📖 0/604 वाचलेली पाने
📄 151
सूरा अल-आराफ

सूरा अल-आराफ

7:2
كِتَٰبٌ أُنزِلَ إِلَيۡكَ فَلَا يَكُن فِي صَدۡرِكَ حَرَجٌ مِّنۡهُ لِتُنذِرَ بِهِۦ وَذِكۡرَىٰ لِلۡمُؤۡمِنِينَ ٢
२. हा एक ग्रंथ आहे, जो तुमच्याकडे अवतरित केला गेला, यासाठी की याद्वारे सचेत करण्यात तुमच्या मनात संकोच निर्माण होऊ नये, आणि ईमान राखणाऱ्यांकरिता बोध आहे
7:3
ٱتَّبِعُواْ مَآ أُنزِلَ إِلَيۡكُم مِّن رَّبِّكُمۡ وَلَا تَتَّبِعُواْ مِن دُونِهِۦٓ أَوۡلِيَآءَۗ قَلِيلًا مَّا تَذَكَّرُونَ ٣
३. जे (धर्मविधान) तुमच्या पालनकर्त्यातर्फे उतरविले गेले, त्याचे अनुसरण करा आणि त्याच्याखेरीज इतर दोस्तांचे अनुसरण करू नका. तुम्ही लोक फार कमी बोध प्राप्त करता
7:4
وَكَم مِّن قَرۡيَةٍ أَهۡلَكۡنَٰهَا فَجَآءَهَا بَأۡسُنَا بَيَٰتًا أَوۡ هُمۡ قَآئِلُونَ ٤
४. आणि कित्येक वस्त्या आम्ही नष्ट करून टाकल्या आणि त्यांच्यावर आमचा अज़ाब रात्रीच्या वेळी पोहोचला किंवा अशा स्थितीत की ते दुपारच्या वेळी आराम करीत होते
7:5
فَمَا كَانَ دَعۡوَىٰهُمۡ إِذۡ جَآءَهُم بَأۡسُنَآ إِلَّآ أَن قَالُوٓاْ إِنَّا كُنَّا ظَٰلِمِينَ ٥
५. तर जेव्हा त्यांच्याजवळ आमचा अज़ाब आला, तेव्हा त्यांची ओरड फक्त हीच राहिली की ते म्हणाले, आम्हीच अत्याचारी राहिलोत
7:6
فَلَنَسۡـَٔلَنَّ ٱلَّذِينَ أُرۡسِلَ إِلَيۡهِمۡ وَلَنَسۡـَٔلَنَّ ٱلۡمُرۡسَلِينَ ٦
६. मग आम्ही त्यांना अवश्य विचारू ज्यांच्याजवळ संदेश पाठविला गेला आणि पैगंबरांनाही अवश्य विचारू.१
7:7
فَلَنَقُصَّنَّ عَلَيۡهِم بِعِلۡمٍۖ وَمَا كُنَّا غَآئِبِينَ ٧
७. मग आम्ही त्यांच्यासमोर ज्ञानासह निवेदन करू, आणि आम्ही गाफील नव्हतो
7:8
وَٱلۡوَزۡنُ يَوۡمَئِذٍ ٱلۡحَقُّۚ فَمَن ثَقُلَتۡ مَوَٰزِينُهُۥ فَأُوْلَٰٓئِكَ هُمُ ٱلۡمُفۡلِحُونَ ٨
८. आणि त्या दिवशी ठीक वजन होईल, मग ज्याचे पारडे जड राहील, तर असेच लोक सफल होतील
7:9
وَمَنۡ خَفَّتۡ مَوَٰزِينُهُۥ فَأُوْلَٰٓئِكَ ٱلَّذِينَ خَسِرُوٓاْ أَنفُسَهُم بِمَا كَانُواْ بِـَٔايَٰتِنَا يَظۡلِمُونَ ٩
९. आणि ज्याचे पारडे हलके असेल तर हे असे लोक असतील, ज्यांनी आपले नुकसान स्वतःच करून घेतले, या कारणाने की आमच्या आयतींशी ते जुलूम करीत होते
7:10
وَلَقَدۡ مَكَّنَّٰكُمۡ فِي ٱلۡأَرۡضِ وَجَعَلۡنَا لَكُمۡ فِيهَا مَعَٰيِشَۗ قَلِيلًا مَّا تَشۡكُرُونَ ١٠
१०. आणि आम्ही तुम्हाला धरतीत राहण्याचे स्थान दिले आणि त्यात तुमच्यासाठी जीवनसामुग्री निर्माण केली. तुम्ही फार कमी आभार मानता
7:11
وَلَقَدۡ خَلَقۡنَٰكُمۡ ثُمَّ صَوَّرۡنَٰكُمۡ ثُمَّ قُلۡنَا لِلۡمَلَٰٓئِكَةِ ٱسۡجُدُواْ لِأٓدَمَ فَسَجَدُوٓاْ إِلَّآ إِبۡلِيسَ لَمۡ يَكُن مِّنَ ٱلسَّٰجِدِينَ ١١
११. आणि आम्ही तुम्हाला निर्माण केले, मग तुमचे रूप घडविले, मग आम्ही फरिश्त्यांना फर्माविले की आदमला सजदा करा, तेव्हा इब्लिसला सोडून सर्वांनी सजदा केला कारण तो सजदा करणाऱ्यांमध्ये सामील झाला नाही
العربيةEnglishBahasa IndonesiaTürkçeРусскийفارسیFrançaisاردوবাংলাDeutschEspañol中文हिन्दीPortuguêsItalianoภาษาไทยPolskiNederlandsShqipKiswahiliO'zbekதமிழ்MelayuBosanskiSoomaaliAzərbaycanکوردی한국어日本語SvenskaDanskNorskپښتوമലയാളംසිංහලTamazightHausaአማርኛБългарскиТоҷикӣҚазақшаFilipinoسنڌيYorùbáFulfuldeТатарчаئۇيغۇرچەКыргызчаਪੰਜਾਬੀJawaతెలుగుမြန်မာગુજરાતીOromoमराठीTiếng ViệtMalagasyНохчийнWolofދިވެހިಕನ್ನಡУкраїнськаΕλληνικάქართულიខ្មែរدریQafar afMaranaoनेपाली
पवित्र कुराण
Thursday, October 8, 2026
Don't forget us in your sincere prayers













