🔥 0 दिवस सलग
📖 लांब सूरा — लहान भागांमध्ये विभागली आहे (12 आयत)
📚 सर्व सूरा
30%
🎤 तुमचा आवाज रेकॉर्ड करण्यासाठी कोणत्याही आयतीजवळील मायक्रोफोन चिन्हावर 🎙️ टॅप करा, नंतर ऐका आणि कारीशी तुलना करा.
0/12
66:1 🔁 0/5
يَٰٓأَيُّهَا ٱلنَّبِيُّ لِمَ تُحَرِّمُ مَآ أَحَلَّ ٱللَّهُ لَكَۖ تَبۡتَغِي مَرۡضَاتَ أَزۡوَٰجِكَۚ وَٱللَّهُ غَفُورٌ رَّحِيمٌ  ۝١
Yaaa ayyuhan nabiyyu lima tuharrimu maaa ahallal laahu laka tabtaghee mardaata azwaajik; wallaahu ghafoorur raheem
१. हे पैगंबर! ज्या गोष्टीला अल्लाहने तुमच्यासाठी हलाल (वैध) केले आहे, तिला तुम्ही हराम (अवैध) का ठरविता? (काय) तुम्ही आपल्या पत्नींची प्रसन्नता प्राप्त करू इच्छिता, आणि अल्लाह मोठा माफ करणारा, मोठा दयाळू आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
66:2 🔁 0/5
قَدۡ فَرَضَ ٱللَّهُ لَكُمۡ تَحِلَّةَ أَيۡمَٰنِكُمۡۚ وَٱللَّهُ مَوۡلَىٰكُمۡۖ وَهُوَ ٱلۡعَلِيمُ ٱلۡحَكِيمُ  ۝٢
Qad faradal laahu lakum tahillata aymaanikum; wallaahu mawlaakum wa huwal`aleemul hakeem
२. निःसंशय, अल्लाहने तुमच्यासाठी (अशा) शपथांमधून बाहेर पडण्याचा मार्ग निर्धारित केला आहे, आणि अल्लाह तुमचा कार्यसाधक (मित्र) आहे आणि तोच (पूर्ण) ज्ञान बाळगणारा आणि हिकमतशाली आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
66:3 🔁 0/5
وَإِذۡ أَسَرَّ ٱلنَّبِيُّ إِلَىٰ بَعۡضِ أَزۡوَٰجِهِۦ حَدِيثًا فَلَمَّا نَبَّأَتۡ بِهِۦ وَأَظۡهَرَهُ ٱللَّهُ عَلَيۡهِ عَرَّفَ بَعۡضَهُۥ وَأَعۡرَضَ عَنۢ بَعۡضٍۖ فَلَمَّا نَبَّأَهَا بِهِۦ قَالَتۡ مَنۡ أَنۢبَأَكَ هَٰذَاۖ قَالَ نَبَّأَنِيَ ٱلۡعَلِيمُ ٱلۡخَبِيرُ  ۝٣
Wa iz asarran nabiyyu ilaa ba`di azwaajihee hadeesan falammaa nabba at bihee wa azharahul laahu `alaihi `arrafa ba`dahoo wa a`rada `am ba`din falammaa nabba ahaa bihee qaalat man amba aka haaza qaala nabba aniyal `aleemul khabeer
३. आणि (स्मरण करा) जेव्हा पैगंबरांनी आपल्या काही पत्नींना गोपनीयतेत एक गोष्ट सांगितली तर जेव्हा तिने त्या गोष्टीची वाच्यता केली, आणि अल्लाहने आपल्या पैगंबराला त्याबाबत अवगत केले, तेव्हा पैगंबरांनी काही गोष्ट तर सांगितली आणि काही सांगायचे टाळले, मग जेव्हा पैगंबरानी आपल्या त्या पत्नीला ही गोष्ट सांगितली, तेव्हा ती म्हणाली, याची खबर तुम्हाला कोणी दिली? सांगितले, सर्व काही जाणणाऱ्या, पूर्ण खबर राखणाऱ्या अल्लाहने मला याची खबर दिली आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
66:4 🔁 0/5
إِن تَتُوبَآ إِلَى ٱللَّهِ فَقَدۡ صَغَتۡ قُلُوبُكُمَاۖ وَإِن تَظَٰهَرَا عَلَيۡهِ فَإِنَّ ٱللَّهَ هُوَ مَوۡلَىٰهُ وَجِبۡرِيلُ وَصَٰلِحُ ٱلۡمُؤۡمِنِينَۖ وَٱلۡمَلَٰٓئِكَةُ بَعۡدَ ذَٰلِكَ ظَهِيرٌ  ۝٤
In tatoobaaa ilal laahi faqad saghat quloobukumaa wa in tazaaharaa `alihi fa innal laaha huwa mawlaahu wa jibreelu wa saalihul mu`mineen; walma laaa`ikatu ba`dazaalika zaheer
४. (हे पैगंबराच्या दोन्ही पत्नींनो!) जर तुम्ही अल्लाहकडे माफी मागाल (तर फार चांगले आहे). निःसंशय, तुमची हृदये झुकली आहेत आणि जर तुम्ही पैगंबराच्या विरोधात एकमेकांची मदत कराल तर निःसंशय, त्यांचा मित्र संरक्षक अल्लाह आहे आणि जिब्रील नेक ईमान राखणारे आणि त्याच्याखेरीज फरिश्तेही मदत करणारे आहेत
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
66:5 🔁 0/5
عَسَىٰ رَبُّهُۥٓ إِن طَلَّقَكُنَّ أَن يُبۡدِلَهُۥٓ أَزۡوَٰجًا خَيۡرًا مِّنكُنَّ مُسۡلِمَٰتٍ مُّؤۡمِنَٰتٍ قَٰنِتَٰتٍ تَٰٓئِبَٰتٍ عَٰبِدَٰتٍ سَٰٓئِحَٰتٍ ثَيِّبَٰتٍ وَأَبۡكَارًا  ۝٥
Asaa rabbuhooo in tallaqakunna anyyubdilahooo azwaajan khairam mnkunna muslimaatim mu`minaatin qaanitaatin taaa`ibaatin `aabidaatin saaa`ihaatin saiyibaatinw wa abkaaraa
५. जर तो (रसूल) तुम्हाला तलाक देऊन टाकील तर लवकरच त्यांना, त्यांचा पालनकर्ता (अल्लाह) तुमच्याऐवजी तुमच्यापेक्षा चांगल्या पत्न्या प्रदान करील, ज्या इस्लाम (धर्म) बाळगणाऱ्या, ईमान राखणाऱ्या, अल्लाहसमोर झुकणाऱ्या, माफी मागणाऱ्या, उपासना करणाऱ्या, रोजे (व्रत) राखणाऱ्या असतील विधवा आणि कुमारिका
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
66:6 🔁 0/5
يَٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُواْ قُوٓاْ أَنفُسَكُمۡ وَأَهۡلِيكُمۡ نَارًا وَقُودُهَا ٱلنَّاسُ وَٱلۡحِجَارَةُ عَلَيۡهَا مَلَٰٓئِكَةٌ غِلَاظٌ شِدَادٌ لَّا يَعۡصُونَ ٱللَّهَ مَآ أَمَرَهُمۡ وَيَفۡعَلُونَ مَا يُؤۡمَرُونَ  ۝٦
Yaaa ayyuhal lazeena samanoo qooo anfusakum wa ahleekum naaranw waqoodu han naasu wal hijaaratu `alaihaa malaaa`ikatun ghilaazun shidaadul laa ya`soonal laaha maa amarahum wa yaf`aloona maa yu`maroon
६. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही स्वतः आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना त्या आगीपासून वाचवा,१ जिचे इंधन मानव आणि दगड आहेत, जिच्यावर कठोर हृदयाचे सक्त फरिश्ते तैनात आहेत. ज्यांना अल्लाह जो आदेश देतो, त्याची ते अवज्ञा करीत नाहीत, किंबहुना जो काही आदेश दिला जातो त्याचे पालन करतात
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
66:7 🔁 0/5
يَٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ كَفَرُواْ لَا تَعۡتَذِرُواْ ٱلۡيَوۡمَۖ إِنَّمَا تُجۡزَوۡنَ مَا كُنتُمۡ تَعۡمَلُونَ  ۝٧
Yaaa ayyuhal lazeena kafaroo la ta`tazinul yawma innamaa tujzawna maa kuntum ta`maloon
७. हे इन्कारी लोकांनो! आज तुम्ही (विवशता आणि) बहाणा दाखवू नका, तुम्हाला केवळ तुमच्या दुष्कर्मांचे प्रतिफळ दिले जात आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
66:8 🔁 0/5
يَٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُواْ تُوبُوٓاْ إِلَى ٱللَّهِ تَوۡبَةً نَّصُوحًا عَسَىٰ رَبُّكُمۡ أَن يُكَفِّرَ عَنكُمۡ سَيِّـَٔاتِكُمۡ وَيُدۡخِلَكُمۡ جَنَّٰتٍ تَجۡرِي مِن تَحۡتِهَا ٱلۡأَنۡهَٰرُ يَوۡمَ لَا يُخۡزِي ٱللَّهُ ٱلنَّبِيَّ وَٱلَّذِينَ ءَامَنُواْ مَعَهُۥۖ نُورُهُمۡ يَسۡعَىٰ بَيۡنَ أَيۡدِيهِمۡ وَبِأَيۡمَٰنِهِمۡ يَقُولُونَ رَبَّنَآ أَتۡمِمۡ لَنَا نُورَنَا وَٱغۡفِرۡ لَنَآۖ إِنَّكَ عَلَىٰ كُلِّ شَيۡءٍ قَدِيرٌ  ۝٨
Yaaa ayyuhal lazeena aammano toobooo ilal laahi tawbatan nasoohan `asaa rabbukum any-yukaffira `ankum sayyi aatikum wa yudkhilakum jannaatin tajree min tahtihal anhaaru yawma laa yukhzil laahun nabiyya wallazeena aamanoo ma`ahoo nooruhum yas`aa baina aydeehim wa bi aymaanihim yaqooloona rabbanaaa atmim lanaa nooranaa waghfir lana innaka `alaa kulli shai`in qadeer
८. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही अल्लाहपुढे (खरी आणि) निखालस माफी मागा. संभवतः तुमच्या पालनकर्त्याने तुमची दुष्कर्मे मिटवावित. आणि तुम्हाला अशा जन्नतमध्ये दाखल करावे जिच्या खाली प्रवाह वाहत आहेत. ज्या दिवशी अल्लाह पैगंबराला आणि ईमान राखणाऱ्यांना, जे त्यांच्यासोबत आहेत अपमानित करणार नाही. त्यांचे दिव्य तेज (नूर) त्यांच्या पुढे आणि त्यांच्या उजवीकडे धावत असेल. हे दुआ (प्रार्थना) करत असतील की हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला संपूर्ण तेज (नूर) प्रदान कर आणि आम्हाला क्षमा कर. निःसंशय, तू प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगणारा आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
66:9 🔁 0/5
يَٰٓأَيُّهَا ٱلنَّبِيُّ جَٰهِدِ ٱلۡكُفَّارَ وَٱلۡمُنَٰفِقِينَ وَٱغۡلُظۡ عَلَيۡهِمۡۚ وَمَأۡوَىٰهُمۡ جَهَنَّمُۖ وَبِئۡسَ ٱلۡمَصِيرُ  ۝٩
yaaa ayyuuhan nabiyyu jaahidil kuffaara walmunaa-fiqeena waghluz `alaihim; wa maawaahum jahannamu wa bi`sal maseer
९. हे पैगंबर! काफिरांशी आणि मुनाफिक (दांभिक) लोकांशी जिहाद करा आणि त्यांच्यावर सक्ती (कठोरता) करा. त्यांचे ठिकाण जहन्नम आहे आणि ते मोठे वाईट ठिकाण आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
66:10 🔁 0/5
ضَرَبَ ٱللَّهُ مَثَلًا لِّلَّذِينَ كَفَرُواْ ٱمۡرَأَتَ نُوحٍ وَٱمۡرَأَتَ لُوطٍۖ كَانَتَا تَحۡتَ عَبۡدَيۡنِ مِنۡ عِبَادِنَا صَٰلِحَيۡنِ فَخَانَتَاهُمَا فَلَمۡ يُغۡنِيَا عَنۡهُمَا مِنَ ٱللَّهِ شَيۡـًٔا وَقِيلَ ٱدۡخُلَا ٱلنَّارَ مَعَ ٱلدَّٰخِلِينَ  ۝١٠
Darabal laahu masalal lillazeena kafarum ra ata Noobinw wamra ata Loot, kaanataa tahta `abdaini min `ibaadinaa saalihaini fakhaanataahumaa falam yughniyaa `anhumaa minal laahi shai anw-wa qeelad khulan naara ma`ad Daakhileen
१०. अल्लाहने काफिर लोकांकरिता नूहच्या आणि लूतच्या पत्नींचे उदाहरण दिले आहे. या दोघी आमच्या दासांपैकी दोन नेक सदाचारी दासांच्या कुटुंबात होत्या. मग त्यांनी त्यांच्याशी विश्वासघात केला, तेव्हा ते दोन्ही (दास) त्यांच्यापासून अल्लाहच्या (कोणत्याही शिक्षा - यातनेला) रोखू शकले नाहीत आणि आदेश दिला गेला की (स्त्रियांनो!) जहन्नममध्ये जाणाऱ्यांसोबत तुम्ही दोघीही जा
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
66:11 🔁 0/5
وَضَرَبَ ٱللَّهُ مَثَلًا لِّلَّذِينَ ءَامَنُواْ ٱمۡرَأَتَ فِرۡعَوۡنَ إِذۡ قَالَتۡ رَبِّ ٱبۡنِ لِي عِندَكَ بَيۡتًا فِي ٱلۡجَنَّةِ وَنَجِّنِي مِن فِرۡعَوۡنَ وَعَمَلِهِۦ وَنَجِّنِي مِنَ ٱلۡقَوۡمِ ٱلظَّٰلِمِينَ  ۝١١
Wa darabal laahu masa lal-lillazeena aamanumra ata Fir`awn; iz qaalat rabbibni lee `indaka baitan fil jannati wa najjinee min Fir`awna wa `amalihii wa najjinee minal qawmiz zaalimeen
११. आणि अल्लाहने ईमान राखणाऱ्यांकरिता फिरऔनच्या पत्नीचे उदाहरण सांगितले. जेव्हा तिने दुआ (प्रार्थना) केली की हे माझ्या पालनकर्त्या! माझ्यासाठी आपल्या जवळ जहन्नतमध्ये एक घर बनव आणि मला फिरऔनपासून व त्याच्या कर्मांपासून वाचव आणि मला अत्याचारी लोकांपासून मुक्ती दे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
66:12 🔁 0/5
وَمَرۡيَمَ ٱبۡنَتَ عِمۡرَٰنَ ٱلَّتِيٓ أَحۡصَنَتۡ فَرۡجَهَا فَنَفَخۡنَا فِيهِ مِن رُّوحِنَا وَصَدَّقَتۡ بِكَلِمَٰتِ رَبِّهَا وَكُتُبِهِۦ وَكَانَتۡ مِنَ ٱلۡقَٰنِتِينَ  ۝١٢
Wa Maryamab nata `Imraanal lateee ahsanat farjahaa fanafakhnaa feehi mir roobinaa wa saddaqat bikali maati Rabbihaa wa Kutubihee wakaanat minal qaaniteen
१२. आणि (उदाहरण दिले) इमरानची कन्या मरियमचे जिने आपल्या शील-अब्रूचे रक्षण केले, मग आम्ही आपल्यातर्फे तिच्यात प्राण (आत्मा) फुंकला आणि (मरियम) ने आपल्या पालनकर्त्याच्या वचनांचे आणि त्याच्या ग्रंथांचे समर्थन केले आणि ती उपासना करणारीं पैकी होती
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
💡 लपवलेल्या शब्दावर टॅप करा जेणेकरून तो तात्पुरता दिसेल — तुमची प्रगती आपोआप जतन होते.

🎉
🎊 शाब्बास! पाठांतर पूर्ण झाले
Mishary Rashid Alafasy
Mahmoud Khalil Al-Husary
Abdurrahman As-Sudais
Mohamed Siddiq Al-Minshawi
Abdul Basit Abdul Samad
Ali Al-Hudhaify
Ahmed ibn Ali al-Ajamy
Abu Bakr Ash-Shaatree
Muhammad Ayyoub
Abdullah Basfar
Abdullah Al-Juhani
Maher Al Muaiqly
0:00
0:00
-

पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers