सूरा अल-अहजाब
PDF —
73 आयत Medinan PDF
Built right in your browser — download starts automatically

सूरा अल-अहजाब pdf — डाउनलोड करा (मराठी)

सूरा अल-अहजाब pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-अहजाब भाषांतर. अल-अहजाब (Medinan) 73 आयत.

← अस-सजदाअल-अहजाब सबा →


सूरा अल-अहजाब
73 आयत · Medinan · मराठी
bismillah
ﭑﭒﭓﭔﭕﭖﭗﭘﭙﭚﭛﭜﭝﭞﭟ
१. हे पैगंबर! अल्लाहचे भय बाळगून राहा आणि काफिर आणि मुनाफिक (दांभिक ईमानधारक) लोकांचे म्हणणे मानू नका. अल्लाह मोठा ज्ञान बाळगणारा, मोठा बुद्धिकौशल्य बाळगणारा आहे
ﭠﭡﭢﭣﭤﭥﭦﭧﭨﭩﭪﭫﭬﭭ
२. आणि जे काही तुमच्याकडे, तुमच्या पालनकर्त्यातर्फे वहयी (प्रकाशना) केली जाते, तिचे अनुसरण करा (विश्वास करा), कारण अल्लाह तुमच्या प्रत्येक कर्माशी परिचित आहे
ﭮﭯﭰﭱﭲﭳﭴﭵ
३. आणि तुम्ही अल्लाहवरच भरवसा राखा, अल्लाह काम बनविण्याकरिता पुरेसा आहे
ﭶﭷﭸﭹﭺﭻﭼﭽﭾﭿﮀﮁﮂﮃﮄﮅﮆﮇﮈﮉﮊﮋﮌﮍﮎﮏﮐﮑﮒﮓﮔﮕﮖ
४. कोणत्याही माणसाच्या छातीत अल्लाहने दोन हृदय ठेवली नाहीत. आणि आपल्या ज्या पत्न्यांना तुम्ही माता म्हणून संबोधून बसता, त्यांना अल्लाहने तुमच्या (खऱ्याखुऱ्या) माता बनविले नाही आणि ना तुमच्या दत्तक घेतलेल्या बालकांना (वस्तुतः) तुमचे पुत्र बनविले आहे. या तर तुमच्या तोंडच्या गोष्टी आहेत. अल्लाह सत्य गोष्टी सांगतो आणि तोच सरळ मार्ग दाखवितो
ﮗﮘﮙﮚﮛﮜﮝﮞﮟﮠﮡﮢﮣﮤﮥﮦﮧﮨﮩﮪﮫﮬﮭﮮﮯﮰﮱﯓﯔﯕﯖﯗ
५. दत्तक घेतलेल्या मुलांना त्यांच्या (खऱ्या) पित्यांच्या संबंधाने हाक मारा. अल्लाहजवळ पूर्ण न्याय हाच आहे. मग जर तुम्हाला त्यांचे (खरे) पिता माहीत नसतील तर ते तुमचे धर्म-बांधव आणि मित्र आहेत.१ तुमच्याकडून भूलचूक म्हणून काही घडल्यास त्याबाबत तुमच्यावर कसलाही गुन्हा नाही, परंतु गुन्हा तो आहे, ज्याचा तुम्ही इरादा कराल आणि इरादा मनापासून कराल. अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे
ﯘﯙﯚﯛﯜﯝﯞﯟﯠﯡﯢﯣﯤﯥﯦﯧﯨﯩﯪﯫﯬﯭﯮﯯﯰﯱﯲﯳﯴﯵﯶﯷﯸ
६. पैगंबर, ईमान राखणाऱ्यांवर स्वतः त्यांच्यापेक्षाही अधिक हक्क राखणारे आहेत आणि पैगंबराच्या पत्न्या ईमानधारकांच्या माता आहेत आणि नातेवाईक, अल्लाहच्या ग्रंथाच्या आधारावर इतर ईमानधारक आणि स्वदेशत्याग केलेल्यांच्या तुलनेत जास्त हक्कदार आहेत. (तथापि) तुम्हाला आपल्या मित्रांशी सद्‌व्यवहार करण्याची अनुमती आहे. हा आदेश ‘सुरिक्षत ग्रंथा’ (लौहे महफूज) मध्ये लिहिलेला आहे
ﭑﭒﭓﭔﭕﭖﭗﭘﭙﭚﭛﭜﭝﭞﭟﭠﭡﭢﭣ
७. आणि जेव्हा आम्ही समस्त पैगंबरांकडून वचन घेतले (विशेषतः) तुमच्याकडून आणि नूहकडून आणि इब्राहीमकडून आणि मूसाकडून आणि मरियमचे पुत्र ईसाकडून आणि आम्ही त्या सर्वांकडून पक्के वचन घेतले होते
ﭤﭥﭦﭧﭨﭩﭪﭫﭬﭭ
८. यासाठी की अल्लाहने सच्चा लोकांना त्यांच्या सच्चेपणाविषयी विचारणा करावी आणि न मानणाऱ्यांकरिता आम्ही दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातना) तयार करून ठेवला आहे
ﭮﭯﭰﭱﭲﭳﭴﭵﭶﭷﭸﭹﭺﭻﭼﭽﭾﭿﮀﮁﮂﮃﮄ
९. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहने जो उपकार तुमच्यावर केला आहे, त्याचे स्मरण करा जेव्हा तुमचा सामना करण्याकरिता सैन्यांवर सैन्ये आली मग आम्ही त्यांच्यावर वेगवान वादळ आणि असे सैन्य पाठविले, जे तुम्ही पाहिलेच नाही आणि तुम्ही जे काही करता अल्लाह ते सर्व पाहतो
ﮅﮆﮇﮈﮉﮊﮋﮌﮍﮎﮏﮐﮑﮒﮓﮔﮕ
१०. जेव्हा (शत्रू) तुमच्या वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने चालून आले आणि जेव्हा डोळे निश्चल झाले आणि काळीज तोंडाशी आले, आणि तुम्ही अल्लाहविषयी विभिन्न विचार करू लागले
ﮖﮗﮘﮙﮚﮛﮜ
११. इथेच ईमान राखणाऱ्यांची कसोटी घेतली गेली आणि पूर्णतः ते हलवून सोडले गेले
ﮝﮞﮟﮠﮡﮢﮣﮤﮥﮦﮧﮨﮩﮪ
१२. आणि त्या वेळी दांभिक (मुनाफिक) आणि मनात रोग बाळगणारे म्हणू लागले की अल्लाह आणि त्याच्या पैगंबराने आमच्याशी केवळ धोक्याचेच वायदे केले होते
ﮫﮬﮭﮮﮯﮰﮱﯓﯔﯕﯖﯗﯘﯙﯚﯛﯜﯝﯞﯟﯠﯡﯢﯣﯤﯥﯦﯧ
१३. आणि त्यांच्याच एका गटाने पुकारुन म्हटले, हे यासरिबच्या लोकानो! तुमच्या थांबण्याचे हे स्थान नाही, परत निघा आणि त्यांचा एक दुसरा गट, पैगंबराजवळ ही अनुमती मागू लागला की आमची घरे खाली (उघडी) आणि असुरक्षित आहेत. वास्तविक ती (उघडी) असुरक्षित नव्हती, (परंतु) त्यांनी पळ काढण्याचा पक्का इरादा केला होता
ﯨﯩﯪﯫﯬﯭﯮﯯﯰﯱﯲﯳﯴﯵﯶ
१४. आणि जर मदीनेच्या चोहीबाजूंनी त्यांच्यावर (सैन्ये) दाखल केली गेली असती, मग त्यांच्याशी उत्पात (फसाद) ची मागणी केली गेली असती, तर त्यांनी उत्पात अवश्य माजविला असता. आणि काही लढलेही असते पण थोडेसे
ﯷﯸﯹﯺﯻﯼﯽﯾﯿﰀﰁﰂﰃﰄﰅ
१५. आणि याच्यापूर्वी तर त्यांनी अल्लाहशी वायदा केला होता की पाठ फिरविणार नाही आणि अल्लाहशी केल्या गेलेल्या वायद्याची विचारपूस निश्चितच होईल
ﭑﭒﭓﭔﭕﭖﭗﭘﭙﭚﭛﭜﭝﭞﭟﭠ
१६. त्यांना सांगा, जर तुम्ही मृत्युच्या किंवा हत्येच्या भयाने पळ काढाल तर हे पळ काढणे तुमच्या काहीच उपयोगी पडणार नाही आणि त्या वेळी तुम्ही फार कमी लाभान्वित केले जाल
ﭡﭢﭣﭤﭥﭦﭧﭨﭩﭪﭫﭬﭭﭮﭯﭰﭱﭲﭳﭴﭵﭶﭷﭸﭹﭺ
१७. त्यांना विचारा की जर अल्लाह तुम्हाला काही हानि पोहचवू इच्छिल किंवा तुमच्यावर एखादी दया कृपा करू इच्छिल तर असा कोण आहे जो तुम्हाला वाचवू शकेल (किंवा तुमच्यापासून रोखू शकेल) (अल्लाहच्या विरोधात) आपल्याकरिता, अल्लाहखेरीज त्यांना ना कोणी मित्र आढळून येईल ना कोणी सहाय्यक
ﭻﭼﭽﭾﭿﮀﮁﮂﮃﮄﮅﮆﮇﮈﮉﮊﮋ
१८. अल्लाह तुमच्यापैकी त्यांना (चांगल्या प्रकारे) जाणतो, जे दुसऱ्यांना रोखतात आणि आपल्या बांधवांना सांगतात की आमच्याजवळ या आणि कधीतरी युद्धात सहभाग घेतात
ﮌﮍﮎﮏﮐﮑﮒﮓﮔﮕﮖﮗﮘﮙﮚﮛﮜﮝﮞﮟﮠﮡﮢﮣﮤﮥﮦﮧﮨﮩﮪﮫﮬﮭﮮﮯﮰﮱﯓﯔ
१९. तुमची मदत करण्यात (पूर्णपणे) कंजूस आहेत, मग जेव्हा भय - दहशतीचा प्रसंग येतो तेव्हा तुम्ही त्यांना पाहाल की ते तुमच्याकडे दृष्टी केंद्रित करतात आणि त्यांचे डोळे अशा प्रकारे गरगरा फिरू लागतात, त्या माणसासारखे, ज्याच्यावर मृत्युची मुर्छा आलेली असावी, मग जेव्हा भीती नाहीशी होते, तेव्हा तुमच्याशी आपल्या तीक्ष्ण जीभेने मोठमोठ्या गोष्टी बोलू लागतात. धनाचे मोठे लोभी आहेत. या लोकांनी ईमान राखलेच नाही. अल्लाहने त्यांची सर्व कर्मे वाया घालविली आहेत आणि असे करणे अल्लाहकरिता फार सोपे आहे
ﯕﯖﯗﯘﯙﯚﯛﯜﯝﯞﯟﯠﯡﯢﯣﯤﯥﯦﯧﯨﯩﯪﯫﯬﯭﯮ
२०. हे लोक समजतात की सैन्ये अद्याप गेली नाहीत आणि जर सैन्ये परत आली तर हे अशी इच्छा बाळगतात की ते वनात राहणाऱ्यांमध्ये वनवासी लोकांसोबत असते तर बरे झाले असते यासाठी की तुमची खबर बात घेत राहिले असते. जर ते तुमच्यात हजर असते (तरीदेखील?) उगाच बोलण्याचा मान राखण्यासाठी थोडेसे लढले असते
ﯯﯰﯱﯲﯳﯴﯵﯶﯷﯸﯹﯺﯻﯼﯽﯾﯿﰀ
२१. निःसंशय, तुमच्यासाठी अल्लाहच्या पैगंबरामध्ये उत्तम नमुना आहे१ त्या प्रत्येक माणसाकरिता जो अल्लाहची आणि कयामतच्या दिवसाची आशा बाळगतो आणि अल्लाहचे अत्याधिक स्मरण करतो
ﰁﰂﰃﰄﰅﰆﰇﰈﰉﰊﰋﰌﰍﰎﰏﰐﰑﰒﰓﰔ
२२. आणि जेव्हा ईमानधारकांनी (काफिरांची) सैन्ये पाहिली, तेव्हा (अचानक) उद्‌गारले की याचाच वायदा आम्हाला अल्लाहने आणि त्याच्या पैगंबराने दिला होता आणि अल्लाह आणि त्याचे पैगंबर सच्चे आहेत आणि त्या (गोष्टी) ने त्यांच्या ईमानात आणि आज्ञापालनात आणखी जास्त वाढ केली
ﭑﭒﭓﭔﭕﭖﭗﭘﭙﭚﭛﭜﭝﭞﭟﭠﭡﭢﭣﭤﭥ
२३. ईमान राखणाऱ्यांमध्ये (असे) लोकही आहेत, ज्यांनी अल्लाहशी जो वायदा केला होता तो खरा करून दाखविला.१ काहींनी तर आपला वायदा पूर्ण केला आणि काही (संधीची) प्रतीक्षा करीत आहेत. आणि त्यांनी कसलाही बदल केला नाही
ﭦﭧﭨﭩﭪﭫﭬﭭﭮﭯﭰﭱﭲﭳﭴﭵﭶﭷ
२४. यासाठी की अल्लाहने सच्चा लोकांना त्यांच्या खरेपणाचा मोबदला प्रदान करावा आणि इच्छिल्यास मुनाफिक (दांभिक) लोकांना शिक्षा-यातना द्यावी किंवा त्यांचीही क्षमा- याचना कबूल करावी. अल्लाह मोठा क्षमाशील आणि मोठा दयावान आहे
ﭸﭹﭺﭻﭼﭽﭾﭿﮀﮁﮂﮃﮄﮅﮆﮇﮈﮉﮊ
२५. आणि अल्लाहने काफिरांना क्रोधाने भारावलेल्या अवस्थेतच (असफल) परतविले, ज्यामुळे त्यांची कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही आणि त्या युद्धात अल्लाह स्वतःच ईमान राखणाऱ्यांसाठी पुरेसा ठरला. अल्लाह मोठा शक्तिशाली आणि वर्चस्वशाली आहे
ﮋﮌﮍﮎﮏﮐﮑﮒﮓﮔﮕﮖﮗﮘﮙﮚﮛ
२६. आणि ज्या ग्रंथधारकांनी, त्यांच्याशी लागेबांधे जुळवून घेतले होते त्यांनाही अल्लाहने त्यांच्या किल्ल्यांमधून बाहेर काढले आणि त्यांच्या मनात असा धाक बसविला की तुम्ही एका समूहास ठार करीत राहिले आणि एका समूहाला कैदी बनवित राहिले
ﮜﮝﮞﮟﮠﮡﮢﮣﮤﮥﮦﮧﮨﮩﮪ
२७. आणि त्याने तुम्हाला त्यांच्या जमिनीचे आणि त्याच्या घरांचे आणि धन-संपत्तीचे मालक बनविले आणि त्या जमिनीचेही जिच्यावर तुम्ही अद्याप पाऊलही ठेवले नाही. अल्लाह सर्व काही करण्याचे सामर्थ्य राखतो
ﮫﮬﮭﮮﮯﮰﮱﯓﯔﯕﯖﯗﯘﯙﯚﯛ
२८. हे पैगंबर! आपल्या पत्नींना सांगा की ऐहिक जीवनाची आणि ऐहिक शोभा सजावटीची इच्छा बाळगत असाल तर या मी तुम्हाला काही देऊन सवरून चांगल्या रितीने सोडून द्यावे
ﯜﯝﯞﯟﯠﯡﯢﯣﯤﯥﯦﯧﯨﯩﯪ
२९. आणि जर तुमची इच्छा अल्लाह आणि त्याचा रसूल (पैगंबर) आणि आखिरतचे घर आहे तर (विश्वास ठेवा की) तुमच्यापैकी सत्कर्म करणारींकरिता अल्लाहने फार चांगला मोबदला तयार करून ठेवला आहे
ﯫﯬﯭﯮﯯﯰﯱﯲﯳﯴﯵﯶﯷﯸﯹﯺﯻﯼ
३०. हे पैगंबरांच्या पत्नींनो! तुमच्यापैकी जी (पत्नी) देखील उघडपणे निर्लज्जतेचे कृत्य करील तर तिला दुप्पट अज़ाब दिला जाईल. अल्लाहकरिता ही फार सोपी गोष्ट आहे
ﭑﭒﭓﭔﭕﭖﭗﭘﭙﭚﭛﭜﭝﭞﭟﭠ
३१. आणि तुमच्यापैकी जो कोणी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचे आज्ञापालन करील आणि सत्कर्म करील तर आम्ही तिला दुप्पट मोबदला प्रदान करू आणि तिच्यासाठी आम्ही अति उत्तम आजिविका तयार करून ठेवली आहे
ﭡﭢﭣﭤﭥﭦﭧﭨﭩﭪﭫﭬﭭﭮﭯﭰﭱﭲﭳﭴﭵ
३२. हे पैगंबरांच्या पत्नींनो! तुम्ही सर्वसाधारण स्त्रियांसारख्या नाहीत. जर तुम्ही अल्लाहचे भय राखणाऱ्या असाल तर कोमल स्वरात बोलत जाऊ नका की (ज्यामुळे) ज्याच्या मनात रोग असेल त्याने एखादा वाईट इरादा करावा, तथापि नियमाला अनुसरून बोलत राहा
ﭶﭷﭸﭹﭺﭻﭼﭽﭾﭿﮀﮁﮂﮃﮄﮅﮆﮇﮈﮉﮊﮋﮌﮍﮎﮏﮐﮑ
३३. आणि आपल्या घरांमध्ये स्थैर्यपूर्वक राहा, आणि पूर्वीच्या अज्ञानकाळाप्रमाणे आपल्या शृंगारा (सौंदर्या) चे प्रदर्शन करू नका आणि नमाज नियिमतपणे अदा करीत राहा आणि जकात (धर्मदान) देत राहा, आणि अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या आदेशाचे पालन करा. अल्लाह हेच इच्छितो की हे पैगंबरांच्या पत्नींनो! तुमच्यापासून त्याने प्रत्येक (प्रकारची) अपवित्रता दूर करावी, आणि तुम्हाला खूप पवित्र करावे
ﮒﮓﮔﮕﮖﮗﮘﮙﮚﮛﮜﮝﮞﮟﮠﮡ
३४. आणि तुमच्या घरांमध्ये अल्लाहच्या ज्या आयती आणि पैगंबरांची वचने (हदीस) वाचली जातात, त्या स्मरणात असू द्या. निःसंशय अल्लाह मोठा सूक्ष्मदर्शी, माहितगार आहे
ﮢﮣﮤﮥﮦﮧﮨﮩﮪﮫﮬﮭﮮﮯﮰﮱﯓﯔﯕﯖﯗﯘﯙﯚﯛﯜﯝﯞﯟﯠﯡ
३५. निःसंशय, मुस्लिम पुरुष आणि मुस्लिम स्त्रिया, ईमान राखणारे पुरुष आणि ईमान राखणाऱ्या स्त्रिया, आज्ञापालन करणारे पुरुष आणि आज्ञापालन करणाऱ्या स्त्रिया, सत्यवचनी पुरुष आणि सत्यवचनी स्त्रिया, सहनशीलता राखणारे पुरुष आणि सहनशीलता राखणाऱ्या स्त्रिया (अल्लाहला) विनंती करणारे पुरुष आणि विनंती करणाऱ्या स्त्रिया, दान (सदका) करणारे पुरुष आणि दान करणाऱ्या स्त्रिया, रोजा (उपवास-व्रत) करणारे पुरुष आणि रोजा राखणाऱ्या स्त्रिया, आपल्या लज्जास्थाना (गुप्तांगा) चे रक्षण करणारे पुरुष आणि आपल्या लज्जास्थानाचे रक्षण करणाऱ्या स्त्रिया, अल्लाहचे अत्याधिक स्मरण करणारे पुरुष आणि अत्याधिक स्मरण करणाऱ्या स्त्रिया, या सर्वांसाठी अल्लाहने मोठी क्षमा आणि महान मोबदला तयार करून ठेवला आहे
ﭑﭒﭓﭔﭕﭖﭗﭘﭙﭚﭛﭜﭝﭞﭟﭠﭡﭢﭣﭤﭥﭦﭧﭨﭩﭪ
३६. आणि (लक्षात ठेवा) कोणत्याही ईमान राखणाऱ्या पुरुषाला आणि स्त्रीला, अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या फैसल्यानंतर आपल्या एखाद्या गोष्टीचा कसलाही अधिकार बाकी राहत नाही (लक्षात ठेवा) अल्लाह आणि त्याच्या पैगंबराची जो कोणी अवज्ञा करील, तो उघड मार्गभ्रष्टतेत जाऊन पडेल
ﭫﭬﭭﭮﭯﭰﭱﭲﭳﭴﭵﭶﭷﭸﭹﭺﭻﭼﭽﭾﭿﮀﮁﮂﮃﮄﮅﮆﮇﮈﮉﮊﮋﮌﮍﮎﮏﮐﮑﮒﮓﮔﮕﮖﮗﮘﮙﮚﮛﮜﮝ
३७. आणि (स्मरण करा) जेव्हा तुम्ही त्या माणसाला सांगत होते , ज्यावर अल्लाहने अनुग्रह केला आणि तु्‌म्ही देखील की आपल्या पत्नीला आपल्या जवळ ठेवा, आणि अल्लाहचे भय बाळगा आणि तुम्ही आपल्या मनात ही गोष्ट लपवून ठेवली होती जिला अल्लाह उघड करणार होता, आणि तुम्ही लोकांचे भय बाळगत होता, वास्तिवक अल्लाह या गोष्टीचा अधिक हक्क राखत होता की तुम्ही त्याचे भय बाळगावे, मग जेव्हा जैदने त्या स्त्रीकडून आपली गरज पूर्ण करून घेतली, तेव्हा तिला आम्ही तुमच्या विवाहात दिले. यासाठी की ईमान राखणाऱ्या लोकांना, त्यांच्या दत्तक पुत्रांच्या पत्नींबाबत कसल्याही प्रकारचा संकोच राहू नये, जेव्हा ते त्यांच्याकडून आपली गरज पूर्ण करून घेतील, अल्लाहचा हा आदेश कार्यान्वित होणारच होता
ﮞﮟﮠﮡﮢﮣﮤﮥﮦﮧﮨﮩﮪﮫﮬﮭﮮﮯﮰﮱﯓﯔﯕﯖﯗ
३८. ज्या गोष्टी अल्लाहने आपल्या पैगंबराकरिता उचित (मान्य) केल्या आहेत, त्यांच्या बाबतीत पैगंबरावर काही हरकत नाही. अल्लाहचा हाच नियम त्यां (पैगंबरां) च्याबाबतही राहिला जे पूर्वी होऊन गेले आणि अल्लाहची कामे अनुमानाने निर्धारित केलेले असतात
ﯘﯙﯚﯛﯜﯝﯞﯟﯠﯡﯢﯣﯤﯥﯦ
३९. ते सर्व असे होते की अल्लाहचे आदेश पोहचवित नसत आणि अल्लाहचेच भय बाळगत आणि अल्लाहखेरीज कोणाचेही भय बाळगत नस, आणि अल्लाह हिशोब घेण्यासाठी पुरेसा आहे
ﯧﯨﯩﯪﯫﯬﯭﯮﯯﯰﯱﯲﯳﯴﯵﯶﯷﯸﯹ
४०. लोकांनो! तुमच्या पुरुषांपैकी मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) कोणाचेही पिता नाहीत, तथापि ते अल्लाहचे रसूल (पैगंबर) आहेत आणि समस्त पैगंबरांमध्ये अंतिम पैगंबर आहेत,१ आणि अल्लाह प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे जाणणारा आहे
ﯺﯻﯼﯽﯾﯿﰀﰁ
४१. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहचे अत्याधिक स्मरण करा
ﰂﰃﰄﰅ
४२. आणि सकाळ संध्याकाळ त्याची पवित्रता वर्णन करीत राहा
ﰆﰇﰈﰉﰊﰋﰌﰍﰎﰏﰐﰑﰒﰓﰔ
४३. तोच आहे, जो तुमच्यावर आपली दया - कृपा पाठवितो आणि त्याचे फरिश्ते (तुमच्यासाठी दया याचनेची प्रार्थना करतात) यासाठी की त्याने तुम्हाला अंधारातून काढून प्रकाशाकडे न्यावे, आणि अल्लाह ईमान राखणाऱ्यांवर मोठा दया करणारा आहे
ﭑﭒﭓﭔﭕﭖﭗﭘﭙﭚ
४४. ज्या दिवशी हे अल्लाहला भेटतील, त्यांचे स्वागत सलामद्वारे होईल, त्यांच्यासाठी अल्लाहने मान-सन्मानपूर्ण मोबदला तयार करून ठेवला आहे
ﭛﭜﭝﭞﭟﭠﭡﭢ
४५. हे पैगंबर! निःसंशय, आम्हीच तुम्हाला (रसूल) साक्षी, खूशखबर देणारा आणि खबरदार करणारा बनवून पाठविले आहे
ﭣﭤﭥﭦﭧﭨﭩ
४६. आणि अल्लाहच्या आदेशाने त्याच्याकडे बोलविणारा आणि उज्ज्वल (प्रकाशमान) दीप बनवून
ﭪﭫﭬﭭﭮﭯﭰﭱﭲ
४७. आणि तुम्ही ईमान राखणाऱ्या लोकांना ही शुभवार्ता ऐकवा की त्यांच्याकरिता अल्लाहकडून फार मोठा अनुग्रह आहे
ﭳﭴﭵﭶﭷﭸﭹﭺﭻﭼﭽﭾﭿﮀ
४८. आणि काफिरांचे व ढोंगी मुसलमानांचे म्हणणे मानू नका, आणि जे दुःख (त्यांच्याकडून) पोहोचेल त्याची चिंता करू नका. अल्लाहवर भरवसा राखा, अल्लाह काम बनविण्यासाठी पुरेसा आहे
ﮁﮂﮃﮄﮅﮆﮇﮈﮉﮊﮋﮌﮍﮎﮏﮐﮑﮒﮓﮔﮕﮖﮗﮘ
४९. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्ही ईमान राखणाऱ्या स्त्रियांशी विवाह कराल, मग त्यांना हात लावण्यापूर्वी तलाक (घटस्फोट) द्याल, तर त्यांच्यावर तुमचा कसलाही (अधिकार) इद्दत (तलाकनंतर निर्धारित वेळेपर्यंतची प्रतिबंधित मुदती) चा नाही, जिची तुम्ही गणना करावी.१ तेव्हा तुम्ही त्यांना काही न काही द्या आणि भल्या रितीने त्यांना निरोप द्या
ﮙﮚﮛﮜﮝﮞﮟﮠﮡﮢﮣﮤﮥﮦﮧﮨﮩﮪﮫﮬﮭﮮﮯﮰﮱﯓﯔﯕﯖﯗﯘﯙﯚﯛﯜﯝﯞﯟﯠﯡﯢﯣﯤﯥﯦﯧﯨﯩﯪﯫﯬﯭﯮﯯﯰﯱﯲﯳﯴﯵﯶﯷﯸﯹ
५०. हे पैगंबर (स.)! आम्ही तुमच्यासाठी तुमच्या त्या पत्न्या हलाल (वैध) केल्या आहेत, ज्यांना तुम्ही त्यांचे महर (स्त्रीधन) देऊन टाकले आहे आणि त्या दासी देखील, ज्यांना अल्लाहने युद्धात तुम्हाला प्रदान केल्या आहेत आणि तुमच्या काकाच्या कन्या, आत्याच्या कन्या, तुमच्या मामाच्या कन्या आणि तुमच्या मावशीच्या कन्या देखील, ज्यांनी तुमच्यासोबत हिजरत (स्वदेशत्याग) केली आहे आणि ती ईमानधारक स्त्री जी स्वतःला पैगंबरांना दान करील, हे त्या स्थितीत की स्वतः जर पैगंबरही तिच्याशी विवाह करू इच्छितील. हे विशेषतः तुमच्यासाठीच आहे आणि इतर ईमानधारकांसाठी नाही. आम्ही त्याला चांगल्या प्रकारे जाणतो जे आम्ही त्यांच्यावर त्यांच्या पत्न्या आणि दासींविषयी (चे आदेश) निर्धारित केले आहेत. हे यासाठी की तुमच्यावर एखादी अडचण उद्‌भवू नये. अल्लाह मोठा माफ करणारा आणि मोठा दया करणारा आहे
ﭑﭒﭓﭔﭕﭖﭗﭘﭙﭚﭛﭜﭝﭞﭟﭠﭡﭢﭣﭤﭥﭦﭧﭨﭩﭪﭫﭬﭭﭮﭯﭰﭱﭲﭳﭴﭵﭶﭷﭸﭹ
५१. त्यांच्यापैकी जिला तुम्ही इच्छित असाल दूर राखा आणि जिला इच्छित असाल आपल्या जवळ ठेवा आणि जर तुम्ही त्यांच्यापैकी एखादीला आपल्या जवळ बोलावून घ्याल, ज्यांना तुम्ही वेगळे करून ठेवले होते, तर यात तुम्हाला काही हरकत नाही. याद्वारे या गोष्टीची अधिक आशा बाळगली जाऊ शकते की या (स्त्रियां) चे नेत्र शितल राहावेत आणि त्या दुःखी न व्हाव्यात आणि तुम्ही जे काही त्यांना द्याल त्यावर त्या सर्व राजी खुशी राहतील. तुमच्या मनात जे काही आहे ते अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो. अल्लाह मोठा ज्ञान बाळगणारा सहनशील आहे
ﭺﭻﭼﭽﭾﭿﮀﮁﮂﮃﮄﮅﮆﮇﮈﮉﮊﮋﮌﮍﮎﮏﮐﮑﮒﮓﮔ
५२. यानंतर इतर स्त्रिया तुमच्याकरिता हलाल (वैध) नाहीत आणि ना हे (उचित आहे) की त्यांना सोडून दुसऱ्या स्त्रियांशी (विवाह करावा) जरी त्यांचे रूप (सौंदर्य) कितीही चांगले वाटत असेल. परंतु तुमच्या दासीखेरीज, अल्लाह प्रत्येक गोष्टीवर देखरेख करणारा आहे
ﮕﮖﮗﮘﮙﮚﮛﮜﮝﮞﮟﮠﮡﮢﮣﮤﮥﮦﮧﮨﮩﮪﮫﮬﮭﮮﮯﮰﮱﯓﯔﯕﯖﯗﯘﯙﯚﯛﯜﯝﯞﯟﯠﯡﯢﯣﯤﯥﯦﯧﯨﯩﯪﯫﯬﯭﯮﯯﯰﯱﯲﯳﯴﯵﯶﯷﯸﯹﯺﯻﯼﯽﯾﯿﰀﰁ
५३. हे ईमान राखणाऱ्या लोकांनो! जोपर्यंत तुम्हाला (आत येण्याची) अनुमती दिली जात नाही, तोपर्यंत तुम्ही पैगंबराच्या घरात प्रवेश करू नका. भोजनाकरिता अशा वेळी की भोजन तयार होण्याची प्रतीक्षा करीत राहावे, किंबहुना जेव्हा बोलाविले जाईल, तेव्हा जा आणि जेव्हा भोजन करू घ्याल तेव्हा निघण्याची तयारी करा. तिथेच (बसून) गप्पा गोष्टीत मग्न होऊ नका. पैगंबराना तुमच्या या कामाचा त्रास होतो, परंतु ते तुमचा आदर (संकोच) करतात, आणि अल्लाह सत्य गोष्ट सांगण्यात कोणाचीही पर्वा करीत नाही, आणि जेव्हा तुम्ही पैगंबराच्या पत्नींकडून एखादी वस्तू मागाल तर पडद्याआडून मागा. तुमच्या आणि त्यांच्या हृदयांकरिता पुर्ण पवित्रता हीच आहे. तुमच्यासाठी हे योग्य नव्हे की तुम्ही अल्लाहच्या पैगंबरास त्रास द्यावा आणि ना तुमच्यासाठी हे उचित आहे की पैगंबर (स.) यांच्यानंतर त्यांच्या पत्नींशी विवाह करावा (लक्षात ठेवा) अल्लाहजवळ हे महाभयंकर (पाप) आहे
ﰂﰃﰄﰅﰆﰇﰈﰉﰊﰋﰌﰍ
५४. तुम्ही एखादी गोष्ट जाहीर करा किंवा लपवून ठेवा, अल्लाह प्रत्येक गोष्टीचे चांगल्या प्रकारे ज्ञान राखणारा आहे
ﭑﭒﭓﭔﭕﭖﭗﭘﭙﭚﭛﭜﭝﭞﭟﭠﭡﭢﭣﭤﭥﭦﭧﭨﭩﭪﭫﭬﭭﭮﭯﭰﭱ
५५. त्या स्त्रियांवर कसलाही गुन्हा नाही त्या आपल्या पित्यांच्या, आपल्या पुत्रांच्या आणि भावांच्या, आपल्या पुतण्यांच्या, भाच्यांच्या आणि आपल्या (परिचित) स्त्रियांच्या आणि ज्यांच्या त्या मालक आहेत त्यां (दास दासीं) च्या समोर असाव्यात.१ स्त्रियांनो! अल्लाहचे भय बाळगत राहा, अल्लाह निःसंशय, प्रत्येक गोष्टीवर साक्षी आहे
ﭲﭳﭴﭵﭶﭷﭸﭹﭺﭻﭼﭽﭾﭿﮀ
५६. अल्लाह आणि त्याचे फरिश्ते या पैगंबरावर दरुद पाठवितात. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही (देखील) यांच्यावर दरुद पाठवा आणि जास्त सलाम (ही) पाठवत राहा. १
ﮁﮂﮃﮄﮅﮆﮇﮈﮉﮊﮋﮌﮍﮎﮏ
५७. जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबराला दुःख- त्रास देतात, त्यांच्यावर या जगात व आखिरतमध्ये अल्लाहतर्फे धिःक्कार आहे आणि त्यांच्यासाठी मोठा अपमानित करणारा अज़ाब (शिक्षा-यातना) आहे
ﮐﮑﮒﮓﮔﮕﮖﮗﮘﮙﮚﮛﮜ
५८. आणि जे लोक ईमान राखणाऱ्या पुरुष व स्त्रियांना अशा एखाद्या अपराधाबद्दल दुःख - त्रास देतात, जो त्यांच्याकडून घडला नसेल तर ते फार मोठा आरोप आणि खुल्या अपराधाचे ओझे उचलतात
ﮝﮞﮟﮠﮡﮢﮣﮤﮥﮦﮧﮨﮩﮪﮫﮬﮭﮮﮯﮰﮱﯓﯔﯕ
५९. हे पैगंबर! आपल्या पत्नींना आणि आपल्या कन्यांना आणि ईमान राखणाऱ्यांच्या स्त्रियांना सांगा की त्यांनी आपल्या अंगावर आपल्या चादरी टाकून घेत जावे. अशाने त्या त्वरित ओळखल्या जातील, मग त्यांना त्रास पोहचविला जाणार नाही, आणि अल्लाह मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे
ﯖﯗﯘﯙﯚﯛﯜﯝﯞﯟﯠﯡﯢﯣﯤﯥﯦﯧﯨﯩﯪ
६०. जर (अजूनही) हे मुनाफिक (ईमानधारक असल्याचे ढोंग करणारे) आणि ते, ज्यांच्या मनात रोग आहे आणि मदीनाचे ते रहिवाशी जे खोट्या अफवा उडवितात, थांबले नाहीत तर आम्ही तुम्हाला त्यांच्या (नाशा) वर लावून देऊ, मग तर ते काही दिवसच तुमच्यासोबत या (शहरा) त राहू शकतील
ﯫﯬﯭﯮﯯﯰﯱﯲ
६१. त्यांच्यावर धिःक्काराचा वर्षाव केला गेला, ज्या ज्या ठिकाणी सापडावेत, धरले जावेत आणि खूप तुकडे तुकडे केले जावेत
ﯳﯴﯵﯶﯷﯸﯹﯺﯻﯼﯽﯾﯿﰀ
६२. त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांसाठीही अल्लाहचा हाच नियम लागू राहिला आणि तुम्हाला अल्लाहच्या विधी-नियमात केव्हाही बदल आढळणार नाही
ﭑﭒﭓﭔﭕﭖﭗﭘﭙﭚﭛﭜﭝﭞﭟﭠﭡﭢ
६३. लोक तुम्हाला कयामत (च्या वेळे) विषयी विचारतात. (तुम्ही) सांगा, याचे ज्ञान तर केवळ अल्लाहलाच आहे, तुम्हाला काय माहीत, फार संभव आहे की कयामत अगदी जवळ येऊन ठेपली असेल
ﭣﭤﭥﭦﭧﭨﭩﭪ
६४. अल्लाहने काफिरांचा धिःक्कार केलेला आहे आणि त्यांच्यासाठी धगधगणारी आग तयार करून ठेवली आहे
ﭫﭬﭭﭮﭯﭰﭱﭲﭳﭴ
६५. जिच्यात ते सदैवकाळ राहतील, त्यांना ना कोणी पाठीराखा मित्र लाभेल आणि ना कोणी मदत करणारा
ﭵﭶﭷﭸﭹﭺﭻﭼﭽﭾﭿﮀ
६६. त्या दिवशी त्यांचे चेहरे आगीत उलट पालट केले जातील (ते मोठ्या पश्चात्तापाने आणि दुःखाने) म्हणतील की आम्ही अल्लाहचे आणि पैगंबरांचे आज्ञापालन केले असते तर बरे झाले असते
ﮁﮂﮃﮄﮅﮆﮇﮈﮉ
६७. आणि ते म्हणतील, हे आमच्या पालनकर्त्या! आम्ही आपल्या प्रमुखांचे आणि थोरा-मोठ्यांचे म्हणणे ऐकले (मानले) ज्यांनी आम्हाला सरळ मार्गापासून विचलित केले
ﮊﮋﮌﮍﮎﮏﮐﮑﮒ
६८. हे आमच्या पालनकर्त्या! तू त्यांना दुप्पट अज़ाब (शिक्षा-यातना) दे आणि त्यांच्यावर फार मोठा धिःक्कार (लानत) पाठव
ﮓﮔﮕﮖﮗﮘﮙﮚﮛﮜﮝﮞﮟﮠﮡﮢﮣﮤ
६९. हे ईमान राखणाऱ्यांनो! त्या लोकांसारखे होऊ नका, ज्यांनी मूसाला क्लेश - यातना दिली, तर जी गोष्ट त्यांनी सांगितली होती अल्लाहने त्यांना त्या गोष्टीपासून मुक्त केले आणि अल्लाहजवळ मूसा प्रतिष्ठित होते
ﮥﮦﮧﮨﮩﮪﮫﮬﮭ
७०. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहचे भय राखा आणि सरळ सरळ (सत्य) गोष्टी बोलत जा
ﮮﮯﮰﮱﯓﯔﯕﯖﯗﯘﯙﯚﯛﯜﯝﯞ
७१. यासाठी की अल्लाहने तुमच्या आचरणात सुधारणा करावी आणि तुमचे अपराध माफ करावेत आणि जो मनुष्य देखील अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या आदेशाचे पालन करील, त्याने फार मोठी सफलता प्राप्त करून घेतली
ﯟﯠﯡﯢﯣﯤﯥﯦﯧﯨﯩﯪﯫﯬﯭﯮﯯﯰﯱﯲ
७२. आम्ही आपल्या अमानतीला आकाशांच्या आणि जमिनीच्या आणि पर्वतांच्या समोर सादर केले (परंतु) सर्वांनी ती उचलण्याबाबत इन्कार केला आणि तिच्यापासून भयभित झाले (तथापि) मानवाने तिला उचलून घेतले, निःसंशय तो मोठा अत्याचारी आणि अडाणी आहे
ﯳﯴﯵﯶﯷﯸﯹﯺﯻﯼﯽﯾﯿﰀﰁﰂﰃ
७३. (हे अशासाठी) की अल्लाहने मुनाफिक पुरुष आणि मुनाफिक स्त्रिया आणि अनेकेश्वरवादी पुरुष आणि अनेकेश्वरवादी स्त्रियांना सजा द्यावी आणि ईमान राखणाऱ्या पुरुषांची आणि ईमान राखणाऱ्या स्त्रियांची तौबा (क्षमा-याचना) कबूल करावी, आणि अल्लाह मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे

पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers