📖 0/604 वाचलेली पाने
📄 282
सूरा बनी इस्राईल
bismillah
سُبۡحَٰنَ ٱلَّذِيٓ أَسۡرَىٰ بِعَبۡدِهِۦ لَيۡلًا مِّنَ ٱلۡمَسۡجِدِ ٱلۡحَرَامِ إِلَى ٱلۡمَسۡجِدِ ٱلۡأَقۡصَا ٱلَّذِي بَٰرَكۡنَا حَوۡلَهُۥ لِنُرِيَهُۥ مِنۡ ءَايَٰتِنَآۚ إِنَّهُۥ هُوَ ٱلسَّمِيعُ ٱلۡبَصِيرُ  ۝١ وَءَاتَيۡنَا مُوسَى ٱلۡكِتَٰبَ وَجَعَلۡنَٰهُ هُدًى لِّبَنِيٓ إِسۡرَٰٓءِيلَ أَلَّا تَتَّخِذُواْ مِن دُونِي وَكِيلًا  ۝٢ ذُرِّيَّةَ مَنۡ حَمَلۡنَا مَعَ نُوحٍۚ إِنَّهُۥ كَانَ عَبۡدًا شَكُورًا  ۝٣ وَقَضَيۡنَآ إِلَىٰ بَنِيٓ إِسۡرَٰٓءِيلَ فِي ٱلۡكِتَٰبِ لَتُفۡسِدُنَّ فِي ٱلۡأَرۡضِ مَرَّتَيۡنِ وَلَتَعۡلُنَّ عُلُوًّا كَبِيرًا  ۝٤ فَإِذَا جَآءَ وَعۡدُ أُولَىٰهُمَا بَعَثۡنَا عَلَيۡكُمۡ عِبَادًا لَّنَآ أُوْلِي بَأۡسٍ شَدِيدٍ فَجَاسُواْ خِلَٰلَ ٱلدِّيَارِۚ وَكَانَ وَعۡدًا مَّفۡعُولًا  ۝٥ ثُمَّ رَدَدۡنَا لَكُمُ ٱلۡكَرَّةَ عَلَيۡهِمۡ وَأَمۡدَدۡنَٰكُم بِأَمۡوَٰلٍ وَبَنِينَ وَجَعَلۡنَٰكُمۡ أَكۡثَرَ نَفِيرًا  ۝٦ إِنۡ أَحۡسَنتُمۡ أَحۡسَنتُمۡ لِأَنفُسِكُمۡۖ وَإِنۡ أَسَأۡتُمۡ فَلَهَاۚ فَإِذَا جَآءَ وَعۡدُ ٱلۡأٓخِرَةِ لِيَسُـُٔواْ وُجُوهَكُمۡ وَلِيَدۡخُلُواْ ٱلۡمَسۡجِدَ كَمَا دَخَلُوهُ أَوَّلَ مَرَّةٍ وَلِيُتَبِّرُواْ مَا عَلَوۡاْ تَتۡبِيرًا  ۝٧
सूरा बनी इस्राईल
bismillah
17:1
سُبۡحَٰنَ ٱلَّذِيٓ أَسۡرَىٰ بِعَبۡدِهِۦ لَيۡلًا مِّنَ ٱلۡمَسۡجِدِ ٱلۡحَرَامِ إِلَى ٱلۡمَسۡجِدِ ٱلۡأَقۡصَا ٱلَّذِي بَٰرَكۡنَا حَوۡلَهُۥ لِنُرِيَهُۥ مِنۡ ءَايَٰتِنَآۚ إِنَّهُۥ هُوَ ٱلسَّمِيعُ ٱلۡبَصِيرُ  ۝١
१. पवित्र आहे तो (अल्लाह), जो आपल्या दासाला एका रात्रीतून आदरणीय मस्जिदीपासून, अक्सा मस्जिदपर्यंत घेऊन गेला, जिच्या भोवती आम्ही बरकती प्रदान करून ठेवल्या आहेत. यासाठी की आम्ही त्याला आपल्या सामर्थ्याच्या काही मोठ्या निशाण्या दाखवून द्याव्यात. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाहच चांगल्या प्रकारे ऐकणारा, पाहणारा आहे
17:2
وَءَاتَيۡنَا مُوسَى ٱلۡكِتَٰبَ وَجَعَلۡنَٰهُ هُدًى لِّبَنِيٓ إِسۡرَٰٓءِيلَ أَلَّا تَتَّخِذُواْ مِن دُونِي وَكِيلًا  ۝٢
२. आणि आम्ही मूसाला ग्रंथ प्रदान केला आणि त्याला इस्राईलच्या संततीकरिता मार्गदर्शक बनविले की तुम्ही माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही काम बनविणारा बनवू नका
17:3
ذُرِّيَّةَ مَنۡ حَمَلۡنَا مَعَ نُوحٍۚ إِنَّهُۥ كَانَ عَبۡدًا شَكُورًا  ۝٣
३. हे त्या लोकांपासून जन्मास आलेल्यांनो! ज्यांना आम्ही नूहच्या सोबत नौकेत चढविले होते. तो आमचा मोठा कृतज्ञशील दास होता
17:4
وَقَضَيۡنَآ إِلَىٰ بَنِيٓ إِسۡرَٰٓءِيلَ فِي ٱلۡكِتَٰبِ لَتُفۡسِدُنَّ فِي ٱلۡأَرۡضِ مَرَّتَيۡنِ وَلَتَعۡلُنَّ عُلُوًّا كَبِيرًا  ۝٤
४. आणि आम्ही इस्राईलच्या संततीकरिता त्यांच्या ग्रंथात स्पष्टतः निर्णय दिला होता की तुम्ही धरतीवर दोन वेळा उपद्रव निर्माण कराल, आणि तुम्ही फार जास्त अत्याचार कराल
17:5
فَإِذَا جَآءَ وَعۡدُ أُولَىٰهُمَا بَعَثۡنَا عَلَيۡكُمۡ عِبَادًا لَّنَآ أُوْلِي بَأۡسٍ شَدِيدٍ فَجَاسُواْ خِلَٰلَ ٱلدِّيَارِۚ وَكَانَ وَعۡدًا مَّفۡعُولًا  ۝٥
५. या दोन्ही वायद्यांपैकी पहिल्या वायद्याची वेळ येताच आम्ही तुमच्यासमोर आपल्या त्या दासांना उठवून उभे केले जे मोठे लढवय्ये होते, मग ते तुमच्या घरांमध्ये अगदी आतापर्यंत पसरले आणि अल्लाहचा वायदा पूर्ण होणारच होता
17:6
ثُمَّ رَدَدۡنَا لَكُمُ ٱلۡكَرَّةَ عَلَيۡهِمۡ وَأَمۡدَدۡنَٰكُم بِأَمۡوَٰلٍ وَبَنِينَ وَجَعَلۡنَٰكُمۡ أَكۡثَرَ نَفِيرًا  ۝٦
६. मग आम्ही तुम्हाला त्यांच्यावर वर्चस्व देऊन (तुमचे दिवस) पालटले आणि विपुल धन संपत्ती आणि संततीने तुमची मदत केली आणि तुमचे समूह बळ वाढविले
17:7
إِنۡ أَحۡسَنتُمۡ أَحۡسَنتُمۡ لِأَنفُسِكُمۡۖ وَإِنۡ أَسَأۡتُمۡ فَلَهَاۚ فَإِذَا جَآءَ وَعۡدُ ٱلۡأٓخِرَةِ لِيَسُـُٔواْ وُجُوهَكُمۡ وَلِيَدۡخُلُواْ ٱلۡمَسۡجِدَ كَمَا دَخَلُوهُ أَوَّلَ مَرَّةٍ وَلِيُتَبِّرُواْ مَا عَلَوۡاْ تَتۡبِيرًا  ۝٧
७. जर तुम्ही सत्कर्म कराल तर स्वतः आपल्या फायद्याकरिता कराल आणि जर तुम्ही वाईट कर्मे कराल तर ते देखील स्वतःसाठीच. मग जेव्हा दुसऱ्या वायद्याची वेळ आली, तेव्हा (आम्ही दुसऱ्या दासांना पाठविले) यासाठी की त्यांनी तुमचा चेहरा बिघडवून टाकावा आणि पहिल्या खेपेप्रमाणे पुन्हा त्याच मस्जिदीत घुसावे आणि जी काही वस्तू ताब्यात येईल, तोडफोड करून मुळासकट उपटून टाकावी


📚 15 📄282 / 604



M Mishary Rashid Alafasy
M Mahmoud Khalil Al-Husary
A Abdurrahman As-Sudais
M Mohamed Siddiq Al-Minshawi
A Abdul Basit Abdul Samad
A Ali Al-Hudhaify
A Ahmed ibn Ali al-Ajamy
A Abu Bakr Ash-Shaatree
M Muhammad Ayyoub
A Abdullah Basfar
A Abdullah Al-Juhani
M Maher Al Muaiqly
0:00
0:00
-

पवित्र कुराण


Wednesday, October 14, 2026

Don't forget us in your sincere prayers