🔥 0 दिवस सलग
📖 लांब सूरा — लहान भागांमध्ये विभागली आहे (54 आयत)
0/54
34:1
🔁 0/5
ٱلۡحَمۡدُ لِلَّهِ ٱلَّذِي لَهُۥ مَا فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَمَا فِي ٱلۡأَرۡضِ وَلَهُ ٱلۡحَمۡدُ فِي ٱلۡأٓخِرَةِۚ وَهُوَ ٱلۡحَكِيمُ ٱلۡخَبِيرُ ١
Alhamdu lillaahil lazee lahoo maa fis samaawaati wa maa fil ardi wa lahul hamdu fil aakhirah; wa Huwal Hakeemul Khabeer
१. समस्त प्रशंसा अल्लाहकरिताच आहे, जो आकाशांच्या आणि जमिनीच्या समस्त वस्तूंचा स्वामी आहे आणि आखिरतमध्येही प्रशंसा त्याच्याचकरिता आहे. तो (मोठा) हिकमतशाली आणि (पूर्णतः) जाणकार आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:2
🔁 0/5
يَعۡلَمُ مَا يَلِجُ فِي ٱلۡأَرۡضِ وَمَا يَخۡرُجُ مِنۡهَا وَمَا يَنزِلُ مِنَ ٱلسَّمَآءِ وَمَا يَعۡرُجُ فِيهَاۚ وَهُوَ ٱلرَّحِيمُ ٱلۡغَفُورُ ٢
Ya`lamu maa yaliju fil ardi wa maa yakhruju minhaa wa maa yanzilu minas samaaa`i wa maa ya`ruju feehaa; wa Huwar Raheemul Ghafoor
२. जे काही जमिनीत दाखल होते आणि जे काही तिच्यातून निघते आणि जे आकाशातून अवतरित होते आणि जे चढून त्यात जाते, ते सर्व काही तो जाणतो, आणि तो मोठा दया करणारा, मोठा माफ करणारा आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:3
🔁 0/5
وَقَالَ ٱلَّذِينَ كَفَرُواْ لَا تَأۡتِينَا ٱلسَّاعَةُۖ قُلۡ بَلَىٰ وَرَبِّي لَتَأۡتِيَنَّكُمۡ عَٰلِمِ ٱلۡغَيۡبِۖ لَا يَعۡزُبُ عَنۡهُ مِثۡقَالُ ذَرَّةٍ فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَلَا فِي ٱلۡأَرۡضِ وَلَآ أَصۡغَرُ مِن ذَٰلِكَ وَلَآ أَكۡبَرُ إِلَّا فِي كِتَٰبٍ مُّبِينٍ ٣
Wa qaalal lazeena kafaroo laa taateenas Saa`ah; qul balaa wa Rabbee lataatiyannakum `Aalimul Ghaib; laa ya`zubu `anhu misqaalu zarratin fis samaawaati wa laa fil ardi wa laaa asgharu min zaalika wa laaa akbaru illaa fee kitaabim mubeen
३. आणि काफिर म्हणतात की आमच्यावर कयामत स्थापित होणार नाही. तुम्ही सांगा, मला माझ्या पालनकर्त्याची शपथ! जो अपरोक्ष जाणणारा आहे की ती निश्चितच तुमच्यावर कायम होईल. अल्लाहपासून एका कणाइतकीही वस्तू लपलेली नाही, ना आकाशांमध्ये आणि ना धरतीत, किंबहुना त्याहूनही लहान आणि मोठी सर्व वस्तू (व गोष्टी) एका खुल्या (स्पष्ट) ग्रंथा विद्यमान आहेत
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:4
🔁 0/5
لِّيَجۡزِيَ ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّٰلِحَٰتِۚ أُوْلَٰٓئِكَ لَهُم مَّغۡفِرَةٌ وَرِزۡقٌ كَرِيمٌ ٤
Liyajziyal lazeena aamanoo wa `amilus saalihaat; ulaaa`ika lahum maghfiratunw wa rizqun kareem
४. यासाठी की त्याने (अल्लाहने) ईमान राखणाऱ्या आणि सदाचारी लोकांना चांगला मोबदला प्रदान करावा. हेच ते लोक होत, ज्यांच्याकरिता क्षमा, सन्मानपूर्ण आजिविका आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:5
🔁 0/5
وَٱلَّذِينَ سَعَوۡ فِيٓ ءَايَٰتِنَا مُعَٰجِزِينَ أُوْلَٰٓئِكَ لَهُمۡ عَذَابٌ مِّن رِّجۡزٍ أَلِيمٌ ٥
Wallazeena sa`aw feee aayaatinaa mu`aajizeena ulaaa `ika lahum `azaabum mir irjzin aleem
५. आणि आमच्या आयतींचा अवमान करण्यात ज्यांनी प्रयत्न केला आहे, तर ते असे लोक आहेत, ज्यांच्यासाठी अतिशय वाईट प्रकारचा सक्त अज़ाब आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:6
🔁 0/5
وَيَرَى ٱلَّذِينَ أُوتُواْ ٱلۡعِلۡمَ ٱلَّذِيٓ أُنزِلَ إِلَيۡكَ مِن رَّبِّكَ هُوَ ٱلۡحَقَّ وَيَهۡدِيٓ إِلَىٰ صِرَٰطِ ٱلۡعَزِيزِ ٱلۡحَمِيدِ ٦
Wa yaral lazeena utul `Ilmal lazeee unzila ilaika mir Rabbika huwal haqqa wa yahdeee ilaaa siraatil `Azeezil Hameed
६. आणि ज्यांना ज्ञान आहे ते पाहतील की जे काही तुमच्याकडे, तुमच्या पालनकर्त्यातर्फे अवतरित झाले आहे ते (परिपूर्ण) सत्य आहे आणि ते अल्लाहचा मार्ग दाखविते जो मोठा वर्चस्वशाली, प्रशंसनीय आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:7
🔁 0/5
وَقَالَ ٱلَّذِينَ كَفَرُواْ هَلۡ نَدُلُّكُمۡ عَلَىٰ رَجُلٍ يُنَبِّئُكُمۡ إِذَا مُزِّقۡتُمۡ كُلَّ مُمَزَّقٍ إِنَّكُمۡ لَفِي خَلۡقٍ جَدِيدٍ ٧
Wa qaalal lazeena kafaroo hal nadullukum `alaa rajuliny yanabbi `ukum izaa muzziqtum kulla mumazzaqin innakum lafee khalqin jadeed
७. आणि काफिर (इन्कारी लोक) म्हणाले, या, आम्ही तुम्हाला एक असा मनुष्य दाखवावा, जो तुम्हाला ही खबर पोहचवित आहे की जेव्हा तुम्ही पूर्णपणे कण कण (चूर चूर) होऊन जाल, तेव्हा तुम्ही पुन्हा एका नव्या जीवनात याल
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:8
🔁 0/5
أَفۡتَرَىٰ عَلَى ٱللَّهِ كَذِبًا أَم بِهِۦ جِنَّةُۢۗ بَلِ ٱلَّذِينَ لَا يُؤۡمِنُونَ بِٱلۡأٓخِرَةِ فِي ٱلۡعَذَابِ وَٱلضَّلَٰلِ ٱلۡبَعِيدِ ٨
Aftaraa `alal laahi kaziban am bihee jinnah; balil lazeena laa yu`minoona bil Aakhirati fil`azaabi waddad laalil ba`eed
८. (आम्ही नाही सांगत) की स्वतः त्यानेच अल्लाहवर असत्य रचले आहे किंवा त्याला वेड लागले आहे, किंबहुना (खरी गोष्ट अशी) की आखिरतवर ईमान न राखणारेच शिक्षा-यातनेत आणि दूरच्या मार्गभ्रष्टतेत पडले आहेत
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:9
🔁 0/5
أَفَلَمۡ يَرَوۡاْ إِلَىٰ مَا بَيۡنَ أَيۡدِيهِمۡ وَمَا خَلۡفَهُم مِّنَ ٱلسَّمَآءِ وَٱلۡأَرۡضِۚ إِن نَّشَأۡ نَخۡسِفۡ بِهِمُ ٱلۡأَرۡضَ أَوۡ نُسۡقِطۡ عَلَيۡهِمۡ كِسَفًا مِّنَ ٱلسَّمَآءِۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَأٓيَةً لِّكُلِّ عَبۡدٍ مُّنِيبٍ ٩
Afalam yaraw ilaa maa baina aydeehim wa maa khalfahum minas samaaa`i wal ard; in nashad nakhsif bihimul arda aw nusqit `alaihim kisafam minas samaaa`; inna fee zaalika la Aayatal likulli `abdim muneeb
९. तेव्हा काय ते आपल्या पुढे मागे आकाश व धरतीला पाहत नाहीत? जर आम्ही इच्छिले तर त्यांना जमिनीत धसवून टाकू किंवा त्यांच्यावर आकाशाचे तुकडे कोसळवू. निःसंशय यात फार मोठे प्रमाण आहे त्या प्रत्येक दासाकरिता, जो (मनापासून) रुजू करणारा असावा
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:10
🔁 0/5
۞ وَلَقَدۡ ءَاتَيۡنَا دَاوُۥدَ مِنَّا فَضۡلًاۖ يَٰجِبَالُ أَوِّبِي مَعَهُۥ وَٱلطَّيۡرَۖ وَأَلَنَّا لَهُ ٱلۡحَدِيدَ ١٠
Wa laqad aatainaa Daawooda minnaa fadlany yaa jibaalu awwibee ma`ahoo wattaira wa alannaa lahul hadeed
१०. आणि आम्ही दाऊदवर आपली कृपा केली. हे पर्वतांनो! त्यांच्यासोबत (तुम्हीही) माझी तस्बीह (गुणगान) करीत जा आणि पक्ष्यांना देखील (हाच आदेश आहे) आणि आम्ही त्यांच्याकरिता लोखंडास नरम केले
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:11
🔁 0/5
أَنِ ٱعۡمَلۡ سَٰبِغَٰتٍ وَقَدِّرۡ فِي ٱلسَّرۡدِۖ وَٱعۡمَلُواْ صَٰلِحًاۖ إِنِّي بِمَا تَعۡمَلُونَ بَصِيرٌ ١١
Ani`mal saabighaatinw wa qaddir fis sardi wa`maloo saalihan innee bimaa ta`maloona Baseer
११. (यासाठी) की तुम्ही पूरे पूरे कवच (चिलखते) बनवा आणि त्यांच्या कड्या ठीक ठीक अनुमानाने राखा आणि तुम्ही सर्व नेकीची कामे करा (विश्वास राखा) मी तुमचे (प्रत्येक) कर्म पाहत आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:12
🔁 0/5
وَلِسُلَيۡمَٰنَ ٱلرِّيحَ غُدُوُّهَا شَهۡرٌ وَرَوَاحُهَا شَهۡرٌۖ وَأَسَلۡنَا لَهُۥ عَيۡنَ ٱلۡقِطۡرِۖ وَمِنَ ٱلۡجِنِّ مَن يَعۡمَلُ بَيۡنَ يَدَيۡهِ بِإِذۡنِ رَبِّهِۦۖ وَمَن يَزِغۡ مِنۡهُمۡ عَنۡ أَمۡرِنَا نُذِقۡهُ مِنۡ عَذَابِ ٱلسَّعِيرِ ١٢
Wa li-Sulaimaanar reeha ghuduwwuhaa shahrunw wa ra-waahuhaa shahrunw wa asalnaa lahoo `ainal qitr; wa minal jinni mai ya`malu baina yadaihi bi izni Rabbih; wa mai yazigh minhum `an amrinaa nuziqhu min `azaabis sa`eer
१२. आणि आम्ही हवेला सुलेमानच्या अधीन केले की सकाळची मजल तिची एक महिन्याची राहात असे आणि संध्याकाळची मजल देखील आणि आम्ही त्यांच्यासाठी तांब्याचा झरा प्रवाहित केला आणि त्यांच्या पालनकर्त्याच्या आदेशाने काही जिन्न देखील, जे त्यांच्या ताब्यात राहून त्यांच्याजवळ काम करीत असत आणि त्यांच्यापैकी जो कोणी आमच्या आदेशाची अवज्ञा करीत असे, आम्ही त्याला भडकत्या आगीच्या अज़ाब (शिक्षे) ची गोडी चाखवित असू
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:13
🔁 0/5
يَعۡمَلُونَ لَهُۥ مَا يَشَآءُ مِن مَّحَٰرِيبَ وَتَمَٰثِيلَ وَجِفَانٍ كَٱلۡجَوَابِ وَقُدُورٍ رَّاسِيَٰتٍۚ ٱعۡمَلُوٓاْ ءَالَ دَاوُۥدَ شُكۡرًاۚ وَقَلِيلٌ مِّنۡ عِبَادِيَ ٱلشَّكُورُ ١٣
Ya`maloona lahoo ma yashaaa`u mim mahaareeba wa tamaaseela wa jifaanin kaljawaabi wa qudoorir raasiyaat; i`maloo aala Daawooda shukraa; wa qaleelum min `ibaadiyash shakoor
१३. सुलेमान जे काही इच्छित असत ते (जिन्नात) तयार करून देत, जसे किल्ला, चित्र (स्मारक), तलावासारख्या पराती आणि चुलींवर कायम टिकून राहणाऱ्या डेगा (मोठे मोठे पातेले) हे दाऊदच्या वंशजांनो! त्याच्याशी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता सत्कर्मे करा, माझ्या दासांपैकी कृतज्ञशील दास फार कमीच असतात
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:14
🔁 0/5
فَلَمَّا قَضَيۡنَا عَلَيۡهِ ٱلۡمَوۡتَ مَا دَلَّهُمۡ عَلَىٰ مَوۡتِهِۦٓ إِلَّا دَآبَّةُ ٱلۡأَرۡضِ تَأۡكُلُ مِنسَأَتَهُۥۖ فَلَمَّا خَرَّ تَبَيَّنَتِ ٱلۡجِنُّ أَن لَّوۡ كَانُواْ يَعۡلَمُونَ ٱلۡغَيۡبَ مَا لَبِثُواْ فِي ٱلۡعَذَابِ ٱلۡمُهِينِ ١٤
Falammaa qadainaa `alaihil mawta ma dallahum `alaa mawtiheee illaa daaabbatul ardi taakulu minsa atahoo falammaa kharra tabaiyanatil jinnu al law kaanoo ya`lamoonal ghaiba maa labisoo fil `azaabil muheen
१४. मग जेव्हा आम्ही त्यांच्यावर मृत्युचा आदेश पाठविला, तेव्हा ती खबर (जिन्नांना) कोणीही दिली नाही, वाळवीच्या किड्याखेरीज, जो त्यांची लाठी खात होता. तर जेव्हा (सुलेमान) खाली कोसळले, त्या क्षणी जिन्नांनी जाणून घेतले की जर ते अपरोक्ष ज्ञान बाळगत असते तर या अपमानाच्या शिक्षेत पडून राहिले नसते.१
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:15
🔁 0/5
لَقَدۡ كَانَ لِسَبَإٍ فِي مَسۡكَنِهِمۡ ءَايَةٌۖ جَنَّتَانِ عَن يَمِينٍ وَشِمَالٍۖ كُلُواْ مِن رِّزۡقِ رَبِّكُمۡ وَٱشۡكُرُواْ لَهُۥۚ بَلۡدَةٌ طَيِّبَةٌ وَرَبٌّ غَفُورٌ ١٥
Laqad kaana li Saba-in fee maskanihim Aayatun jannataani `ai yameeninw wa shimaalin kuloo mir rizq Rabbikum washkuroolah; baldatun taiyibatunw wa Rabbun Ghafoor
१५. सबाच्या जनसमूहाकरिता, त्यांच्या वस्तींमध्येच (अल्लाहच्या सामर्थ्याची) निशाणी होती. त्यांच्या उजव्या डाव्या बाजूला दोन बागा होत्या. (आम्ही त्यांना आदेश दिला होता की) आपल्या पालनकर्त्याने प्रदान केलेली आजिविका खा आणि त्याचे आभार मानत राहा. ही स्वच्छ - शुद्ध भूमी आहे आणि पालनकर्ता क्षमाशील आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:16
🔁 0/5
فَأَعۡرَضُواْ فَأَرۡسَلۡنَا عَلَيۡهِمۡ سَيۡلَ ٱلۡعَرِمِ وَبَدَّلۡنَٰهُم بِجَنَّتَيۡهِمۡ جَنَّتَيۡنِ ذَوَاتَيۡ أُكُلٍ خَمۡطٍ وَأَثۡلٍ وَشَيۡءٍ مِّن سِدۡرٍ قَلِيلٍ ١٦
Fa-a``radoo fa-arsalnaa `alaihim Sailal `Arimi wa baddalnaahum bijannataihim jannataini azwaatai ukulin khamtinw wa aslinw wa shai`im min sidrin qaleel
१६. परंतु त्यांनी तोंड फिरविले, मग आम्ही त्यांच्यावर वेगवान महापुराचे (पाणी) पाठविले आणि त्यांच्या (हिरव्या टवटवीत) बागांऐवजी दोन (अशा) बागा दिल्या, ज्या स्वादात कडवट आणि अधिकांश झाडे-झुडपे आणि काही बोरींची झाडे असलेल्या होत्या
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:17
🔁 0/5
ذَٰلِكَ جَزَيۡنَٰهُم بِمَا كَفَرُواْۖ وَهَلۡ نُجَٰزِيٓ إِلَّا ٱلۡكَفُورَ ١٧
Zaalika jazainaahum bimaa kafaroo wa hal nujaazeee illal kafoor
१७. आम्ही त्यांच्या कृतघ्नतेचा हा मोबदला त्यांना दिला. आम्ही (अशी सक्त) सजा मोठमोठ्या कृतघ्न लोकांनाच देतो
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:18
🔁 0/5
وَجَعَلۡنَا بَيۡنَهُمۡ وَبَيۡنَ ٱلۡقُرَى ٱلَّتِي بَٰرَكۡنَا فِيهَا قُرًى ظَٰهِرَةً وَقَدَّرۡنَا فِيهَا ٱلسَّيۡرَۖ سِيرُواْ فِيهَا لَيَالِيَ وَأَيَّامًا ءَامِنِينَ ١٨
Wa ja`alnaa bainahum wa bainal qural latee baaraknaa feehaa quran zaahiratanw wa qaddamaa feehas sayr; seeroo feehaa la yaalirya wa aiyaaman aamineen
१८. आणि आम्ही त्याच्या व त्या वस्तींच्या दरम्यान, ज्यांच्यात आम्ही सुख-समृद्धी प्रदान करून ठेवली होती. काही वस्त्या दुसऱ्या ठेवल्या होत्या, ज्या, मार्गावर दिसून येत होत्या आणि त्यांच्यात चालण्याची (प्रवासाची) ठिकाणे निश्चित केली होती, त्यात रात्री आणि दिवसा शांती सुरक्षापूर्वक हिंडत फिरत राहा
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:19
🔁 0/5
فَقَالُواْ رَبَّنَا بَٰعِدۡ بَيۡنَ أَسۡفَارِنَا وَظَلَمُوٓاْ أَنفُسَهُمۡ فَجَعَلۡنَٰهُمۡ أَحَادِيثَ وَمَزَّقۡنَٰهُمۡ كُلَّ مُمَزَّقٍۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَأٓيَٰتٍ لِّكُلِّ صَبَّارٍ شَكُورٍ ١٩
Faqaaloo Rabbanaa baa`id baina asfaarinaa wa zalamooo anfusahum faja`alnaahum ahaadeesa wa mazzaq naahum kulla mumazzaq; inna fee zaalika la Aayaatil likulli sabbaarin shakoor
१९. परंतु त्यांनी दुसऱ्यांदा दुआ (प्रार्थना) केली की हे आमच्या पालनकर्त्या! आमचे प्रवास दूर दूरपर्यंत कर आणि ज्याअर्थी त्यांनी स्वतः आपल्या हातांनी आपले वाईट करून घेतले, यास्तव आम्ही त्यांना (जुन्या) कहाणीच्या रूपात करून टाकले२ आणि त्यांचे तुकडे तुकडे करुन टाकलेत३ निःसंशय, प्रत्येक सहनशील आणि कृतज्ञशील माणसाकरिता या (घटने) त अनेक निशाण्या आहेत
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:20
🔁 0/5
وَلَقَدۡ صَدَّقَ عَلَيۡهِمۡ إِبۡلِيسُ ظَنَّهُۥ فَٱتَّبَعُوهُ إِلَّا فَرِيقًا مِّنَ ٱلۡمُؤۡمِنِينَ ٢٠
Wa laqad saddaq `alaihim Ibleesu zannnabhoo fattaba`oohu illaa fareeqam minal mu`mineen
२०. आणि सैतानाने त्यांच्याविषयी आपला इरादा (अनुमान) खरा करून दाखविला, हे लोक (सर्वच्या सर्व) त्याचे अनुयायी बनले, ईमान राखणाऱ्यांच्या एका गटाखेरीज
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:21
🔁 0/5
وَمَا كَانَ لَهُۥ عَلَيۡهِم مِّن سُلۡطَٰنٍ إِلَّا لِنَعۡلَمَ مَن يُؤۡمِنُ بِٱلۡأٓخِرَةِ مِمَّنۡ هُوَ مِنۡهَا فِي شَكٍّۗ وَرَبُّكَ عَلَىٰ كُلِّ شَيۡءٍ حَفِيظٌ ٢١
Wa maa kaana lahoo `alaihim min sultaanin illaa lina`lama mai yu minu bil Aakhirati mimman huwa minhaa fee shakk; wa Rabbuka `alaa kulli shai`in Hafeez
२१. आणि सैतानाचा त्यांच्यावर कोणताही दबाव (आणि जोर) नव्हता, परंतु अशासाठी की आम्ही त्या लोकांना, जे आखिरतवर ईमान राखतात, त्या लोकांमध्ये (चांगल्या प्रकारे) जाहीर करावे, जे त्याबाबत संशयग्रस्त आहेत, आणि तुमचा पालनकर्ता प्रत्येक गोष्टीचा संरक्षक आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:22
🔁 0/5
قُلِ ٱدۡعُواْ ٱلَّذِينَ زَعَمۡتُم مِّن دُونِ ٱللَّهِ لَا يَمۡلِكُونَ مِثۡقَالَ ذَرَّةٍ فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَلَا فِي ٱلۡأَرۡضِ وَمَا لَهُمۡ فِيهِمَا مِن شِرۡكٍ وَمَا لَهُۥ مِنۡهُم مِّن ظَهِيرٍ ٢٢
Qulid `ul lazeena za`amtum min doonil laahi laa yamlikoona misqaala zarratin fissamaawaati wa laa fil ardi wa maa lahum feehimaa min shirkinw wa maa lahoo minhum min zaheer
२२. सांगा की अल्लाहखेरीज ज्यांचा ज्यांचा तुम्हाला (उपास्य असण्याचा) भ्रम आहे (त्या सर्वांना) हाक द्या. त्यांच्यापैकी ना कोणाला आकाशांमध्ये आणि धरतीत कणाइतकाही अधिकार आहे, ना त्यांचा या दोघांत कसलाही हिस्सा आहे आणि ना त्यांच्यापैकी कोणी अल्लाहचा सहभागी आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:23
🔁 0/5
وَلَا تَنفَعُ ٱلشَّفَٰعَةُ عِندَهُۥٓ إِلَّا لِمَنۡ أَذِنَ لَهُۥۚ حَتَّىٰٓ إِذَا فُزِّعَ عَن قُلُوبِهِمۡ قَالُواْ مَاذَا قَالَ رَبُّكُمۡۖ قَالُواْ ٱلۡحَقَّۖ وَهُوَ ٱلۡعَلِيُّ ٱلۡكَبِيرُ ٢٣
Wa laa tanfa`ush shafaa`atu `indahooo illaa liman azina lah; hattaaa izaa fuzzi`a `an quloobihim qaaloo maazaa qaala Rabbukum; qaalul haqq, wa Huwal `Aliyul Kabeer
२३. आणि शिफारस (ची दुआ - प्रार्थना) ही त्याच्यासमोर काही लाभ देत नाही, त्यांच्याखेरीज, ज्यांच्यासाठी अनुमानित असावी. येथेपर्यंत की, जेव्हा त्यांच्या हृदयातून भय-दहशत दूर केली जाते, तेव्हा ते विचारतात, तुमच्या पालनकर्त्याने काय सांगितले? उत्तर देतात की खरे सांगितले आणि तो मोठा उच्चतम आणि मोठा महान आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:24
🔁 0/5
۞ قُلۡ مَن يَرۡزُقُكُم مِّنَ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۖ قُلِ ٱللَّهُۖ وَإِنَّآ أَوۡ إِيَّاكُمۡ لَعَلَىٰ هُدًى أَوۡ فِي ضَلَٰلٍ مُّبِينٍ ٢٤
Qul mai yarzuqukum minas samaawaati wal ardi qulil laahu wa innaaa aw iyyaakum la`alaa hudan aw fee dalaalim mubeen
२४. त्यांना विचारा की तुम्हाला आकाशामधून आणि जमिनीतून आजिविका कोण पोहचवितो? (स्वतः) उत्तर द्या की (महान) अल्लाह! (ऐका) आम्ही अथवा तुम्ही, एक तर निश्चितपणे मार्गदर्शनावर आहे किंवा उघड मार्गभ्रष्टतेत आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:25
🔁 0/5
قُل لَّا تُسۡـَٔلُونَ عَمَّآ أَجۡرَمۡنَا وَلَا نُسۡـَٔلُ عَمَّا تَعۡمَلُونَ ٢٥
Qul laa tus`aloona `ammaaa ajramnaa wa laa nus`alu `ammaa ta`maloon
२५. सांगा की आम्ही केलेल्या अपराधांबाबत तुम्हाला काही विचारले जाणार नाही आणि ना तुमच्या कर्मांसंबंधी आम्हाला विचारले जाईल
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:26
🔁 0/5
قُلۡ يَجۡمَعُ بَيۡنَنَا رَبُّنَا ثُمَّ يَفۡتَحُ بَيۡنَنَا بِٱلۡحَقِّ وَهُوَ ٱلۡفَتَّاحُ ٱلۡعَلِيمُ ٢٦
Qul yajma`u bainanaa Rabbunaa summa yaftahu bainanaa bilhaqq; wa Huwal Fattaahul `Aleem
२६. (त्यांना) खबरदार करा की आम्हा सर्वांना आमचा पालनकर्ता एकत्र करून मग आमच्या दरम्यान सत्यासह फैसला करील आणि तो फैसला करणारा, सर्व काही जाणणारा आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:27
🔁 0/5
قُلۡ أَرُونِيَ ٱلَّذِينَ أَلۡحَقۡتُم بِهِۦ شُرَكَآءَۖ كـَلَّاۚ بَلۡ هُوَ ٱللَّهُ ٱلۡعَزِيزُ ٱلۡحَكِيمُ ٢٧
Qul arooniyal lazeena alhaqtum bihee shurakaaa`a kallaa; bal Huwal Laahul `Azeezul Hakeem
२७. सांगा की बरे मलाही त्यांना दाखवा, ज्यांना तुम्ही अल्लाहचा सहभागी बनवून त्याच्यासोबत सामील करीत आहात. असे कदापि नाही, किंबहुना तोच अल्लाह आहे, जबरदस्त व हिकमतशाली
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:28
🔁 0/5
وَمَآ أَرۡسَلۡنَٰكَ إِلَّا كَآفَّةً لِّلنَّاسِ بَشِيرًا وَنَذِيرًا وَلَٰكِنَّ أَكۡثَرَ ٱلنَّاسِ لَا يَعۡلَمُونَ ٢٨
Wa maaa arsalnaaka illaa kaaffatal linnaasi basheeranw wa nazeeranw wa laakinna aksaran naasi laa ya`lamoon
२८. आणि आम्ही तुम्हाला सर्व लोकांकरिता शुभ समाचार ऐकविणारा आणि खबरदार करणारा बनवून पाठविले आहे, परंतु (खरी गोष्ट अशी की) अधिकांश लोक जाणत नाहीत
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:29
🔁 0/5
وَيَقُولُونَ مَتَىٰ هَٰذَا ٱلۡوَعۡدُ إِن كُنتُمۡ صَٰدِقِينَ ٢٩
Wa yaqooloona mataa haazal wa`du in kuntum saadiqeen
२९. आणि विचारतात की तो वायदा केव्हा पूर्ण होईल? सच्चे असाल तर सांगा
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:30
🔁 0/5
قُل لَّكُم مِّيعَادُ يَوۡمٍ لَّا تَسۡتَـٔۡخِرُونَ عَنۡهُ سَاعَةً وَلَا تَسۡتَقۡدِمُونَ ٣٠
Qul lakum mee`aadu Yawmil laa tastaakhiroona `anhu saa`atanw wa la tastaqdimoon
३०. उत्तर द्या, वायद्याचा दिवस अगदी निश्चित आहे, ज्यापासून एक क्षण ना तुम्ही मागे हटू शकता, आणि ना पुढे जाऊ शकता
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:31
🔁 0/5
وَقَالَ ٱلَّذِينَ كَفَرُواْ لَن نُّؤۡمِنَ بِهَٰذَا ٱلۡقُرۡءَانِ وَلَا بِٱلَّذِي بَيۡنَ يَدَيۡهِۗ وَلَوۡ تَرَىٰٓ إِذِ ٱلظَّٰلِمُونَ مَوۡقُوفُونَ عِندَ رَبِّهِمۡ يَرۡجِعُ بَعۡضُهُمۡ إِلَىٰ بَعۡضٍ ٱلۡقَوۡلَ يَقُولُ ٱلَّذِينَ ٱسۡتُضۡعِفُواْ لِلَّذِينَ ٱسۡتَكۡبَرُواْ لَوۡلَآ أَنتُمۡ لَكُنَّا مُؤۡمِنِينَ ٣١
Wa qaalal lazeena kafaroo lan nu`mina bihaazal Quraani wa laa billazee baina yadayh; wa law taraaa iziz zaalimoona mawqoofoona `inda Rabbihim yarji`u ba`duhum ilaa ba`dinil qawla yaqoolul lazeenas tud`ifoo lillazeenas takbaroo law laaa antum lakunnaa mu`mineen
३१. आणि काफिर (इन्कारी लोक) म्हणाले, आम्ही तर या कुरआनास मानणारे नाहीत, ना याच्या पूर्वीच्या ग्रंथांना आणि जर तुम्ही पाहिले असते, जेव्हा हे अत्याचारी आपल्या पालनकर्त्यासमोर उभे, एकमेकांवर दोषारोप ठेवत असतील. खालच्या दर्जाचे लोक, उच्च दर्जाच्या लोकांना म्हणतील, जर तुम्ही राहिले नसते तर (खात्रीने) आम्ही ईमान राखणारे असतो
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:32
🔁 0/5
قَالَ ٱلَّذِينَ ٱسۡتَكۡبَرُواْ لِلَّذِينَ ٱسۡتُضۡعِفُوٓاْ أَنَحۡنُ صَدَدۡنَٰكُمۡ عَنِ ٱلۡهُدَىٰ بَعۡدَ إِذۡ جَآءَكُمۖ بَلۡ كُنتُم مُّجۡرِمِينَ ٣٢
Qaalal lazeenas takbaroo lillazeenas tud`ifooo anahnu sadadnaakum `anil hudaa ba`da iz jaaa`akum bal kuntum mujrimeen
३२. हे उच्च दर्जाचे लोक त्या दुर्बल लोकांना उत्तर देतील की, काय तुमच्याजवळ मार्गदर्शन येऊन पोहोचल्यानंतर आम्ही तुम्हाला त्यापासून रोखले होते (नाही), उलट तुम्ही (स्वतः) अत्याचारी होते
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:33
🔁 0/5
وَقَالَ ٱلَّذِينَ ٱسۡتُضۡعِفُواْ لِلَّذِينَ ٱسۡتَكۡبَرُواْ بَلۡ مَكۡرُ ٱلَّيۡلِ وَٱلنَّهَارِ إِذۡ تَأۡمُرُونَنَآ أَن نَّكۡفُرَ بِٱللَّهِ وَنَجۡعَلَ لَهُۥٓ أَندَادًاۚ وَأَسَرُّواْ ٱلنَّدَامَةَ لَمَّا رَأَوُاْ ٱلۡعَذَابَۚ وَجَعَلۡنَا ٱلۡأَغۡلَٰلَ فِيٓ أَعۡنَاقِ ٱلَّذِينَ كَفَرُواْۖ هَلۡ يُجۡزَوۡنَ إِلَّا مَا كَانُواْ يَعۡمَلُونَ ٣٣
Wa qaalal lazeenastud`ifoo lillazeenas takbaroo bal makrul laili wannahaari iz taamuroonanaaa an nakfura billaahi wa naj`ala lahooo andaadaa; wa asarrun nadaamata lammaa ra awul `azaab; wa ja`alnal aghlaala feee a`naaqil lazeena kafaroo; hal yujzawna illaa maa kanoo ya`maloon
३३. (आणि याला उत्तर देताना) हे दुर्बल लोक त्या घमेंडी लोकांना सांगतील (मुळीच नाही) किंबहुना रात्रंदिवस लबाडीने आम्हाला, अल्लाहसोबत कुप्र करण्यास आणि त्याच्यासोबत सहभागी ठरविण्यास तुमचा आदेश देणे, आमच्या बेईमानीचे कारण ठरले आणि अज़ाबला (शिक्षा-यातनेला) पाहताच सर्वच्या सर्व मनातल्या मनात लज्जित होत असतील आणि काफिरांच्या गळ्यात आम्ही तौक (जोखड) टाकू, त्यांना केवळ त्यांच्या कृतकर्मांचा मोबदला दिला जाईल
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:34
🔁 0/5
وَمَآ أَرۡسَلۡنَا فِي قَرۡيَةٍ مِّن نَّذِيرٍ إِلَّا قَالَ مُتۡرَفُوهَآ إِنَّا بِمَآ أُرۡسِلۡتُم بِهِۦ كَٰفِرُونَ ٣٤
Wa maaa arsalnaa` fee qaryatim min nazeerin illaa qaala mutrafooaa innaa bimaaa ursiltum bihee kaafiroon
३४. आणि आम्ही ज्या ज्या वस्तीत एखादा खबरदार करणारा पाठविला, तेव्हा तिथल्या सुखसंपन्न अवस्थेच्या लोकांनी हेच म्हटले की ज्या गोष्टीसह तुम्ही पाठविले गेले आहात, आम्ही त्याचा इन्कार करणारे आहोत
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:35
🔁 0/5
وَقَالُواْ نَحۡنُ أَكۡثَرُ أَمۡوَٰلًا وَأَوۡلَٰدًا وَمَا نَحۡنُ بِمُعَذَّبِينَ ٣٥
Wa qaaloo nahnu aksaru amwaalanw wa awlaadanw wa maa nahnu bimu `azzabeen
३५. आणि म्हणाले की आम्ही धन-संपत्ती आणि संतती अधिक बाळगतो आणि आम्हाला अज़ाब (शिक्षा - यातना) दिलीच जाणार नाही
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:36
🔁 0/5
قُلۡ إِنَّ رَبِّي يَبۡسُطُ ٱلرِّزۡقَ لِمَن يَشَآءُ وَيَقۡدِرُ وَلَٰكِنَّ أَكۡثَرَ ٱلنَّاسِ لَا يَعۡلَمُونَ ٣٦
Qul inna Rabbee yabsutur rizqa limai yashaaa`u wa yaqdiru wa laakinna aksaran naasi laa ya`lamoon
३६. सांगा की माझा पालनकर्ता, ज्याच्यासाठी इच्छितो रोजी (आजिविका) व्यापक करतो, आणि ज्याच्यासाठी इच्छितो तंग (संकुचित) करतो, परंतु बहुतेक लोक हे जाणत नाहीत
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:37
🔁 0/5
وَمَآ أَمۡوَٰلُكُمۡ وَلَآ أَوۡلَٰدُكُم بِٱلَّتِي تُقَرِّبُكُمۡ عِندَنَا زُلۡفَىٰٓ إِلَّا مَنۡ ءَامَنَ وَعَمِلَ صَٰلِحًا فَأُوْلَٰٓئِكَ لَهُمۡ جَزَآءُ ٱلضِّعۡفِ بِمَا عَمِلُواْ وَهُمۡ فِي ٱلۡغُرُفَٰتِ ءَامِنُونَ ٣٧
Wa maaa amwaalukum wa laaa awlaadukum billatee tuqarribukum `indanaa zulfaaa illaa man aamana wa `amila saalihan fa ulaaa`ika lahum jazaaa`ud di`fi bimaa `amiloo wa hum fil ghurufaati aaminoon
३७. आणि तुमची धन-संपत्ती आणि संतती अशी गोष्ट नव्हे की तुम्हाला आमच्याजवळ (दर्जांनी) निकट करील, परंतु ज्यांनी ईमान राखले आणि जे सत्कर्म करीत राहिले तर त्यांच्यासाठी त्यांच्या सत्कर्मांचा दुप्पट मोबदला आहे आणि ते निर्भय आणि समाधानी होऊन उंच महालांमध्ये राहतील
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:38
🔁 0/5
وَٱلَّذِينَ يَسۡعَوۡنَ فِيٓ ءَايَٰتِنَا مُعَٰجِزِينَ أُوْلَٰٓئِكَ فِي ٱلۡعَذَابِ مُحۡضَرُونَ ٣٨
Wallazeena yas`awna feee Aayaatinaa mu`aajizeena ulaaa`ika fil`azaabi muhdaroon
३८. आणि जे लोक आमच्या आयतींना अवमानित करण्याच्या धावपळीत मग्न राहतात तर अशाच लोकांना अज़ाब (शिक्षा-यातना) ग्रस्त करून हजर केले जाईल
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:39
🔁 0/5
قُلۡ إِنَّ رَبِّي يَبۡسُطُ ٱلرِّزۡقَ لِمَن يَشَآءُ مِنۡ عِبَادِهِۦ وَيَقۡدِرُ لَهُۥۚ وَمَآ أَنفَقۡتُم مِّن شَيۡءٍ فَهُوَ يُخۡلِفُهُۥۖ وَهُوَ خَيۡرُ ٱلرَّٰزِقِينَ ٣٩
Qul inna Rabbee yabsutur rizqa limai yashaaa`u min `ibaadihee wa yaqdiru lah; wa maaa anfaqtum min shai`in fahuwa yukhlifuhoo wa Huwa khairur raaziqeen
३९. सांगा की माझा पालनकर्ता आपल्या दासांपैकी ज्याच्यासाठी इच्छितो रोजी (आजिविका) व्यापक करतो, आणि ज्याच्यासाठी इच्छितो तंग (मोजून मापून) देतो आणि तुम्ही जे काही अल्लाहच्या मार्गात खर्च कराल, अल्लाह त्याचा (पुरेपूर) मोबदला प्रदान करील. तो तर सर्वांत उत्तम रोजी (आजिविका) प्रदान करणारा आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:40
🔁 0/5
وَيَوۡمَ يَحۡشُرُهُمۡ جَمِيعًا ثُمَّ يَقُولُ لِلۡمَلَٰٓئِكَةِ أَهَٰٓؤُلَآءِ إِيَّاكُمۡ كَانُواْ يَعۡبُدُونَ ٤٠
Wa yawma yahshuruhum jamee`an summa yaqoolu lilmalaaa`ikati a-haaa`ulaaa`i iyyaakum kaanoo ya`budoon
४०. आणि त्या सर्वांना अल्लाह त्या दिवशी एकत्र करून फरिश्त्यांना विचारेल, काय हे लोक तुमची उपासना करीत होते
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:41
🔁 0/5
قَالُواْ سُبۡحَٰنَكَ أَنتَ وَلِيُّنَا مِن دُونِهِمۖ بَلۡ كَانُواْ يَعۡبُدُونَ ٱلۡجِنَّۖ أَكۡثَرُهُم بِهِم مُّؤۡمِنُونَ ٤١
Qaaloo Subhaanaka Anta waliyyunaa min doonihim bal kaanoo ya`budoonal jinna aksaruhum bihim mu`minoon
४१. ते म्हणतील, तू पवित्र आहेस, आणि आमचा मित्र - संरक्षक तर तू आहेस, हे लोक नव्हेत. हे तर जिन्नांची उपासना करत होते. यांच्यापैकी बहुतेकांचे त्यांच्यावरच ईमान होते
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:42
🔁 0/5
فَٱلۡيَوۡمَ لَا يَمۡلِكُ بَعۡضُكُمۡ لِبَعۡضٍ نَّفۡعًا وَلَا ضَرًّا وَنَقُولُ لِلَّذِينَ ظَلَمُواْ ذُوقُواْ عَذَابَ ٱلنَّارِ ٱلَّتِي كُنتُم بِهَا تُكَذِّبُونَ ٤٢
Fal Yawma laa yamliku ba`dukum liba`din naf`anw wa laa darraa; wa naqoolu lilzeena zalamoo zooqoo `azaaban Naaril latee kuntum bihaa tukazziboon
४२. तेव्हा आज तुमच्यापैकी कोणीही, कोणाच्याहीकरिता (कशाही प्रकारे) लाभ - हानी (पोहचविण्या) चा मालक नसेल आणि आम्ही अत्याचारींना सांगू की त्या आगीची गोडी चाखा, जिला तुम्ही खोटे ठरवित राहिले
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:43
🔁 0/5
وَإِذَا تُتۡلَىٰ عَلَيۡهِمۡ ءَايَٰتُنَا بَيِّنَٰتٍ قَالُواْ مَا هَٰذَآ إِلَّا رَجُلٌ يُرِيدُ أَن يَصُدَّكُمۡ عَمَّا كَانَ يَعۡبُدُ ءَابَآؤُكُمۡ وَقَالُواْ مَا هَٰذَآ إِلَّآ إِفۡكٌ مُّفۡتَرًىۚ وَقَالَ ٱلَّذِينَ كَفَرُواْ لِلۡحَقِّ لَمَّا جَآءَهُمۡ إِنۡ هَٰذَآ إِلَّا سِحۡرٌ مُّبِينٌ ٤٣
Wa izaa tutlaa `alaihim Aayaatunaa baiyinaatin qaaloo maa haazaa illaa rajuluny yureedu ai-yasuddakum `ammaa kaana ya`budu aabaaa`ukum wa qaaloo maa haazaaa illaaa ifkum muftaraa; wa qaalal lazeena kafaroo lilhaqqi lammaa jaaa`ahum in haazaaa illaa sihrum mubeen
४३. आणि जेव्हा त्यांच्यासमोर आमच्या स्पष्ट आयती वाचून ऐकविल्या जातात, तेव्हा म्हणतात की हा असा मनुष्य आहे, जो तुम्हाला, तुमच्या वाडवडिलांच्या उपास्य दैवतांपासून रोखू इच्छितो (याखेरीज आणखी काही नाही) आणि असे म्हणतात की हा तर मनाने रचलेला आरोप आहे, आणि सत्य त्यांच्याजवळ येऊन पोहोचले तरीही इन्कार करणारे हेच म्हणत राहिले की ही तर उघड जादू आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:44
🔁 0/5
وَمَآ ءَاتَيۡنَٰهُم مِّن كُتُبٍ يَدۡرُسُونَهَاۖ وَمَآ أَرۡسَلۡنَآ إِلَيۡهِمۡ قَبۡلَكَ مِن نَّذِيرٍ ٤٤
Wa maaa aatainaahum min Kutubiny yadrusoonahaa wa maaa arsalnaaa ilaihim qablaka min nazeer
४४. आणि या (मक्काच्या रहिवाशां) ना, आम्ही ना ग्रंथ प्रदान करून ठेवले आहेत, ज्यांना हे वाचत असावेत आणि ना त्यांच्याजवळ तुमच्यापूर्वी कोणी खबरदार करणारा आला
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:45
🔁 0/5
وَكَذَّبَ ٱلَّذِينَ مِن قَبۡلِهِمۡ وَمَا بَلَغُواْ مِعۡشَارَ مَآ ءَاتَيۡنَٰهُمۡ فَكَذَّبُواْ رُسُلِيۖ فَكَيۡفَ كَانَ نَكِيرِ ٤٥
Wa kazzabal lazeena min qablihim wa maa balaghoo mi`shaara maaa aatainaahum fakazzaboo Rusulee; fakaifa kaana nakeer
४५. आणि यांच्यापूर्वीच्या लोकांनीही आमच्या गोष्टींना खोटे ठरविले होते. आणि त्यांना आम्ही जे देऊन ठेवले होते, त्याच्या दहाव्या हिश्श्यापर्यंतही हे पोहचले नाहीत. तेव्हा, त्यांनी माझ्या पैगंबरांना खोटे ठरविले, (मग पाहा) माझ्या शिक्षा यातनेची किती (कठोर) अवस्था झाली.१
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:46
🔁 0/5
۞ قُلۡ إِنَّمَآ أَعِظُكُم بِوَٰحِدَةٍۖ أَن تَقُومُواْ لِلَّهِ مَثۡنَىٰ وَفُرَٰدَىٰ ثُمَّ تَتَفَكَّرُواْۚ مَا بِصَاحِبِكُم مِّن جِنَّةٍۚ إِنۡ هُوَ إِلَّا نَذِيرٌ لَّكُم بَيۡنَ يَدَيۡ عَذَابٍ شَدِيدٍ ٤٦
Qul innamaaa a`izukum biwaahidatin an taqoomoo lillaahi masnaa wa furaadaa summa tatafakkaroo; maa bisaahibikum min jinnah; in huwa illaa nazeerul lakum baina yadai `azaabin shadeed
४६. सांगा की मी तुम्हाला केवळ एकाच गोष्टीचा उपदेश करतो की तुम्ही अल्लाहकरिता (प्रामाणिकपणे, हट्ट सोडून) दोन दोन मिळून किंवा एकट्या एकट्याने उभे राहून विचार तर करा. तुमच्या या साथीदाराला काही वेड वगैरे लागले नाही. तो तर तुम्हाला एका मोठ्या (सक्त) शिक्षा - यातनेच्या येण्यापूर्वी सावध करणारा आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:47
🔁 0/5
قُلۡ مَا سَأَلۡتُكُم مِّنۡ أَجۡرٍ فَهُوَ لَكُمۡۖ إِنۡ أَجۡرِيَ إِلَّا عَلَى ٱللَّهِۖ وَهُوَ عَلَىٰ كُلِّ شَيۡءٍ شَهِيدٌ ٤٧
Qul maa sa-altukum min ajrin fahuwa lakum in ajriya illaa `alal laahi wa Huwa `alaa kullin shai-in Shaheed
४७. सांगा की जो मोबदला मी तुमच्याकडून मागेन, तो तुमच्याकरिता आहे. माझा मोबदला देण्याची जबाबदारी अल्लाहवर आहे, आणि तो प्रत्येक गोष्टीस साक्षी आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:48
🔁 0/5
قُلۡ إِنَّ رَبِّي يَقۡذِفُ بِٱلۡحَقِّ عَلَّٰمُ ٱلۡغُيُوبِ ٤٨
Qul inna Rabbee yaqzifu bilhaqq `Allaamul Ghuyoob
४८. सांगा, माझा पालनकर्ता सत्य (वहयी) अवतरित करतो. तो प्रत्येक लपलेली गोष्ट (गैब) जाणणारा आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:49
🔁 0/5
قُلۡ جَآءَ ٱلۡحَقُّ وَمَا يُبۡدِئُ ٱلۡبَٰطِلُ وَمَا يُعِيدُ ٤٩
Qul jaaa`al haqqu wa maa yubdi`ul baatilu wa maa yu`eed
४९. सांगा, सत्य येऊन पोहोचले. असत्याने ना पहिल्यांदा डोके वर काढले आणि ना दुसऱ्यांदा डोके वर काढू शकेल
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:50
🔁 0/5
قُلۡ إِن ضَلَلۡتُ فَإِنَّمَآ أَضِلُّ عَلَىٰ نَفۡسِيۖ وَإِنِ ٱهۡتَدَيۡتُ فَبِمَا يُوحِيٓ إِلَيَّ رَبِّيٓۚ إِنَّهُۥ سَمِيعٌ قَرِيبٌ ٥٠
Qul in dalaltu fainnamaaa adillu `alaa nafsee wa inih-tadaitu fabimaa yoohee ilaiya Rabbee; innahoo Samee`un Qareeb
५०. सांगा की जर मी मार्गभ्रष्ट होईन तर माझ्या मार्गभ्रष्टतेचे (संकट) माझ्यावरच आहे आणि जर मी सत्य मार्गावर आहे तर त्या वहयीमुळे जिला माझा पालनकर्ता माझ्यावर अवतरित करतो. तो मोठा ऐकणारा, अतिशय निकट आहे
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:51
🔁 0/5
وَلَوۡ تَرَىٰٓ إِذۡ فَزِعُواْ فَلَا فَوۡتَ وَأُخِذُواْ مِن مَّكَانٍ قَرِيبٍ ٥١
Wa law taraaa iz fazi`oo falaa fawta wa ukhizoo mim makaanin qareeb
५१. आणि जर तुम्ही (ती वेळ) पाहाल जेव्हा हे काफिर घाबरलेल्या स्थितीत फिरतील, मग पळून निघून जाण्याची कोणतीही अवस्था (मार्ग) नसेल आणि जवळच्या ठिकाणाहून धरले जातील
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:52
🔁 0/5
وَقَالُوٓاْ ءَامَنَّا بِهِۦ وَأَنَّىٰ لَهُمُ ٱلتَّنَاوُشُ مِن مَّكَانِۭ بَعِيدٍ ٥٢
Wa qaloo aamannaa bihee wa annaa lahumut tanaawushu mim makaanim ba`eed
५२. आणि त्या वेळी म्हणतील की आम्ही या (कुरआना) वर इमान राखले आहे, परंतु एवढ्या दूरच्या (अपेक्षित वस्तू) कशी हाती येऊ शकते
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:53
🔁 0/5
وَقَدۡ كَفَرُواْ بِهِۦ مِن قَبۡلُۖ وَيَقۡذِفُونَ بِٱلۡغَيۡبِ مِن مَّكَانِۭ بَعِيدٍ ٥٣
Wa qad kafaroo bihee min qablu wa yaqzifoona bilghaibi mim makaanim ba`eed
५३. आणि याच्यापूर्वी तर त्यांनी याचा इन्कार केला होता आणि लांबूनच न पाहता अटकळीचे तीर चालवित राहिले
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
34:54
🔁 0/5
وَحِيلَ بَيۡنَهُمۡ وَبَيۡنَ مَا يَشۡتَهُونَ كَمَا فُعِلَ بِأَشۡيَاعِهِم مِّن قَبۡلُۚ إِنَّهُمۡ كَانُواْ فِي شَكٍّ مُّرِيبِۭ ٥٤
Wa heela bainahum wa baina maa yashtahoona kamaa fu`ila bi-ashyaa`ihim min qabl; innahum kaanoo fee shakkim mureeb
५४. आणि त्यांच्या व त्यांच्या इच्छा आकांक्षांच्या दरम्यान आड पडदा टाकला गेला, ज्या प्रकारे यापूर्वीही यांच्यासारख्यांशी केले गेले ते देखील (यांच्याप्रमाणेच) शंका संशयात पडले होते
🎤 तुमचे रेकॉर्डिंग:
💡 लपवलेल्या शब्दावर टॅप करा जेणेकरून तो तात्पुरता दिसेल — तुमची प्रगती आपोआप जतन होते.
العربيةEnglishBahasa IndonesiaTürkçeРусскийفارسیFrançaisاردوবাংলাDeutschEspañol中文हिन्दीPortuguêsItalianoภาษาไทยPolskiNederlandsShqipKiswahiliO'zbekதமிழ்MelayuBosanskiSoomaaliAzərbaycanکوردی한국어日本語SvenskaDanskNorskپښتوമലയാളംසිංහලTamazightHausaአማርኛБългарскиТоҷикӣҚазақшаFilipinoسنڌيYorùbáFulfuldeТатарчаئۇيغۇرچەКыргызчаਪੰਜਾਬੀJawaతెలుగుမြန်မာગુજરાતીOromoमराठीTiếng ViệtMalagasyНохчийнWolofދިވެހިಕನ್ನಡУкраїнськаΕλληνικάქართულიខ្មែរدریQafar afMaranaoनेपाली
पवित्र कुराण
Tuesday, August 18, 2026
Don't forget us in your sincere prayers







