📖 0/604 वाचलेली पाने
📄 598
सूरा अल-कद्र

सूरा अल-बय्यिना

सूरा अल-कद्र

97:1
إِنَّآ أَنزَلۡنَٰهُ فِي لَيۡلَةِ ٱلۡقَدۡرِ ١
१. निःसंशय, आम्ही या (कुरआना) ला कद्र (बरकती) च्या रात्री अवतरित केले
97:3
لَيۡلَةُ ٱلۡقَدۡرِ خَيۡرٌ مِّنۡ أَلۡفِ شَهۡرٍ ٣
३. कद्रची रात्र एक हजार महिन्यांपेक्षा उत्तम आहे
97:4
تَنَزَّلُ ٱلۡمَلَٰٓئِكَةُ وَٱلرُّوحُ فِيهَا بِإِذۡنِ رَبِّهِم مِّن كُلِّ أَمۡرٍ ٤
४. या रात्री (प्रत्येक कार्य पार पाडण्यास) आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाने फरिश्ते आणि रुह (जिब्रील) अवतरित होतात
97:5
سَلَٰمٌ هِيَ حَتَّىٰ مَطۡلَعِ ٱلۡفَجۡرِ ٥
५. ही रात्र पूर्णपणे सलामतीची असते आणि प्रातःकाळाचा उदय (पहाट) होईपर्यंत असते
सूरा अल-बय्यिना

98:1
لَمۡ يَكُنِ ٱلَّذِينَ كَفَرُواْ مِنۡ أَهۡلِ ٱلۡكِتَٰبِ وَٱلۡمُشۡرِكِينَ مُنفَكِّينَ حَتَّىٰ تَأۡتِيَهُمُ ٱلۡبَيِّنَةُ ١
१. ग्रंथधारकंपैकी इन्कार करणारे आणि अनेकेश्वरवादी लोक आपल्या वर्तनापासून मागे हटणारे नव्हते, जोपर्यंत त्यांच्याजवळ उघड प्रमाण न यावे (आणि ते प्रमाण हे होते की)
98:2
رَسُولٌ مِّنَ ٱللَّهِ يَتۡلُواْ صُحُفًا مُّطَهَّرَةً ٢
२. सर्वश्रेष्ठ अल्लाहचा एक पैगंबर, जो पवित्र ग्रंथ वाचून दाखविल
98:4
وَمَا تَفَرَّقَ ٱلَّذِينَ أُوتُواْ ٱلۡكِتَٰبَ إِلَّا مِنۢ بَعۡدِ مَا جَآءَتۡهُمُ ٱلۡبَيِّنَةُ ٤
४. ग्रंथधारक आपल्याजवळ स्पष्ट प्रमाण येऊन पोहचल्यानंतरच (मतभेदात पडून) विभाजित झाले
98:5
وَمَآ أُمِرُوٓاْ إِلَّا لِيَعۡبُدُواْ ٱللَّهَ مُخۡلِصِينَ لَهُ ٱلدِّينَ حُنَفَآءَ وَيُقِيمُواْ ٱلصَّلَوٰةَ وَيُؤۡتُواْ ٱلزَّكَوٰةَۚ وَذَٰلِكَ دِينُ ٱلۡقَيِّمَةِ ٥
५. वास्तविक त्यांना याखेरीज कोणताही आदेश दिला गेला नाही की त्यांनी फक्त अल्लाहचीच उपासना करावी, त्याच्याचकरिता दीन (धर्मा) ला विशुद्ध राखावे. (इब्राहीम) हनीफच्या दीन (धर्मा) वर आणि नमाजला कायम राखावे आणि जकात (कर्तव्य-दान) देत राहावे. हाच सरळ दीन (धर्म) आहे मुस्लिम संप्रदायाचा
98:6
إِنَّ ٱلَّذِينَ كَفَرُواْ مِنۡ أَهۡلِ ٱلۡكِتَٰبِ وَٱلۡمُشۡرِكِينَ فِي نَارِ جَهَنَّمَ خَٰلِدِينَ فِيهَآۚ أُوْلَٰٓئِكَ هُمۡ شَرُّ ٱلۡبَرِيَّةِ ٦
६. निःसंशय, जे लोक ग्रंथधारकांपैकी इन्कारी झाले. आणि अनेकेश्वरवादी, सर्वच्या सर्व जहन्नमच्या आगीत (जातील), ज्यात ते नेहमी (नेहमी) राहतील. हेच लोक सर्वांत वाईट निर्मिती होय
98:7
إِنَّ ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّٰلِحَٰتِ أُوْلَٰٓئِكَ هُمۡ خَيۡرُ ٱلۡبَرِيَّةِ ٧
७. निःसंशय, ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म केले, तर असे लोक (अल्लाहची) सर्वांत उत्तम निर्मिती होय
العربيةEnglishBahasa IndonesiaTürkçeРусскийفارسیFrançaisاردوবাংলাDeutschEspañol中文हिन्दीPortuguêsItalianoภาษาไทยPolskiNederlandsShqipKiswahiliO'zbekதமிழ்MelayuBosanskiSoomaaliAzərbaycanکوردی한국어日本語SvenskaDanskNorskپښتوമലയാളംසිංහලTamazightHausaአማርኛБългарскиТоҷикӣҚазақшаFilipinoسنڌيYorùbáFulfuldeТатарчаئۇيغۇرچەКыргызчаਪੰਜਾਬੀJawaతెలుగుမြန်မာગુજરાતીOromoमराठीTiếng ViệtMalagasyНохчийнWolofދިވެހިಕನ್ನಡУкраїнськаΕλληνικάქართულიខ្មែរدریQafar afMaranaoनेपाली
पवित्र कुराण
Tuesday, September 1, 2026
Don't forget us in your sincere prayers







