अन-नूर · 60/64
भाषांतर उच्चार — अन-नूर
وَالْقَوَاعِدُ مِنَ النِّسَاءِ اللَّاتِي لَا يَرْجُونَ نِكَاحًا فَلَيْسَ عَلَيْهِنَّ جُنَاحٌ أَن يَضَعْنَ ثِيَابَهُنَّ غَيْرَ مُتَبَرِّجَاتٍ بِزِينَةٍ ۖ وَأَن يَسْتَعْفِفْنَ خَيْرٌ لَّهُنَّ ۗ وَاللَّهُ سَمِيعٌ عَلِيمٌ ۝٦٠
Walqawaa`idu minan nisaaa`il laatee laa yarjoona nikaahan falisa `alaihinna junaahun ai yada`na siyaabahunna ghaira mutabar rijaatim bizeenah; wa ai yasta`fifna khairul lahunn; wallaahu Samee`un `Aleem
📖 मराठी अर्थ
६०. आणि मोठ्या म्हाताऱ्या स्त्रिया, ज्यांना आपल्या विवाहाची आशा (आणि इच्छा) च राहिली नसावी, त्या जर आपले कपडे (पडद्यासाठी वापरलेले) उतरवून ठेवतील तर त्यांच्यावर काही दोष नाही (मात्र या अटीवर) की त्या आपली शोभा- सजावट दाखविणाऱ्या नसाव्यात. तथापि त्यांच्यासाठी हेच अधिक चांगले आहे की त्यांनी यापासून अलिप्त राहावे. आणि अल्लाह सर्व काही ऐकणारा व जाणणारा आहे

🎧 ऐका


📜 आयत 58-62 — अन-नूर

58يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا لِيَسْتَأْذِنكُمُ الَّذِينَ مَلَكَتْ أَيْمَانُكُمْ وَالَّذِينَ لَمْ يَبْلُغُوا الْحُلُمَ مِنكُمْ ثَلَاثَ مَرَّاتٍ ۚ مِّن قَبْلِ صَلَاةِ الْفَجْرِ وَحِينَ تَضَعُونَ ثِيَابَكُم مِّنَ الظَّهِيرَةِ وَمِن بَعْدِ صَلَاةِ الْعِشَاءِ ۚ ثَلَاثُ عَوْرَاتٍ لَّكُمْ ۚ لَيْسَ عَلَيْكُمْ وَلَا عَلَيْهِمْ جُنَاحٌ بَعْدَهُنَّ ۚ طَوَّافُونَ عَلَيْكُم بَعْضُكُمْ عَلَىٰ بَعْضٍ ۚ كَذَٰلِكَ يُبَيِّنُ اللَّهُ لَكُمُ الْآيَاتِ ۗ وَاللَّهُ عَلِيمٌ حَكِيمٌ
५८. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुमच्या ताब्यात असलेल्या दासांनी आणि त्यांनीही जे तुमच्यापैकी पूर्ण वयास पोहोचले नसतील (आपल्या येण्याच्या) तीन वेळांमध्ये तुमच्याकडून अनुमती घेणे आवष्यक आहे. फज्र (प्रातःकालीन) च्या नमाजपूर्वी आणि जोहर (मध्यान्ह) च्या वेळी जेव्हा तुम्ही आपले कपडे उतरवून ठेवता आणि ईशा (रात्री) च्या नमाजनंतर, या तिन्ही वेळा तुमच्या (एकांत) आणि पडद्याच्या आहेत. या वेळांखेरीज, ना तुमच्यावर काही दोष आहे, ना त्यांच्यावर. तुम्ही सर्व आपसात जास्त करून एकमेकांच्या जवळ येणे-जाणे करणारे आहेत. अशा प्रकारे अल्लाह आपले आदेश अगदी स्पष्ट करून सांगत आहे आणि अल्लाह जाणणारा आणि हिकमत बाळगणारा आहे
59وَإِذَا بَلَغَ الْأَطْفَالُ مِنكُمُ الْحُلُمَ فَلْيَسْتَأْذِنُوا كَمَا اسْتَأْذَنَ الَّذِينَ مِن قَبْلِهِمْ ۚ كَذَٰلِكَ يُبَيِّنُ اللَّهُ لَكُمْ آيَاتِهِ ۗ وَاللَّهُ عَلِيمٌ حَكِيمٌ
५९. आणि तुमच्यापैकी जी मुले तरुण (जाणत्या) वयास पोहचतील तर ज्याप्रमाणे त्यांच्या पूर्वीचे (मोठे) लोक अनुमती मागतात, त्यांनी देखील अनुमती घेऊन आले पाहिजे. अल्लाह अशा प्रकारे तुम्हाला आपल्या आयती स्पष्टतः सांगतो. अल्लाहच जाणणारा आणि हिकमत बाळगणारा आहे
60وَالْقَوَاعِدُ مِنَ النِّسَاءِ اللَّاتِي لَا يَرْجُونَ نِكَاحًا فَلَيْسَ عَلَيْهِنَّ جُنَاحٌ أَن يَضَعْنَ ثِيَابَهُنَّ غَيْرَ مُتَبَرِّجَاتٍ بِزِينَةٍ ۖ وَأَن يَسْتَعْفِفْنَ خَيْرٌ لَّهُنَّ ۗ وَاللَّهُ سَمِيعٌ عَلِيمٌ
६०. आणि मोठ्या म्हाताऱ्या स्त्रिया, ज्यांना आपल्या विवाहाची आशा (आणि इच्छा) च राहिली नसावी, त्या जर आपले कपडे (पडद्यासाठी वापरलेले) उतरवून ठेवतील तर त्यांच्यावर काही दोष नाही (मात्र या अटीवर) की त्या आपली शोभा- सजावट दाखविणाऱ्या नसाव्यात. तथापि त्यांच्यासाठी हेच अधिक चांगले आहे की त्यांनी यापासून अलिप्त राहावे. आणि अल्लाह सर्व काही ऐकणारा व जाणणारा आहे
61لَّيْسَ عَلَى الْأَعْمَىٰ حَرَجٌ وَلَا عَلَى الْأَعْرَجِ حَرَجٌ وَلَا عَلَى الْمَرِيضِ حَرَجٌ وَلَا عَلَىٰ أَنفُسِكُمْ أَن تَأْكُلُوا مِن بُيُوتِكُمْ أَوْ بُيُوتِ آبَائِكُمْ أَوْ بُيُوتِ أُمَّهَاتِكُمْ أَوْ بُيُوتِ إِخْوَانِكُمْ أَوْ بُيُوتِ أَخَوَاتِكُمْ أَوْ بُيُوتِ أَعْمَامِكُمْ أَوْ بُيُوتِ عَمَّاتِكُمْ أَوْ بُيُوتِ أَخْوَالِكُمْ أَوْ بُيُوتِ خَالَاتِكُمْ أَوْ مَا مَلَكْتُم مَّفَاتِحَهُ أَوْ صَدِيقِكُمْ ۚ لَيْسَ عَلَيْكُمْ جُنَاحٌ أَن تَأْكُلُوا جَمِيعًا أَوْ أَشْتَاتًا ۚ فَإِذَا دَخَلْتُم بُيُوتًا فَسَلِّمُوا عَلَىٰ أَنفُسِكُمْ تَحِيَّةً مِّنْ عِندِ اللَّهِ مُبَارَكَةً طَيِّبَةً ۚ كَذَٰلِكَ يُبَيِّنُ اللَّهُ لَكُمُ الْآيَاتِ لَعَلَّكُمْ تَعْقِلُونَ
६१. आंधळ्याला, पांगळ्याला, रोग्याला आणि स्वतः तुम्हाला कधीही कसलीही हरकत नाही की तुम्ही आपल्या घरी, मावशा किंवा आपल्या पित्याच्या घरी किंवा आपल्या मातांच्या घरी किंवा आपल्या भावांच्या घरी किंवा आपल्या बहीणींच्या घरी किंवा आपल्या चुलत्यांच्या घरी किंवा आपल्या आत्यांच्या घरी किंवा आपल्या मामांच्या घरी किंवा आपल्या मावशींच्या घरी किंवा त्या घरांमध्ये, ज्यांच्या किल्ल्या तुमच्या मालकीच्या असाव्यात किंवा आपल्या मित्रांच्या घरी, तुमच्यावर यातही काही गुन्हा नाही की तुम्ही सर्व एकत्र बसून जेवण घ्यावे किंवा वेगवेगळे बसून परंतु जेव्हा तुम्ही घरांमध्ये प्रवेश करू लागाल तेव्हा आपल्या घरच्या लोकांना सलाम करीत जा. शुभ कामना आहे, जी मंगलप्रद आणि पवित्र अल्लाहतर्फे अवतरित आहे. अशा प्रकारे अल्लाह, आपले आदेश तुम्हाला स्पष्ट करून सांगत आहे, यासाठी की तुम्ही समजून घ्यावे
62إِنَّمَا الْمُؤْمِنُونَ الَّذِينَ آمَنُوا بِاللَّهِ وَرَسُولِهِ وَإِذَا كَانُوا مَعَهُ عَلَىٰ أَمْرٍ جَامِعٍ لَّمْ يَذْهَبُوا حَتَّىٰ يَسْتَأْذِنُوهُ ۚ إِنَّ الَّذِينَ يَسْتَأْذِنُونَكَ أُولَٰئِكَ الَّذِينَ يُؤْمِنُونَ بِاللَّهِ وَرَسُولِهِ ۚ فَإِذَا اسْتَأْذَنُوكَ لِبَعْضِ شَأْنِهِمْ فَأْذَن لِّمَن شِئْتَ مِنْهُمْ وَاسْتَغْفِرْ لَهُمُ اللَّهَ ۚ إِنَّ اللَّهَ غَفُورٌ رَّحِيمٌ
६२. ईमान राखणारे लोक तर तेच आहेत जे अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखतात, आणि जेव्हा अशा समस्येत, लोकांनी एकत्र होण्याची आवश्यकता असते पैगंबरांसोबत असतात, तेव्हा जोपर्यंत तुमच्याकडून अनुमती घेत नाहीत, कोठेही जात नाहीत. जे लोक (अशा प्रसंगी) तुमच्याकडून अनुमती घेतात, वास्तिवक ते हेच लोक होत, ज्यांनी अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखलेले आहे. तेव्हा असे लोक जेव्हा तुमच्याकडून आपल्या एखाद्या कामाकरिता अनुमती (परवनागी) मागतील तेव्हा तुम्ही त्यांच्यापैकी ज्याला इच्छित असाल अनुमती द्या आणि त्यांच्यासाठी अल्लाहजवळ माफीची प्रार्थना करा. निःसंशय, अल्लाह माफ करणारा, दया कृपा करणारा आहे
अन-नूरकुराण यादी
64आयत
MedinanRevelation
60आयत

भाषांतर — अन-नूर 60

सूरा अन-नूर आयत 60 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६०. आणि मोठ्या म्हाताऱ्या स्त्रिया, ज्यांना आपल्या विवाहाची आशा (आणि…

सूरा आयत 60/64 — अन-नूर النور (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नूर ऐका, अन-नूर भाषांतर, अन-नूर mp3, अन-नूर pdf. आयत 58–62. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers