PDF —
25 आयत Meccan PDF
Built right in your browser — download starts automatically

सूरा अल-इनशिकाक pdf — डाउनलोड करा (मराठी)

सूरा अल-इनशिकाक pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-इनशिकाक भाषांतर. सूरा अल-इनशिकाक (Meccan) 25 आयत.



25 आयत · Meccan · मराठी
bismillah
ﭣﭤﭥﭦ
84:1 १. जेव्हा आकाश विदीर्ण होईल
ﭧﭨﭩﭪ
84:2 २. आणि आपल्या पालनकर्त्याचा आदेश कान लावून ऐकेल, आणि त्याला तसे करणे भाग आहे
ﭫﭬﭭﭮ
84:3 ३. आणि जेव्हा जमिनीला (खेचून) पसरविले जाईल
ﭯﭰﭱﭲﭳ
84:4 ४. आणि तिच्यात जे आहे ते ओकून बाहेर काढील आणि अगदी खाली होईल
ﭴﭵﭶﭷ
84:5 ५. आणि आपल्या पालनकर्त्याचा आदेश कान लावून ऐकेल आणि ती त्यास पात्र आहे
ﭸﭹﭺﭻﭼﭽﭾﭿﮀ
84:6 ६. हे मानवा! तू आपल्या पालनकर्त्याशी भेट होईपर्यंत हे प्रयत्न आणि सर्व कार्य आणि परिश्रम करून त्याची भेट घेणार आहेस
ﮁﮂﮃﮄﮅﮆ
84:7 ७. तर त्या वेळी ज्या माणसाच्या उजव्या हातात कर्म-पत्र दिले जाईल
ﮇﮈﮉﮊﮋ
84:8 ८. त्याचा हिशोब मोठ्या सहजतेने घेतला जाईल.१
ﮌﮍﮎﮏﮐ
84:9 ९. आणि तो आपल्या कुटुंबियांकडे आनंदित होऊन परत जाईल
ﮑﮒﮓﮔﮕﮖﮗ
84:10 १०. परंतु ज्या माणसाचे कर्म-पत्र त्याच्या पाठीमागून दिले जाईल
ﮘﮙﮚﮛ
84:11 ११. तेव्हा तो मृत्युला बोलावू लागेल
ﮜﮝﮞ
84:12 १२. आणि भडकत्या जहन्नममध्ये दाखल होईल
ﮟﮠﮡﮢﮣﮤ
84:13 १३. हा मनुष्य आपल्या कुटुंबात (जगात) आनंदित होता
ﮥﮦﮧﮨﮩﮪ
84:14 १४. तो समजत होता की अल्लाहकडे परतून जाणारच नाही
ﮫﮬﮭﮮﮯﮰﮱﯓ
84:15 १५. हे कसे शक्य आहे, वास्तविक त्याचा पालनकर्ता त्याला चांगल्या प्रकारे पाहात होता
ﯔﯕﯖﯗ
84:16 १६. मला संध्याकाळच्या लालिमेची शपथ
ﯘﯙﯚﯛ
84:17 १७. आणि रात्रीची आणि तिने गोळा केलेल्या वस्तूंची शपथ
ﯜﯝﯞﯟ
84:18 १८. आणि पूर्ण चंद्राची शपथ
ﯠﯡﯢﯣﯤ
84:19 १९. निःसंशय, तुम्ही एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत पोहोचाल
ﯥﯦﯧﯨﯩ
84:20 २०. त्यांना झाले तरी काय की ईमान राखत नाहीत
ﯪﯫﯬﯭﯮﯯﯰﯱ
84:21 २१. आणि जेव्हा त्यांच्यासमोर कुरआन वाचले जाते, तेव्हा सजदा करीत नाहीत
ﯲﯳﯴﯵﯶ
84:22 २२. किंबहुना त्यांनी कुप्र (इन्कार) केला, ते खोटे ठरवित आहेत
ﯷﯸﯹﯺﯻ
84:23 २३. आणि हे जे काही मनात ठेवतात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो
ﯼﯽﯾﯿ
84:24 २४. तेव्हा तुम्ही त्यांना दुःखदायक शिक्षा यातनांची खूशखबर द्या
ﭑﭒﭓﭔﭕﭖﭗﭘﭙﭚ
84:25 २५. तथापि ईमान राखणाऱ्या नेक सदाचारी लोकांना अगणित आणि कधीही न संपणारा मोबदला प्रदान केला जाईल

पवित्र कुराण


Wednesday, September 9, 2026

Don't forget us in your sincere prayers