📖 0/604 वाचलेली पाने
📄 134
وَكَذَٰلِكَ فَتَنَّا بَعۡضَهُم بِبَعۡضٍ لِّيَقُولُوٓاْ أَهَٰٓؤُلَآءِ مَنَّ ٱللَّهُ عَلَيۡهِم مِّنۢ بَيۡنِنَآۗ أَلَيۡسَ ٱللَّهُ بِأَعۡلَمَ بِٱلشَّٰكِرِينَ  ۝٥٣ وَإِذَا جَآءَكَ ٱلَّذِينَ يُؤۡمِنُونَ بِـَٔايَٰتِنَا فَقُلۡ سَلَٰمٌ عَلَيۡكُمۡۖ كَتَبَ رَبُّكُمۡ عَلَىٰ نَفۡسِهِ ٱلرَّحۡمَةَ أَنَّهُۥ مَنۡ عَمِلَ مِنكُمۡ سُوٓءَۢا بِجَهَٰلَةٍ ثُمَّ تَابَ مِنۢ بَعۡدِهِۦ وَأَصۡلَحَ فَأَنَّهُۥ غَفُورٌ رَّحِيمٌ  ۝٥٤ وَكَذَٰلِكَ نُفَصِّلُ ٱلۡأٓيَٰتِ وَلِتَسۡتَبِينَ سَبِيلُ ٱلۡمُجۡرِمِينَ  ۝٥٥ قُلۡ إِنِّي نُهِيتُ أَنۡ أَعۡبُدَ ٱلَّذِينَ تَدۡعُونَ مِن دُونِ ٱللَّهِۚ قُل لَّآ أَتَّبِعُ أَهۡوَآءَكُمۡ قَدۡ ضَلَلۡتُ إِذًا وَمَآ أَنَا۠ مِنَ ٱلۡمُهۡتَدِينَ  ۝٥٦ قُلۡ إِنِّي عَلَىٰ بَيِّنَةٍ مِّن رَّبِّي وَكَذَّبۡتُم بِهِۦۚ مَا عِندِي مَا تَسۡتَعۡجِلُونَ بِهِۦٓۚ إِنِ ٱلۡحُكۡمُ إِلَّا لِلَّهِۖ يَقُصُّ ٱلۡحَقَّۖ وَهُوَ خَيۡرُ ٱلۡفَٰصِلِينَ  ۝٥٧ قُل لَّوۡ أَنَّ عِندِي مَا تَسۡتَعۡجِلُونَ بِهِۦ لَقُضِيَ ٱلۡأَمۡرُ بَيۡنِي وَبَيۡنَكُمۡۗ وَٱللَّهُ أَعۡلَمُ بِٱلظَّٰلِمِينَ  ۝٥٨ ۞ وَعِندَهُۥ مَفَاتِحُ ٱلۡغَيۡبِ لَا يَعۡلَمُهَآ إِلَّا هُوَۚ وَيَعۡلَمُ مَا فِي ٱلۡبَرِّ وَٱلۡبَحۡرِۚ وَمَا تَسۡقُطُ مِن وَرَقَةٍ إِلَّا يَعۡلَمُهَا وَلَا حَبَّةٍ فِي ظُلُمَٰتِ ٱلۡأَرۡضِ وَلَا رَطۡبٍ وَلَا يَابِسٍ إِلَّا فِي كِتَٰبٍ مُّبِينٍ  ۝٥٩
6:53
وَكَذَٰلِكَ فَتَنَّا بَعۡضَهُم بِبَعۡضٍ لِّيَقُولُوٓاْ أَهَٰٓؤُلَآءِ مَنَّ ٱللَّهُ عَلَيۡهِم مِّنۢ بَيۡنِنَآۗ أَلَيۡسَ ٱللَّهُ بِأَعۡلَمَ بِٱلشَّٰكِرِينَ  ۝٥٣
५३. आणि अशा प्रकारे आम्ही त्यांना आपसात कसोटीत टाकले, यासाठी की त्यांनी म्हणावे, काय अल्लाहने आमच्यामधून फक्त यांच्यावरच उपकार केला? तेव्हा काय असे नाही की अल्लाह कृतज्ञशील लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो
6:54
وَإِذَا جَآءَكَ ٱلَّذِينَ يُؤۡمِنُونَ بِـَٔايَٰتِنَا فَقُلۡ سَلَٰمٌ عَلَيۡكُمۡۖ كَتَبَ رَبُّكُمۡ عَلَىٰ نَفۡسِهِ ٱلرَّحۡمَةَ أَنَّهُۥ مَنۡ عَمِلَ مِنكُمۡ سُوٓءَۢا بِجَهَٰلَةٍ ثُمَّ تَابَ مِنۢ بَعۡدِهِۦ وَأَصۡلَحَ فَأَنَّهُۥ غَفُورٌ رَّحِيمٌ  ۝٥٤
५४. आणि तुमच्याजवळ जेव्हा ते लोक येतील, जे आमच्या आयतींवर ईमान राखतात, तर त्यांना सांगा, तुमच्यावर सलामती असो तुमच्या पालनकर्त्याने स्वतःवर दया अनिवार्य करून घेतली आहे की तुमच्यापैकी ज्याने मूर्खपणाने वाईट कृत्य केले मग त्यानंतर क्षमा याचना केली आणि सुधारणा करून घेतली तर अल्लाह मोठा माफ करणारा दया करणारा आहे
6:55
وَكَذَٰلِكَ نُفَصِّلُ ٱلۡأٓيَٰتِ وَلِتَسۡتَبِينَ سَبِيلُ ٱلۡمُجۡرِمِينَ  ۝٥٥
५५. अशा प्रकारे आम्ही आपल्या आयतींचे सविस्तर निवेदन करतो यासाठी की अपराधी लोकांचा मार्ग स्पष्ट व्हावा
6:56
قُلۡ إِنِّي نُهِيتُ أَنۡ أَعۡبُدَ ٱلَّذِينَ تَدۡعُونَ مِن دُونِ ٱللَّهِۚ قُل لَّآ أَتَّبِعُ أَهۡوَآءَكُمۡ قَدۡ ضَلَلۡتُ إِذًا وَمَآ أَنَا۠ مِنَ ٱلۡمُهۡتَدِينَ  ۝٥٦
५६. तुम्ही सांगा की मला या गोष्टीपासून रोखले गेले आहे की मी त्यांची उपासना करावी, ज्यांना अल्लाहशिवाय तुम्ही पुकारता. तुम्ही सांगा की मी तुमच्या मनाच्या इच्छेनुसार चालणार नाही कारण अशा स्थितीत मी मार्गभ्रष्ट होईन आणि सन्मार्गावर राहणार नाही
6:57
قُلۡ إِنِّي عَلَىٰ بَيِّنَةٍ مِّن رَّبِّي وَكَذَّبۡتُم بِهِۦۚ مَا عِندِي مَا تَسۡتَعۡجِلُونَ بِهِۦٓۚ إِنِ ٱلۡحُكۡمُ إِلَّا لِلَّهِۖ يَقُصُّ ٱلۡحَقَّۖ وَهُوَ خَيۡرُ ٱلۡفَٰصِلِينَ  ۝٥٧
५७. तुम्ही सांगा, माझ्याजवळ माझ्या पालनकर्त्यातर्फे एक प्रमाण आहे आणि ते तुम्ही खोटे ठरविता. ज्या गोष्टीची तुम्ही घाई करीत आहात ती माझ्याजवळ नाही. अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणाचाही आदेश नाही अल्लाह वास्तव गोष्टींना स्पष्टतः सांगतो आणि तोच सर्वांत चांगला फैसला करणारा आहे
6:58
قُل لَّوۡ أَنَّ عِندِي مَا تَسۡتَعۡجِلُونَ بِهِۦ لَقُضِيَ ٱلۡأَمۡرُ بَيۡنِي وَبَيۡنَكُمۡۗ وَٱللَّهُ أَعۡلَمُ بِٱلظَّٰلِمِينَ  ۝٥٨
५८. तुम्ही सांगा, ज्या गोष्टीची तुम्ही एवढ्या घाईने मागणी करीत आहात ती जर माझ्या अवाख्यात असती तर माझ्या व तुमच्या दरम्यान केव्हाच फैसला झाला असता आणि अल्लाह अत्याचारी लोकांना चांगल्या प्रकारे ओळखतो
6:59
۞ وَعِندَهُۥ مَفَاتِحُ ٱلۡغَيۡبِ لَا يَعۡلَمُهَآ إِلَّا هُوَۚ وَيَعۡلَمُ مَا فِي ٱلۡبَرِّ وَٱلۡبَحۡرِۚ وَمَا تَسۡقُطُ مِن وَرَقَةٍ إِلَّا يَعۡلَمُهَا وَلَا حَبَّةٍ فِي ظُلُمَٰتِ ٱلۡأَرۡضِ وَلَا رَطۡبٍ وَلَا يَابِسٍ إِلَّا فِي كِتَٰبٍ مُّبِينٍ  ۝٥٩
५९. आणि त्या (अल्लाह) कडेच परोक्षाच्या चाव्या आहेत, ज्यांना फक्त तोच जाणतो आणि जे काही धरतीवर आणि जलाशयात आहे ते सर्व तो जाणतो आणि जमिनीच्या अंधःकारात एक दाणाही खाली पडत नाही. आणि ना एखादी ओली व कोरडी वस्तू पडते, परंतु हे सर्व काही स्पष्ट ग्रंथात नमूद आहे.१


📚 7 📄134 / 604



M Mishary Rashid Alafasy
M Mahmoud Khalil Al-Husary
A Abdurrahman As-Sudais
M Mohamed Siddiq Al-Minshawi
A Abdul Basit Abdul Samad
A Ali Al-Hudhaify
A Ahmed ibn Ali al-Ajamy
A Abu Bakr Ash-Shaatree
M Muhammad Ayyoub
A Abdullah Basfar
A Abdullah Al-Juhani
M Maher Al Muaiqly
0:00
0:00
-

पवित्र कुराण


Thursday, October 8, 2026

Don't forget us in your sincere prayers