📖 0/604 वाचलेली पाने
📄 17
अल-बकरा

अल-बकरा

2:106
۞ مَا نَنسَخۡ مِنۡ ءَايَةٍ أَوۡ نُنسِهَا نَأۡتِ بِخَيۡرٍ مِّنۡهَآ أَوۡ مِثۡلِهَآۗ أَلَمۡ تَعۡلَمۡ أَنَّ ٱللَّهَ عَلَىٰ كُلِّ شَيۡءٍ قَدِيرٌ ١٠٦
१०६. ज्या आयतीला आम्ही रद्द करतो किंवा तिचा विसर पाडतो तर त्याहून चांगली किंवा तिच्यासारखी आणखी आणतो. काय तुम्ही नाही जाणत की अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो
2:107
أَلَمۡ تَعۡلَمۡ أَنَّ ٱللَّهَ لَهُۥ مُلۡكُ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۗ وَمَا لَكُم مِّن دُونِ ٱللَّهِ مِن وَلِيٍّ وَلَا نَصِيرٍ ١٠٧
१०७. काय तुम्हाला नाही माहीत की धरती आणि आकाशांची राज्य-सत्ता केवळ अल्लाहकरिताच आहे, आणि अल्लाहच्या शिवाय तुमचा कोणी संरक्षक आणि सहाय्यक नाही
2:108
أَمۡ تُرِيدُونَ أَن تَسۡـَٔلُواْ رَسُولَكُمۡ كَمَا سُئِلَ مُوسَىٰ مِن قَبۡلُۗ وَمَن يَتَبَدَّلِ ٱلۡكُفۡرَ بِٱلۡإِيمَٰنِ فَقَدۡ ضَلَّ سَوَآءَ ٱلسَّبِيلِ ١٠٨
१०८. काय तुम्ही आपल्या रसूल (पैगंबर) ला तसे प्रश्न विचारू इच्छिता, जसे यापूर्वी मूसाला विचारले गेले (ऐका!) जो ईमानचा मार्ग सोडून कुप्र (इन्कार) चा मार्ग धरतो, तो सरळ मार्गापासून भटकतो
2:109
وَدَّ كَثِيرٌ مِّنۡ أَهۡلِ ٱلۡكِتَٰبِ لَوۡ يَرُدُّونَكُم مِّنۢ بَعۡدِ إِيمَٰنِكُمۡ كُفَّارًا حَسَدًا مِّنۡ عِندِ أَنفُسِهِم مِّنۢ بَعۡدِ مَا تَبَيَّنَ لَهُمُ ٱلۡحَقُّۖ فَٱعۡفُواْ وَٱصۡفَحُواْ حَتَّىٰ يَأۡتِيَ ٱللَّهُ بِأَمۡرِهِۦٓۗ إِنَّ ٱللَّهَ عَلَىٰ كُلِّ شَيۡءٍ قَدِيرٌ ١٠٩
१०९. या ग्रंथधारकांपैकी अधिकांश लोक सत्य प्रकट झाल्यानंतरही केवळ द्वेष-मत्सरामुळे तुम्हालाही ईमानापासून दूर करू इच्छितात, तेव्हा तुम्हीही माफ करा आणि सोडून द्या, येथपर्यंत की अल्लाहने आपला फैसला लागू करावा. निःसंशय अल्लाह प्रत्येक कार्य करण्याचे सामर्थ्य राखतो
2:110
وَأَقِيمُواْ ٱلصَّلَوٰةَ وَءَاتُواْ ٱلزَّكَوٰةَۚ وَمَا تُقَدِّمُواْ لِأَنفُسِكُم مِّنۡ خَيۡرٍ تَجِدُوهُ عِندَ ٱللَّهِۗ إِنَّ ٱللَّهَ بِمَا تَعۡمَلُونَ بَصِيرٌ ١١٠
११०. तुम्ही नमाज (नित्य-नेमाने) अदा करीत राहा, आणि जकात (धर्म दान) देत राहा आणि जी भलाई तुम्ही आपल्यासाठी पुढे पाठवाल, ती सर्वकाही अल्लाहजवळ प्राप्त कराल. निःसंशय, अल्लाह तुमचे प्रत्येक कर्म पाहत आहे
2:111
وَقَالُواْ لَن يَدۡخُلَ ٱلۡجَنَّةَ إِلَّا مَن كَانَ هُودًا أَوۡ نَصَٰرَىٰۗ تِلۡكَ أَمَانِيُّهُمۡۗ قُلۡ هَاتُواْ بُرۡهَٰنَكُمۡ إِن كُنتُمۡ صَٰدِقِينَ ١١١
१११. आणि हे म्हणतात की जन्नतमध्ये यहूदी आणि ख्रिश्चनांखेरीज अन्य कोणी जाणार नाही. या त्यांच्या काल्पिनक आशा- अपेक्षा आहेत. त्यांना सांगा, तुम्ही (आपल्या कथनात) सच्चे असाल तर एखादा पुरावा तरी प्रस्तुत करा
2:112
بَلَىٰۚ مَنۡ أَسۡلَمَ وَجۡهَهُۥ لِلَّهِ وَهُوَ مُحۡسِنٌ فَلَهُۥٓ أَجۡرُهُۥ عِندَ رَبِّهِۦ وَلَا خَوۡفٌ عَلَيۡهِمۡ وَلَا هُمۡ يَحۡزَنُونَ ١١٢
११२. ऐका! ज्याने स्वतःला अल्लाहच्या हवाली केले, आणि नेक-सदाचारी आहे, तर त्याच्याचकरिता, त्याच्या पालनकर्त्या (अल्लाह) च्या ठिकाणी चांगला मोबदला आहे आणि ना त्यांना कसले भय राहील ना एखादे दुःख
العربيةEnglishBahasa IndonesiaTürkçeРусскийفارسیFrançaisاردوবাংলাDeutschEspañol中文हिन्दीPortuguêsItalianoภาษาไทยPolskiNederlandsShqipKiswahiliO'zbekதமிழ்MelayuBosanskiSoomaaliAzərbaycanکوردی한국어日本語SvenskaDanskNorskپښتوമലയാളംසිංහලTamazightHausaአማርኛБългарскиТоҷикӣҚазақшаFilipinoسنڌيYorùbáFulfuldeТатарчаئۇيغۇرچەКыргызчаਪੰਜਾਬੀJawaతెలుగుမြန်မာગુજરાતીOromoमराठीTiếng ViệtMalagasyНохчийнWolofދިވެހިಕನ್ನಡУкраїнськаΕλληνικάქართულიខ្មែរدریQafar afMaranaoनेपाली
पवित्र कुराण
Wednesday, August 19, 2026
Don't forget us in your sincere prayers







