PDF —
52 आयत Meccan PDF
Built right in your browser — download starts automatically

सूरा अल-हाक्का pdf — डाउनलोड करा (मराठी)

सूरा अल-हाक्का pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-हाक्का भाषांतर. सूरा अल-हाक्का (Meccan) 52 आयत.

← अल-कलमसूरा अल-हाक्का अल-मआरिज →


52 आयत · Meccan · मराठी
bismillah
ﮯﮰ
69:1 १. सिद्ध होणारी
ﮱﯓﯔ
69:2 २. काय आहे सिद्ध होणारी
ﯕﯖﯗﯘﯙ
69:3 ३. आणि तुम्हाला काय माहीत की ती सिद्ध होणारी काय आहे
ﯚﯛﯜﯝﯞ
69:4 ४. त्या खडकाविणारीला समूद आणि आदच्या लोकांनी खोटे ठरविले
ﯟﯠﯡﯢﯣ
69:5 ५. (परिणामी) समूद तर अतिशय तीव्र (आणि भयंकर जोराच्या) चित्काराद्वारे नष्ट केले गेले
ﯤﯥﯦﯧﯨﯩﯪ
69:6 ६. आणि आद, मोठ्या वेगाच्या पालापाचोळा असलेल्या वादळाद्वारे नष्ट केले गेले
ﯫﯬﯭﯮﯯﯰﯱﯲﯳﯴﯵﯶﯷﯸﯹﯺﯻ
69:7 ७. ज्यास (अल्लाहने) त्यांच्यावर सतत सात रात्री आणि आठ दिवसपर्यंत लावून ठेवले. तेव्हा तुम्ही पाहिले असते की लोक जमिनीवर अशा प्रकारे चीत केले गेले आहेत जणू खजुरीची पोकळ खोडे
ﯼﯽﯾﯿﰀﰁ
69:8 ८. तर काय त्यांच्यापैकी कोणीही तुम्हाला बाकी दिसून येत आहे
ﭑﭒﭓﭔﭕﭖﭗ
69:9 ९. फिरऔन आणि त्याच्या पूर्वीचे लोक आणि ज्यांच्या वस्त्या पालथ्या घातल्या गेल्या, त्यांनीही अपराध केले
ﭘﭙﭚﭛﭜﭝﭞ
69:10 १०. आणि आपल्या पालनकर्त्याच्या रसूल (पैगंबरा) ची अवज्ञा केली (शेवटी) अल्लाहने त्यांना (ही) पकडीत घेतले
ﭟﭠﭡﭢﭣﭤﭥﭦ
69:11 ११. जेव्हा पाण्यात पूर आला तर त्या वेळी आम्ही तुम्हाला नौकेत चढविले
ﭧﭨﭩﭪﭫﭬﭭ
69:12 १२. यासाठी की त्यास तुमच्यासाठी बोध उपदेश (आणि स्मारक) बनवावे, आणि (यासाठी की) स्मरण राखणाऱ्या कानांनी त्यास स्मरणात राखावे
ﭮﭯﭰﭱﭲﭳﭴ
69:13 १३. तर जेव्हा सूर (शंखा) मध्ये एक फुंक मारली जाईल
ﭵﭶﭷﭸﭹﭺﭻ
69:14 १४. आणि धरती व पर्वत उचलून घेतले जातील आणि एकाच प्रहारात कण-कण (चुरेचूर) बनविले जातील
ﭼﭽﭾﭿ
69:15 १५. त्या दिवशी घडून येणारी घटना (कयामत) घडून येईल
ﮀﮁﮂﮃﮄﮅ
69:16 १६. आणि आकाश विदीर्ण होईल तर त्या दिवशी फार कमजोर होईल
ﮆﮇﮈﮉﮊﮋﮌﮍﮎﮏﮐ
69:17 १७. आणि त्याच्या किनाऱ्यांवर फरिश्ते असतील आणि तुमच्या पालनकर्त्याचे आसन (अर्श) त्या दिवशी आठ फरिश्ते आपल्यावर उचलून घेतलेले असतील
ﮑﮒﮓﮔﮕﮖﮗ
69:18 १८. त्या दिवशी तुम्ही सर्व हजर केले जाल, तुमचे कोणतेही रहस्य लपून राहणार नाही
ﮘﮙﮚﮛﮜﮝﮞﮟﮠﮡ
69:19 १९. तेव्हा त्याचे कर्मपत्र त्याच्या उजव्या हातात दिले जाईल, तेव्हा तो म्हणू लागेल की घ्या, माझे कर्मपत्र वाचा
ﮢﮣﮤﮥﮦﮧ
69:20 २०. मला तर पूर्ण विश्वास होता की मी आपला (कर्मांचा) हिशोब प्राप्त करणारा आहे
ﮨﮩﮪﮫﮬ
69:21 २१. तर तो एका सुख-संपन्न जीवनात असेल
ﮭﮮﮯﮰ
69:22 २२. उच्च (आणि सुंदर) जन्नतमध्ये
ﮱﯓﯔ
69:23 २३. जिची फळे खाली झुकलेली असतील
ﯕﯖﯗﯘﯙﯚﯛﯜﯝ
69:24 २४. (त्यांना सांगितले जाईल) की मजेने खा व प्या, आपल्या त्या कर्मांच्या मोबदल्यात जी तुम्ही मागच्या काळात केलीत
ﯞﯟﯠﯡﯢﯣﯤﯥﯦﯧﯨ
69:25 २५. परंतु ज्याला त्याचे कर्मपत्र डाव्या हातात दिले जाईल, तर तो म्हणेल की अरेरे! मला माझे कर्मपत्र दिले गेले नसते
ﯩﯪﯫﯬﯭ
69:26 २६. आणि मी जाणतच नाही की हिशोब काय आहे
ﯮﯯﯰﯱ
69:27 २७. मृत्युनेच माझे काम संपविले असते तर (बरे झाले असते)
ﯲﯳﯴﯵﯶﯷ
69:28 २८. माझ्या धनानेही मला काही लाभ पोहचविला नाही
ﯸﯹﯺﯻ
69:29 २९. माझे राज्यही माझ्यापासून दुरावले
ﯼﯽﯾ
69:30 ३०. (आदेश होईल) धरा त्याला, मग त्याच्या गळ्यात जोखंड (तौक) टाका
ﯿﰀﰁﰂ
69:31 ३१. मग त्याला जहन्नममध्ये टाका
ﰃﰄﰅﰆﰇﰈﰉﰊ
69:32 ३२. मग त्याला अशा साखळीत की जिचे माप सत्तर हाताचे आहे, जखडून टाका
ﰋﰌﰍﰎﰏﰐﰑ
69:33 ३३. निःसंशय, हा महान अल्लाहवर ईमान राखत नव्हता
ﰒﰓﰔﰕﰖﰗ
69:34 ३४. आणि गरीबाला जेवू घालण्यावर प्रोत्साहित करीत नव्हता
ﰘﰙﰚﰛﰜﰝ
69:35 ३५. तर आज इथे त्याचा ना कोणी मित्र आहे
ﭑﭒﭓﭔﭕﭖ
69:36 ३६. आणि ना पू खेरीज त्याचे एखादे भोजन आहे
ﭗﭘﭙﭚﭛ
69:37 ३७. ज्यास अपराधी लोकांशिवाय कोणीही खाणार नाही
ﭜﭝﭞﭟﭠ
69:38 ३८. तेव्हा मला शपथ आहे त्या वस्तूंची, ज्यांना तुम्ही पाहता
ﭡﭢﭣﭤ
69:39 ३९. आणि त्या वस्तूंची, ज्यांना तुम्ही पाहत नाही
ﭥﭦﭧﭨﭩ
69:40 ४०. की निःसंशय, हा (कुरआन) प्रतिष्ठित पैगंबराचे कथन आहे.१
ﭪﭫﭬﭭﭮﭯﭰﭱﭲ
69:41 ४१. ही एखाद्या कवीची कल्पना नव्हे (अरेरे!) तुम्ही फार कमी विश्वास राखता
ﭳﭴﭵﭶﭷﭸﭹﭺ
69:42 ४२. आणि ना एखाद्या ज्योतिषीचे कथन आहे. (खेद आहे) तुम्ही फार कमी बोध ग्रहण करता
ﭻﭼﭽﭾﭿ
69:43 ४३. (हे तर) समस्त विश्वांच्या पालनकर्त्याने अवतरित केले आहे
ﮀﮁﮂﮃﮄﮅ
69:44 ४४. आणि जर याने एखादी गोष्ट (मनाने) रचून, तिचा संबंध आमच्याशी जोडला असता
ﮆﮇﮈﮉ
69:45 ४५. तर आम्ही त्याचा उजवा हात अवश्य धरला असता
ﮊﮋﮌﮍﮎ
69:46 ४६. मग त्याच्या हृदयाची शीर (नस) कापून टाकली असती
ﮏﮐﮑﮒﮓﮔﮕ
69:47 ४७. मग तुमच्यापैकी कोणीही (मला) तसे करण्यापासून रोखणारा नसता
ﮖﮗﮘﮙ
69:48 ४८. निःसंशय, हा (कुरआन) अल्लाहचे भय बाळगणाऱ्यांकरिता बोध - उपदेश आहे
ﮚﮛﮜﮝﮞﮟ
69:49 ४९. आणि आम्ही पूर्णतः जाणून आहोत की तुमच्यापैकी काहीजण याला खोटे ठरविणारे आहेत
ﮠﮡﮢﮣﮤ
69:50 ५०. निःसंशय, (हे खोटे ठरविणे) काफिरांकरिता पश्चात्तापकारक आहे
ﮥﮦﮧﮨ
69:51 ५१. आणि निःसंशय, हे अगदी खात्रीचे सत्य आहे
ﮩﮪﮫﮬﮭ
69:52 ५२. तेव्हा तुम्ही आपल्या महिमावान (महामहीम) पालनकर्त्याच्या पावित्र्याचे गुणगान करा

पवित्र कुराण


Wednesday, September 9, 2026

Don't forget us in your sincere prayers