📖 0/604 वाचलेली पाने
📄 305
सूरा मर्यम
bismillah
كٓهيعٓصٓ  ۝١ ذِكۡرُ رَحۡمَتِ رَبِّكَ عَبۡدَهُۥ زَكَرِيَّآ  ۝٢ إِذۡ نَادَىٰ رَبَّهُۥ نِدَآءً خَفِيًّا  ۝٣ قَالَ رَبِّ إِنِّي وَهَنَ ٱلۡعَظۡمُ مِنِّي وَٱشۡتَعَلَ ٱلرَّأۡسُ شَيۡبًا وَلَمۡ أَكُنۢ بِدُعَآئِكَ رَبِّ شَقِيًّا  ۝٤ وَإِنِّي خِفۡتُ ٱلۡمَوَٰلِيَ مِن وَرَآءِي وَكَانَتِ ٱمۡرَأَتِي عَاقِرًا فَهَبۡ لِي مِن لَّدُنكَ وَلِيًّا  ۝٥ يَرِثُنِي وَيَرِثُ مِنۡ ءَالِ يَعۡقُوبَۖ وَٱجۡعَلۡهُ رَبِّ رَضِيًّا  ۝٦ يَٰزَكَرِيَّآ إِنَّا نُبَشِّرُكَ بِغُلَٰمٍ ٱسۡمُهُۥ يَحۡيَىٰ لَمۡ نَجۡعَل لَّهُۥ مِن قَبۡلُ سَمِيًّا  ۝٧ قَالَ رَبِّ أَنَّىٰ يَكُونُ لِي غُلَٰمٌ وَكَانَتِ ٱمۡرَأَتِي عَاقِرًا وَقَدۡ بَلَغۡتُ مِنَ ٱلۡكِبَرِ عِتِيًّا  ۝٨ قَالَ كَذَٰلِكَ قَالَ رَبُّكَ هُوَ عَلَيَّ هَيِّنٌ وَقَدۡ خَلَقۡتُكَ مِن قَبۡلُ وَلَمۡ تَكُ شَيۡـًٔا  ۝٩ قَالَ رَبِّ ٱجۡعَل لِّيٓ ءَايَةًۖ قَالَ ءَايَتُكَ أَلَّا تُكَلِّمَ ٱلنَّاسَ ثَلَٰثَ لَيَالٍ سَوِيًّا  ۝١٠ فَخَرَجَ عَلَىٰ قَوۡمِهِۦ مِنَ ٱلۡمِحۡرَابِ فَأَوۡحَىٰٓ إِلَيۡهِمۡ أَن سَبِّحُواْ بُكۡرَةً وَعَشِيًّا  ۝١١
सूरा मर्यम
bismillah
19:1
كٓهيعٓصٓ  ۝١
१. काफ. हा. या. एैन. श्वाद
19:2
ذِكۡرُ رَحۡمَتِ رَبِّكَ عَبۡدَهُۥ زَكَرِيَّآ  ۝٢
२. हा उल्लेख आहे तुमच्या पालनकर्त्याच्या त्या कृपेचा, जी त्याने आपले दास जकरियावर केली होती
19:3
إِذۡ نَادَىٰ رَبَّهُۥ نِدَآءً خَفِيًّا  ۝٣
३. जेव्हा त्यांनी आपल्या पालनकर्त्याजवळ गुपचुप रित्या प्रार्थना केली
19:4
قَالَ رَبِّ إِنِّي وَهَنَ ٱلۡعَظۡمُ مِنِّي وَٱشۡتَعَلَ ٱلرَّأۡسُ شَيۡبًا وَلَمۡ أَكُنۢ بِدُعَآئِكَ رَبِّ شَقِيًّا  ۝٤
४. म्हणाले हे माझ्या पालनकर्त्या माझी हाडे कमकुवत झाली आहेत आणि डोके म्हातारपणामुळे भडकले आहे, परंतु मी कधीही तुझ्याजवळ दुआ (प्रार्थना) करून वंचित राहिलो नाही
19:5
وَإِنِّي خِفۡتُ ٱلۡمَوَٰلِيَ مِن وَرَآءِي وَكَانَتِ ٱمۡرَأَتِي عَاقِرًا فَهَبۡ لِي مِن لَّدُنكَ وَلِيًّا  ۝٥
५. आणि मला आपल्या (मृत्यु) नंतर, आपल्या जवळच्या नातेवाईकांचे भय आहे. माझी पत्नी देखील वांझ आहे, पण तरीही तू मला आपल्यातर्फे वारस प्रदान कर
19:6
يَرِثُنِي وَيَرِثُ مِنۡ ءَالِ يَعۡقُوبَۖ وَٱجۡعَلۡهُ رَبِّ رَضِيًّا  ۝٦
६. जो माझाही वारस असेल आणि याकूबच्या वंशाचाही वारस, आणि हे माझ्या पालनकर्त्या! तू त्याला आपला आवडता दास बनव
19:7
يَٰزَكَرِيَّآ إِنَّا نُبَشِّرُكَ بِغُلَٰمٍ ٱسۡمُهُۥ يَحۡيَىٰ لَمۡ نَجۡعَل لَّهُۥ مِن قَبۡلُ سَمِيًّا  ۝٧
७. हे जकरिया! आम्ही तुम्हाला एका पुत्रा (च्या प्राप्ती) ची खूशखबर देतो, ज्याचे नाव यहया आहे. आम्ही त्यांच्यापूर्वी या नावासारखे नाव कोणालाही दिले नाही
19:8
قَالَ رَبِّ أَنَّىٰ يَكُونُ لِي غُلَٰمٌ وَكَانَتِ ٱمۡرَأَتِي عَاقِرًا وَقَدۡ بَلَغۡتُ مِنَ ٱلۡكِبَرِ عِتِيًّا  ۝٨
८. (जकरिया) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! मला पुत्र कसा बरे होईल, माझी पत्नी वांझ आणि मी स्वतः म्हातारपणाच्या अतिशय कमकुवत अवस्थेस पोहोचलो आहे
19:9
قَالَ كَذَٰلِكَ قَالَ رَبُّكَ هُوَ عَلَيَّ هَيِّنٌ وَقَدۡ خَلَقۡتُكَ مِن قَبۡلُ وَلَمۡ تَكُ شَيۡـًٔا  ۝٩
९. आदेश झाला की (वायदा) अशाच प्रकारे पूर्ण झाला. तुमच्या पालनकर्त्याने फर्माविले आहे की माझ्याकरिता तर हे अगदी सोपे आहे आणि तुम्ही स्वतः जेव्हा काहीच नव्हता, मी तुम्हाला निर्माण केले आहे
19:10
قَالَ رَبِّ ٱجۡعَل لِّيٓ ءَايَةًۖ قَالَ ءَايَتُكَ أَلَّا تُكَلِّمَ ٱلنَّاسَ ثَلَٰثَ لَيَالٍ سَوِيًّا  ۝١٠
१०. (जकरिया) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! माझ्यासाठी एखादी निशाणी निर्धारीत कर, आदेश दिला की तुमच्यासाठी निशाणी ही की प्रकृती धडधाकट असतानाही तुम्ही तीन रात्री पर्यंत कोणत्याही माणसाशी बोलू शकणार नाहीत
19:11
فَخَرَجَ عَلَىٰ قَوۡمِهِۦ مِنَ ٱلۡمِحۡرَابِ فَأَوۡحَىٰٓ إِلَيۡهِمۡ أَن سَبِّحُواْ بُكۡرَةً وَعَشِيًّا  ۝١١
११. आता जकरिया आपल्या खोली (हुजऱ्या) च्या बाहेर येऊन आपल्या जनसमूहाजवळ येऊन त्यांना इशारा करतात की तुम्ही सकाळ-संध्याकाळ अल्लाहची पवित्रता वर्णन करा


📚 16 📄305 / 604



M Mishary Rashid Alafasy
M Mahmoud Khalil Al-Husary
A Abdurrahman As-Sudais
M Mohamed Siddiq Al-Minshawi
A Abdul Basit Abdul Samad
A Ali Al-Hudhaify
A Ahmed ibn Ali al-Ajamy
A Abu Bakr Ash-Shaatree
M Muhammad Ayyoub
A Abdullah Basfar
A Abdullah Al-Juhani
M Maher Al Muaiqly
0:00
0:00
-

पवित्र कुराण


Wednesday, October 14, 2026

Don't forget us in your sincere prayers