सूरा अल-वाकिया pdf — डाउनलोड करा (मराठी)
सूरा अल-वाकिया pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-वाकिया भाषांतर. सूरा अल-वाकिया (Meccan) 96 आयत.
Related
More सूरा PDF
सूरा अल-वाकिया

ﮃﮄﮅﮆ
56:1
१. जेव्हा कयामत प्रस्थापित होईल
ﮇﮈﮉﮊ
56:2
२. जिचे घडून येण्यात काहीच असत्य नाही
ﮋﮌﮍ
56:3
३. ती वर-खाली करणारी असेल
ﮎﮏﮐﮑﮒ
56:4
४. जेव्हा जमीन भूकंपासह हालवून टाकली जाईल
ﮓﮔﮕﮖ
56:5
५. आणि पर्वत अगदी कण - कण केले जातील
ﮗﮘﮙﮚ
56:6
६. मग ते विखुरलेल्या धुळीसारखे होतील
ﮛﮜﮝﮞ
56:7
७. आणि तुम्ही तीन गटात विभागले जाल
ﮟﮠﮡﮢﮣﮤ
56:8
८. तेव्हा उजव्या हाताचे, किती चांगले आहेत उजव्या हाताचे
ﮥﮦﮧﮨﮩﮪ
56:9
९. आणि डाव्या हाताचे, काय अवस्था आहे डाव्या हाताच्या लोकांची
ﮫﮬﮭ
56:10
१०. आणि जे पुढे जाणारे आहेत, ते तर आहेतच पुढे जाणारे
ﮮﮯﮰ
56:11
११. ते अगदी सान्निध्य प्राप्त केलेले आहेत
ﮱﯓﯔﯕ
56:12
१२. सुख-विलासाच्या जन्नतींमध्ये आहेत
ﯖﯗﯘﯙ
56:13
१३. (फार मोठा) समूह तर पूर्वी होऊन गेलेल्यांपैकी असेल
ﯚﯛﯜﯝ
56:14
१४. आणि थोडेसे नंतरच्या लोकांपैकी
ﯞﯟﯠﯡ
56:15
१५. (हे लोक) सोन्याच्या तारांनी विणलेल्या आसनांवर
ﯢﯣﯤﯥ
56:16
१६. एकमेकांसमोर तक्के लावून बसले असतील
ﭑﭒﭓﭔﭕ
56:17
१७. त्यांच्याजवळ अशी मुले, जी नेहमी (मुलेच) राहतील, ये-जा करतील
ﭖﭗﭘﭙﭚﭛ
56:18
१८. प्याले आणि सुरई घेऊन आणि मद्याचा प्याला घेऊन, जो मद्याने भरून वाहत असेल
ﭜﭝﭞﭟﭠﭡ
56:19
१९. ज्यामुळे ना डोके गरगरु लागेल आणि ना बुद्धी भ्रष्ट होईल
ﭢﭣﭤﭥ
56:20
२०. आणि असे मेवे घेऊन, जे ते पसंत करतील
ﭦﭧﭨﭩﭪ
56:21
२१. आणि पक्ष्यांचे मांस, जे त्यांना (फार) आवडेल
ﭫﭬﭭ
56:22
२२. आणि मोठमोठ्या डोळ्यांच्या (मृगनयनी) हूर (पऱ्या)
ﭮﭯﭰﭱ
56:23
२३. ज्या लपलेल्या मोत्यांसारख्या आहेत
ﭲﭳﭴﭵﭶ
56:24
२४. हा मोबदला आहे त्याच्या कर्मांचा
ﭷﭸﭹﭺﭻﭼﭽ
56:25
२५. तिथे ना ते निरर्थक गोष्ट ऐकतील आणि ना अपराधाची गोष्ट
ﭾﭿﮀﮁﮂ
56:26
२६. केवळ सलामच सलाम (शांती सलामती) चा आवाज असेल
ﮃﮄﮅﮆﮇﮈ
56:27
२७. आणि उजव्या हाताचे किती चांगले आहेत उजव्या हाताचे
ﮉﮊﮋﮌ
56:28
२८. ती काटे नसलेली बोरे
ﮍﮎﮏ
56:29
२९. आणि थरांवर थर केळी
ﮐﮑﮒ
56:30
३०. आणि लांब लांब सावल्या
ﮓﮔﮕ
56:31
३१. आणि वाहते पाणी
ﮖﮗﮘ
56:32
३२. आणि खूप जास्त फळांमध्ये
ﮙﮚﮛﮜﮝ
56:33
३३. जे ना संपतील, ना रोखले जातील
ﮞﮟﮠ
56:34
३४. आणि उंच उंच बिछायतीवर असतील
ﮡﮢﮣﮤ
56:35
३५. आम्ही त्या (च्या पत्नीं) ना खास प्रकारे बनविले आहे
ﮥﮦﮧ
56:36
३६. आणि आम्ही त्यांना कुमारिका बनविले आहे
ﮨﮩﮪ
56:37
३७. प्रेम करणाऱ्या, समवयस्क आहेत
ﮫﮬﮭ
56:38
३८. उजव्या हाताच्या लोकांकरिता आहे
ﮮﮯﮰﮱ
56:39
३९. (फार) मोठा समूह आहे पूर्वीच्या लोकांपैकी
ﯓﯔﯕﯖ
56:40
४०. आणि (फार) मोठा समूह आहे नंतरच्या लोकांपैकी
ﯗﯘﯙﯚﯛﯜ
56:41
४१. आणि डाव्या हाताचे, कसे आहेत डाव्या हाताचे
ﯝﯞﯟﯠ
56:42
४२. उष्ण हवा आणि गरम (उकळत्या) पाण्यात असतील
ﯡﯢﯣﯤ
56:43
४३. आणि काळ्याकुट्ट धुराच्या सावलीत
ﯥﯦﯧﯨﯩ
56:44
४४. जी ना थंड आहेत ना सुखदायक
ﯪﯫﯬﯭﯮﯯ
56:45
४५. निःसंशय हे लोक यापूर्वी फार सुख-संपन्न अवस्थेत वाढले होते
ﯰﯱﯲﯳﯴﯵ
56:46
४६. आणि घोर अपराधांवर आग्रह करीत होते
ﯶﯷﯸﯹﯺﯻﯼﯽﯾﯿ
56:47
४७. आणि म्हणत की काय जेव्हा आम्ही मरण पावू आणि माती व हाडे होऊन जावू तर काय आम्ही दुसऱ्यांदा जिवंत करून उभे केले जावू
ﰀﰁﰂ
56:48
४८. आणि काय आमचे वाडवडील देखील
ﰃﰄﰅﰆﰇ
56:49
४९. (तुम्ही) सांगा की निःसंशय, सर्व पूर्वीचे आणि नंतरचे
ﰈﰉﰊﰋﰌﰍ
56:50
५०. एका निर्धारित दिवसाच्या वेळी अवश्य एकत्र केले जातील
ﭑﭒﭓﭔﭕﭖ
56:51
५१. मग तुम्ही हे मार्गभ्रष्ट झालेल्यांनो, खोटे ठरविणाऱ्यांनो
ﭗﭘﭙﭚﭛﭜ
56:52
५२. जक्कूमचे झाड जरूर खाल
ﭝﭞﭟﭠ
56:53
५३. आणि त्याच्यानेच पोट भराल
ﭡﭢﭣﭤﭥ
56:54
५४. मग त्यावर गरम उकळते पाणी प्याल
ﭦﭧﭨﭩ
56:55
५५. मग पिणारेही तहानलेल्या उंटांसारखे
ﭪﭫﭬﭭﭮ
56:56
५६. कयामतच्या दिवशी त्यांचा हाच पाहुणचार आहे
ﭯﭰﭱﭲﭳ
56:57
५७. आम्ही तुम्हा सर्वांना निर्माण केले, मग तुम्ही का नाही मानत
ﭴﭵﭶﭷ
56:58
५८. बरे हे तर सांगा की जे वीर्य तुम्ही टपकविता
ﭸﭹﭺﭻﭼﭽ
56:59
५९. काय त्यापासून (मानव) तुम्ही बनवितात की आम्ही निर्माण करतो
ﭾﭿﮀﮁﮂﮃﮄﮅ
56:60
६०. आम्हीच तुमच्या दरम्यान मृत्युला भाग्य (निश्चित) केले आहे, आणि आम्ही त्यापासून हरलेलो नाही
ﮆﮇﮈﮉﮊﮋﮌﮍﮎﮏ
56:61
६१. की तुमच्या जागी तुमच्यासारखे दुसरे निर्माण करावेत, आणि तुम्हाला नव्या रुपात (या जगात) निर्माण करावे, जे तुम्ही जाणत नाहीत
ﮐﮑﮒﮓﮔﮕﮖ
56:62
६२. आणि तुम्हाला पहिल्या निर्मितीचे ज्ञानही आहे, तरीही तुम्ही बोध का नाही प्राप्त करीत
ﮗﮘﮙﮚ
56:63
६३. बरे, मग हेही सांगा की तुम्ही जे काही पेरता
ﮛﮜﮝﮞﮟﮠ
56:64
६४. त्याला तुम्ही उगविता की आम्ही त्यास उगविणारे आहोत
ﮡﮢﮣﮤﮥﮦﮧ
56:65
६५. आम्ही इच्छिले तर त्याचा चुराडा (कण कण) करून टाकू आणि तुम्ही आश्चर्याने बोलतच राहावे
ﮨﮩﮪ
56:66
६६. की आमच्यावर तर भुर्दंड पडला
ﮫﮬﮭﮮ
56:67
६७. किंबहुना आम्ही तर पूर्णपणे वंचित राहिलो
ﮯﮰﮱﯓﯔ
56:68
६८. बरे तर हे सागा की जे पाणी तुम्ही पीता
ﯕﯖﯗﯘﯙﯚﯛﯜ
56:69
६९. त्यास ढगांमधून तुम्ही अवतरित केले आहे की आम्ही पाऊस पाडतो
ﯝﯞﯟﯠﯡﯢﯣ
56:70
७०. आम्ही इच्छिले तर त्या (पाण्या) स कडू (जहर) करून टाकू, मग तुम्ही आमच्याशी कृतज्ञता का नाही व्यक्त करीत
ﯤﯥﯦﯧﯨ
56:71
७१. बरे हेही सांगा की जी आग तुम्ही पेटविता
ﯩﯪﯫﯬﯭﯮﯯ
56:72
७२. तिचे झाड तुम्ही निर्माण केले आहे की आम्ही त्याचे निर्माणकर्ते आहोत
ﯰﯱﯲﯳﯴﯵ
56:73
७३. आम्ही तिला बोध प्राप्त करण्याचे साधन आणि प्रवाशांच्या फायद्याची गोष्ट बनविले आहे
ﯶﯷﯸﯹﯺ
56:74
७४. तेव्हा आपल्या महान पालनकर्त्याच्या नावाचे गुणगान करा
ﯻﯼﯽﯾﯿﰀ
56:75
७५. तर मी शपथ घेतो ताऱ्यांच्या कोसळण्याची
ﰁﰂﰃﰄﰅﰆ
56:76
७६. आणि जर तुम्हाला ज्ञान असेल तर ही फार मोठी शपथ आहे
ﭑﭒﭓﭔ
56:77
७७. की निःसंशय हा कुरआन मोठा प्रतिष्ठासंपन्न आहे
ﭕﭖﭗﭘ
56:78
७८. जो एका सुरक्षित ग्रंथात (लिहिलेला) आहे
ﭙﭚﭛﭜﭝ
56:79
७९. ज्याला केवळ स्वच्छ शुद्ध (पाक) लोकच स्पर्श करू शकतात
ﭞﭟﭠﭡﭢ
56:80
८०. हा सर्व विश्वांच्या पालनकर्त्यातर्फे अवतरित केला गेला आहे
ﭣﭤﭥﭦﭧ
56:81
८१. तर काय तुम्ही अशा गोष्टीला साधारण (आणि तुच्छ) समजता
ﭨﭩﭪﭫﭬ
56:82
८२. आणि आपल्या वाट्याला हेच घेता की यास खोटे ठरवित फिरावे
ﭭﭮﭯﭰﭱ
56:83
८३. तर जेव्हा (प्राण) कंठाशी येऊन पोहचावा
ﭲﭳﭴﭵ
56:84
८४. आणि तुम्ही त्या वेळी (डोळ्यांनी) पाहात राहावे
ﭶﭷﭸﭹﭺﭻﭼﭽ
56:85
८५. आणि आम्ही तुमच्या तुलनेत त्या माणसाच्या अधिक जवळ असतो, परंतु तुम्ही पाहू शकत नाही
ﭾﭿﮀﮁﮂﮃ
56:86
८६. तेव्हा जर तुम्ही एखाद्याच्या आज्ञेच्या अधीन नाहीत
ﮄﮅﮆﮇﮈ
56:87
८७. आणि त्या कथनात सच्चे असाल तर तो प्राण परतवून दाखवा
ﮉﮊﮋﮌﮍﮎ
56:88
८८. तर जो कोणी (अल्लाहच्या दरबारात) निकटतम असेल
ﮏﮐﮑﮒﮓ
56:89
८९. त्याच्यासाठी ऐषआराम आहे (उत्तम भोजन आहे आणि देणग्यांनी युक्त अशी जन्नत आहे)
ﮔﮕﮖﮗﮘﮙﮚ
56:90
९०. आणि जो मनुष्य उजव्या हाताच्या लोकांपैकी आहे
ﮛﮜﮝﮞﮟﮠ
56:91
९१. तरीही सलाम (शांती सलामती) आहे तुझ्यासाठी की तू उजव्या हाताच्या लोकांपैकी आहेस
ﮡﮢﮣﮤﮥﮦﮧ
56:92
९२. परंतु जर कोणी खोटे ठरविणाऱ्या मार्गभ्रष्ट लोकांपैकी आहे
ﮨﮩﮪﮫ
56:93
९३. तर उकळत्या पाण्याने त्याचा पाहुणचार आहे
ﮬﮭﮮ
56:94
९४. आणि जहन्नममध्ये जायचे आहे
ﮯﮰﮱﯓﯔﯕ
56:95
९५. ही (वार्ता) अगदी सत्य आणि निश्चित आहे
ﯖﯗﯘﯙﯚ
56:96
९६. तेव्हा तुम्ही आपल्या (अतिमहान) पालनकर्त्याच्या नावाचे पावित्र्य वर्णन करा
पवित्र कुराण
Wednesday, September 9, 2026
Don't forget us in your sincere prayers







