सूरा अल-आला pdf — डाउनलोड करा (मराठी)
सूरा अल-आला pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-आला भाषांतर. सूरा अल-आला (Meccan) 19 आयत.
Related
- सूरा अल-आला भाषांतरमराठी
- सूरा अल-आला mp3ऐका
- Quran Index मराठी114
More सूरा PDF
सूरा अल-आला

ﮟﮠﮡﮢﮣ
87:1
१. आपल्या अति उच्च पालनकर्त्याच्या नावाची पवित्रता वर्णन करा
ﮤﮥﮦﮧ
87:2
२. ज्याने निर्माण केले आणि सही सलामत बनविले
ﮨﮩﮪﮫ
87:3
३. आणि ज्याने (यथायोग्य) अनुमान केले आणि मग मार्गदर्शन केले
ﮬﮭﮮﮯ
87:4
४. आणि ज्याने ताजे गवत उगविले
ﮰﮱﯓﯔ
87:5
५. मग त्याने ते (सुकवून) काळा केर - कचरा करून टाकले
ﯕﯖﯗﯘ
87:6
६. आम्ही तुम्हाला शिकवू, मग तुम्ही विसरणार नाही
ﯙﯚﯛﯜﯝﯞﯟﯠﯡﯢﯣ
87:7
७. परंतु जे काही अल्लाह इच्छिल. निःसंशय, तो उघड आणि लपलेले सर्व काही जाणतो
ﯤﯥﯦ
87:8
८. आणि आम्ही तुमच्यासाठी सहजता निर्माण करू
ﯧﯨﯩﯪﯫ
87:9
९. तेव्हा तुम्ही उपदेश करीत राहा जर उपदेश काही लाभ देईल
ﯬﯭﯮﯯ
87:10
१०. (अल्लाहचे) भय बाळगणारा तर बोध ग्रहण करील
ﭑﭒﭓ
87:11
११. तथापि दुर्दैवी, यापासून दूर पळेल
ﭔﭕﭖﭗﭘ
87:12
१२. जो मोठ्या भयंकर आगीत दाखल होईल
ﭙﭚﭛﭜﭝﭞﭟ
87:13
१३. जिथे मग तो ना मरेल, ना जगेल, (किंबहुना मरणासन्न स्थितीतच पडून राहील)
ﭠﭡﭢﭣﭤ
87:14
१४. निःसंशय, त्याने सफलता प्राप्त केली, जो स्वच्छ शुद्ध झाला
ﭥﭦﭧﭨﭩ
87:15
१५. आणि ज्याने आपल्या पालनकर्त्याचे नाम स्मरणात ठेवले, आणि नमाज पढत राहिला
ﭪﭫﭬﭭﭮ
87:16
१६. परंतु तुम्ही तर ऐहिक जीवनालाच प्राधान्य देता
ﭯﭰﭱﭲ
87:17
१७. आणि आखिरत (मरणोत्तर जीवन) अतिशय उत्तम निरंतर टिकून राहणारी आहे
ﭳﭴﭵﭶﭷﭸ
87:18
१८. या गोष्टीचे वर्णन पूर्वी (अवतरित झालेल्या) ग्रंथातही आहे
ﭹﭺﭻﭼ
87:19
१९. (अर्थात) इब्राहीम आणि मूसा यांच्या ग्रंथात
पवित्र कुराण
Wednesday, September 9, 2026
Don't forget us in your sincere prayers







