PDF —
26 आयत Meccan PDF
Built right in your browser — download starts automatically

सूरा अल-गाशिया pdf — डाउनलोड करा (मराठी)

सूरा अल-गाशिया pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-गाशिया भाषांतर. सूरा अल-गाशिया (Meccan) 26 आयत.

← अल-आलासूरा अल-गाशिया अल-फज्र →


26 आयत · Meccan · मराठी
bismillah
ﭽﭾﭿﮀﮁ
88:1 १. काय तुम्हालाही, झाकून टाकणाऱ्या (कयामत) ची वार्ता पोहचली आहे
ﮂﮃﮄﮅ
88:2 २. त्या दिवशी बहुतेक चेहरे अपमानित असतील
ﮆﮇﮈ
88:3 ३. (आणि) दुःखांनी पीडित कष्ट - यातनाग्रस्त असतील
ﮉﮊﮋﮌ
88:4 ४. ते धगधगत्या आगीत जाऊन पडतील
ﮍﮎﮏﮐﮑ
88:5 ५. आणि अतिशय उष्ण झऱ्याचे पाणी त्यांना पाजले जाईल
ﮒﮓﮔﮕﮖﮗﮘ
88:6 ६. त्यांच्यासाठी काटेदार झाडांखेरीज आणखी काही खायला नसेल
ﮙﮚﮛﮜﮝﮞﮟ
88:7 ७. जे ना त्यांना धष्ट पुष्ट करील, ना त्यांची भूक मिटवील
ﮠﮡﮢﮣ
88:8 ८. बहुतेक चेहरे त्या दिवशी प्रफुल्ल टवटवीत आणि (सुसंपन्न स्थितीत) असतील
ﮤﮥﮦ
88:9 ९. आपल्या कर्मांमुळे आनंदित असतील
ﮧﮨﮩﮪ
88:10 १०. उच्च (प्रतीच्या) जन्नतींमध्ये असतील
ﮫﮬﮭﮮﮯ
88:11 ११. जिथे कोणतीही असभ्य निरर्थक गोष्ट ऐकणार नाहीत
ﮰﮱﯓﯔ
88:12 १२. जिथे (शीतल) झरे वाहत असतील
ﯕﯖﯗﯘ
88:13 १३. (आणि) त्या (जन्नतीं) मध्ये उंच उंच आसने असतील
ﯙﯚﯛ
88:14 १४. आणि प्याले ठेवलेले (असतील)
ﯜﯝﯞ
88:15 १५. आणि एका रांगेत लावलेले तक्के असतील
ﯟﯠﯡ
88:16 १६. आणि मऊ मखमली गालिचे पसरलेले असतील
ﯢﯣﯤﯥﯦﯧﯨ
88:17 १७. काय हे उंटाकडे नाही पाहत की त्यांना कशा प्रकारे निर्माण केले गेले आहे
ﯩﯪﯫﯬﯭ
88:18 १८. आणि आकाशांना की कशा प्रकारे उंच केले गेले आहे
ﯮﯯﯰﯱﯲ
88:19 १९. आणि पर्वतांकडे, की कशा प्रकारे गाडले गेले आहेत
ﯳﯴﯵﯶﯷ
88:20 २०. आणि जमिनीकडे की कशा प्रकारे ती बिछविली गेली आहे
ﯸﯹﯺﯻﯼ
88:21 २१. तर तुम्ही उपदेश करीत राहा (कारण) तुम्ही फक्त उपदेश करणारे आहात
ﯽﯾﯿﰀ
88:22 २२. तुम्ही काही यांच्यावर देखरेख ठेवणारे नाहीत
ﭑﭒﭓﭔﭕ
88:23 २३. परंतु जो मनुष्य तोंड फिरवील आणि इन्कार करील
ﭖﭗﭘﭙﭚ
88:24 २४. त्याला सर्वश्रेष्ठ अल्लाह फार मोठा अज़ाब (शिक्षा - यातना) देईल
ﭛﭜﭝﭞ
88:25 २५. निःसंशय, त्यांना तर आमच्याचकडे परतायचे आहे
ﭟﭠﭡﭢﭣ
88:26 २६. निःसंशय, त्यांचा हिशोब घेण्याची जबाबदारी आमची आहे

पवित्र कुराण


Wednesday, September 9, 2026

Don't forget us in your sincere prayers