وَالْمُرْسَلَاتِ عُرْفًا(1) १. मनमोहक, सतत चालणाऱ्या मंद हवेची शपथ |
فَالْعَاصِفَاتِ عَصْفًا(2) २. मग जोरात (वेगाने) वाहू लागणारींची शपथ |
وَالنَّاشِرَاتِ نَشْرًا(3) ३. आणि (ढगांना) पसरविणारींची शपथ |
فَالْفَارِقَاتِ فَرْقًا(4) ४. मग सत्य - असत्याला वेगवेगळे करणारे |
فَالْمُلْقِيَاتِ ذِكْرًا(5) ५. आणि वहयी (प्रकाशना) आणणाऱ्या फरिश्त्यांची शपथ |
عُذْرًا أَوْ نُذْرًا(6) ६. जी (वहयी) आरोपाचे खंडन करण्यासाठी किंवा सचेत करण्यासाठी असते |
إِنَّمَا تُوعَدُونَ لَوَاقِعٌ(7) ७. निःसंशय, ज्या गोष्टीचा तुमच्याशी वायदा केला जात आहे ती अगदी निश्चितपणे घडून येणार आहे |
فَإِذَا النُّجُومُ طُمِسَتْ(8) ८. तर जेव्हा तारे निस्तेज केले जातील |
وَإِذَا السَّمَاءُ فُرِجَتْ(9) ९. आणि आकाशाचा विध्वंस केला जाईल |
وَإِذَا الْجِبَالُ نُسِفَتْ(10) १०. आणि जेव्हा पर्वत तुकडे तुकडे करून उडविले जातील |
وَإِذَا الرُّسُلُ أُقِّتَتْ(11) ११. आणि जेव्हा पैगंबरांना निर्धारित वेळेवर आणले जाईल |
لِأَيِّ يَوْمٍ أُجِّلَتْ(12) १२. कोणत्या दिवसाकारीता (त्यांना) थांबविले गेले आहे |
لِيَوْمِ الْفَصْلِ(13) १३. निर्णयाच्या दिवसाकरिता |
وَمَا أَدْرَاكَ مَا يَوْمُ الْفَصْلِ(14) १४. आणि तुम्हाला काय माहीत की निर्णयाचा दिवस काय आहे |
وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ(15) १५. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी दुःस्थिती (विनाश) आहे |
أَلَمْ نُهْلِكِ الْأَوَّلِينَ(16) १६. काय आम्ही पूर्वी होऊन गेलेल्या लोकांना नष्ट नाही केले |
ثُمَّ نُتْبِعُهُمُ الْآخِرِينَ(17) १७. मग आम्ही त्यांच्या पाठोपाठ नंतरच्या लोकांना आणले |
كَذَٰلِكَ نَفْعَلُ بِالْمُجْرِمِينَ(18) १८. आम्ही अपराधी लोकांशी असाच व्यवहार करतो |
وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ(19) १९. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांकरिता विनाश आहे |
أَلَمْ نَخْلُقكُّم مِّن مَّاءٍ مَّهِينٍ(20) २०. काय आम्ही तुम्हाला तुच्छ पाण्या (वीर्या) पासून निर्माण केले नाही |
فَجَعَلْنَاهُ فِي قَرَارٍ مَّكِينٍ(21) २१. मग आम्ही त्यास मजबूत (आणि सुरक्षित) स्थानी ठेवले |
إِلَىٰ قَدَرٍ مَّعْلُومٍ(22) २२. एका निर्धारित वेळे पर्यर्ंत |
فَقَدَرْنَا فَنِعْمَ الْقَادِرُونَ(23) २३. मग आम्ही अनुमान लावले, तर आम्ही किती चांगले अनुमान लावणारे आहोत |
وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ(24) २४. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे |
أَلَمْ نَجْعَلِ الْأَرْضَ كِفَاتًا(25) २५. काय आम्ही जमिनीला संचयित करणारी नाही बनविले |
أَحْيَاءً وَأَمْوَاتًا(26) २६. जिवंत असलेल्यांनाही आणि मेलेल्यांनाही |
وَجَعَلْنَا فِيهَا رَوَاسِيَ شَامِخَاتٍ وَأَسْقَيْنَاكُم مَّاءً فُرَاتًا(27) २७. आणि आम्ही तिच्यात उंच (आणि वजनदार) पर्वत बनविले, आणि तुम्हाला सिंचित करणारे गोड पाणी पाजले |
وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ(28) २८. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे |
انطَلِقُوا إِلَىٰ مَا كُنتُم بِهِ تُكَذِّبُونَ(29) २९. त्या (जहन्नम) कडे जा, जिला तुम्ही खोटे ठरवित होते |
انطَلِقُوا إِلَىٰ ظِلٍّ ذِي ثَلَاثِ شُعَبٍ(30) ३०. चला त्या सावलीकडे, जिला तीन शाखा आहेत |
لَّا ظَلِيلٍ وَلَا يُغْنِي مِنَ اللَّهَبِ(31) ३१. जी वास्तविक ना छाया देणारी आहे आणि ना ज्वालापासून वाचवू शकते |
إِنَّهَا تَرْمِي بِشَرَرٍ كَالْقَصْرِ(32) ३२. निःसंशय, (जहन्नम) महालासारख्या चिंगाऱ्या फेकते |
كَأَنَّهُ جِمَالَتٌ صُفْرٌ(33) ३३. जणू काही ते पिवळे उंट आहेत |
وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ(34) ३४. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी दुर्दशा (विनाश) आहे |
هَٰذَا يَوْمُ لَا يَنطِقُونَ(35) ३५. आज (चा दिवस) असा दिवस आहे की ते बोलूही शकणार नाहीत |
وَلَا يُؤْذَنُ لَهُمْ فَيَعْتَذِرُونَ(36) ३६. ना त्यांना सबब मांडण्याची अनुमती दिली जाईल |
وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ(37) ३७. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांची दुःस्थिती ( खराबी ) आहे |
هَٰذَا يَوْمُ الْفَصْلِ ۖ جَمَعْنَاكُمْ وَالْأَوَّلِينَ(38) ३८. हा आहे फैसल्याचा दिवस. आम्ही तुम्हाला आणि पूर्वी होऊन गेलेल्या लोकांना (सर्वांना) एकत्रित केले आहे |
فَإِن كَانَ لَكُمْ كَيْدٌ فَكِيدُونِ(39) ३९. तेव्हा जर तुम्ही माझ्याशी एखादी चाल खेळू शकत असाल तर खेळून पाहा |
وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ(40) ४०. दुःख आहे त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांकरिता |
إِنَّ الْمُتَّقِينَ فِي ظِلَالٍ وَعُيُونٍ(41) ४१. निःसंशय, नेक सदाचारी लोक सावलीत असतील आणि वाहत्या झऱ्यांमध्ये |
وَفَوَاكِهَ مِمَّا يَشْتَهُونَ(42) ४२. आणि त्या फळांमध्ये, ज्यांची ते इच्छा करतील |
كُلُوا وَاشْرَبُوا هَنِيئًا بِمَا كُنتُمْ تَعْمَلُونَ(43) ४३. (हे जन्नतमध्ये राहणाऱ्यांनो!) मजेत खा आणि प्या, आपल्या कृत-कर्मांच्या मोबदल्यात |
إِنَّا كَذَٰلِكَ نَجْزِي الْمُحْسِنِينَ(44) ४४. निःसंशय, आम्ही सत्कर्म (नेकी) करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो |
وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ(45) ४५. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांकरिता मोठे दुःख आहे |
كُلُوا وَتَمَتَّعُوا قَلِيلًا إِنَّكُم مُّجْرِمُونَ(46) ४६. (हे खोटे ठरविणाऱ्यांनो!) तुम्ही (या जगात) थोडे खाऊन पिऊन घ्या आणि लाभ प्राप्त करून घ्या. निश्चितच तुम्ही अपराधी आहात |
وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ(47) ४७. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे |
وَإِذَا قِيلَ لَهُمُ ارْكَعُوا لَا يَرْكَعُونَ(48) ४८. त्यांना जेव्हा सांगितले जाते की रुकूअ करा (झुका) तर करीत नाही |
وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ(49) ४९. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांचा विनाश आहे |
فَبِأَيِّ حَدِيثٍ بَعْدَهُ يُؤْمِنُونَ(50) ५०. आता या (कुरआना) नंतर कोणत्या गोष्टीवर ईमान राखतील |