सूरा अद-दुखान अरबी आणि मराठी

सूरा अद-दुखान संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (59 आयत — مكية). अद-दुखान ऐका, अद-दुखान भाषांतर, अद-दुखान mp3, अद-दुखान pdf.

सूरा अद-दुखान वाचा आणि ऐका

🎧 आयत
M Mishary Rashid Alafasy
M Mahmoud Khalil Al-Husary
A Abdurrahman As-Sudais
M Mohamed Siddiq Al-Minshawi
A Abdul Basit Abdul Samad
A Ali Al-Hudhaify
A Ahmed ibn Ali al-Ajamy
A Abu Bakr Ash-Shaatree
M Muhammad Ayyoub
A Abdullah Basfar
A Abdullah Al-Juhani
M Maher Al Muaiqly
x1
حم ۝١
📖 भाषांतर आयत 1
१. हा. मीम
وَالْكِتَابِ الْمُبِينِ ۝٢
📖 भाषांतर आयत 2
२. शपथ आहे या स्पष्ट ग्रंथाची
إِنَّا أَنزَلْنَاهُ فِي لَيْلَةٍ مُّبَارَكَةٍ ۚ إِنَّا كُنَّا مُنذِرِينَ ۝٣
📖 भाषांतर आयत 3
३. निःसंशय, आम्ही या ग्रंथाला एका शुभरात्रीत१ अवतरित केले आहे. निःसंशय, आम्ही अवगत करून देणारे आहोत
فِيهَا يُفْرَقُ كُلُّ أَمْرٍ حَكِيمٍ ۝٤
📖 भाषांतर आयत 4
४. त्याच रात्रीत प्रत्येक महत्त्वपूर्ण कार्याचा निर्णय घेतला जातो
أَمْرًا مِّنْ عِندِنَا ۚ إِنَّا كُنَّا مُرْسِلِينَ ۝٥
📖 भाषांतर आयत 5
५. आमच्याकडून एक फर्मान बनून आम्हीच आहोत रसूल (संदेशवाहक) बनवून पाठविणारे
رَحْمَةً مِّن رَّبِّكَ ۚ إِنَّهُ هُوَ السَّمِيعُ الْعَلِيمُ ۝٦
📖 भाषांतर आयत 6
६. तुमच्या पालनकर्त्याच्या कृपेने, तोच आहे ऐकणारा आणि जाणणारा
رَبِّ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَمَا بَيْنَهُمَا ۖ إِن كُنتُم مُّوقِنِينَ ۝٧
📖 भाषांतर आयत 7
७. जो आकाशांचा आणि धरतीचा आणि त्यांच्या दरम्यान जे काही आहे त्या सर्वांचा स्वामी आहे, जर तुम्ही विश्वास राखणारे असाल
لَا إِلَٰهَ إِلَّا هُوَ يُحْيِي وَيُمِيتُ ۖ رَبُّكُمْ وَرَبُّ آبَائِكُمُ الْأَوَّلِينَ ۝٨
📖 भाषांतर आयत 8
८. त्याच्याशिवाय दुसरा कोणीही उपासना करण्यास पात्र नाही. तोच जिवंत करतो आणि मारतो. तोच तुमचा आणि तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या पूर्वजांचा स्वामी व पालनकर्ता आहे
بَلْ هُمْ فِي شَكٍّ يَلْعَبُونَ ۝٩
📖 भाषांतर आयत 9
९. किंबहुना ते संशयात पडून खेळत आहेत
فَارْتَقِبْ يَوْمَ تَأْتِي السَّمَاءُ بِدُخَانٍ مُّبِينٍ ۝١٠
📖 भाषांतर आयत 10
१०. तुम्ही त्या दिवसाच्या प्रतीक्षेत राहा, जेव्हा आकाश उघड स्वरूपाचा धूर आणील
يَغْشَى النَّاسَ ۖ هَٰذَا عَذَابٌ أَلِيمٌ ۝١١
📖 भाषांतर आयत 11
११. जो लोकांना घेरा टाकील. ही मोठी दुःखदायक शिक्षा - यातना आहे
رَّبَّنَا اكْشِفْ عَنَّا الْعَذَابَ إِنَّا مُؤْمِنُونَ ۝١٢
📖 भाषांतर आयत 12
१२. (म्हणतील की) हे आमच्या पालनकर्त्या! हा अज़ाब (शिक्षा - यातना) आमच्यापासून दूर कर, आम्ही ईमान स्वीकारले
أَنَّىٰ لَهُمُ الذِّكْرَىٰ وَقَدْ جَاءَهُمْ رَسُولٌ مُّبِينٌ ۝١٣
📖 भाषांतर आयत 13
१३. त्यांच्यासाठी आता उपदेश कोठे आहे? स्पष्टरित्या निवेदन करणारे पैगंबर त्यांच्याजवळ (केव्हाच) येऊन गेलेत
ثُمَّ تَوَلَّوْا عَنْهُ وَقَالُوا مُعَلَّمٌ مَّجْنُونٌ ۝١٤
📖 भाषांतर आयत 14
१४. तरीही त्यांनी त्यांच्याकडून तोंड फिरविले आणि सांगितले की हा तर शिकविलेला वेडा आहे
إِنَّا كَاشِفُو الْعَذَابِ قَلِيلًا ۚ إِنَّكُمْ عَائِدُونَ ۝١٥
📖 भाषांतर आयत 15
१५. आम्ही शिक्षा - यातनेला थोडेसे दूरही करू तरी तुम्ही परत पुन्हा आपल्या त्याच अवस्थेत याल
يَوْمَ نَبْطِشُ الْبَطْشَةَ الْكُبْرَىٰ إِنَّا مُنتَقِمُونَ ۝١٦
📖 भाषांतर आयत 16
१६. ज्या दिवशी आम्ही मोठ्या सक्त पकडीत धरू, निश्चितच आम्ही प्रतिशोध (सूड) घेणार आहोत
۞ وَلَقَدْ فَتَنَّا قَبْلَهُمْ قَوْمَ فِرْعَوْنَ وَجَاءَهُمْ رَسُولٌ كَرِيمٌ ۝١٧
📖 भाषांतर आयत 17
१७. आणि निःसंशय, आम्ही यापूर्वी फिरऔनच्या जनसमूहाची (ही) परीक्षा घेतली आहे ज्यांच्याजवळ (अल्लाहचा) प्रतिष्ठासंपन्न रसूल (पैगंबर) आला
أَنْ أَدُّوا إِلَيَّ عِبَادَ اللَّهِ ۖ إِنِّي لَكُمْ رَسُولٌ أَمِينٌ ۝١٨
📖 भाषांतर आयत 18
१८. की अल्लाहच्या दासांना माझ्या हवाली करा, विश्वास राखा की मी तुमच्यासाठी विश्वस्त पैगंबर आहे
وَأَن لَّا تَعْلُوا عَلَى اللَّهِ ۖ إِنِّي آتِيكُم بِسُلْطَانٍ مُّبِينٍ ۝١٩
📖 भाषांतर आयत 19
१९. आणि तुम्ही अल्लाहसमोर विद्रोह दाखवू नका. मी तुमच्यासमोर उघड पुरावा प्रस्तुत करेन
وَإِنِّي عُذْتُ بِرَبِّي وَرَبِّكُمْ أَن تَرْجُمُونِ ۝٢٠
📖 भाषांतर आयत 20
२०. आणि मी, आपल्या व तुमच्या पालनकर्त्याच्या शरणात येतो. या गोष्टीपासून की तुम्ही मला दगडांनी ठेचून मारावे
وَإِن لَّمْ تُؤْمِنُوا لِي فَاعْتَزِلُونِ ۝٢١
📖 भाषांतर आयत 21
२१. आणि जर तुम्ही माझ्यावर ईमान राखत नसाल तर माझ्यापासून अलग राहा
فَدَعَا رَبَّهُ أَنَّ هَٰؤُلَاءِ قَوْمٌ مُّجْرِمُونَ ۝٢٢
📖 भाषांतर आयत 22
२२. मग त्यांनी आपल्या पालनकर्त्याला दुआ-प्रार्थना केली की हे सर्व अपराधी लोक आहेत
فَأَسْرِ بِعِبَادِي لَيْلًا إِنَّكُم مُّتَّبَعُونَ ۝٢٣
📖 भाषांतर आयत 23
२३. (आम्ही फर्माविले) की रात्रीतूनच तुम्ही माझ्या दासांना घेऊन निघा. निश्चितच तुमचा पाठलाग केला जाईल
وَاتْرُكِ الْبَحْرَ رَهْوًا ۖ إِنَّهُمْ جُندٌ مُّغْرَقُونَ ۝٢٤
📖 भाषांतर आयत 24
२४. आणि तुम्ही समुद्राला स्थिर अवस्थेत सोडून निघून जा. निःसंशय, हे सैन्य बुडविले जाईल
كَمْ تَرَكُوا مِن جَنَّاتٍ وَعُيُونٍ ۝٢٥
📖 भाषांतर आयत 25
२५. ते अनेक बागा आणि झरे सोडून गेले
وَزُرُوعٍ وَمَقَامٍ كَرِيمٍ ۝٢٦
📖 भाषांतर आयत 26
२६. आणि शेते व उत्तम निवासस्थाने
وَنَعْمَةٍ كَانُوا فِيهَا فَاكِهِينَ ۝٢٧
📖 भाषांतर आयत 27
२७. आणि त्या सुखदायक वस्तू ज्यांच्यात ते सुख भोगत होते
كَذَٰلِكَ ۖ وَأَوْرَثْنَاهَا قَوْمًا آخَرِينَ ۝٢٨
📖 भाषांतर आयत 28
२८. अशा प्रकारे घडले, आणि आम्ही त्या सर्वांचा उत्तराधिकारी (वारस) दुसऱ्या जनसमूहाला बनविले
فَمَا بَكَتْ عَلَيْهِمُ السَّمَاءُ وَالْأَرْضُ وَمَا كَانُوا مُنظَرِينَ ۝٢٩
📖 भाषांतर आयत 29
२९. तेव्हा त्यांच्यासाठी ना आकाश रडले ना धरती आणि ना त्यांना कसली संधी लाभली
وَلَقَدْ نَجَّيْنَا بَنِي إِسْرَائِيلَ مِنَ الْعَذَابِ الْمُهِينِ ۝٣٠
📖 भाषांतर आयत 30
३०. आणि आम्हीच इस्राईलच्या संततीला (अतिशय) अपमानदायक शिक्षा-यातनेपासून मुक्ती दिली
مِن فِرْعَوْنَ ۚ إِنَّهُ كَانَ عَالِيًا مِّنَ الْمُسْرِفِينَ ۝٣١
📖 भाषांतर आयत 31
३१. (जी) फिरऔनतर्फे (दिली जात) होती. वास्तविक तो विद्रोही आणि मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांपैकी होता
وَلَقَدِ اخْتَرْنَاهُمْ عَلَىٰ عِلْمٍ عَلَى الْعَالَمِينَ ۝٣٢
📖 भाषांतर आयत 32
३२. आणि आम्ही जाणूनबुजून इस्राईलच्या संततीला जगातील लोकांवर श्रेष्ठता प्रदान केली
وَآتَيْنَاهُم مِّنَ الْآيَاتِ مَا فِيهِ بَلَاءٌ مُّبِينٌ ۝٣٣
📖 भाषांतर आयत 33
३३. आणि आम्ही त्यांना अशा निशाण्या प्रदान केल्या, ज्यांच्यात उघड कसोटी होती
إِنَّ هَٰؤُلَاءِ لَيَقُولُونَ ۝٣٤
📖 भाषांतर आयत 34
३४. हे लोक तर हेच म्हणतात
إِنْ هِيَ إِلَّا مَوْتَتُنَا الْأُولَىٰ وَمَا نَحْنُ بِمُنشَرِينَ ۝٣٥
📖 भाषांतर आयत 35
३५. की (अंतिम गोष्ट) हेच आमचे पहिल्यांदा (जगात) मरण पावणे आहे आणि आम्ही दुसऱ्यांदा उठविलो जाणार नाहीत
فَأْتُوا بِآبَائِنَا إِن كُنتُمْ صَادِقِينَ ۝٣٦
📖 भाषांतर आयत 36
३६. जर तुम्ही सच्चे असाल तर आमच्या पूर्वजांना घेऊन या
أَهُمْ خَيْرٌ أَمْ قَوْمُ تُبَّعٍ وَالَّذِينَ مِن قَبْلِهِمْ ۚ أَهْلَكْنَاهُمْ ۖ إِنَّهُمْ كَانُوا مُجْرِمِينَ ۝٣٧
📖 भाषांतर आयत 37
३७. काय हे लोक अधिक चांगले आहेत की तुब्बअ च्या जनसमूहाचे लोक आणि जे त्यांच्याही पूर्वीचे होते? आम्ही त्या सर्वांना नष्ट करून टाकले. निःसंशय, ते अपराधी होते
وَمَا خَلَقْنَا السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ وَمَا بَيْنَهُمَا لَاعِبِينَ ۝٣٨
📖 भाषांतर आयत 38
३८. आणि आम्ही आकाशांना व धरतीला आणि त्यांच्या दरम्यानच्या वस्तूंना खेळ स्वरूपात निर्माण केले नाही
مَا خَلَقْنَاهُمَا إِلَّا بِالْحَقِّ وَلَٰكِنَّ أَكْثَرَهُمْ لَا يَعْلَمُونَ ۝٣٩
📖 भाषांतर आयत 39
३९. किंबहुना आम्ही त्यांना उचित हेतुसहच निर्माण केले आहे. परंतु अधिकांश लोक हे जाणत नाहीत
إِنَّ يَوْمَ الْفَصْلِ مِيقَاتُهُمْ أَجْمَعِينَ ۝٤٠
📖 भाषांतर आयत 40
४०. निःसंशय, निर्णयाचा दिवस त्या सर्वांसाठी निर्धारित वेळी आहे
يَوْمَ لَا يُغْنِي مَوْلًى عَن مَّوْلًى شَيْئًا وَلَا هُمْ يُنصَرُونَ ۝٤١
📖 भाषांतर आयत 41
४१. त्या दिवशी कोणी मित्र कोणा मित्राच्या काहीच कामी येणार नाही आणि ना त्यांची मदत केली जाईल
إِلَّا مَن رَّحِمَ اللَّهُ ۚ إِنَّهُ هُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ ۝٤٢
📖 भाषांतर आयत 42
४२. परंतु (त्याच्याखेरीज) ज्याच्यावर अल्लाहची दया - कृपा व्हावी. निःसंशय, तो मोठा शक्तिशाली आणि दया करणारा आहे
إِنَّ شَجَرَتَ الزَّقُّومِ ۝٤٣
📖 भाषांतर आयत 43
४३. निःसंशय, जक्कूमचे झाड
طَعَامُ الْأَثِيمِ ۝٤٤
📖 भाषांतर आयत 44
४४. गुन्हेगारांचे भोजन आहे
كَالْمُهْلِ يَغْلِي فِي الْبُطُونِ ۝٤٥
📖 भाषांतर आयत 45
४५. जे वितळलेल्या तांब्यासारखे आहे आणि पोटात उकळत राहते
كَغَلْيِ الْحَمِيمِ ۝٤٦
📖 भाषांतर आयत 46
४६. खूप गरम उकळत्या पाण्यासारखे
خُذُوهُ فَاعْتِلُوهُ إِلَىٰ سَوَاءِ الْجَحِيمِ ۝٤٧
📖 भाषांतर आयत 47
४७. त्याला धरा, मग फरफटत ओढत नेऊन जहन्नमच्या मध्यभागी पोहचवा
ثُمَّ صُبُّوا فَوْقَ رَأْسِهِ مِنْ عَذَابِ الْحَمِيمِ ۝٤٨
📖 भाषांतर आयत 48
४८. मग त्याच्या डोक्यावर गरम उकळत्या पाण्याची यातना (अज़ाब) ओता
ذُقْ إِنَّكَ أَنتَ الْعَزِيزُ الْكَرِيمُ ۝٤٩
📖 भाषांतर आयत 49
४९. (त्याला सांगितले जाईल) चाखत जा (गोडी), तू तर मोठा प्रतिष्ठित आणि आदरसन्मान बाळगणारा होता
إِنَّ هَٰذَا مَا كُنتُم بِهِ تَمْتَرُونَ ۝٥٠
📖 भाषांतर आयत 50
५०. हीच ती गोष्ट होय, जिच्याबाबत तुम्ही शंका करीत असत
إِنَّ الْمُتَّقِينَ فِي مَقَامٍ أَمِينٍ ۝٥١
📖 भाषांतर आयत 51
५१. निःसंशय, अल्लाहचे भय बाळगणारे शांतीपूर्ण ठिकाणी असतील
فِي جَنَّاتٍ وَعُيُونٍ ۝٥٢
📖 भाषांतर आयत 52
५२. बागांमध्ये आणि जलस्रोतां (झऱ्यां) मध्ये
يَلْبَسُونَ مِن سُندُسٍ وَإِسْتَبْرَقٍ مُّتَقَابِلِينَ ۝٥٣
📖 भाषांतर आयत 53
५३. पातळ व मुलायम रेशमी वस्त्रे घातलेले, समोरासमोर बसले असतील
كَذَٰلِكَ وَزَوَّجْنَاهُم بِحُورٍ عِينٍ ۝٥٤
📖 भाषांतर आयत 54
५४. हे त्याच प्रकारे आहे, आणि आम्ही मोठया नेत्रांच्या हूर-परींशी त्यांचा विवाह करून देऊ
يَدْعُونَ فِيهَا بِكُلِّ فَاكِهَةٍ آمِنِينَ ۝٥٥
📖 भाषांतर आयत 55
५५. निर्भयतापूर्वक तिथे प्रत्येक प्रकारच्या मेव्याची मागणी करतील
لَا يَذُوقُونَ فِيهَا الْمَوْتَ إِلَّا الْمَوْتَةَ الْأُولَىٰ ۖ وَوَقَاهُمْ عَذَابَ الْجَحِيمِ ۝٥٦
📖 भाषांतर आयत 56
५६. तिथे ते मृत्युचा स्वाद चाखणार नाहीत, पहिल्या मृत्युखेरीज (जो जगात घडला) त्यांना अल्लाहने जहन्नमच्या (भयंकर) शिक्षा - यातने (अज़ाब) पासून वाचविले
فَضْلًا مِّن رَّبِّكَ ۚ ذَٰلِكَ هُوَ الْفَوْزُ الْعَظِيمُ ۝٥٧
📖 भाषांतर आयत 57
५७. ही केवळ तुमच्या पालनकर्त्याची कृपा आहे. हीच आहे मोठी सफलता
فَإِنَّمَا يَسَّرْنَاهُ بِلِسَانِكَ لَعَلَّهُمْ يَتَذَكَّرُونَ ۝٥٨
📖 भाषांतर आयत 58
५८. आम्ही या (कुरआना) ला तुमच्या भाषेत सोपे केले, यासाठी की त्यांनी (लोकांनी) बोध ग्रहण करावा
فَارْتَقِبْ إِنَّهُم مُّرْتَقِبُونَ ۝٥٩
📖 भाषांतर आयत 59
५९. आता तुम्ही प्रतीक्षा करा, हे देखील प्रतीक्षा करीत आहेत
← 43 अद-दुखान (44/114) 45 →
वाचा सूरा अद-दुखान मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ

44الدخان Ad-Dukhan 📚 59 आयत مكية

आयतनिहाय – सूरा अद-दुखान — 59 आयत




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers