PDF —
59 आयत Meccan PDF
Built right in your browser — download starts automatically

सूरा अद-दुखान pdf — डाउनलोड करा (मराठी)

सूरा अद-दुखान pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अद-दुखान भाषांतर. सूरा अद-दुखान (Meccan) 59 आयत.



59 आयत · Meccan · मराठी
bismillah
ﭑﭒ
44:1 १. हा. मीम
ﭓﭔﭕ
44:2 २. शपथ आहे या स्पष्ट ग्रंथाची
ﭖﭗﭘﭙﭚﭛﭜﭝﭞﭟ
44:3 ३. निःसंशय, आम्ही या ग्रंथाला एका शुभरात्रीत१ अवतरित केले आहे. निःसंशय, आम्ही अवगत करून देणारे आहोत
ﭠﭡﭢﭣﭤﭥ
44:4 ४. त्याच रात्रीत प्रत्येक महत्त्वपूर्ण कार्याचा निर्णय घेतला जातो
ﭦﭧﭨﭩﭪﭫﭬﭭ
44:5 ५. आमच्याकडून एक फर्मान बनून आम्हीच आहोत रसूल (संदेशवाहक) बनवून पाठविणारे
ﭮﭯﭰﭱﭲﭳﭴﭵﭶ
44:6 ६. तुमच्या पालनकर्त्याच्या कृपेने, तोच आहे ऐकणारा आणि जाणणारा
ﭷﭸﭹﭺﭻﭼﭽﭾﭿﮀ
44:7 ७. जो आकाशांचा आणि धरतीचा आणि त्यांच्या दरम्यान जे काही आहे त्या सर्वांचा स्वामी आहे, जर तुम्ही विश्वास राखणारे असाल
ﮁﮂﮃﮄﮅﮆﮇﮈﮉﮊﮋﮌ
44:8 ८. त्याच्याशिवाय दुसरा कोणीही उपासना करण्यास पात्र नाही. तोच जिवंत करतो आणि मारतो. तोच तुमचा आणि तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या पूर्वजांचा स्वामी व पालनकर्ता आहे
ﮍﮎﮏﮐﮑﮒ
44:9 ९. किंबहुना ते संशयात पडून खेळत आहेत
ﮓﮔﮕﮖﮗﮘﮙ
44:10 १०. तुम्ही त्या दिवसाच्या प्रतीक्षेत राहा, जेव्हा आकाश उघड स्वरूपाचा धूर आणील
ﮚﮛﮜﮝﮞﮟﮠ
44:11 ११. जो लोकांना घेरा टाकील. ही मोठी दुःखदायक शिक्षा - यातना आहे
ﮡﮢﮣﮤﮥﮦﮧ
44:12 १२. (म्हणतील की) हे आमच्या पालनकर्त्या! हा अज़ाब (शिक्षा - यातना) आमच्यापासून दूर कर, आम्ही ईमान स्वीकारले
ﮨﮩﮪﮫﮬﮭﮮﮯ
44:13 १३. त्यांच्यासाठी आता उपदेश कोठे आहे? स्पष्टरित्या निवेदन करणारे पैगंबर त्यांच्याजवळ (केव्हाच) येऊन गेलेत
ﮰﮱﯓﯔﯕﯖﯗ
44:14 १४. तरीही त्यांनी त्यांच्याकडून तोंड फिरविले आणि सांगितले की हा तर शिकविलेला वेडा आहे
ﯘﯙﯚﯛﯜﯝﯞﯟ
44:15 १५. आम्ही शिक्षा - यातनेला थोडेसे दूरही करू तरी तुम्ही परत पुन्हा आपल्या त्याच अवस्थेत याल
ﯠﯡﯢﯣﯤﯥﯦ
44:16 १६. ज्या दिवशी आम्ही मोठ्या सक्त पकडीत धरू, निश्चितच आम्ही प्रतिशोध (सूड) घेणार आहोत
ﯧﯨﯩﯪﯫﯬﯭﯮﯯﯰ
44:17 १७. आणि निःसंशय, आम्ही यापूर्वी फिरऔनच्या जनसमूहाची (ही) परीक्षा घेतली आहे ज्यांच्याजवळ (अल्लाहचा) प्रतिष्ठासंपन्न रसूल (पैगंबर) आला
ﯱﯲﯳﯴﯵﯶﯷﯸﯹﯺﯻ
44:18 १८. की अल्लाहच्या दासांना माझ्या हवाली करा, विश्वास राखा की मी तुमच्यासाठी विश्वस्त पैगंबर आहे
ﭑﭒﭓﭔﭕﭖﭗﭘﭙﭚﭛ
44:19 १९. आणि तुम्ही अल्लाहसमोर विद्रोह दाखवू नका. मी तुमच्यासमोर उघड पुरावा प्रस्तुत करेन
ﭜﭝﭞﭟﭠﭡﭢ
44:20 २०. आणि मी, आपल्या व तुमच्या पालनकर्त्याच्या शरणात येतो. या गोष्टीपासून की तुम्ही मला दगडांनी ठेचून मारावे
ﭣﭤﭥﭦﭧﭨ
44:21 २१. आणि जर तुम्ही माझ्यावर ईमान राखत नसाल तर माझ्यापासून अलग राहा
ﭩﭪﭫﭬﭭﭮﭯ
44:22 २२. मग त्यांनी आपल्या पालनकर्त्याला दुआ-प्रार्थना केली की हे सर्व अपराधी लोक आहेत
ﭰﭱﭲﭳﭴﭵ
44:23 २३. (आम्ही फर्माविले) की रात्रीतूनच तुम्ही माझ्या दासांना घेऊन निघा. निश्चितच तुमचा पाठलाग केला जाईल
ﭶﭷﭸﭹﭺﭻﭼﭽ
44:24 २४. आणि तुम्ही समुद्राला स्थिर अवस्थेत सोडून निघून जा. निःसंशय, हे सैन्य बुडविले जाईल
ﭾﭿﮀﮁﮂﮃ
44:25 २५. ते अनेक बागा आणि झरे सोडून गेले
ﮄﮅﮆﮇ
44:26 २६. आणि शेते व उत्तम निवासस्थाने
ﮈﮉﮊﮋﮌ
44:27 २७. आणि त्या सुखदायक वस्तू ज्यांच्यात ते सुख भोगत होते
ﮍﮎﮏﮐﮑﮒ
44:28 २८. अशा प्रकारे घडले, आणि आम्ही त्या सर्वांचा उत्तराधिकारी (वारस) दुसऱ्या जनसमूहाला बनविले
ﮓﮔﮕﮖﮗﮘﮙﮚﮛ
44:29 २९. तेव्हा त्यांच्यासाठी ना आकाश रडले ना धरती आणि ना त्यांना कसली संधी लाभली
ﮜﮝﮞﮟﮠﮡﮢﮣ
44:30 ३०. आणि आम्हीच इस्राईलच्या संततीला (अतिशय) अपमानदायक शिक्षा-यातनेपासून मुक्ती दिली
ﮤﮥﮦﮧﮨﮩﮪﮫﮬ
44:31 ३१. (जी) फिरऔनतर्फे (दिली जात) होती. वास्तविक तो विद्रोही आणि मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांपैकी होता
ﮭﮮﮯﮰﮱﯓﯔ
44:32 ३२. आणि आम्ही जाणूनबुजून इस्राईलच्या संततीला जगातील लोकांवर श्रेष्ठता प्रदान केली
ﯕﯖﯗﯘﯙﯚﯛﯜ
44:33 ३३. आणि आम्ही त्यांना अशा निशाण्या प्रदान केल्या, ज्यांच्यात उघड कसोटी होती
ﯝﯞﯟﯠ
44:34 ३४. हे लोक तर हेच म्हणतात
ﯡﯢﯣﯤﯥﯦﯧﯨﯩ
44:35 ३५. की (अंतिम गोष्ट) हेच आमचे पहिल्यांदा (जगात) मरण पावणे आहे आणि आम्ही दुसऱ्यांदा उठविलो जाणार नाहीत
ﯪﯫﯬﯭﯮﯯ
44:36 ३६. जर तुम्ही सच्चे असाल तर आमच्या पूर्वजांना घेऊन या
ﯰﯱﯲﯳﯴﯵﯶﯷﯸﯹﯺﯻﯼﯽ
44:37 ३७. काय हे लोक अधिक चांगले आहेत की तुब्बअ च्या जनसमूहाचे लोक आणि जे त्यांच्याही पूर्वीचे होते? आम्ही त्या सर्वांना नष्ट करून टाकले. निःसंशय, ते अपराधी होते
ﯾﯿﰀﰁﰂﰃﰄﰅ
44:38 ३८. आणि आम्ही आकाशांना व धरतीला आणि त्यांच्या दरम्यानच्या वस्तूंना खेळ स्वरूपात निर्माण केले नाही
ﰆﰇﰈﰉﰊﰋﰌﰍﰎ
44:39 ३९. किंबहुना आम्ही त्यांना उचित हेतुसहच निर्माण केले आहे. परंतु अधिकांश लोक हे जाणत नाहीत
ﭑﭒﭓﭔﭕﭖ
44:40 ४०. निःसंशय, निर्णयाचा दिवस त्या सर्वांसाठी निर्धारित वेळी आहे
ﭗﭘﭙﭚﭛﭜﭝﭞﭟﭠﭡ
44:41 ४१. त्या दिवशी कोणी मित्र कोणा मित्राच्या काहीच कामी येणार नाही आणि ना त्यांची मदत केली जाईल
ﭢﭣﭤﭥﭦﭧﭨﭩﭪ
44:42 ४२. परंतु (त्याच्याखेरीज) ज्याच्यावर अल्लाहची दया - कृपा व्हावी. निःसंशय, तो मोठा शक्तिशाली आणि दया करणारा आहे
ﭫﭬﭭﭮ
44:43 ४३. निःसंशय, जक्कूमचे झाड
ﭯﭰﭱ
44:44 ४४. गुन्हेगारांचे भोजन आहे
ﭲﭳﭴﭵﭶ
44:45 ४५. जे वितळलेल्या तांब्यासारखे आहे आणि पोटात उकळत राहते
ﭷﭸﭹ
44:46 ४६. खूप गरम उकळत्या पाण्यासारखे
ﭺﭻﭼﭽﭾﭿ
44:47 ४७. त्याला धरा, मग फरफटत ओढत नेऊन जहन्नमच्या मध्यभागी पोहचवा
ﮀﮁﮂﮃﮄﮅﮆﮇ
44:48 ४८. मग त्याच्या डोक्यावर गरम उकळत्या पाण्याची यातना (अज़ाब) ओता
ﮈﮉﮊﮋﮌﮍ
44:49 ४९. (त्याला सांगितले जाईल) चाखत जा (गोडी), तू तर मोठा प्रतिष्ठित आणि आदरसन्मान बाळगणारा होता
ﮎﮏﮐﮑﮒﮓﮔ
44:50 ५०. हीच ती गोष्ट होय, जिच्याबाबत तुम्ही शंका करीत असत
ﮕﮖﮗﮘﮙﮚ
44:51 ५१. निःसंशय, अल्लाहचे भय बाळगणारे शांतीपूर्ण ठिकाणी असतील
ﮛﮜﮝﮞ
44:52 ५२. बागांमध्ये आणि जलस्रोतां (झऱ्यां) मध्ये
ﮟﮠﮡﮢﮣﮤ
44:53 ५३. पातळ व मुलायम रेशमी वस्त्रे घातलेले, समोरासमोर बसले असतील
ﮥﮦﮧﮨﮩ
44:54 ५४. हे त्याच प्रकारे आहे, आणि आम्ही मोठया नेत्रांच्या हूर-परींशी त्यांचा विवाह करून देऊ
ﮪﮫﮬﮭﮮﮯ
44:55 ५५. निर्भयतापूर्वक तिथे प्रत्येक प्रकारच्या मेव्याची मागणी करतील
ﮰﮱﯓﯔﯕﯖﯗﯘﯙﯚﯛﯜ
44:56 ५६. तिथे ते मृत्युचा स्वाद चाखणार नाहीत, पहिल्या मृत्युखेरीज (जो जगात घडला) त्यांना अल्लाहने जहन्नमच्या (भयंकर) शिक्षा - यातने (अज़ाब) पासून वाचविले
ﯝﯞﯟﯠﯡﯢﯣﯤﯥ
44:57 ५७. ही केवळ तुमच्या पालनकर्त्याची कृपा आहे. हीच आहे मोठी सफलता
ﯦﯧﯨﯩﯪﯫ
44:58 ५८. आम्ही या (कुरआना) ला तुमच्या भाषेत सोपे केले, यासाठी की त्यांनी (लोकांनी) बोध ग्रहण करावा
ﯬﯭﯮﯯ
44:59 ५९. आता तुम्ही प्रतीक्षा करा, हे देखील प्रतीक्षा करीत आहेत

पवित्र कुराण


Wednesday, September 9, 2026

Don't forget us in your sincere prayers