📖 0/604 वाचलेली पाने
📄 518
सूरा काफ

सूरा काफ

50:2
بَلۡ عَجِبُوٓاْ أَن جَآءَهُم مُّنذِرٌ مِّنۡهُمۡ فَقَالَ ٱلۡكَٰفِرُونَ هَٰذَا شَيۡءٌ عَجِيبٌ ٢
२. तथापि त्यांना आश्चर्य वाटले की त्यांच्याजवळ त्यांच्यामधूनच एक खबरदार करणारा आला, तेव्हा काफिर म्हणाले, ही एक विचित्र गोष्ट आहे
50:3
أَءِذَا مِتۡنَا وَكُنَّا تُرَابًاۖ ذَٰلِكَ رَجۡعُۢ بَعِيدٌ ٣
३. काय जेव्हा आम्ही मेल्यावर माती होऊन जाऊ, मग हे परतणे दूरची गोष्ट आहे
50:4
قَدۡ عَلِمۡنَا مَا تَنقُصُ ٱلۡأَرۡضُ مِنۡهُمۡۖ وَعِندَنَا كِتَٰبٌ حَفِيظُۢ ٤
४. जमीन जे काही त्यांच्यातून घटविते, ते आम्ही जाणतो आणि आमच्याजवळ सर्व स्मरणात राखणारा ग्रंथ आहे
50:5
بَلۡ كَذَّبُواْ بِٱلۡحَقِّ لَمَّا جَآءَهُمۡ فَهُمۡ فِيٓ أَمۡرٍ مَّرِيجٍ ٥
५. तथापि त्यांनी सत्य गोष्टीला खोटे म्हटले, जेव्हा ती त्यांच्याजवळ पोहचली, तेव्हा ते गोंधळात पडले आहेत
50:6
أَفَلَمۡ يَنظُرُوٓاْ إِلَى ٱلسَّمَآءِ فَوۡقَهُمۡ كَيۡفَ بَنَيۡنَٰهَا وَزَيَّنَّٰهَا وَمَا لَهَا مِن فُرُوجٍ ٦
६. काय त्यांनी आकाशाला आपल्यावर (असलेले) पाहिले नाही की आम्ही ते कशा प्रकारे बनविले आहे आणि त्याला सुशोभित केले आहे? त्यात कोठेही फट (किंवा छिद्र) नाही
50:7
وَٱلۡأَرۡضَ مَدَدۡنَٰهَا وَأَلۡقَيۡنَا فِيهَا رَوَٰسِيَ وَأَنۢبَتۡنَا فِيهَا مِن كُلِّ زَوۡجِۭ بَهِيجٍ ٧
७. आणि जमिनीला आम्ही बिछविले आहे आणि तिच्यावर आम्ही पर्वत रोवले आणि तिच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर वस्तू उगविल्या
50:8
تَبۡصِرَةً وَذِكۡرَىٰ لِكُلِّ عَبۡدٍ مُّنِيبٍ ٨
८. यासाठी की प्रत्येक (अल्लाहकडे) परतणाऱ्या दासाकरिता पाहण्याचे व समजण्याचे साधन व्हावे
50:9
وَنَزَّلۡنَا مِنَ ٱلسَّمَآءِ مَآءً مُّبَٰرَكًا فَأَنۢبَتۡنَا بِهِۦ جَنَّٰتٍ وَحَبَّ ٱلۡحَصِيدِ ٩
९. आणि आम्ही आकाशातून शुभ पाण्याचा वर्षाव केला आणि त्याद्वारे बागा आणि कापणी केल्या जाणाऱ्या शेताचे अन्न-धान्य निर्माण केले
50:10
وَٱلنَّخۡلَ بَاسِقَٰتٍ لَّهَا طَلۡعٌ نَّضِيدٌ ١٠
१०. आणि खजुरींचे उंच उंच वृक्ष, ज्यांचे गुच्छे एकावर एक आहेत
50:11
رِّزۡقًا لِّلۡعِبَادِۖ وَأَحۡيَيۡنَا بِهِۦ بَلۡدَةً مَّيۡتًاۚ كَذَٰلِكَ ٱلۡخُرُوجُ ١١
११. दासांच्या आजिविकेकरिता आणि आम्ही पाण्याद्वारे मृत शहराला जिवंत केले. अशाच प्रकारे (कबरींमधून) निघायचे आहे
50:12
كَذَّبَتۡ قَبۡلَهُمۡ قَوۡمُ نُوحٍ وَأَصۡحَٰبُ ٱلرَّسِّ وَثَمُودُ ١٢
१२. त्यांच्यापूर्वी नूहच्या जनसमूहाने आणि रस्सच्या निवासींनी आणि समूदच्या लोकांनी खोटे ठरविले होते
50:14
وَأَصۡحَٰبُ ٱلۡأَيۡكَةِ وَقَوۡمُ تُبَّعٍۚ كُلٌّ كَذَّبَ ٱلرُّسُلَ فَحَقَّ وَعِيدِ ١٤
१४. आणि आयकावाल्यांनी आणि तुब्बअच्या जनसमूहाने (देखील खोटे ठरविले होते) सर्वांनी पैगंबरांना खोटे ठरविले, तेव्हा माझा शिक्षेचा वायदा त्यांच्याकरिता खरा ठरला
50:15
أَفَعَيِينَا بِٱلۡخَلۡقِ ٱلۡأَوَّلِۚ بَلۡ هُمۡ فِي لَبۡسٍ مِّنۡ خَلۡقٍ جَدِيدٍ ١٥
१५. काय आम्ही पहिल्यांदा निर्माण केल्याने थकलो? किंबहुना हे लोक नव्या जीवनाच्या संदर्भात संशयग्रस्त आहेत
العربيةEnglishBahasa IndonesiaTürkçeРусскийفارسیFrançaisاردوবাংলাDeutschEspañol中文हिन्दीPortuguêsItalianoภาษาไทยPolskiNederlandsShqipKiswahiliO'zbekதமிழ்MelayuBosanskiSoomaaliAzərbaycanکوردی한국어日本語SvenskaDanskNorskپښتوമലയാളംසිංහලTamazightHausaአማርኛБългарскиТоҷикӣҚазақшаFilipinoسنڌيYorùbáFulfuldeТатарчаئۇيغۇرچەКыргызчаਪੰਜਾਬੀJawaతెలుగుမြန်မာગુજરાતીOromoमराठीTiếng ViệtMalagasyНохчийнWolofދިވެހިಕನ್ನಡУкраїнськаΕλληνικάქართულიខ្មែរدریQafar afMaranaoनेपाली
पवित्र कुराण
Sunday, August 30, 2026
Don't forget us in your sincere prayers







