🔥 0 दिवस सलग
📖 लांब सूरा — लहान भागांमध्ये विभागली आहे (45 आयत)
0/45
35:1
🔁 0/5
ٱلۡحَمۡدُ لِلَّهِ فَاطِرِ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِ جَاعِلِ ٱلۡمَلَٰٓئِكَةِ رُسُلًا أُوْلِيٓ أَجۡنِحَةٍ مَّثۡنَىٰ وَثُلَٰثَ وَرُبَٰعَۚ يَزِيدُ فِي ٱلۡخَلۡقِ مَا يَشَآءُۚ إِنَّ ٱللَّهَ عَلَىٰ كُلِّ شَيۡءٍ قَدِيرٌ ١
Alhamdu lillaahi faatiris samaawaati wal ardi jaa`ilil malaaa`ikati rusulan uleee ajnihatim masnaa wa sulaasa wa rubaa`; yazeedu fil khalqi maa yashaaa`; innal laaha `alaa kulli shai`in Qadeer
१. त्या अल्लाकरिता समस्त स्तुती - प्रशंसा आहे, जो आकाशांना आणि धरतीला निर्माण करणारा आणि दोन दोन, तीन तीन आणि चार चार पंख बाळगणाऱ्या फरिश्त्यांना आपला संदेशवाहक बनविणारा आहे१ सृष्टीनिर्मितीत जे इच्छितो वाढवितो. निःसंशय, अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगणारा आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:2
🔁 0/5
مَّا يَفۡتَحِ ٱللَّهُ لِلنَّاسِ مِن رَّحۡمَةٍ فَلَا مُمۡسِكَ لَهَاۖ وَمَا يُمۡسِكۡ فَلَا مُرۡسِلَ لَهُۥ مِنۢ بَعۡدِهِۦۚ وَهُوَ ٱلۡعَزِيزُ ٱلۡحَكِيمُ ٢
Maa yaftahil laahu linnaaasi mir rahmatin falaa mumsika lahaa wa maa yumsik falaa mursila lahoo mimb`dih; wa Huwal `Azeezul Hakeem
२. अल्लाह जो दया - कृपा (द्वार) लोकांकरिता उघड करील तर त्यास कोणी बंद करणारा नाही आणि ज्याच्यासाठी बंद करील तर त्यानंतर त्यास कोणी सुरू करणारा (उघडणारा) नाही आणि तोच जबरदस्त हिकमतशाली आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:3
🔁 0/5
يَٰٓأَيُّهَا ٱلنَّاسُ ٱذۡكُرُواْ نِعۡمَتَ ٱللَّهِ عَلَيۡكُمۡۚ هَلۡ مِنۡ خَٰلِقٍ غَيۡرُ ٱللَّهِ يَرۡزُقُكُم مِّنَ ٱلسَّمَآءِ وَٱلۡأَرۡضِۚ لَآ إِلَٰهَ إِلَّا هُوَۖ فَأَنَّىٰ تُؤۡفَكُونَ ٣
Yaaa ayyuhan naasuzkuroo ni`matal laahi `alaikum; hal min khaaliqin ghairul laahi yarzuqukum minas samaaa`i wal ard; laaa ilaaha illaa Huwa fa annaa tu`fakoon
३. लोकांनो! तुमच्यावर अल्लाहने जे उपकार केले आहेत, त्यांचे स्मरण करा. काय अल्लाहखेरीज दुसराही कोणी निर्माता आहे, जो तुम्हाला आकाशातून आणि जमिनीपासून रोजी (आजिविका) देत असावा? त्याच्याखेरीज कोणीही उपास्य नाही, तेव्हा तुम्ही कोठे उलट जात आहात
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:4
🔁 0/5
وَإِن يُكَذِّبُوكَ فَقَدۡ كُذِّبَتۡ رُسُلٌ مِّن قَبۡلِكَۚ وَإِلَى ٱللَّهِ تُرۡجَعُ ٱلۡأُمُورُ ٤
Wa iny yukazzibooka faqad kuzzibat Rusulum min qablik; wa ilal laahi turja`ul umoor
४. आणि जर ते तुम्हाला खोटे ठरवितात तर तुमच्या पूर्वीचे (सर्व) पैगंबरही खोटे ठरविले गेले आहेत आणि समस्त कार्ये अल्लाहच्याचकडे परतविले जातात
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:5
🔁 0/5
يَٰٓأَيُّهَا ٱلنَّاسُ إِنَّ وَعۡدَ ٱللَّهِ حَقٌّۖ فَلَا تَغُرَّنَّكُمُ ٱلۡحَيَوٰةُ ٱلدُّنۡيَا وَلَا يَغُرَّنَّكُم بِٱللَّهِ ٱلۡغَرُورُ ٥
Yaaa ayyuhan naasu inna wa`dal laahi haqqun falaa taghurrannakumul hayaatud dunyaa; wa laa yaghurran nakum billaahil gharoor
५. हे लोकांनो! अल्लाहचा वायदा सच्चा आहे. ऐहिक जीवनाने तुम्हाला धोक्यात न टाकावे आणि ना दगाबाज (सैताना) ने तुम्हाला गफलतीत मग्न ठेवावे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:6
🔁 0/5
إِنَّ ٱلشَّيۡطَٰنَ لَكُمۡ عَدُوٌّ فَٱتَّخِذُوهُ عَدُوًّاۚ إِنَّمَا يَدۡعُواْ حِزۡبَهُۥ لِيَكُونُواْ مِنۡ أَصۡحَٰبِ ٱلسَّعِيرِ ٦
Innash shaitaana lakum `aduwwun fattakhizoohu `aduwwaa; innamaa yad`oo hizbahoo liyakoonoo min ashaabis sa`eer
६. (लक्षात ठेवा) सैतान तुमचा शत्रू आहे, तुम्ही त्याला शत्रूच जाणा, तो तर आपल्या टोळीला केवळ अशासाठी बोलवितो की ते सर्व जहन्नममध्ये जाणारे व्हावेत
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:7
🔁 0/5
ٱلَّذِينَ كَفَرُواْ لَهُمۡ عَذَابٌ شَدِيدٌۖ وَٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّٰلِحَٰتِ لَهُم مَّغۡفِرَةٌ وَأَجۡرٌ كَبِيرٌ ٧
Allazeena kafaroo lahum `azaabun shadeed; wallazeena aamanoo wa `amilus saalihaati lahum maghfiratunw wa ajrun kabeer
७. जे लोक काफिर (इन्कारी) झाले, त्यांच्याकरिता सक्त अज़ाब आहे आणि ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले त्यांच्यासाठी क्षमा आणि मोठा चांगला मोबदला आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:8
🔁 0/5
أَفَمَن زُيِّنَ لَهُۥ سُوٓءُ عَمَلِهِۦ فَرَءَاهُ حَسَنًاۖ فَإِنَّ ٱللَّهَ يُضِلُّ مَن يَشَآءُ وَيَهۡدِي مَن يَشَآءُۖ فَلَا تَذۡهَبۡ نَفۡسُكَ عَلَيۡهِمۡ حَسَرَٰتٍۚ إِنَّ ٱللَّهَ عَلِيمُۢ بِمَا يَصۡنَعُونَ ٨
Afaman zuyyina lahoo sooo`u `amalihee fara aahu hasanaa; fa innal laaha yudillu mai yashaaa`u wa yahdee mai yahaaa`u falaa tazhab nafsuka `alaihim hasaraat; innal laaha `aleemun bimaa yasna`oon
८. काय तो मनुष्य, ज्याच्याकरिता त्याची दुष्कर्मे सुशोभित केली गेली आहेत तर तो त्यां (कर्मां) ना चांगले समजतो (काय तो मार्गदर्शन प्राप्त करणाऱ्या माणसा समान आहे?) (निश्चितच) अल्लाह ज्याला इच्छितो, मार्गभ्रष्ट करतो, आणि ज्याला इच्छितो मार्ग दाखवितो. तेव्हा तुम्ही त्यांच्याबद्दल दुःखी कष्टी होऊन आपला जीव कष्ट यातनेत टाकू नये. हे लोक जे काही करीत आहेत निःसंशय, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:9
🔁 0/5
وَٱللَّهُ ٱلَّذِيٓ أَرۡسَلَ ٱلرِّيَٰحَ فَتُثِيرُ سَحَابًا فَسُقۡنَٰهُ إِلَىٰ بَلَدٍ مَّيِّتٍ فَأَحۡيَيۡنَا بِهِ ٱلۡأَرۡضَ بَعۡدَ مَوۡتِهَاۚ كَذَٰلِكَ ٱلنُّشُورُ ٩
Wallaahul lazeee arsalar riyaaha fatuseeru shaaban fasuqnaahu ilaa baladim maiyitin fa ahyaynaa bihil arda ba`da mawtihaa; kazaalikan nushoor
९. आणि अल्लाहच वाऱ्यांना वाढवितो, जे ढगांना उंच नेतात, मग आम्ही त्या ढगांना कोरड्या जमिनीकडे नेतो आणि त्याद्वारे त्या जमिनीला तिच्या मृत्युनंतर (पुन्हा) जिवंत करतो. अशाच प्रकारे दुसऱ्यांदा जिवंत होऊन उठणेही आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:10
🔁 0/5
مَن كَانَ يُرِيدُ ٱلۡعِزَّةَ فَلِلَّهِ ٱلۡعِزَّةُ جَمِيعًاۚ إِلَيۡهِ يَصۡعَدُ ٱلۡكَلِمُ ٱلطَّيِّبُ وَٱلۡعَمَلُ ٱلصَّٰلِحُ يَرۡفَعُهُۥۚ وَٱلَّذِينَ يَمۡكُرُونَ ٱلسَّيِّـَٔاتِ لَهُمۡ عَذَابٌ شَدِيدٌۖ وَمَكۡرُ أُوْلَٰٓئِكَ هُوَ يَبُورُ ١٠
Man kaana yureedul `izzata falillaahil `izzatu jamee`aa; ilaihi yas`adul kalimut taiyibu wal`amalus saalihu yarfa`uh; wallazeena yamkuroonas sayyiaati lahum `azaabun shadeed; wa makru ulaaa`ika huwa yaboor
१०. जो मनुष्य मान-सन्मान प्राप्त करू इच्छित असेल, तर (त्याने जाणून घ्यावे की) समस्त मान-प्रतिष्ठा अल्लाहकरिताच आहे. समस्त पवित्र वचने त्याच्याचकडे चढतात आणि सत्कर्म त्यांना उंचविते, आणि जे लोक दुष्कर्मांच्या कट कारस्थानात व्यस्त राहतात, त्यांच्यासाठी मोठा सक्त अज़ाब आहे आणि त्यांचे हे पाखंड नाश पावेल
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:11
🔁 0/5
وَٱللَّهُ خَلَقَكُم مِّن تُرَابٍ ثُمَّ مِن نُّطۡفَةٍ ثُمَّ جَعَلَكُمۡ أَزۡوَٰجًاۚ وَمَا تَحۡمِلُ مِنۡ أُنثَىٰ وَلَا تَضَعُ إِلَّا بِعِلۡمِهِۦۚ وَمَا يُعَمَّرُ مِن مُّعَمَّرٍ وَلَا يُنقَصُ مِنۡ عُمُرِهِۦٓ إِلَّا فِي كِتَٰبٍۚ إِنَّ ذَٰلِكَ عَلَى ٱللَّهِ يَسِيرٌ ١١
Wallaahu khalaqakum min turaabin summa min nutfatin summa ja`alakum azwaajaa; wa maa tahmilu min unsaa wa laa tada`u illaa bi`ilmih; wa maa yu`ammaru mim mu`ammarinw wa laa yunqasu min `umuriheee illaa fee kitaab; inna zaalika `alal laahi yaseer
११. लोक हो! अल्लाहने तुम्हाल मातीपासून निर्माण केले, मग वीर्यापासून, मग तुम्हाला जोडी (जोडपे नर-नारी) बनविले. स्त्रियांचे गर्भ धारण करणे आणि बाळाचे जन्म घेणे, या सर्वांचे त्याला ज्ञान आहे, आणि कोणताही आयुष्यमान दीर्घायुष्य प्राप्त करीत नाही आणि ना कोणाचे आयुष्य घडते, परंतु हे सर्व एका ग्रंथात अस्तित्वात आहे. अल्लाकरिता ही गोष्ट फार सोपी आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:12
🔁 0/5
وَمَا يَسۡتَوِي ٱلۡبَحۡرَانِ هَٰذَا عَذۡبٌ فُرَاتٌ سَآئِغٌ شَرَابُهُۥ وَهَٰذَا مِلۡحٌ أُجَاجٌۖ وَمِن كُلٍّ تَأۡكُلُونَ لَحۡمًا طَرِيًّا وَتَسۡتَخۡرِجُونَ حِلۡيَةً تَلۡبَسُونَهَاۖ وَتَرَى ٱلۡفُلۡكَ فِيهِ مَوَاخِرَ لِتَبۡتَغُواْ مِن فَضۡلِهِۦ وَلَعَلَّكُمۡ تَشۡكُرُونَ ١٢
Wa maa yastawil bahraani haaza `azbun furaatun saaa`ighun sharaabuhoo wa haazaa milhun ujaaj; wa min kullin taakuloona lahman tariyyanw wa tastakhrijoona hilyatan talbasoonahaa wa taral fulka feehi mawaakhira litabtaghoo min fadlihee wa la`allakm tashkuroon
१२. आणि दोन समुद्र समान नाहीत. हा गोड आहे, तहान भागवितो, प्यायला चांगला आणि तो दुसरा खारट आहे, कडू. तुम्ही या दोघांपासून ताजे मांस खाता आणि ते दागिने काढता, ज्यांना तुम्ही अंगावर घालता आणि तुम्ही पाहता की मोठमोठ्या नावा, पाण्याला छेदणाऱ्या, त्या समुद्रात आहे, यासाठी की तुम्ही त्याच्या कृपेचा शोध घ्यावा आणि यासाठी की तुम्ही त्याचे आभार मानावेत
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:13
🔁 0/5
يُولِجُ ٱلَّيۡلَ فِي ٱلنَّهَارِ وَيُولِجُ ٱلنَّهَارَ فِي ٱلَّيۡلِ وَسَخَّرَ ٱلشَّمۡسَ وَٱلۡقَمَرَۖ كُلٌّ يَجۡرِي لِأَجَلٍ مُّسَمًّىۚ ذَٰلِكُمُ ٱللَّهُ رَبُّكُمۡ لَهُ ٱلۡمُلۡكُۚ وَٱلَّذِينَ تَدۡعُونَ مِن دُونِهِۦ مَا يَمۡلِكُونَ مِن قِطۡمِيرٍ ١٣
Yoolijul laila fin nahaari wa yoolijun nahaara fil laili wa sakhkharash shamsa wal qamara kulluny yajree li ajalim musammaa; zaalikumul lahuu Rabbukum lahul mulk; wallazeena tad`oona min doonihee maa yamlikoona min qitmeer
१३. तो रात्रीला दिवसात आणि दिवसाला रात्रीत दाखल करतो आणि सूर्य व चंद्राला त्यानेच कामास लावले आहे. प्रत्येक एका निर्धारित अवधीपावेतो चालत आहे. हाच अल्लाह होय, तुम्हा सर्वांचा पालनकर्ता. त्याचीच राज्य सत्ता आहे, आणि ज्यांना तुम्ही त्याच्याखेरीज पुकारत आहात, ते तर खजुरीच्या बी सालपटाचेही मालक नाहीत
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:14
🔁 0/5
إِن تَدۡعُوهُمۡ لَا يَسۡمَعُواْ دُعَآءَكُمۡ وَلَوۡ سَمِعُواْ مَا ٱسۡتَجَابُواْ لَكُمۡۖ وَيَوۡمَ ٱلۡقِيَٰمَةِ يَكۡفُرُونَ بِشِرۡكِكُمۡۚ وَلَا يُنَبِّئُكَ مِثۡلُ خَبِيرٍ ١٤
in tad`oohum laa yasma`oo du`aaa`akum wa law sami`oo mas tajaaboo lakum; wa Yawmal Qiyaamati Yakfuroona bishirkikum; wa laa yunabbi`uka mislu khabeer
१४. जर तुम्ही त्यांना पुकाराल तर ते तुमची पुकार ऐकणारच नाहीत. आणि जर (समजा) ऐकूनही घेतील तर कबूल करणार नाहीत. किंबहुना कयामतच्या दिवशी तुमच्या शिर्क (अनेकईश्वरउपासना ) चा साफ इन्कार करतील१ आणि तुम्हाला कोणीही अल्लाहसारखा जाणकार (वास्तवपूर्ण) खबरी देणार नाही
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:15
🔁 0/5
۞ يَٰٓأَيُّهَا ٱلنَّاسُ أَنتُمُ ٱلۡفُقَرَآءُ إِلَى ٱللَّهِۖ وَٱللَّهُ هُوَ ٱلۡغَنِيُّ ٱلۡحَمِيدُ ١٥
Yaaa ayyunhan naasu antumul fuqaraaa`u ilallaahi wallaahu Huwal Ghaniyyul Hameed
१५. लोक हो! तुम्ही अल्लाहचे भिकारी आहात आणि अल्लाहच निःस्पृह (गरज नसलेला) प्रशंसनीय आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:16
🔁 0/5
إِن يَشَأۡ يُذۡهِبۡكُمۡ وَيَأۡتِ بِخَلۡقٍ جَدِيدٍ ١٦
Iny yashaa yuzhibkum wa yaati bikhalqin jadeed
१६. जर त्याने इच्छिले तर तुमचा सर्वनाश करून टाकील आणि एक नवी निर्मिती (सृष्टी) निर्माण करील
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:17
🔁 0/5
وَمَا ذَٰلِكَ عَلَى ٱللَّهِ بِعَزِيزٍ ١٧
Wa maa zaalika `alal laahi bi`azeez
१७. आणि ही गोष्ट अल्लाहकरिता काहीच कठीण नाही
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:18
🔁 0/5
وَلَا تَزِرُ وَازِرَةٌ وِزۡرَ أُخۡرَىٰۚ وَإِن تَدۡعُ مُثۡقَلَةٌ إِلَىٰ حِمۡلِهَا لَا يُحۡمَلۡ مِنۡهُ شَيۡءٌ وَلَوۡ كَانَ ذَا قُرۡبَىٰٓۗ إِنَّمَا تُنذِرُ ٱلَّذِينَ يَخۡشَوۡنَ رَبَّهُم بِٱلۡغَيۡبِ وَأَقَامُواْ ٱلصَّلَوٰةَۚ وَمَن تَزَكَّىٰ فَإِنَّمَا يَتَزَكَّىٰ لِنَفۡسِهِۦۚ وَإِلَى ٱللَّهِ ٱلۡمَصِيرُ ١٨
Wa laa taziru waaziratun wizra ukhraa; wa in tad`u musqalatun ilaa himlihaa laa yuhmal minhu shai`unw wa law kaana zaa qurbaa; innamaa tunzirul lazeena yakhshawna Rabbahum bilghaibi wa aqaamus Sallah; wa man tazakkaa fa innamaa yatazakkaa linafsih; wa ilal laahil maseer
१८. आणि कोणीही ओझे उचलणारा, दुसऱ्याचे ओझे उचलणार नाही आणि जर कोणी जास्त वजनाचे ओझे बाळगणारा आपला भार उचलण्याकरिता दुसऱ्या कोणाला बोलविल तर तो त्यातून काहीच उचलू शकणार नाही, मग तो जवळचा नातेवाईक का असेना. तुम्ही केवळ अशांनाच सावध करू शकता, जे पाहिल्याविनाच आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगतात आणि नमाज नियमितपणे पढतात आणि जो पाक (स्वच्छ - शुद्ध) होईल, तो आपल्याच फायद्यासाठी पाक होईल आणि (शेवटी) अल्लाहकडेच परतून जायचे आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:19
🔁 0/5
وَمَا يَسۡتَوِي ٱلۡأَعۡمَىٰ وَٱلۡبَصِيرُ ١٩
Wa maa tastawil a`maa wal baseer
१९. आणि आंधळा व डोळस दोन्ही समान नाहीत
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:20
🔁 0/5
وَلَا ٱلظُّلُمَٰتُ وَلَا ٱلنُّورُ ٢٠
Wa laz zulumaatu wa lannoon
२०. आणि ना अंधार आणि ना प्रकाश
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:21
🔁 0/5
وَلَا ٱلظِّلُّ وَلَا ٱلۡحَرُورُ ٢١
Wa laz zillu wa lal haroor
२१. आणि ना सावली आणि ना ऊन
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:22
🔁 0/5
وَمَا يَسۡتَوِي ٱلۡأَحۡيَآءُ وَلَا ٱلۡأَمۡوَٰتُۚ إِنَّ ٱللَّهَ يُسۡمِعُ مَن يَشَآءُۖ وَمَآ أَنتَ بِمُسۡمِعٍ مَّن فِي ٱلۡقُبُورِ ٢٢
Wa maa yastawil ahyaaa`u wa lal amwaat; innal laaha yusmi`u mai yashaaa`u wa maaa anta bimusi`im man fil quboor
२२. आणि जीवित व मृत दोघे समान असू शकत नाही, आणि अल्लाह ज्याला इच्छितो ऐकवितो, आणि तुम्ही त्या लोकांना ऐकवू शकत नाही, जे कबरींमध्ये आहेत
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:23
🔁 0/5
إِنۡ أَنتَ إِلَّا نَذِيرٌ ٢٣
In anta illaa nazeer
२३. तुम्ही तर फक्त खबरदार करणारे आहात
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:24
🔁 0/5
إِنَّآ أَرۡسَلۡنَٰكَ بِٱلۡحَقِّ بَشِيرًا وَنَذِيرًاۚ وَإِن مِّنۡ أُمَّةٍ إِلَّا خَلَا فِيهَا نَذِيرٌ ٢٤
Innaa arsalnaak bil haqqi basheeranw wa nazeeraa; wa im min ummatin illaa khalaa feehaa nazeer
२४. आम्हीच तुम्हाला सत्यासह खूशखबर ऐकविणारा आणि भय दाखविणारा बनवून पाठविले आहे आणि कोणताही जनसमुदाय असा होऊन गेला नाही की ज्यात एखादा खबरदार करणारा आला नसावा
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:25
🔁 0/5
وَإِن يُكَذِّبُوكَ فَقَدۡ كَذَّبَ ٱلَّذِينَ مِن قَبۡلِهِمۡ جَآءَتۡهُمۡ رُسُلُهُم بِٱلۡبَيِّنَٰتِ وَبِٱلزُّبُرِ وَبِٱلۡكِتَٰبِ ٱلۡمُنِيرِ ٢٥
Wa inyukazzibooka faqad kazzabal lazeena min qablihim jaaa`at hum Rusuluhum bilbaiyinaati wa biz Zuburi wa bil Kitaabil Muneer
२५. आणि जर हे लोक तुम्हाला खोटे ठरवतील तर त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनीही खोटे ठरविले होते, त्यांच्याजवळदेखील त्यांचे पैगंबर मोजिजे (ईशचमत्कार), सहीफे (पोथी) आणि स्पष्ट ग्रंथ घेऊन आले होते
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:26
🔁 0/5
ثُمَّ أَخَذۡتُ ٱلَّذِينَ كَفَرُواْۖ فَكَيۡفَ كَانَ نَكِيرِ ٢٦
Summa akhaztul lazeena kafaroo fakaifa kaana nakeer
२६. मग मी त्या काफिरांना (सत्य-विरोधकांना) धरले, तर कशी होती माझी शिक्षा
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:27
🔁 0/5
أَلَمۡ تَرَ أَنَّ ٱللَّهَ أَنزَلَ مِنَ ٱلسَّمَآءِ مَآءً فَأَخۡرَجۡنَا بِهِۦ ثَمَرَٰتٍ مُّخۡتَلِفًا أَلۡوَٰنُهَاۚ وَمِنَ ٱلۡجِبَالِ جُدَدُۢ بِيضٌ وَحُمۡرٌ مُّخۡتَلِفٌ أَلۡوَٰنُهَا وَغَرَابِيبُ سُودٌ ٢٧
Alam tara annal laaha anzala minas samaaa`i maaa`an fa akhrajnaa bihee samaraatim mukhtalifan alwaanuhaa; wa minal jibaali judadum beedunw wa humrum mukhtalifun alwaanuhaa wa gharaabeebu sood
२७. काय तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिले नाही की अल्लाहने आकाशातून पाणी अवतरित केले, मग आम्ही त्याच्याद्वारे अनेक रंगाची फळे निर्माण केली आणि पर्वतांचेही अनेक हिस्से आहेत सफेद आणि लाल की त्यांचे देखील अनेक रंग आहेत आणि गडद काळेही
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:28
🔁 0/5
وَمِنَ ٱلنَّاسِ وَٱلدَّوَآبِّ وَٱلۡأَنۡعَٰمِ مُخۡتَلِفٌ أَلۡوَٰنُهُۥ كَذَٰلِكَۗ إِنَّمَا يَخۡشَى ٱللَّهَ مِنۡ عِبَادِهِ ٱلۡعُلَمَٰٓؤُاْۗ إِنَّ ٱللَّهَ عَزِيزٌ غَفُورٌ ٢٨
Wa minan naasi wadda waaabbi wal an`aami mukhtalifun alwaanuhoo kazalik; innamaa yakhshal laaha min `ibaadihil `ulamaaa`; innal laaha `Azeezun Ghafoor
२८. आणि अशाच प्रकारे माणसांमध्ये, जनावरांमध्ये आणि चतुष्पाद प्राण्यांमध्येही काही असे आहेत ज्यांचे रंग वेगवेगळे आहेत. अल्लाहशी त्याचे तेच दास भय राखतात, जे ज्ञान बाळगतात. वास्तविक अल्लाह मोठा वर्चस्वशाली, माफ करणारा आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:29
🔁 0/5
إِنَّ ٱلَّذِينَ يَتۡلُونَ كِتَٰبَ ٱللَّهِ وَأَقَامُواْ ٱلصَّلَوٰةَ وَأَنفَقُواْ مِمَّا رَزَقۡنَٰهُمۡ سِرًّا وَعَلَانِيَةً يَرۡجُونَ تِجَٰرَةً لَّن تَبُورَ ٢٩
Innal lazeena yatloona Kitabbal laahi wa aqaamus Salaata wa anfaqoo mimmaa razaqnaahum sirranw wa `alaa niyatany yarjoona tijaaratal lan taboor
२९. जे लोक अल्लाहच्या ग्रंथाचे पठण (तिलावत) करतात आणि नमाज नित्य नेमाने पढतात आणि जे काही आम्ही त्यांना प्रदान केले आहे त्यातून गुप्तपणे आणि उघडपणे खर्च करतात, ते अशा व्यापाराची आशा बाळगतात, जो कधीही तोट्यात राहणार नाही
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:30
🔁 0/5
لِيُوَفِّيَهُمۡ أُجُورَهُمۡ وَيَزِيدَهُم مِّن فَضۡلِهِۦٓۚ إِنَّهُۥ غَفُورٌ شَكُورٌ ٣٠
Liyuwaffiyahum ujoorahum wa yazeedahum min fadlih; innahoo Ghafoorun Shakoor
३०. यासाठी की त्यांना त्यांचा मोबदला पुरेपूर दिला जावा आणि त्यांना आपल्या कृपेने आणखी जास्त प्रदान करावे. निःसंशय, तो मोठा माफ करणारा, गुणग्राहक आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:31
🔁 0/5
وَٱلَّذِيٓ أَوۡحَيۡنَآ إِلَيۡكَ مِنَ ٱلۡكِتَٰبِ هُوَ ٱلۡحَقُّ مُصَدِّقًا لِّمَا بَيۡنَ يَدَيۡهِۗ إِنَّ ٱللَّهَ بِعِبَادِهِۦ لَخَبِيرُۢ بَصِيرٌ ٣١
Wallaeee awhainaaa ilaika minal Kitaabi huwal haqqu musaddiqal limaa baina yadayh; innal laaha bi`ibaadihee la khabeerum Baseer
३१. आणि हा ग्रंथ जो आम्ही तुमच्याकडे वहयी (प्रकाशना) द्वारे पाठविला आहे तो पूर्णतः सत्य आहे, जो आपल्या पूर्वीच्या ग्रंथांचीही पुष्टी करतो. निःसंशय, अल्लाह आपल्या दासांची पूर्ण माहिती ठेवणारा, चांगल्या प्रकारे पाहणारा आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:32
🔁 0/5
ثُمَّ أَوۡرَثۡنَا ٱلۡكِتَٰبَ ٱلَّذِينَ ٱصۡطَفَيۡنَا مِنۡ عِبَادِنَاۖ فَمِنۡهُمۡ ظَالِمٌ لِّنَفۡسِهِۦ وَمِنۡهُم مُّقۡتَصِدٌ وَمِنۡهُمۡ سَابِقُۢ بِٱلۡخَيۡرَٰتِ بِإِذۡنِ ٱللَّهِۚ ذَٰلِكَ هُوَ ٱلۡفَضۡلُ ٱلۡكَبِيرُ ٣٢
Summa awrasnal Kitaaballazeenas tafainaa min `ibaadinaa faminhum zaalimul linafsihee wa minhum muqtasid, wa minhum saabiqum bilkhairaati bi iznil laah; zaalika huwal fadlul kabeer
३२. मग (या) ग्रंथाचा उत्तराधिकारी आम्ही त्या लोकांना बनविले, ज्यांना आम्ही आपल्या दासांमधून निवडून घेतले. मग काही तर आपल्या प्राणांवर अत्याचार करणारे आहेत, आणि काही मध्यम दर्जाचे आहेत आणि त्यांच्यापैकी काही अल्लाहने दिलेल्या तौफिक (सुबुद्धी) ने सत्कर्मात पुढेच जात राहतात. हा फार मोठा अनुग्रह आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:33
🔁 0/5
جَنَّٰتُ عَدۡنٍ يَدۡخُلُونَهَا يُحَلَّوۡنَ فِيهَا مِنۡ أَسَاوِرَ مِن ذَهَبٍ وَلُؤۡلُؤًاۖ وَلِبَاسُهُمۡ فِيهَا حَرِيرٌ ٣٣
jannaatu `adniny yad khuloonahaa yuhallawna feeha min asaawira min zahabinw wa lu`lu`anw wa libaa suhum feehaa hareer
३३. सदैव काळ राहण्याच्या त्या बागा आहेत, ज्यात हे लोक प्रवेश करतील, तिथे त्यांना सोन्याची कांकणे आणि मोती (अंगावर) घातली जातील आणि तिथे त्यांची वस्त्रे रेशमाची असतील
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:34
🔁 0/5
وَقَالُواْ ٱلۡحَمۡدُ لِلَّهِ ٱلَّذِيٓ أَذۡهَبَ عَنَّا ٱلۡحَزَنَۖ إِنَّ رَبَّنَا لَغَفُورٌ شَكُورٌ ٣٤
Wa qaalul hamdu lillaahil lazeee azhaba `annal hazan; inna Rabbanaa la Ghafoorun Shakoor
३४. आणि म्हणतील की अल्लाहचे अनंत उपकार आहेत, ज्याने आमच्यापासून दुःख दूर केले. निःसंशय, आमचा पालनकर्ता मोठा माफ करणारा आणि कदर जाणणारा आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:35
🔁 0/5
ٱلَّذِيٓ أَحَلَّنَا دَارَ ٱلۡمُقَامَةِ مِن فَضۡلِهِۦ لَا يَمَسُّنَا فِيهَا نَصَبٌ وَلَا يَمَسُّنَا فِيهَا لُغُوبٌ ٣٥
Allazeee ahallanaa daaral muqaamati min fadlihee laa yamassunaa feehaa nasabunw wa laa yamassunaa feehaa lughoob
३५. ज्याने आम्हाला आपल्या कृपेने सदैव काळ राहण्याच्या ठिकाणी उतरविले, जिथे ना आम्हाला काही कष्ट पोहोचेल आणि ना कसला थकवा जाणवेल
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:36
🔁 0/5
وَٱلَّذِينَ كَفَرُواْ لَهُمۡ نَارُ جَهَنَّمَ لَا يُقۡضَىٰ عَلَيۡهِمۡ فَيَمُوتُواْ وَلَا يُخَفَّفُ عَنۡهُم مِّنۡ عَذَابِهَاۚ كَذَٰلِكَ نَجۡزِي كُلَّ كَفُورٍ ٣٦
Wallazeena kafaroo lahum naaru Jahannama laa yuqdaa `alaihim fa yamootoo wa laa yukhaffafu `anhum min `azaabihaa; kazaalika najzee kulla kafoor
३६. आणि जे लोक काफिर (इन्कारी) आहेत, त्यांच्यासाठी जहन्नमची आग आहे, ना तर त्यांना मृत्यु येईल की ते मरुन जावेत आणि ना जहन्नमची शिक्षाच कमी केली जाईल. आम्ही प्रत्येक काफिराला अशीच शिक्षा - यातना देतो
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:37
🔁 0/5
وَهُمۡ يَصۡطَرِخُونَ فِيهَا رَبَّنَآ أَخۡرِجۡنَا نَعۡمَلۡ صَٰلِحًا غَيۡرَ ٱلَّذِي كُنَّا نَعۡمَلُۚ أَوَلَمۡ نُعَمِّرۡكُم مَّا يَتَذَكَّرُ فِيهِ مَن تَذَكَّرَ وَجَآءَكُمُ ٱلنَّذِيرُۖ فَذُوقُواْ فَمَا لِلظَّٰلِمِينَ مِن نَّصِيرٍ ٣٧
Wa hum yastarikhoona feehaa Rabbanaa akhrijnaa na`mal saalihan ghairal lazee kunnaa na`mal; awa lamnu `ammirkum maa yatazak karu feehi man tazakkara wa jaaa`akumun nazeeru fazooqoo famaa lizzaalimeena min naseer
३७. आणि ते लोक त्यात (जहन्नममध्ये) मोठमोठ्याने ओरडतील की हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला (यातून) बाहेर काढ आम्ही चांगले कर्म करू, त्या कर्मांखेरीज, जे आम्ही करीत होतो (अल्लाह फर्माविल) की काय आम्ही तुम्हाला एवढे आयुष्य दिले नव्हते की ज्याला समजून घ्यायचे असते, तो समजू शकत होता१ आणि तुमच्याजवळ खबरदार करणाराही पोहचला होता,२ तेव्हा आता गोडी चाखा (अशा) जुलमी अत्याचारी लोकांचा कोणीही सहाय्य करणारा नाही
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:38
🔁 0/5
إِنَّ ٱللَّهَ عَٰلِمُ غَيۡبِ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۚ إِنَّهُۥ عَلِيمُۢ بِذَاتِ ٱلصُّدُورِ ٣٨
Innal laaha `aalimu ghaibis samaawaati wal ard; innahoo `aleemum bizaatis sudoor
३८. निःसंशय, अल्लाह आकाशांच्या आणि जमिनीच्या लपलेल्या वस्तूंना जाणणारा आहे. निःसंशय, तो छातीतल्या (मनातल्या) गोष्टींनाही जाणणारा आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:39
🔁 0/5
هُوَ ٱلَّذِي جَعَلَكُمۡ خَلَٰٓئِفَ فِي ٱلۡأَرۡضِۚ فَمَن كَفَرَ فَعَلَيۡهِ كُفۡرُهُۥۖ وَلَا يَزِيدُ ٱلۡكَٰفِرِينَ كُفۡرُهُمۡ عِندَ رَبِّهِمۡ إِلَّا مَقۡتًاۖ وَلَا يَزِيدُ ٱلۡكَٰفِرِينَ كُفۡرُهُمۡ إِلَّا خَسَارًا ٣٩
Huwal lazee ja`alakum khalaaa`ifa fil ard; faman kafara fa`alaihi kufruhoo; wa laa yazeedul kaafireena kufruhum `inda Rabbihim illaa maqtanw wa la yazeedul kaafireena kufruhum illaa khasaaraa
३९. तोच असा आहे, ज्याने तुम्हाला धरतीवर बसविले, तेव्हा जो मनुष्य कुप्र (इन्कार) करील तर त्याच्या कुप्रचे ओझे त्याच्यावरच येईल आणि काफिर लोकांकरिता, त्यांचा इन्कार त्यांच्या पालनकर्त्याजवळ क्रोध वाढविण्याचेच कारण ठरतो आणि काफिरांसाठी त्यांचा इन्कार नुकसान वाढविण्याचीच सबब ठरतो
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:40
🔁 0/5
قُلۡ أَرَءَيۡتُمۡ شُرَكَآءَكُمُ ٱلَّذِينَ تَدۡعُونَ مِن دُونِ ٱللَّهِ أَرُونِي مَاذَا خَلَقُواْ مِنَ ٱلۡأَرۡضِ أَمۡ لَهُمۡ شِرۡكٌ فِي ٱلسَّمَٰوَٰتِ أَمۡ ءَاتَيۡنَٰهُمۡ كِتَٰبًا فَهُمۡ عَلَىٰ بَيِّنَتٍ مِّنۡهُۚ بَلۡ إِن يَعِدُ ٱلظَّٰلِمُونَ بَعۡضُهُم بَعۡضًا إِلَّا غُرُورًا ٤٠
Qul ara`aytum shurakaaa`a kumul lazeena tad`oona min doonil laah; aroonee maazaa khalaqoo minal ardi am lahum shirkun fis samaawaati am aatainaahum Kitaaban fahum `alaa baiyinatim minh; bal iny ya`iiduz zaalimoona ba `duhum ba`dan illaa ghurooraa
४०. (तुम्ही) सांगा की तुम्ही आपल्या (ठरविलेल्या) सहभागी ईश्वरांची अवस्था तर सांगा, त्यांना तुम्ही अल्लाहखेरीज पुकारीत असता, अर्थात मला हे सांगा की त्यांनी धरतीचा कोणता (हिस्सा) बनविला आहे किंवा त्यांचा आकाशात काही सहभाग आहे अथवा आम्ही त्यांंना एखादा ग्रंथ दिला आहे की हे त्याच्या पुराव्यावर अटळ असावेत? नव्हे, किंबहुना हे अत्याचारी एकमेकांशी केवळ फसवणुकीच्या गोष्टींचे वायदे करीत असतात
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:41
🔁 0/5
۞ إِنَّ ٱللَّهَ يُمۡسِكُ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضَ أَن تَزُولَاۚ وَلَئِن زَالَتَآ إِنۡ أَمۡسَكَهُمَا مِنۡ أَحَدٍ مِّنۢ بَعۡدِهِۦٓۚ إِنَّهُۥ كَانَ حَلِيمًا غَفُورًا ٤١
Innal laaha yumsikus samaawaati wal arda an tazoolaaa; wa la`in zaalataaa in amsa kahumaa min ahadim mim ba`dih; innahoo kaana Haleeman Ghafooraa
४१. निःसंशय, अल्लाहने आकाशांना आणि जमिनीला धरून ठेवले आहे की ते डगमगू नयेत आणि जर ते डगमगले तर मग अल्लाहखेरीज कोणी त्यांना धरूही शकत नाही. निःसंशय तो मोठा सहनशील, माफ करणारा आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:42
🔁 0/5
وَأَقۡسَمُواْ بِٱللَّهِ جَهۡدَ أَيۡمَٰنِهِمۡ لَئِن جَآءَهُمۡ نَذِيرٌ لَّيَكُونُنَّ أَهۡدَىٰ مِنۡ إِحۡدَى ٱلۡأُمَمِۖ فَلَمَّا جَآءَهُمۡ نَذِيرٌ مَّا زَادَهُمۡ إِلَّا نُفُورًا ٤٢
Wa aqsamoo billaahi jahda aymaanihim la`in jaaa`ahum nazeerul layakoonunna ahdaa min ihdal umami falam maa jaaa`ahum nazeerum maa zaadahum illaa nufooraa
४२. आणि या काफिर लोकांनी मोठी दृढशपथ घेतली होती की जर त्यांच्याजवळ कोणी खबरदार करणारा आला तर ते प्रत्येक समुदाया (उम्मत) पेक्षा जास्त मार्गदर्शन प्राप्त करणारे बनतील, मग जेव्हा त्यांच्याजवळ एक पैगंबर येऊन पोहोचला तेव्हा त्यांच्या तिरस्कारातच प्रगति झाली
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:43
🔁 0/5
ٱسۡتِكۡبَارًا فِي ٱلۡأَرۡضِ وَمَكۡرَ ٱلسَّيِّيِٕۚ وَلَا يَحِيقُ ٱلۡمَكۡرُ ٱلسَّيِّئُ إِلَّا بِأَهۡلِهِۦۚ فَهَلۡ يَنظُرُونَ إِلَّا سُنَّتَ ٱلۡأَوَّلِينَۚ فَلَن تَجِدَ لِسُنَّتِ ٱللَّهِ تَبۡدِيلًاۖ وَلَن تَجِدَ لِسُنَّتِ ٱللَّهِ تَحۡوِيلًا ٤٣
Istakbaaran fil ardi wa makras sayyi`; wa laa yaheequl makrus sayyi`u illaa bi ahlih; fahal yanzuroona illaa sunnatal awwaleen; falan tajida lisunnatil laahi tabdeelanw wa lan tajida lisunnatil laahi tahweela
४३. जगात स्वतःला मोठा समजल्यामुळे आणि त्यांच्या वाईट प्रयत्नांमुळे आणि वाईट प्रयत्न करणाऱ्यांची शिक्षा ते प्रयत्न करणाऱ्यांनाच भोगावी लागते तर काय हे त्याच व्यवहाराच्या प्रतीक्षेत आहेत, जो पूर्वीच्या लोकांशी केला जात राहिला? तेव्हा तुम्हाला अल्लाहच्या पद्धतीत कधीही बदल आढळणार नाही आणि तुम्हाला अल्लाहच्या नियमात कधी बदल होत असलेला आढळणार नाही
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:44
🔁 0/5
أَوَلَمۡ يَسِيرُواْ فِي ٱلۡأَرۡضِ فَيَنظُرُواْ كَيۡفَ كَانَ عَٰقِبَةُ ٱلَّذِينَ مِن قَبۡلِهِمۡ وَكَانُوٓاْ أَشَدَّ مِنۡهُمۡ قُوَّةًۚ وَمَا كَانَ ٱللَّهُ لِيُعۡجِزَهُۥ مِن شَيۡءٍ فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَلَا فِي ٱلۡأَرۡضِۚ إِنَّهُۥ كَانَ عَلِيمًا قَدِيرًا ٤٤
Awalam yaseeroo fil ardi fa yanzuroo kaifa kaana `aaqibatul lazeena min qblihim wa kaanoo ashadda minhum quwwah; wa maa kaanal laahu liyu`jizahoo min shai`in fis samaawaati wa laa fil ard; innahoo kaana `Aleeman Qadeeraa
४४. काय हे लोक धरतीवर हिंडले फिरले नाहीत की त्यांनी पाहिले असते की जे लोक यांच्यापूर्वी होऊन गेलेत, त्यांचा अंत कसा झाला. वास्तविक ते लोक यांच्यापेक्षा अधिक शक्तिशाली होते. आणि आकाशांमध्ये व धरतीवर अशी कोणतीही वस्तू नाही जी अल्लाहला लाचार करील. तो सर्व काही जाणणारा, मोठा सामर्थ्यशाली आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
35:45
🔁 0/5
وَلَوۡ يُؤَاخِذُ ٱللَّهُ ٱلنَّاسَ بِمَا كَسَبُواْ مَا تَرَكَ عَلَىٰ ظَهۡرِهَا مِن دَآبَّةٍ وَلَٰكِن يُؤَخِّرُهُمۡ إِلَىٰٓ أَجَلٍ مُّسَمًّىۖ فَإِذَا جَآءَ أَجَلُهُمۡ فَإِنَّ ٱللَّهَ كَانَ بِعِبَادِهِۦ بَصِيرَۢا ٤٥
Wa law yu`aakhizul laahun naasa bima kasaboo maa taraka `alaa zahrihaa min daaabbatinw wa laakiny yu`akhkhiruhum ilaaa ajalim musamman fa izaa jaaa`a ajaluhum fa innal laaha kaana bi`ibaadihee Baseeraa
४५. आणि जर अल्लाह, लोकांना त्यांच्या कर्मांमुळे त्वरित पकडीत घेऊ लागला असता तर संपूर्ण धरतीवर एक जीवदेखील सोडला नसता तथापि अल्लाह त्यांना एका निर्धारित समयापर्यंत सवड देत आहे, तर जेव्हा त्यांची ती वेळ येऊन पोहोचेल तेव्हा अल्लाह आपल्या दासांना स्वतः पाहून घेईल
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
💡 लपवलेल्या शब्दावर टॅप करा जेणेकरून तो तात्पुरता दिसेल — तुमची प्रगती आपोआप जतन होते.
العربيةEnglishBahasa IndonesiaTürkçeРусскийفارسیFrançaisاردوবাংলাDeutschEspañol中文हिन्दीPortuguêsItalianoภาษาไทยPolskiNederlandsShqipKiswahiliO'zbekதமிழ்MelayuBosanskiSoomaaliAzərbaycanکوردی한국어日本語SvenskaDanskNorskپښتوമലയാളംසිංහලTamazightHausaአማርኛБългарскиТоҷикӣҚазақшаFilipinoسنڌيYorùbáFulfuldeТатарчаئۇيغۇرچەКыргызчаਪੰਜਾਬੀJawaతెలుగుမြန်မာગુજરાતીOromoमराठीTiếng ViệtMalagasyНохчийнWolofދިވެހިಕನ್ನಡУкраїнськаΕλληνικάქართულიខ្មែរدریQafar afMaranaoनेपाली
पवित्र कुराण
Tuesday, August 18, 2026
Don't forget us in your sincere prayers







