🔥 0 दिवस सलग
📖 लांब सूरा — लहान भागांमध्ये विभागली आहे (53 आयत)
📚 सर्व सूरा
30%
🎤 तुमचा आवाज रेकॉर्ड करण्यासाठी कोणत्याही आयतीजवळील मायक्रोफोन चिन्हावर 🎙️ टॅप करा, नंतर ऐका आणि कारीशी तुलना करा.
0/53
42:1 🔁 0/5
حمٓ  ۝١
Haa Meeem
१. हा मीम
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:2 🔁 0/5
عٓسٓقٓ  ۝٢
Ayyyn Seeen Qaaaf
२. ऐन. सीन. काफ
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:3 🔁 0/5
كَذَٰلِكَ يُوحِيٓ إِلَيۡكَ وَإِلَى ٱلَّذِينَ مِن قَبۡلِكَ ٱللَّهُ ٱلۡعَزِيزُ ٱلۡحَكِيمُ  ۝٣
Kazaalika yooheee ilaika wa ilal lazeena min qablikal laahul `Azeezul Hakeem
३. अल्लाह, जो मोठा वर्चस्वशाली आणि हिकमतशाली आहे, अशा प्रकारे तुमच्याकडे आणि तुमच्या पूर्वीच्या लोकांकडे वहयी पाठवित राहिला
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:4 🔁 0/5
لَهُۥ مَا فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَمَا فِي ٱلۡأَرۡضِۖ وَهُوَ ٱلۡعَلِيُّ ٱلۡعَظِيمُ  ۝٤
Lahoo maa fis samaa waati wa maa fil ardi wa Huwal `Aliyul `Azeem
४. जे काही आकाशांमध्ये आहे आणि जे काही धरतीत आहे सर्व त्याचेच आहे आणि तो सर्वोच्च व सर्वांत महान आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:5 🔁 0/5
تَكَادُ ٱلسَّمَٰوَٰتُ يَتَفَطَّرۡنَ مِن فَوۡقِهِنَّۚ وَٱلۡمَلَٰٓئِكَةُ يُسَبِّحُونَ بِحَمۡدِ رَبِّهِمۡ وَيَسۡتَغۡفِرُونَ لِمَن فِي ٱلۡأَرۡضِۗ أَلَآ إِنَّ ٱللَّهَ هُوَ ٱلۡغَفُورُ ٱلرَّحِيمُ  ۝٥
Takaadus samaawaatu yatafattarna min fawqihinn; walmalaaa`ikatu yusabbihoona bihamdi Rabbihim wa yastaghfiroona liman fil ard; alaaa innal laaha huwal Ghafoorur Raheem
५. निकट आहे की आकाश आपल्यावरून विदीर्ण व्हावे, आणि सर्व फरिश्ते आपल्या पालनकर्त्याची पवित्रता त्याच्या प्रशंसेसह वर्णन करीत आहेत आणि धरतीवर असणाऱ्यांकरिता क्षमा-याचना करीत आहेत. खूप लक्षात घ्या की अल्लाहच माफ करणारा, दया करणारा आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:6 🔁 0/5
وَٱلَّذِينَ ٱتَّخَذُواْ مِن دُونِهِۦٓ أَوۡلِيَآءَ ٱللَّهُ حَفِيظٌ عَلَيۡهِمۡ وَمَآ أَنتَ عَلَيۡهِم بِوَكِيلٍ  ۝٦
Wallazeenat takhazoo min dooniheee awliyaaa`al laahu hafeezun `alaihim wa maaa anta `alaihim biwakeel
६. आणि ज्या लोकांनी त्याच्याखेरीज दुसऱ्यांना औलिया (मित्र, सहाय्यक) बनवून घेतले आहे, अल्लाह त्यांना चांगल्या प्रकारे पाहत आहे, आणि तुम्ही त्यांच्याकरिता उत्तरदायी (जबाबदार) नाहीत
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:7 🔁 0/5
وَكَذَٰلِكَ أَوۡحَيۡنَآ إِلَيۡكَ قُرۡءَانًا عَرَبِيًّا لِّتُنذِرَ أُمَّ ٱلۡقُرَىٰ وَمَنۡ حَوۡلَهَا وَتُنذِرَ يَوۡمَ ٱلۡجَمۡعِ لَا رَيۡبَ فِيهِۚ فَرِيقٌ فِي ٱلۡجَنَّةِ وَفَرِيقٌ فِي ٱلسَّعِيرِ  ۝٧
Wa kazaalika awhainaaa llaika Qur-aanan `Arabiyyal litunzir aUmmal Quraa wa man hawlahaa wa tunzira Yawmal Jam`ilaa raiba feeh; fareequn fil jannati wa fareequn fissa`eer
७. आणि त्याच प्रकारे आम्ही आपल्याकडे अरबी कुरआनाची वहयी केली आहे, यासाठी की तुम्ही मक्का आणि त्याच्या जवळपासच्या इलाक्यात राहणाऱ्यांना खबरदार करावे आणि एकत्रित केले जाण्याच्या दिवसापासून, ज्याच्या येण्याबाबत काही शंका नाही, भय दाखवावे. एक गट जन्नतमध्ये असेल आणि एक गट जहन्नममध्ये असेल
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:8 🔁 0/5
وَلَوۡ شَآءَ ٱللَّهُ لَجَعَلَهُمۡ أُمَّةً وَٰحِدَةً وَلَٰكِن يُدۡخِلُ مَن يَشَآءُ فِي رَحۡمَتِهِۦۚ وَٱلظَّٰلِمُونَ مَا لَهُم مِّن وَلِيٍّ وَلَا نَصِيرٍ  ۝٨
Wa law shaaa`al laahu laja`alahum ummatanw waahi datanw walaakiny yudkhilumany yashaaa`u fee rahmatih; waz zaalimoona maa lahum minw waliyyinw wa laa naseer
८. जर अल्लाहने इच्छिले असते तर त्या सर्वांना एकच समुदाय (उम्मत) बनविले असते, परंतु तो ज्याला इच्छितो आपल्या दया-कृपेत सामील करतो आणि अत्याचारींचा पाठीराखा आणि सहाय्यक कोणीही नाही
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:9 🔁 0/5
أَمِ ٱتَّخَذُواْ مِن دُونِهِۦٓ أَوۡلِيَآءَۖ فَٱللَّهُ هُوَ ٱلۡوَلِيُّ وَهُوَ يُحۡيِ ٱلۡمَوۡتَىٰ وَهُوَ عَلَىٰ كُلِّ شَيۡءٍ قَدِيرٌ  ۝٩
Amit takhazoo min dooniheee awliyaaa`a fallaahu Huwal Waliyyu wa Huwa yuhyil mawtaa wa Huwa `alaa kulli shai`in Qadeer
९. काय त्या लोकांनी अल्लाहखेरीज दुसरे कार्य साधक बनवून घेतले आहे, (वस्तुतः) अल्लाहच वाली (संरक्षक) आहे. तोच मृतांना जिवंत करील आणि तोच प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:10 🔁 0/5
وَمَا ٱخۡتَلَفۡتُمۡ فِيهِ مِن شَيۡءٍ فَحُكۡمُهُۥٓ إِلَى ٱللَّهِۚ ذَٰلِكُمُ ٱللَّهُ رَبِّي عَلَيۡهِ تَوَكَّلۡتُ وَإِلَيۡهِ أُنِيبُ  ۝١٠
Wa makh-talaftum feehi min shai`in fahukmuhooo ilallaah; zaalikumul laahu Rabbee `alaihi tawakkaltu wa ilaihi uneeb
१०. आणि ज्या ज्या गोष्टीत तुमचा मतभेद असेल, त्याचा फैसला अल्लाहच्या हाती आहे.१ हाच अल्लाह माझा स्वामी व पालनकर्ता आहे, ज्यावर मी भरवसा ठेवला आहे आणि ज्याच्याकडे मी झुकतो
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:11 🔁 0/5
فَاطِرُ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۚ جَعَلَ لَكُم مِّنۡ أَنفُسِكُمۡ أَزۡوَٰجًا وَمِنَ ٱلۡأَنۡعَٰمِ أَزۡوَٰجًا يَذۡرَؤُكُمۡ فِيهِۚ لَيۡسَ كَمِثۡلِهِۦ شَيۡءٌۖ وَهُوَ ٱلسَّمِيعُ ٱلۡبَصِيرُ  ۝١١
Faatirus samaawaati wal ard; ja`ala lakum min anfusikum azwaajanw wa minal an`aami azwaajany yazra`ukum feeh; laisa kamislihee shai`unw wa Huwas Samee`ul Baseer
११. तो आकाश आणि धरतीला निर्माण करणारा आहे. त्याने तुमच्यासाठी तुमच्या जाती-प्रकारातून जोड्या बनविल्या आहेत आणि चतुष्पाद प्राण्यांच्याही जोड्या बनविल्या आहेत. तुम्हाला तो त्यात पसरवित आहे, त्याच्यासारखे अन्य काहीही नाही. तो सर्व काही ऐकणारा आणि पाहणारा आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:12 🔁 0/5
لَهُۥ مَقَالِيدُ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۖ يَبۡسُطُ ٱلرِّزۡقَ لِمَن يَشَآءُ وَيَقۡدِرُۚ إِنَّهُۥ بِكُلِّ شَيۡءٍ عَلِيمٌ  ۝١٢
Lahoo maqaaleedus samaawaati wal ardi yabsutur rizqa limany yashaaa`u wa yaqdir; innahoo bikulli shai`unw wa Huwas Samee`ul Baseer
१२. आकाशांच्या व धरतीच्या चाव्या त्याच्याच ताब्यात आहेत. ज्याला इच्छितो अमाप रोजी (आजिविका) प्रदान करतो आणि ज्याला इच्छितो अपर्याप्त देतो. निःसंशय, तो प्रत्येक गोष्टीचे ज्ञान बाळगणारा आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:13 🔁 0/5
۞ شَرَعَ لَكُم مِّنَ ٱلدِّينِ مَا وَصَّىٰ بِهِۦ نُوحًا وَٱلَّذِيٓ أَوۡحَيۡنَآ إِلَيۡكَ وَمَا وَصَّيۡنَا بِهِۦٓ إِبۡرَٰهِيمَ وَمُوسَىٰ وَعِيسَىٰٓۖ أَنۡ أَقِيمُواْ ٱلدِّينَ وَلَا تَتَفَرَّقُواْ فِيهِۚ كَبُرَ عَلَى ٱلۡمُشۡرِكِينَ مَا تَدۡعُوهُمۡ إِلَيۡهِۚ ٱللَّهُ يَجۡتَبِيٓ إِلَيۡهِ مَن يَشَآءُ وَيَهۡدِيٓ إِلَيۡهِ مَن يُنِيبُ  ۝١٣
Shara`a lakum minad deeni maa wassaa bihee Noohanw wallazeee awhainaaa ilaika wa maa wassainaa biheee Ibraaheema wa Moosa wa `Eesaaa an aqeemud adeena wa laa tatafarraqoo feeh; kabura `alal mushrikeena maa tad`oohum ilaih; Allaahu yajtabee ilaihi many yashaaa`u wa yahdeee ilaihi mai yuneeb
१३. अल्लाहने तुमच्यासाठी तोच दीन (धर्म) निर्धारित केला आहे, ज्याला कायम करण्याचा आदेश त्याने नूह (अलै.) ला दिला होता, जो (वहयीद्वारे) आम्ही तुमच्याकडे पाठविला आहे आणि ज्याचा खास आदेश आम्ही इब्राहीम आणि मूसा आणि ईसा (अलै.) यांना दिला होता की या दीन (धर्मा) ला कायम राखा आणि यात फूट पाडू नका, ज्या गोष्टीकडे तुम्ही त्यांना बोलावित आहात, ती तर (त्या) अनेकेश्वरवाद्यांना अप्रिय वाटते. अल्लाह ज्याला इच्छितो आपला निवडक (दास) बनवितो आणि जो देखील त्याच्याकडे लक्ष केंद्रित करतो, तर अशांचे तो यथायोग्य मार्गदर्शन करतो
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:14 🔁 0/5
وَمَا تَفَرَّقُوٓاْ إِلَّا مِنۢ بَعۡدِ مَا جَآءَهُمُ ٱلۡعِلۡمُ بَغۡيَۢا بَيۡنَهُمۡۚ وَلَوۡلَا كَلِمَةٌ سَبَقَتۡ مِن رَّبِّكَ إِلَىٰٓ أَجَلٍ مُّسَمًّى لَّقُضِيَ بَيۡنَهُمۡۚ وَإِنَّ ٱلَّذِينَ أُورِثُواْ ٱلۡكِتَٰبَ مِنۢ بَعۡدِهِمۡ لَفِي شَكٍّ مِّنۡهُ مُرِيبٍ  ۝١٤
Wa maa tafarraqooo illaa mim ba`di maa jaaa`ahumul `ilmu baghyam bainahum; wa law laa Kalimatun sabaqat mir Rabbika ilaaa ajalim musammal laqudiya bainahum; wa innal lazeena oorisul Kitaaba mim ba`dihim lafee shakkim minhu mureeb
१४. आणि त्या लोकांनी आपल्याजवळ ज्ञान येऊन पोहोचल्यानंतर मतभेद केला (केवळ) हट्टापायी आणि जर तुमच्या पालनकर्त्याचे फर्मान एका निर्धारित अवधीपर्यर्ंत आधीपासून निश्चित केले गेले नसते तर त्यांचा फैसला केव्हाच झाला असता आणि ज्यांना, त्यांच्यानंतर ग्रंथ दिला गेला आहे, तेही त्याच्या संबंधाने संशयात पडले आहेत
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:15 🔁 0/5
فَلِذَٰلِكَ فَٱدۡعُۖ وَٱسۡتَقِمۡ كَمَآ أُمِرۡتَۖ وَلَا تَتَّبِعۡ أَهۡوَآءَهُمۡۖ وَقُلۡ ءَامَنتُ بِمَآ أَنزَلَ ٱللَّهُ مِن كِتَٰبٍۖ وَأُمِرۡتُ لِأَعۡدِلَ بَيۡنَكُمُۖ ٱللَّهُ رَبُّنَا وَرَبُّكُمۡۖ لَنَآ أَعۡمَٰلُنَا وَلَكُمۡ أَعۡمَٰلُكُمۡۖ لَا حُجَّةَ بَيۡنَنَا وَبَيۡنَكُمُۖ ٱللَّهُ يَجۡمَعُ بَيۡنَنَاۖ وَإِلَيۡهِ ٱلۡمَصِيرُ  ۝١٥
Falizaalika fad`u wastaqim kamaaa umirta wa laa tattabi` ahwaaa`ahum wa qul aamantu bimaaa anzalal laahu min Kitaab, wa umirtu li a`dila bainakum Allaahu Rabbunaa wa Rabbukum lanaaa a`maa lunaa wa lakum a`maalukim laa hujjata bainanaa wa baina kumul laahu yajma`u bainanaa wa ilaihil maseer
१५. तेव्हा तुम्ही त्याच्याचकडे लोकांना बोलवित राहा आणि जे काही तुम्हाला सांगितले गेले आहे, त्यावर दृढतापूर्वक राहा आणि त्यांच्या इच्छा - आकांक्षांचे अनुसरण करू नका आणि सांगा की अल्लाहने जेवढे ग्रंथ अवतरित केले आहेत, मी त्यांच्यावर ईमान राखतो आणि मला आदेश दिला गेला आहे की तुमच्या दरम्यान न्याय-निवाडा करीत राहावे. आमचा आणि तुम्हा सर्वांचा स्वामी व पालनकर्ता अल्लाहच आहे. आमचे आचरण आमच्यासाठी आहे आणि तुमचे आचरण तुमच्यासाठी आहे. आमच्या व तुमच्या दरम्यान कसलाही तंटा नाही, अल्लाह आम्हा सर्वांना एकत्र करील आणि त्याच्याचकडे परतून जायचे आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:16 🔁 0/5
وَٱلَّذِينَ يُحَآجُّونَ فِي ٱللَّهِ مِنۢ بَعۡدِ مَا ٱسۡتُجِيبَ لَهُۥ حُجَّتُهُمۡ دَاحِضَةٌ عِندَ رَبِّهِمۡ وَعَلَيۡهِمۡ غَضَبٌ وَلَهُمۡ عَذَابٌ شَدِيدٌ  ۝١٦
Wallazeena yuhaaajjoona fil laahi mim ba`di mastujeeba lahoo hujjatuhum daahidatun `inda Rabbihim wa `alaihim ghadabunw wa lahum `azaabun shadeed
१६. आणि जे लोक अल्लाहच्या संदर्भात वाद निर्माण करतात, या उपरांत की (सृष्टीने) ते मान्य केले आहे, त्यांचा विवाद अल्लाहच्या निकट खोटा आहे आणि त्यांच्यावर ईश-प्रकोप आहे आणि त्यांच्यासाठी सक्त अज़ाब (शिक्षा - यातना) आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:17 🔁 0/5
ٱللَّهُ ٱلَّذِيٓ أَنزَلَ ٱلۡكِتَٰبَ بِٱلۡحَقِّ وَٱلۡمِيزَانَۗ وَمَا يُدۡرِيكَ لَعَلَّ ٱلسَّاعَةَ قَرِيبٌ  ۝١٧
Allahul lazeee anzalal Kitaaba bilhaqqi wal Meezaan; wa ma yudreeka la`allas Saa`ata qareeb
१७. अल्लाहने सत्यासह ग्रंथ अवतरित केला आहे आणि तराजू देखील (अवतरित केला आहे) आणि तुम्हाला काय माहीत की कदाचित कयामत जवळच येऊन ठेपली असेल
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:18 🔁 0/5
يَسۡتَعۡجِلُ بِهَا ٱلَّذِينَ لَا يُؤۡمِنُونَ بِهَاۖ وَٱلَّذِينَ ءَامَنُواْ مُشۡفِقُونَ مِنۡهَا وَيَعۡلَمُونَ أَنَّهَا ٱلۡحَقُّۗ أَلَآ إِنَّ ٱلَّذِينَ يُمَارُونَ فِي ٱلسَّاعَةِ لَفِي ضَلَٰلِۭ بَعِيدٍ  ۝١٨
Yasta`jilu bihal lazeena laa yu`minoona bihaa wallazeena aamanoo mushfiqoona minhaa wa ya`lamoona annahal haqq; alaaa innal lazeena yumaaroona fis Saa`ati lafee dalaalim ba`eed
१८. याची घाई त्यांनाच पडली आहे, जे त्यावर ईमान राखत नाहीत आणि जे त्यावर ईमान राखतात, ते त्याचे भय बाळगतात आणि त्यांना ते सत्य असण्याचे पूर्ण ज्ञान आहे. लक्षात ठेवा, जे लोक कयामतविषयी वाद-विवाद करीत आहेत, ते दूरच्या मार्गभ्रष्टतेत जाऊन पडले आहेत
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:19 🔁 0/5
ٱللَّهُ لَطِيفُۢ بِعِبَادِهِۦ يَرۡزُقُ مَن يَشَآءُۖ وَهُوَ ٱلۡقَوِيُّ ٱلۡعَزِيزُ  ۝١٩
Allahu lateefum bi`ibaadihee yarzuqu mai yashaaa`u wa Huwal Qawiyyul `Azeez
१९. अल्लाह आपल्या दासांवर मोठा कृपा करणारा आहे, ज्याला इच्छितो अधिक आजिविका (रोजी) प्रदान करतो आणि तो मोठा शक्तिशाली मोठा वर्चस्वशाली आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:20 🔁 0/5
مَن كَانَ يُرِيدُ حَرۡثَ ٱلۡأٓخِرَةِ نَزِدۡ لَهُۥ فِي حَرۡثِهِۦۖ وَمَن كَانَ يُرِيدُ حَرۡثَ ٱلدُّنۡيَا نُؤۡتِهِۦ مِنۡهَا وَمَا لَهُۥ فِي ٱلۡأٓخِرَةِ مِن نَّصِيبٍ  ۝٢٠
Man kaana yureedu harsal Aakhirati nazid lahoo fee harsihee wa man kaana yureedu harsad dunyaa nu`tihee mnhaa wa maa lahoo fil Aakhirati min naseeb
२०. ज्याचा संकल्प आखिरतच्या शेतीचा असेल तर आम्ही त्याच्या शेतीत आणखी जास्त वाढकरू आणि जो ऐहिक शेतीची इच्छा बाळगत असेल तर आम्ही त्याला त्यातून काही देऊन टाकू, मात्र अशा माणसाचा आखिरतमध्ये कसलाही हिस्सा नाही
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:21 🔁 0/5
أَمۡ لَهُمۡ شُرَكَٰٓؤُاْ شَرَعُواْ لَهُم مِّنَ ٱلدِّينِ مَا لَمۡ يَأۡذَنۢ بِهِ ٱللَّهُۚ وَلَوۡلَا كَلِمَةُ ٱلۡفَصۡلِ لَقُضِيَ بَيۡنَهُمۡۗ وَإِنَّ ٱلظَّٰلِمِينَ لَهُمۡ عَذَابٌ أَلِيمٌ  ۝٢١
Am lahum shurakaaa`u shara`oo lahum minad deeni maa lam yaazam bihil laah; wa law laa kalimatul fasli laqudiya bainahum; wa innaz zaalimeena lahum `azaabun aleem
२१. काय त्या लोकांनी (अल्लाहचे) असे सहभागी (निर्धारित केले) आहेत, ज्यांनी असे धार्मिक आदेश निश्चित केले आहेत, जे अल्लाहने फर्माविलेले नाहीत. जर फैसल्याच्या दिवसाचा वायदा नसता तर (याच क्षणी) त्यांचा फैसला केला गेला असता. निःसंशय, त्या अत्याचारींकरिताच दुःखदायक शिक्षा - यातना आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:22 🔁 0/5
تَرَى ٱلظَّٰلِمِينَ مُشۡفِقِينَ مِمَّا كَسَبُواْ وَهُوَ وَاقِعُۢ بِهِمۡۗ وَٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّٰلِحَٰتِ فِي رَوۡضَاتِ ٱلۡجَنَّاتِۖ لَهُم مَّا يَشَآءُونَ عِندَ رَبِّهِمۡۚ ذَٰلِكَ هُوَ ٱلۡفَضۡلُ ٱلۡكَبِيرُ  ۝٢٢
Taraz zaalimeena mushfiqeena mimmaa kasaboo wa huwa waaqi`um bihim; wallazeena aamanoo wa `amilus saalihaati fee rawdaatil jannaati lahum maa yashaaa`oona `inda Rabbihim; zaalika huwal fadlul kabeer
२२. तुम्ही पाहाल की हे अत्याचारी आपल्या दुष्कर्मां (च्या दुष्परिणती) चे भय बाळगत असतील, जे निश्चितच त्यांच्यावर घडून येणार आहे, आणि ज्या लोकांनी ईमान राखले आणि जे सत्कर्मही करीत राहिले तर ते जे काही इच्छितील, त्यांना आपल्या पालनकर्त्याजवळ लाभेल हाच आहे मोठा अनुग्रह
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:23 🔁 0/5
ذَٰلِكَ ٱلَّذِي يُبَشِّرُ ٱللَّهُ عِبَادَهُ ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّٰلِحَٰتِۗ قُل لَّآ أَسۡـَٔلُكُمۡ عَلَيۡهِ أَجۡرًا إِلَّا ٱلۡمَوَدَّةَ فِي ٱلۡقُرۡبَىٰۗ وَمَن يَقۡتَرِفۡ حَسَنَةً نَّزِدۡ لَهُۥ فِيهَا حُسۡنًاۚ إِنَّ ٱللَّهَ غَفُورٌ شَكُورٌ  ۝٢٣
Zaalikal lazee yubash shirul laahu `ibaadahul lazeena aamanoo wa `amilus saalihaat; qul laaa as`alukum `alaihi ajran illal mawaddata fil qurbaa; wa mai yaqtarif hasanatan nazid lahoo feehaa husnaa; innal laaha Ghafoorun Shakoor
२३. हेच ते होय, ज्याचा शुभ समाचार अल्लाह त्या दासांना देत आहे ज्यांनी ईमान राखले आणि (पैगंबर आचरणशैलीनुसार) कर्म करीत राहिले, तेव्हा सांगा की मी त्याबद्दल तुमच्याकडून कसलाही मोबदला इच्छित नाही, परंतु नाते-संबंधाचे प्रेम, आणि जो मनुष्य सत्कर्म करील आम्ही त्याच्या सत्कर्मात आणखी जास्त वाढकरू. निःसंशय, अल्लाह मोठा माफ करणारा, मोठा कदर जाणणारा आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:24 🔁 0/5
أَمۡ يَقُولُونَ ٱفۡتَرَىٰ عَلَى ٱللَّهِ كَذِبًاۖ فَإِن يَشَإِ ٱللَّهُ يَخۡتِمۡ عَلَىٰ قَلۡبِكَۗ وَيَمۡحُ ٱللَّهُ ٱلۡبَٰطِلَ وَيُحِقُّ ٱلۡحَقَّ بِكَلِمَٰتِهِۦٓۚ إِنَّهُۥ عَلِيمُۢ بِذَاتِ ٱلصُّدُورِ  ۝٢٤
Am yaqooloonaf tara `alal laahi kaziban fa-iny yasha il laahu yakhtim `alaa qalbik; wa yamhul laahul baatila wa yuhiqqul haqqa bi Kalimaatih; innahoo `Aleemum bizaatis sudoor
२४. काय हे असे सांगतात की (पैगंबराने) अल्लाहविषयी खोटे रचले आहे. अल्लाहने इच्छिले तर तुमच्या हृदयावर मोहर लावील, आणि अल्लाह आपल्या कथनांनी असत्याला मिटवितो आणि सत्याला बाकी राखतो. तो तर छाती (मना) तल्या गुप्त गोष्टीही जाणणारा आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:25 🔁 0/5
وَهُوَ ٱلَّذِي يَقۡبَلُ ٱلتَّوۡبَةَ عَنۡ عِبَادِهِۦ وَيَعۡفُواْ عَنِ ٱلسَّيِّـَٔاتِ وَيَعۡلَمُ مَا تَفۡعَلُونَ  ۝٢٥
Wa Huwal lazee yaqbalut tawbata `an `ibaadihee wa ya`foo `anis saiyiaati wa ya`lamu maa taf`aloon
२५. आणि तोच आहे जो आपल्या दासांची तौबा (क्षमा - याचना) कबूल करतो१ आणि अपराधांना क्षमा करतो आणि तुम्ही जे काही करीत आहात, ते सर्व जाणतो
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:26 🔁 0/5
وَيَسۡتَجِيبُ ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّٰلِحَٰتِ وَيَزِيدُهُم مِّن فَضۡلِهِۦۚ وَٱلۡكَٰفِرُونَ لَهُمۡ عَذَابٌ شَدِيدٌ  ۝٢٦
Wa yastajeebul lazeena aamanoo wa `amilu saalihaati wa yazeeduhum min fadlih; wal kaafiroona lahum `azaabun shadeed
२६. आणि ईमान राखणाऱ्यांची व नेक सदाचारी लोकांची (दुआ - प्रार्थना) ऐकतो आणि त्यांना आपल्या कृपेने आणखी जास्त प्रदान करतो, आणि काफिरांसाठी कठोर शिक्षा - यातना आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:27 🔁 0/5
۞ وَلَوۡ بَسَطَ ٱللَّهُ ٱلرِّزۡقَ لِعِبَادِهِۦ لَبَغَوۡاْ فِي ٱلۡأَرۡضِ وَلَٰكِن يُنَزِّلُ بِقَدَرٍ مَّا يَشَآءُۚ إِنَّهُۥ بِعِبَادِهِۦ خَبِيرُۢ بَصِيرٌ  ۝٢٧
Wa law basatal laahur rizqa li`ibaadihee labaghaw fil ardi wa laakiny yunazzilu biqadarim maa yashaaa`; innahoo bi`ibaadihee Khabeerum Baseer
२७. आणि जर अल्लाहने आपल्या समस्त दासांना विशालतापूर्वक रोजी (आजिविका) दिली असती तर त्यांनी धरतीवर उत्पात (फसाद) माजविला असता, परंतु तो अनुमानाने जे काही इच्छितो अवतरित करतो. तो आपल्या दासांविषयी चांगल्या प्रकारे जाणकार आहे आणि चांगल्या प्रकारे पाहणारा आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:28 🔁 0/5
وَهُوَ ٱلَّذِي يُنَزِّلُ ٱلۡغَيۡثَ مِنۢ بَعۡدِ مَا قَنَطُواْ وَيَنشُرُ رَحۡمَتَهُۥۚ وَهُوَ ٱلۡوَلِيُّ ٱلۡحَمِيدُ  ۝٢٨
Wa Huwal lazee yunazzilul ghaisa mim ba`di maa qanatoo wa yanshuru rahmatah; wa Huwal Waliyyul Hameed
२८. आणि तोच होय, जो लोकांचे निराश झाल्यानंतर पर्जन्यवृष्टी करतो. आणि आपल्या दयेला विस्तृत करतो. तोच आहे मित्र- सहाय्यक, आणि श्रेष्ठता व प्रशंसेस पात्र
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:29 🔁 0/5
وَمِنۡ ءَايَٰتِهِۦ خَلۡقُ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِ وَمَا بَثَّ فِيهِمَا مِن دَآبَّةٍۚ وَهُوَ عَلَىٰ جَمۡعِهِمۡ إِذَا يَشَآءُ قَدِيرٌ  ۝٢٩
Wa min Aayaatihee khalqus samaawaati wal ardi wa maa bassa feehimaa min daaabbah; wa Huwa `alaa jam`ihim izaa yashaaa`u Qadeer
२९. आणि त्याच्या निशाण्यांपैकी आकाश व धरतीचे निर्माण करणे, आणि त्यांच्यात सजीवांना पसरविणे होय. तो या गोष्टीसही समर्थ आहे की जेव्हा इच्छिल त्यांना एकत्र करील
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:30 🔁 0/5
وَمَآ أَصَٰبَكُم مِّن مُّصِيبَةٍ فَبِمَا كَسَبَتۡ أَيۡدِيكُمۡ وَيَعۡفُواْ عَن كَثِيرٍ  ۝٣٠
Wa maaa asaabakum mim museebatin fabimaa kasabat aydeekum wa ya`foo `an kaseer
३०. आणि जे काही संकट तुम्हाला पोहोचते, ते तुमच्या आपल्या हातांच्या दुष्कर्मांचे (फळ) आहे आणि तो बहुतेक गोष्टींना माफ करतो
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:31 🔁 0/5
وَمَآ أَنتُم بِمُعۡجِزِينَ فِي ٱلۡأَرۡضِۖ وَمَا لَكُم مِّن دُونِ ٱللَّهِ مِن وَلِيٍّ وَلَا نَصِيرٍ  ۝٣١
Wa maaa antum bimu`jizeena fil ardi wa maa lakum min doonil laahi minw wa liyyinw wa laa naseer
३१. आणि तुम्ही आम्हाला धरतीवर अगतिक (लाचार) करणारे नाहीत. आणि तुमच्यासाठी अल्लाहखेरीज कोणीही मित्र - सहाय्यक नाही आणि ना कोणी मदत करणारा
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:32 🔁 0/5
وَمِنۡ ءَايَٰتِهِ ٱلۡجَوَارِ فِي ٱلۡبَحۡرِ كَٱلۡأَعۡلَٰمِ  ۝٣٢
Wa min Aayaatihil ja waarifil bahri kal a`lam
३२. आणि समुद्रात चालणाऱ्या पर्वतांसमान नौका, त्याच्या निशाण्यांपैकी आहेत
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:33 🔁 0/5
إِن يَشَأۡ يُسۡكِنِ ٱلرِّيحَ فَيَظۡلَلۡنَ رَوَاكِدَ عَلَىٰ ظَهۡرِهِۦٓۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَأٓيَٰتٍ لِّكُلِّ صَبَّارٍ شَكُورٍ  ۝٣٣
Iny yashaaa yuskinir reeha fa yazlalna rawaakida `alaa zahirh; inna fee zaalika la Aayaatil likulli sabbaarin shakoor
३३. जर त्याने इच्छिले तर हवा बंद करील आणि या नौका समुद्रात स्थिर थांबतील. निःसंशय, यात प्रत्येक सहनशील, कृतज्ञशील माणसाकरिता निशाण्या आहेत
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:34 🔁 0/5
أَوۡ يُوبِقۡهُنَّ بِمَا كَسَبُواْ وَيَعۡفُ عَن كَثِيرٍ  ۝٣٤
Aw yoobiqhunna bimaa kasaboo wa ya`fu `an kaseer
३४. किंवा त्यांना त्यांच्या दुष्कृत्यांपायी नष्ट करून टाकील. तो तर बहुतेक चूका माफ करतो
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:35 🔁 0/5
وَيَعۡلَمَ ٱلَّذِينَ يُجَٰدِلُونَ فِيٓ ءَايَٰتِنَا مَا لَهُم مِّن مَّحِيصٍ  ۝٣٥
Wa ya`lamal lazeena yujaadiloona feee Aayaatinaa maa lahum mim mahees
३५. आणि यासाठी की जे लोक आमच्या निशाण्यांबाबत वाद घालतात, त्यांनी जाणून घ्यावे की त्यांच्याकरिता कशाही प्रकारे सुटका नाही
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:36 🔁 0/5
فَمَآ أُوتِيتُم مِّن شَيۡءٍ فَمَتَٰعُ ٱلۡحَيَوٰةِ ٱلدُّنۡيَاۚ وَمَا عِندَ ٱللَّهِ خَيۡرٌ وَأَبۡقَىٰ لِلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَلَىٰ رَبِّهِمۡ يَتَوَكَّلُونَ  ۝٣٦
Famaa ooteetum min shai`in famataa`ul hayaatid dunyaa wa maa `indal laahi khairunw wa abqaa lillazeena aamanoo wa `alaa Rabbihim yatawakkaloon
३६. तेव्हा तुम्हाला जे काही दिले गेले आहे ते ऐहिक जीवनाची अल्पशी साधन-सामुग्री आहे आणि अल्लाहजवळ जे आहे ते त्यापेक्षा अनेक पटींनी चांगले व बाकी राहणारे आहे. ते त्या लोकांकरिता आहे ज्यांनी ईमान राखले आणि जे केवळ आपल्या पालकनर्त्यावरच भरवसा राखतात
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:37 🔁 0/5
وَٱلَّذِينَ يَجۡتَنِبُونَ كَبَٰٓئِرَ ٱلۡإِثۡمِ وَٱلۡفَوَٰحِشَ وَإِذَا مَا غَضِبُواْ هُمۡ يَغۡفِرُونَ  ۝٣٧
Wallazeena yajtaniboona kabaaa`iral ismi wal fawaa hisha wa izaa maa ghadiboo hum yaghfiroon
३७. आणि ते मोठ्या अपराधांपासून आणि निर्लज्जतेच्या कामांपासून अलिप्त राहतात आणि क्रोधाच्या वेळीही माफ करतात
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:38 🔁 0/5
وَٱلَّذِينَ ٱسۡتَجَابُواْ لِرَبِّهِمۡ وَأَقَامُواْ ٱلصَّلَوٰةَ وَأَمۡرُهُمۡ شُورَىٰ بَيۡنَهُمۡ وَمِمَّا رَزَقۡنَٰهُمۡ يُنفِقُونَ  ۝٣٨
Wallazeenas tajaaboo li Rabbhim wa aqaamus Salaata wa amruhum shooraa bainahum wa mimmaa razaqnaahum yunfiqoon
३८. आणि आपल्या पालनकर्त्याचा आदेश स्वीकारतात आणि नमाजला नियमितपणे कायम करतात आणि त्यांचे प्रत्येक काम आपसातील सल्लामसलतीने पार पडते. आणि आम्ही जे काही त्यांना देऊन ठेवले आहे, त्यातून (आमच्या नावाने) देत असतात
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:39 🔁 0/5
وَٱلَّذِينَ إِذَآ أَصَابَهُمُ ٱلۡبَغۡيُ هُمۡ يَنتَصِرُونَ  ۝٣٩
Wallazeena izaa asaabahumul baghyu hum yantasiroon
३९. आणि जेव्हा त्यांच्यावर अत्याचार (व क्रूरता) होते तेव्हा ते केवळ प्रतिशोध घेतात
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:40 🔁 0/5
وَجَزَٰٓؤُاْ سَيِّئَةٍ سَيِّئَةٌ مِّثۡلُهَاۖ فَمَنۡ عَفَا وَأَصۡلَحَ فَأَجۡرُهُۥ عَلَى ٱللَّهِۚ إِنَّهُۥ لَا يُحِبُّ ٱلظَّٰلِمِينَ  ۝٤٠
Wa jazaaa`u saiyi`atin saiyi`tum misluha faman `afaa wa aslaha fa ajruhoo `alal laah; innahoo laa yuhibbuz zaalimeen
४०. आणि दुचाराचा मोबदला त्याच प्रकारचा दुराचार आहे आणि जो कोणी माफ करील आणि (आपल्या आचरणात) सुधारणा करून घेईल तर त्याचा मोबदला अल्लाहच्या जबाबदारीवर आहे, वस्तुतः अल्लाह अत्याचारींशी प्रेम राखत नाही
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:41 🔁 0/5
وَلَمَنِ ٱنتَصَرَ بَعۡدَ ظُلۡمِهِۦ فَأُوْلَٰٓئِكَ مَا عَلَيۡهِم مِّن سَبِيلٍ  ۝٤١
Wa lamanin tasara ba`da zulmihee fa ulaaa`ika maa `alaihim min sabeel
४१. आणि जो मनुष्य आपल्यावर अत्याचार झाल्यानंतर सूड घेईल तर अशा माणसावर दोषारोप ठेवण्याचा मार्ग नाही
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:42 🔁 0/5
إِنَّمَا ٱلسَّبِيلُ عَلَى ٱلَّذِينَ يَظۡلِمُونَ ٱلنَّاسَ وَيَبۡغُونَ فِي ٱلۡأَرۡضِ بِغَيۡرِ ٱلۡحَقِّۚ أُوْلَٰٓئِكَ لَهُمۡ عَذَابٌ أَلِيمٌ  ۝٤٢
Innamas sabeelu `alal lazeena yazlimoonan naasa wa yabghoona fil ardi bighairil haqq; ulaaa`ika lahum `azaabun aleem
४२. (दोषारोपाचा) मार्ग तर अशा लोकांवर आहे, जे स्वतः दुसऱ्यांवर जुलूम अत्याचार करतात आणि धरतीवर नाहक उत्पात (फसाद) माजवित फिरतात. अशाच लोकांकरिता दुःखदायक शिक्षा-यातना (अज़ाब) आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:43 🔁 0/5
وَلَمَن صَبَرَ وَغَفَرَ إِنَّ ذَٰلِكَ لَمِنۡ عَزۡمِ ٱلۡأُمُورِ  ۝٤٣
Wa laman sabara wa ghafara inna zaalika lamin `azmil umoor
४३. आणि जो मनुष्य सहनशीलता राखेल आणि माफ करेल तर निःसंशय हे मोठ्या हिंमतीच्या कामांपैकी (एक काम) आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:44 🔁 0/5
وَمَن يُضۡلِلِ ٱللَّهُ فَمَا لَهُۥ مِن وَلِيٍّ مِّنۢ بَعۡدِهِۦۗ وَتَرَى ٱلظَّٰلِمِينَ لَمَّا رَأَوُاْ ٱلۡعَذَابَ يَقُولُونَ هَلۡ إِلَىٰ مَرَدٍّ مِّن سَبِيلٍ  ۝٤٤
Wa mai yudlilil laahu famaa lahoo minw waliyyim mim ba`dih; wa taraz zaalimeena lammaa ra awul `azaaba yaqooloona hal ilaa maraddim min sabeel
४४. आणि ज्याला अल्लाह पथभ्रष्ट करील, त्यानंतर त्याचा कोणी मित्र व संरक्षक नाही, आणि तुम्ही पाहाल की अत्याचारी लोक शिक्षा-यातनांना पाहून म्हणत असतील की, परतीचा एखादा मार्ग आहे काय
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:45 🔁 0/5
وَتَرَىٰهُمۡ يُعۡرَضُونَ عَلَيۡهَا خَٰشِعِينَ مِنَ ٱلذُّلِّ يَنظُرُونَ مِن طَرۡفٍ خَفِيٍّۗ وَقَالَ ٱلَّذِينَ ءَامَنُوٓاْ إِنَّ ٱلۡخَٰسِرِينَ ٱلَّذِينَ خَسِرُوٓاْ أَنفُسَهُمۡ وَأَهۡلِيهِمۡ يَوۡمَ ٱلۡقِيَٰمَةِۗ أَلَآ إِنَّ ٱلظَّٰلِمِينَ فِي عَذَابٍ مُّقِيمٍ  ۝٤٥
Wa taraahum yu`radoona `alaihaa khaashi`eena minazzulli yanzuroona min tarfin khaifiyy; wa qaalal lazeena aamanooo innal khaasireenal lazeena khasiroon anfusahum wa ahleehim Yawmal Qiyaamah; alaaa innaz zaalimeena fee`azaabim muqeem
४५. आणि तुम्ही त्यांना पाहाला की ते (जहन्नमच्या) समोर आणून उभे केले जातील. अपमानापायी झुकत जातील, खालच्या नजरेने पाहत असतील. ईमान राखणारे स्पष्टपणे सांगतील की, वस्तुतः तोट्यात राहणारे ते लोक आहेत, ज्यांनी आज कयामतच्या दिवशी स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना हानिग्रस्त केले. लक्षात ठेवा की, अत्याचारी लोक निश्चितच कायमस्वरूपी अज़ाबमध्ये आहेत
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:46 🔁 0/5
وَمَا كَانَ لَهُم مِّنۡ أَوۡلِيَآءَ يَنصُرُونَهُم مِّن دُونِ ٱللَّهِۗ وَمَن يُضۡلِلِ ٱللَّهُ فَمَا لَهُۥ مِن سَبِيلٍ  ۝٤٦
Wa maa kaana lahum min awliyaaa`a yansuroonahum min doonil laah; wa mai yudlilil laahu famaa lahoo min sabeel
४६. आणि त्यांना कोणी मदत करणारा नसेल, जो अल्लाहव्यतिरिक्त त्यांची मदत करू शकेल आणि ज्याला अल्लाह मार्गापासून हटविल, त्याच्यासाठी कोणताही मार्ग नाही
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:47 🔁 0/5
ٱسۡتَجِيبُواْ لِرَبِّكُم مِّن قَبۡلِ أَن يَأۡتِيَ يَوۡمٌ لَّا مَرَدَّ لَهُۥ مِنَ ٱللَّهِۚ مَا لَكُم مِّن مَّلۡجَإٍ يَوۡمَئِذٍ وَمَا لَكُم مِّن نَّكِيرٍ  ۝٤٧
Istajeeboo li Rabbikum min qabli any yaatiya Yawmul laa maradda lahoo minal laah; maa lakum mim malja iny yawma`izinw wa maa lakum min nakeer
४७. आपल्या पालनकर्त्याचा आदेश मान्य करा, यापूर्वी की अल्लाहतर्फे तो दिवस यावा, ज्याचे टळणे असंभव आहे. तुम्हाला त्या दिवशी ना तर एखादे आश्रयस्थान लाभेल आणि ना लपून अनभिज्ञ बनण्याचे (ठिकाण)
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:48 🔁 0/5
فَإِنۡ أَعۡرَضُواْ فَمَآ أَرۡسَلۡنَٰكَ عَلَيۡهِمۡ حَفِيظًاۖ إِنۡ عَلَيۡكَ إِلَّا ٱلۡبَلَٰغُۗ وَإِنَّآ إِذَآ أَذَقۡنَا ٱلۡإِنسَٰنَ مِنَّا رَحۡمَةً فَرِحَ بِهَاۖ وَإِن تُصِبۡهُمۡ سَيِّئَةُۢ بِمَا قَدَّمَتۡ أَيۡدِيهِمۡ فَإِنَّ ٱلۡإِنسَٰنَ كَفُورٌ  ۝٤٨
Fa-in a`radoo famaaa arsalnaaka `alaihim hafeezan in `alaika illal balaagh; wa innaaa izaaa azaqnal insaana minnaa rahmatan fariha bihaa wa in tusibhum saiyi`atum bimaa qaddamat aydeehim fa innal insaana kafoor
४८. जर ते तोंड फिरवित असतील तर आम्ही तुम्हाला त्यांच्यावर देखरेख ठेवणारा बनवून पाठविले नाही. तुमचे कर्तव्य केवळ (आमचा) संदेश पोहचविण्याचे आहे. आणि जेव्हा आम्ही माणसाला आपल्या दया-कृपेची गोडी चाखवितो, तेव्हा तो त्यावर शेखी मिरवू लागतो आणि जर त्यांच्यावर, त्यांच्या आचरणामुळे एखादे संकट येते, तेव्हा निश्चितच मनुष्य मोठा कृतघ्न आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:49 🔁 0/5
لِّلَّهِ مُلۡكُ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۚ يَخۡلُقُ مَا يَشَآءُۚ يَهَبُ لِمَن يَشَآءُ إِنَٰثًا وَيَهَبُ لِمَن يَشَآءُ ٱلذُّكُورَ  ۝٤٩
Lillaahi mulkus samaawaati wal ard; yakhluqu maa yashaaa`; yahabu limai yashaaa`u inaasanw wa yahabu limai yashaaa`uz zukoor
४९. आकाशांची आणि धरतीची राज्यसत्ता अल्लाहकरिताच आहे. तो जे काही इच्छितो, निर्माण करतो, ज्याला इच्छितो कन्या देतो, आणि ज्याला इच्छितो पुत्र देतो
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:50 🔁 0/5
أَوۡ يُزَوِّجُهُمۡ ذُكۡرَانًا وَإِنَٰثًاۖ وَيَجۡعَلُ مَن يَشَآءُ عَقِيمًاۚ إِنَّهُۥ عَلِيمٌ قَدِيرٌ  ۝٥٠
Aw yuzawwijuhum zukraananw wa inaasanw wa yaj`alu mai yashaaa`u `aqeemaa; innahoo `Aleemun Qadeer
५०. किंवा त्यांना पुत्र आणि कन्या दोन्ही मिळून प्रदान करतो, आणि ज्याला इच्छितो निःसंतान ठेवतो, तो मोठा ज्ञान राखणारा आणि सामर्थ्यशाली आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:51 🔁 0/5
۞ وَمَا كَانَ لِبَشَرٍ أَن يُكَلِّمَهُ ٱللَّهُ إِلَّا وَحۡيًا أَوۡ مِن وَرَآيِٕ حِجَابٍ أَوۡ يُرۡسِلَ رَسُولًا فَيُوحِيَ بِإِذۡنِهِۦ مَا يَشَآءُۚ إِنَّهُۥ عَلِيٌّ حَكِيمٌ  ۝٥١
Wa maa kaana libasharin any yukallimahul laahu illaa wahyan aw minw waraaa`i hijaabin aw yursila Rasoolan fa yoohiya bi iznuhee maa yashaaa`; innahoo `Aliyyun Hakeem
५१. एखाद्या दासाशी (माणसाशी) अल्लाहने संभाषण करावे हे अशक्य आहे तथापि वहयीच्या स्वरूपात किंवा पडद्यामागून अथवा एखादा फरिश्ता पाठवून, आणि तो अल्लाहच्या आदेशाने, तो जे इच्छिल वहयी करील. निःसंशय तो (अल्लाह) सर्वांत महान आणि हिकमतशाली आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:52 🔁 0/5
وَكَذَٰلِكَ أَوۡحَيۡنَآ إِلَيۡكَ رُوحًا مِّنۡ أَمۡرِنَاۚ مَا كُنتَ تَدۡرِي مَا ٱلۡكِتَٰبُ وَلَا ٱلۡإِيمَٰنُ وَلَٰكِن جَعَلۡنَٰهُ نُورًا نَّهۡدِي بِهِۦ مَن نَّشَآءُ مِنۡ عِبَادِنَاۚ وَإِنَّكَ لَتَهۡدِيٓ إِلَىٰ صِرَٰطٍ مُّسۡتَقِيمٍ  ۝٥٢
Wa kazaalika awhainaaa ilaika rooham min amrinaa; maa kunta tadree mal Kitaabu wa lal eemaanu wa laakin ja`alnaahu nooran nahdee bihee man nashaaa`u min `ibaadinaa; wa innaka latahdeee ilaaa Siraatim Mustaqeem
५२. आणि याच प्रकारे आम्ही तुमच्याकडे आपल्या आदेशाने रुह (आत्मा) अवतरित केला आहे. तुम्ही त्यापूर्वी हेही जाणत नव्हते की ग्रंथ आणि ईमान काय आहे? परंतु आम्ही त्यास नूर (दिव्य प्रकाश) बनविले. त्याच्याद्वारे आपल्या दासांपैकी, ज्याला इच्छितो, मार्गदर्शन करतो. निःसंशय तुम्ही सत्य मार्ग दाखवित आहात
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
42:53 🔁 0/5
صِرَٰطِ ٱللَّهِ ٱلَّذِي لَهُۥ مَا فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَمَا فِي ٱلۡأَرۡضِۗ أَلَآ إِلَى ٱللَّهِ تَصِيرُ ٱلۡأُمُورُ  ۝٥٣
Siraatil laahil lazee lahoo maa fis samaawaati wa maa fil ard; alaaa ilal laahi taseerul umoor
५३. त्या अल्लाहच्या मार्गाचे ज्याच्या स्वामीत्वात आकाशांची आणि धरतीची प्रत्येक वस्तू आहे. खबरदार असा, समस्त कार्ये - अल्लाहकडेच परततात
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
💡 लपवलेल्या शब्दावर टॅप करा जेणेकरून तो तात्पुरता दिसेल — तुमची प्रगती आपोआप जतन होते.

🎉
🎊 शाब्बास! पाठांतर पूर्ण झाले
Mishary Rashid Alafasy
Mahmoud Khalil Al-Husary
Abdurrahman As-Sudais
Mohamed Siddiq Al-Minshawi
Abdul Basit Abdul Samad
Ali Al-Hudhaify
Ahmed ibn Ali al-Ajamy
Abu Bakr Ash-Shaatree
Muhammad Ayyoub
Abdullah Basfar
Abdullah Al-Juhani
Maher Al Muaiqly
0:00
0:00
-

पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers