Cuma suresi çevirisi Marathi

  1. Suresi mp3
  2. Başka bir sure
  3. Marathi
Kuranı Kerim türkçe meali | Kur'an çevirileri | Marathi dili | Cuma Suresi | الجمعة - Ayet sayısı 11 - Moshaf'taki surenin numarası: 62 - surenin ingilizce anlamı: Friday.

يُسَبِّحُ لِلَّهِ مَا فِي السَّمَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ الْمَلِكِ الْقُدُّوسِ الْعَزِيزِ الْحَكِيمِ(1)

 १. आकाशांच्या आणि धरतीच्या समस्तू वस्तू अल्लाहच्या पावित्र्याचे गुणगान करतात जो बादशहा (सर्वसत्ताधीश) आणि मोठा पवित्र, वर्चस्वशाली (आणि) बुद्धिकौशल्य बाळगणारा आहे

هُوَ الَّذِي بَعَثَ فِي الْأُمِّيِّينَ رَسُولًا مِّنْهُمْ يَتْلُو عَلَيْهِمْ آيَاتِهِ وَيُزَكِّيهِمْ وَيُعَلِّمُهُمُ الْكِتَابَ وَالْحِكْمَةَ وَإِن كَانُوا مِن قَبْلُ لَفِي ضَلَالٍ مُّبِينٍ(2)

 २. तोच आहे, ज्याने निरक्षर लोकांमध्ये त्यांच्यातूनच एक रसूल (पैगंबर) पाठविला, जो त्यांना त्याच्या आयती वाचून ऐकवितो आणि त्यांना स्वच्छ शुद्ध (पाक) करतो आणि त्यांना ग्रंथ व ज्ञान शिकवितो. निःसंशय हे यापूर्वी स्पष्ट अशा मार्गभ्रष्टतेत होते

وَآخَرِينَ مِنْهُمْ لَمَّا يَلْحَقُوا بِهِمْ ۚ وَهُوَ الْعَزِيزُ الْحَكِيمُ(3)

 ३. आणि दुसऱ्यांकरिताही त्यांच्यामधूनच जे अद्याप त्यांना सामील झाले नाहीत आणि तोच वर्चस्वशाली आणि हिकमत बाळगणारा आहे

ذَٰلِكَ فَضْلُ اللَّهِ يُؤْتِيهِ مَن يَشَاءُ ۚ وَاللَّهُ ذُو الْفَضْلِ الْعَظِيمِ(4)

 ४. ही अल्लाहची कृपा आहे ज्याला इच्छितो आपली कृपा प्रदान करतो आणि अल्लाह मोठा कृपाळू आहे

مَثَلُ الَّذِينَ حُمِّلُوا التَّوْرَاةَ ثُمَّ لَمْ يَحْمِلُوهَا كَمَثَلِ الْحِمَارِ يَحْمِلُ أَسْفَارًا ۚ بِئْسَ مَثَلُ الْقَوْمِ الَّذِينَ كَذَّبُوا بِآيَاتِ اللَّهِ ۚ وَاللَّهُ لَا يَهْدِي الْقَوْمَ الظَّالِمِينَ(5)

 ५. ज्या लोकांना तौरातनुसार काम करण्याचा आदेश दिला गेला, परंतु त्यांनी तो अमलात आणला नाही, त्यांचे उदाहरण त्या गाढवासारखे आहे ज्याने (पाठीवर) अनेक ग्रंथ लादलेले असावेत.१ अल्लाहच्या आयतींना याला खोटे ठरविणाऱ्यांचे फार वाईट उदाहरण आहे आणि अल्लाह अशा जुलमी लोकांना मार्गदर्शन करीत नाही

قُلْ يَا أَيُّهَا الَّذِينَ هَادُوا إِن زَعَمْتُمْ أَنَّكُمْ أَوْلِيَاءُ لِلَّهِ مِن دُونِ النَّاسِ فَتَمَنَّوُا الْمَوْتَ إِن كُنتُمْ صَادِقِينَ(6)

 ६. सांगा की हे यहुद्यांनो! जर तुमचा हा दावा आहे की तुम्ही अल्लाहचे दोस्त आहात, इतर लोकांखेरीज, तर तुम्ही मृत्युची अभिलाषा करा जर तुम्ही सच्चे असाल

وَلَا يَتَمَنَّوْنَهُ أَبَدًا بِمَا قَدَّمَتْ أَيْدِيهِمْ ۚ وَاللَّهُ عَلِيمٌ بِالظَّالِمِينَ(7)

 ७. हे मृत्युची कामना कधीही करणार नाहीत, (आपल्या) त्या कर्मांमुळे जी त्यांनी स्वहस्ते आपल्या आधी पाठविली आहेत आणि अल्लाह अत्याचारींना चांगल्या प्रकारे जाणतो

قُلْ إِنَّ الْمَوْتَ الَّذِي تَفِرُّونَ مِنْهُ فَإِنَّهُ مُلَاقِيكُمْ ۖ ثُمَّ تُرَدُّونَ إِلَىٰ عَالِمِ الْغَيْبِ وَالشَّهَادَةِ فَيُنَبِّئُكُم بِمَا كُنتُمْ تَعْمَلُونَ(8)

 ८. सांगा की, ज्या मृत्युपासून तुम्ही पळ काढत आहात, तो तर तुम्हाला अवश्य येऊन गाठेल, मग तुम्ही सर्व, लपलेल्या व उघड गोष्टींना जाणणाऱ्या अल्लाहकडे परतविले जाल आणि मग तो दाखविल की तुम्ही कसकसे कर्म करीत राहिलात

يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا إِذَا نُودِيَ لِلصَّلَاةِ مِن يَوْمِ الْجُمُعَةِ فَاسْعَوْا إِلَىٰ ذِكْرِ اللَّهِ وَذَرُوا الْبَيْعَ ۚ ذَٰلِكُمْ خَيْرٌ لَّكُمْ إِن كُنتُمْ تَعْلَمُونَ(9)

 ९. हे ईमान राखणाऱ्या लोकांनो! जुमअः (शुक्रवार) च्या दिवशी नमाजसाठी अजान दिली गेली असता तुम्ही अल्लाहच्या स्मरणाकडे त्वरित येत जा आणि खरेदी - विक्री सोडून द्या हे तुमच्यासाठी अधिक चांगले आहे, जर तुम्ही जाणत असाल

فَإِذَا قُضِيَتِ الصَّلَاةُ فَانتَشِرُوا فِي الْأَرْضِ وَابْتَغُوا مِن فَضْلِ اللَّهِ وَاذْكُرُوا اللَّهَ كَثِيرًا لَّعَلَّكُمْ تُفْلِحُونَ(10)

 १०. मग जेव्हा नमाज पूर्ण होईल तेव्हा धरतीवर (इतस्ततः) पसरा आणि अल्लाहची कृपा शोधा आणि अल्लाहचे अत्याधिक स्मरण करा, यासाठी की तुम्ही सफलता प्राप्त करून घ्यावी

وَإِذَا رَأَوْا تِجَارَةً أَوْ لَهْوًا انفَضُّوا إِلَيْهَا وَتَرَكُوكَ قَائِمًا ۚ قُلْ مَا عِندَ اللَّهِ خَيْرٌ مِّنَ اللَّهْوِ وَمِنَ التِّجَارَةِ ۚ وَاللَّهُ خَيْرُ الرَّازِقِينَ(11)

 ११. आणि जेव्हा एखादा सौदा विकताना पाहतात किंवा एखादा तमाशा दृष्टीस पडला असता त्याकडे धावतात आणि तुम्हाला उभेच सोडून देतात. (तुम्ही) सांगा की अल्लाहजवळ जे काही आहे ते खेळ आणि व्यापारापेक्षा अधिक चांगले आहे आणि अल्लाह सर्वांत चांगला रोजी देणारा (अन्नदाता) आहे


Marathi diğer sureler:

Bakara suresi Âl-i İmrân Nisâ suresi
Mâide suresi Yûsuf suresi İbrâhîm suresi
Hicr suresi Kehf suresi Meryem suresi
Hac suresi Kasas suresi Ankebût suresi
As-Sajdah Yâsîn suresi Duhân suresi
fetih suresi Hucurât suresi Kâf suresi
Necm suresi Rahmân suresi vakıa suresi
Haşr suresi Mülk suresi Hâkka suresi
İnşikâk suresi Alâ suresi Gâşiye suresi

En ünlü okuyucuların sesiyle Cuma Suresi indirin:

Surah Al-Jumuah mp3: yüksek kalitede dinlemek ve indirmek için okuyucuyu seçerek
Cuma Suresi Ahmed El Agamy
Ahmed El Agamy
Cuma Suresi Saad Al Ghamdi
Saad Al Ghamdi
Cuma Suresi Saud Al Shuraim
Saud Al Shuraim
Cuma Suresi Abdul Basit Abdul Samad
Abdul Basit
Cuma Suresi Abdullah Basfar
Abdullah Basfar
Cuma Suresi Abdullah Awwad Al Juhani
Abdullah Al Juhani
Cuma Suresi Ali Al Hudhaifi
Ali Al Hudhaifi
Cuma Suresi Fares Abbad
Fares Abbad
Cuma Suresi Maher Al Muaiqly
Maher Al Muaiqly
Cuma Suresi Muhammad Jibril
Muhammad Jibril
Cuma Suresi Muhammad Siddiq Al Minshawi
Al Minshawi
Cuma Suresi Al Hosary
Al Hosary
Cuma Suresi Al-afasi
Mishari Al-afasi
Cuma Suresi Nasser Al Qatami
Nasser Al Qatami
Cuma Suresi Yasser Al Dosari
Yasser Al Dosari


Sunday, August 16, 2026

Bizim için dua et, teşekkürler