَابٍ وَأَبَارِيقَ وَكَأْسٍ مِّن مَّعِينٍ(18) १८. प्याले आणि सुरई घेऊन आणि मद्याचा प्याला घेऊन, जो मद्याने भरून वाहत असेल |
لَّا يُصَدَّعُونَ عَنْهَا وَلَا يُنزِفُونَ(19) १९. ज्यामुळे ना डोके गरगरु लागेल आणि ना बुद्धी भ्रष्ट होईल |
وَفَاكِهَةٍ مِّمَّا يَتَخَيَّرُونَ(20) २०. आणि असे मेवे घेऊन, जे ते पसंत करतील |
وَلَحْمِ طَيْرٍ مِّمَّا يَشْتَهُونَ(21) २१. आणि पक्ष्यांचे मांस, जे त्यांना (फार) आवडेल |
وَحُورٌ عِينٌ(22) २२. आणि मोठमोठ्या डोळ्यांच्या (मृगनयनी) हूर (पऱ्या) |
كَأَمْثَالِ اللُّؤْلُؤِ الْمَكْنُونِ(23) २३. ज्या लपलेल्या मोत्यांसारख्या आहेत |
جَزَاءً بِمَا كَانُوا يَعْمَلُونَ(24) २४. हा मोबदला आहे त्याच्या कर्मांचा |
لَا يَسْمَعُونَ فِيهَا لَغْوًا وَلَا تَأْثِيمًا(25) २५. तिथे ना ते निरर्थक गोष्ट ऐकतील आणि ना अपराधाची गोष्ट |
إِلَّا قِيلًا سَلَامًا سَلَامًا(26) २६. केवळ सलामच सलाम (शांती सलामती) चा आवाज असेल |
وَأَصْحَابُ الْيَمِينِ مَا أَصْحَابُ الْيَمِينِ(27) २७. आणि उजव्या हाताचे किती चांगले आहेत उजव्या हाताचे |
فِي سِدْرٍ مَّخْضُودٍ(28) २८. ती काटे नसलेली बोरे |
وَطَلْحٍ مَّنضُودٍ(29) २९. आणि थरांवर थर केळी |
وَظِلٍّ مَّمْدُودٍ(30) ३०. आणि लांब लांब सावल्या |
وَمَاءٍ مَّسْكُوبٍ(31) ३१. आणि वाहते पाणी |
وَفَاكِهَةٍ كَثِيرَةٍ(32) ३२. आणि खूप जास्त फळांमध्ये |
لَّا مَقْطُوعَةٍ وَلَا مَمْنُوعَةٍ(33) ३३. जे ना संपतील, ना रोखले जातील |
وَفُرُشٍ مَّرْفُوعَةٍ(34) ३४. आणि उंच उंच बिछायतीवर असतील |
إِنَّا أَنشَأْنَاهُنَّ إِنشَاءً(35) ३५. आम्ही त्या (च्या पत्नीं) ना खास प्रकारे बनविले आहे |
فَجَعَلْنَاهُنَّ أَبْكَارًا(36) ३६. आणि आम्ही त्यांना कुमारिका बनविले आहे |
عُرُبًا أَتْرَابًا(37) ३७. प्रेम करणाऱ्या, समवयस्क आहेत |
لِّأَصْحَابِ الْيَمِينِ(38) ३८. उजव्या हाताच्या लोकांकरिता आहे |
ثُلَّةٌ مِّنَ الْأَوَّلِينَ(39) ३९. (फार) मोठा समूह आहे पूर्वीच्या लोकांपैकी |
وَثُلَّةٌ مِّنَ الْآخِرِينَ(40) ४०. आणि (फार) मोठा समूह आहे नंतरच्या लोकांपैकी |
وَأَصْحَابُ الشِّمَالِ مَا أَصْحَابُ الشِّمَالِ(41) ४१. आणि डाव्या हाताचे, कसे आहेत डाव्या हाताचे |
فِي سَمُومٍ وَحَمِيمٍ(42) ४२. उष्ण हवा आणि गरम (उकळत्या) पाण्यात असतील |
وَظِلٍّ مِّن يَحْمُومٍ(43) ४३. आणि काळ्याकुट्ट धुराच्या सावलीत |
لَّا بَارِدٍ وَلَا كَرِيمٍ(44) ४४. जी ना थंड आहेत ना सुखदायक |
إِنَّهُمْ كَانُوا قَبْلَ ذَٰلِكَ مُتْرَفِينَ(45) ४५. निःसंशय हे लोक यापूर्वी फार सुख-संपन्न अवस्थेत वाढले होते |
وَكَانُوا يُصِرُّونَ عَلَى الْحِنثِ الْعَظِيمِ(46) ४६. आणि घोर अपराधांवर आग्रह करीत होते |
وَكَانُوا يَقُولُونَ أَئِذَا مِتْنَا وَكُنَّا تُرَابًا وَعِظَامًا أَإِنَّا لَمَبْعُوثُونَ(47) ४७. आणि म्हणत की काय जेव्हा आम्ही मरण पावू आणि माती व हाडे होऊन जावू तर काय आम्ही दुसऱ्यांदा जिवंत करून उभे केले जावू |
أَوَآبَاؤُنَا الْأَوَّلُونَ(48) ४८. आणि काय आमचे वाडवडील देखील |
قُلْ إِنَّ الْأَوَّلِينَ وَالْآخِرِينَ(49) ४९. (तुम्ही) सांगा की निःसंशय, सर्व पूर्वीचे आणि नंतरचे |
لَمَجْمُوعُونَ إِلَىٰ مِيقَاتِ يَوْمٍ مَّعْلُومٍ(50) ५०. एका निर्धारित दिवसाच्या वेळी अवश्य एकत्र केले जातील |
ثُمَّ إِنَّكُمْ أَيُّهَا الضَّالُّونَ الْمُكَذِّبُونَ(51) ५१. मग तुम्ही हे मार्गभ्रष्ट झालेल्यांनो, खोटे ठरविणाऱ्यांनो |
لَآكِلُونَ مِن شَجَرٍ مِّن زَقُّومٍ(52) ५२. जक्कूमचे झाड जरूर खाल |
فَمَالِئُونَ مِنْهَا الْبُطُونَ(53) ५३. आणि त्याच्यानेच पोट भराल |
فَشَارِبُونَ عَلَيْهِ مِنَ الْحَمِيمِ(54) ५४. मग त्यावर गरम उकळते पाणी प्याल |
فَشَارِبُونَ شُرْبَ الْهِيمِ(55) ५५. मग पिणारेही तहानलेल्या उंटांसारखे |
هَٰذَا نُزُلُهُمْ يَوْمَ الدِّينِ(56) ५६. कयामतच्या दिवशी त्यांचा हाच पाहुणचार आहे |
نَحْنُ خَلَقْنَاكُمْ فَلَوْلَا تُصَدِّقُونَ(57) ५७. आम्ही तुम्हा सर्वांना निर्माण केले, मग तुम्ही का नाही मानत |
أَفَرَأَيْتُم مَّا تُمْنُونَ(58) ५८. बरे हे तर सांगा की जे वीर्य तुम्ही टपकविता |
أَأَنتُمْ تَخْلُقُونَهُ أَمْ نَحْنُ الْخَالِقُونَ(59) ५९. काय त्यापासून (मानव) तुम्ही बनवितात की आम्ही निर्माण करतो |
نَحْنُ قَدَّرْنَا بَيْنَكُمُ الْمَوْتَ وَمَا نَحْنُ بِمَسْبُوقِينَ(60) ६०. आम्हीच तुमच्या दरम्यान मृत्युला भाग्य (निश्चित) केले आहे, आणि आम्ही त्यापासून हरलेलो नाही |
عَلَىٰ أَن نُّبَدِّلَ أَمْثَالَكُمْ وَنُنشِئَكُمْ فِي مَا لَا تَعْلَمُونَ(61) ६१. की तुमच्या जागी तुमच्यासारखे दुसरे निर्माण करावेत, आणि तुम्हाला नव्या रुपात (या जगात) निर्माण करावे, जे तुम्ही जाणत नाहीत |
وَلَقَدْ عَلِمْتُمُ النَّشْأَةَ الْأُولَىٰ فَلَوْلَا تَذَكَّرُونَ(62) ६२. आणि तुम्हाला पहिल्या निर्मितीचे ज्ञानही आहे, तरीही तुम्ही बोध का नाही प्राप्त करीत |
أَفَرَأَيْتُم مَّا تَحْرُثُونَ(63) ६३. बरे, मग हेही सांगा की तुम्ही जे काही पेरता |
أَأَنتُمْ تَزْرَعُونَهُ أَمْ نَحْنُ الزَّارِعُونَ(64) ६४. त्याला तुम्ही उगविता की आम्ही त्यास उगविणारे आहोत |
لَوْ نَشَاءُ لَجَعَلْنَاهُ حُطَامًا فَظَلْتُمْ تَفَكَّهُونَ(65) ६५. आम्ही इच्छिले तर त्याचा चुराडा (कण कण) करून टाकू आणि तुम्ही आश्चर्याने बोलतच राहावे |
إِنَّا لَمُغْرَمُونَ(66) ६६. की आमच्यावर तर भुर्दंड पडला |
بَلْ نَحْنُ مَحْرُومُونَ(67) ६७. किंबहुना आम्ही तर पूर्णपणे वंचित राहिलो |
أَفَرَأَيْتُمُ الْمَاءَ الَّذِي تَشْرَبُونَ(68) ६८. बरे तर हे सागा की जे पाणी तुम्ही पीता |
أَأَنتُمْ أَنزَلْتُمُوهُ مِنَ الْمُزْنِ أَمْ نَحْنُ الْمُنزِلُونَ(69) ६९. त्यास ढगांमधून तुम्ही अवतरित केले आहे की आम्ही पाऊस पाडतो |
لَوْ نَشَاءُ جَعَلْنَاهُ أُجَاجًا فَلَوْلَا تَشْكُرُونَ(70) ७०. आम्ही इच्छिले तर त्या (पाण्या) स कडू (जहर) करून टाकू, मग तुम्ही आमच्याशी कृतज्ञता का नाही व्यक्त करीत |
أَفَرَأَيْتُمُ النَّارَ الَّتِي تُورُونَ(71) ७१. बरे हेही सांगा की जी आग तुम्ही पेटविता |
أَأَنتُمْ أَنشَأْتُمْ شَجَرَتَهَا أَمْ نَحْنُ الْمُنشِئُونَ(72) ७२. तिचे झाड तुम्ही निर्माण केले आहे की आम्ही त्याचे निर्माणकर्ते आहोत |
نَحْنُ جَعَلْنَاهَا تَذْكِرَةً وَمَتَاعًا لِّلْمُقْوِينَ(73) ७३. आम्ही तिला बोध प्राप्त करण्याचे साधन आणि प्रवाशांच्या फायद्याची गोष्ट बनविले आहे |
فَسَبِّحْ بِاسْمِ رَبِّكَ الْعَظِيمِ(74) ७४. तेव्हा आपल्या महान पालनकर्त्याच्या नावाचे गुणगान करा |
۞ فَلَا أُقْسِمُ بِمَوَاقِعِ النُّجُومِ(75) ७५. तर मी शपथ घेतो ताऱ्यांच्या कोसळण्याची |
وَإِنَّهُ لَقَسَمٌ لَّوْ تَعْلَمُونَ عَظِيمٌ(76) ७६. आणि जर तुम्हाला ज्ञान असेल तर ही फार मोठी शपथ आहे |
إِنَّهُ لَقُرْآنٌ كَرِيمٌ(77) ७७. की निःसंशय हा कुरआन मोठा प्रतिष्ठासंपन्न आहे |
فِي كِتَابٍ مَّكْنُونٍ(78) ७८. जो एका सुरक्षित ग्रंथात (लिहिलेला) आहे |
لَّا يَمَسُّهُ إِلَّا الْمُطَهَّرُونَ(79) ७९. ज्याला केवळ स्वच्छ शुद्ध (पाक) लोकच स्पर्श करू शकतात |
تَنزِيلٌ مِّن رَّبِّ الْعَالَمِينَ(80) ८०. हा सर्व विश्वांच्या पालनकर्त्यातर्फे अवतरित केला गेला आहे |
أَفَبِهَٰذَا الْحَدِيثِ أَنتُم مُّدْهِنُونَ(81) ८१. तर काय तुम्ही अशा गोष्टीला साधारण (आणि तुच्छ) समजता |
وَتَجْعَلُونَ رِزْقَكُمْ أَنَّكُمْ تُكَذِّبُونَ(82) ८२. आणि आपल्या वाट्याला हेच घेता की यास खोटे ठरवित फिरावे |
فَلَوْلَا إِذَا بَلَغَتِ الْحُلْقُومَ(83) ८३. तर जेव्हा (प्राण) कंठाशी येऊन पोहचावा |
وَأَنتُمْ حِينَئِذٍ تَنظُرُونَ(84) ८४. आणि तुम्ही त्या वेळी (डोळ्यांनी) पाहात राहावे |
وَنَحْنُ أَقْرَبُ إِلَيْهِ مِنكُمْ وَلَٰكِن لَّا تُبْصِرُونَ(85) ८५. आणि आम्ही तुमच्या तुलनेत त्या माणसाच्या अधिक जवळ असतो, परंतु तुम्ही पाहू शकत नाही |
فَلَوْلَا إِن كُنتُمْ غَيْرَ مَدِينِينَ(86) ८६. तेव्हा जर तुम्ही एखाद्याच्या आज्ञेच्या अधीन नाहीत |
تَرْجِعُونَهَا إِن كُنتُمْ صَادِقِينَ(87) ८७. आणि त्या कथनात सच्चे असाल तर तो प्राण परतवून दाखवा |
فَأَمَّا إِن كَانَ مِنَ الْمُقَرَّبِينَ(88) ८८. तर जो कोणी (अल्लाहच्या दरबारात) निकटतम असेल |
فَرَوْحٌ وَرَيْحَانٌ وَجَنَّتُ نَعِيمٍ(89) ८९. त्याच्यासाठी ऐषआराम आहे (उत्तम भोजन आहे आणि देणग्यांनी युक्त अशी जन्नत आहे) |
وَأَمَّا إِن كَانَ مِنْ أَصْحَابِ الْيَمِينِ(90) ९०. आणि जो मनुष्य उजव्या हाताच्या लोकांपैकी आहे |
فَسَلَامٌ لَّكَ مِنْ أَصْحَابِ الْيَمِينِ(91) ९१. तरीही सलाम (शांती सलामती) आहे तुझ्यासाठी की तू उजव्या हाताच्या लोकांपैकी आहेस |
وَأَمَّا إِن كَانَ مِنَ الْمُكَذِّبِينَ الضَّالِّينَ(92) ९२. परंतु जर कोणी खोटे ठरविणाऱ्या मार्गभ्रष्ट लोकांपैकी आहे |
فَنُزُلٌ مِّنْ حَمِيمٍ(93) ९३. तर उकळत्या पाण्याने त्याचा पाहुणचार आहे |
وَتَصْلِيَةُ جَحِيمٍ(94) ९४. आणि जहन्नममध्ये जायचे आहे |
إِنَّ هَٰذَا لَهُوَ حَقُّ الْيَقِينِ(95) ९५. ही (वार्ता) अगदी सत्य आणि निश्चित आहे |
فَسَبِّحْ بِاسْمِ رَبِّكَ الْعَظِيمِ(96) ९६. तेव्हा तुम्ही आपल्या (अतिमहान) पालनकर्त्याच्या नावाचे पावित्र्य वर्णन करा |