सूरा अद-दुहा अरबी आणि मराठी

सूरा अद-दुहा संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (11 आयत — مكية). अद-दुहा ऐका, अद-दुहा भाषांतर, अद-दुहा mp3, अद-दुहा pdf.

सूरा अद-दुहा वाचा आणि ऐका

🎧 आयत
M Mishary Rashid Alafasy
M Mahmoud Khalil Al-Husary
A Abdurrahman As-Sudais
M Mohamed Siddiq Al-Minshawi
A Abdul Basit Abdul Samad
A Ali Al-Hudhaify
A Ahmed ibn Ali al-Ajamy
A Abu Bakr Ash-Shaatree
M Muhammad Ayyoub
A Abdullah Basfar
A Abdullah Al-Juhani
M Maher Al Muaiqly
x1
وَالضُّحَىٰ ۝١
📖 भाषांतर आयत 1
१. शपथ आहे चाश्त (सूर्य वर आल्या) च्या वेळेची
وَاللَّيْلِ إِذَا سَجَىٰ ۝٢
📖 भाषांतर आयत 2
२. आणि शपथ आहे रात्रीची जेव्हा ती पसरते
مَا وَدَّعَكَ رَبُّكَ وَمَا قَلَىٰ ۝٣
📖 भाषांतर आयत 3
३. ना तर तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला (एकटे) सोडले आहे, आणि ना तो तुमच्याशी बेजार झाला आहे
وَلَلْآخِرَةُ خَيْرٌ لَّكَ مِنَ الْأُولَىٰ ۝٤
📖 भाषांतर आयत 4
४. निःसंशय, तुमच्यासाठी आरंभापेक्षा शेवट अधिक चांगला आहे
وَلَسَوْفَ يُعْطِيكَ رَبُّكَ فَتَرْضَىٰ ۝٥
📖 भाषांतर आयत 5
५. तुम्हाला तुमचा पालनकर्ता फार लवकरच (इनाम) देईल आणि तुम्ही राजी (व खूश) व्हाल
أَلَمْ يَجِدْكَ يَتِيمًا فَآوَىٰ ۝٦
📖 भाषांतर आयत 6
६. काय त्याने तुम्हाला अनाथ जाणून आश्रय दिला नाही
وَوَجَدَكَ ضَالًّا فَهَدَىٰ ۝٧
📖 भाषांतर आयत 7
७. आणि तुम्हाला, मार्ग विसरलेले पाहून मार्ग दाखविला नाही
وَوَجَدَكَ عَائِلًا فَأَغْنَىٰ ۝٨
📖 भाषांतर आयत 8
८. आणि तुम्हाला निर्धन असलेले पाहून श्रीमंत बनविले नाही
فَأَمَّا الْيَتِيمَ فَلَا تَقْهَرْ ۝٩
📖 भाषांतर आयत 9
९. तेव्हा अनाथावर तुम्हीही सक्ती (कठोरता) करू नका
وَأَمَّا السَّائِلَ فَلَا تَنْهَرْ ۝١٠
📖 भाषांतर आयत 10
१०. आणि ना याचना करणाऱ्याला दाटून दरडावून बोलू नका
وَأَمَّا بِنِعْمَةِ رَبِّكَ فَحَدِّثْ ۝١١
📖 भाषांतर आयत 11
११. आणि आपल्या पालनकर्त्याच्या कृपा-देणग्यांचे वर्णन करीत राहा
← 92 अद-दुहा (93/114) 94 →
वाचा सूरा अद-दुहा मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ

93الضحى Ad-Duha 📚 11 आयत مكية

आयतनिहाय – सूरा अद-दुहा — 11 आयत




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers