अल-हश्र · 7/24
भाषांतर उच्चार — अल-हश्र
مَّا أَفَاءَ اللَّهُ عَلَىٰ رَسُولِهِ مِنْ أَهْلِ الْقُرَىٰ فَلِلَّهِ وَلِلرَّسُولِ وَلِذِي الْقُرْبَىٰ وَالْيَتَامَىٰ وَالْمَسَاكِينِ وَابْنِ السَّبِيلِ كَيْ لَا يَكُونَ دُولَةً بَيْنَ الْأَغْنِيَاءِ مِنكُمْ ۚ وَمَا آتَاكُمُ الرَّسُولُ فَخُذُوهُ وَمَا نَهَاكُمْ عَنْهُ فَانتَهُوا ۚ وَاتَّقُوا اللَّهَ ۖ إِنَّ اللَّهَ شَدِيدُ الْعِقَابِ ۝٧
Maaa afaaa`al laahu `alaa Rasoolihee min ahlil quraa falillaahi wa lir Rasooli wa lizil qurbaa wal yataamaa walmasaakeeni wabnis sabeeli kai laa yakoona doolatam bainal aghniyaaa`i minkum; wa maaa aataakumur Rasoolu fakhuzoohu wa maa nahaakum `anhu fantahoo; wattaqul laaha innal laaha shadeedul-`iqaab
📖 मराठी अर्थ
७. वस्त्यावाल्यांचे जे धन अल्लाहने तुमच्या लढण्याविनाच आपल्या पैगंबराच्या हाती दिले, ते अल्लाहचे आहे आणि पैगंबराचे आहे, जवळच्या नातेवाईकांचे, अनाथांचे, गोरगरीबांचे व प्रवाशांचे आहे यासाठी की तुमच्यातल्या धनवानांच्याच हातात हे धन फिरत राहू नये आणि तुम्हाला पैगंबर जे काही देईल ते घ्या आणि ज्यापासून रोखेल त्यापासून अलिप्त राहा आणि अल्लाहचे भय बाळगत राहा. निःसंशय, अल्लाह मोठी सक्त शिक्षा यातना देणारा आहे
🎧 ऐका

📜 आयत 5-9 — अल-हश्र

5مَا قَطَعْتُم مِّن لِّينَةٍ أَوْ تَرَكْتُمُوهَا قَائِمَةً عَلَىٰ أُصُولِهَا فَبِإِذْنِ اللَّهِ وَلِيُخْزِيَ الْفَاسِقِينَ
५. खजुरींची जी झाडे तुम्ही कापून टाकलीत आणि ज्यांना तुम्ही त्यांच्या मुळासकट बाकी राहू दिले तर हे सर्व अल्लाहच्या आदेशाने झाले, आणि यासाठीही की दुराचारी लोकांना अल्लाहने अपमानित करावे
6وَمَا أَفَاءَ اللَّهُ عَلَىٰ رَسُولِهِ مِنْهُمْ فَمَا أَوْجَفْتُمْ عَلَيْهِ مِنْ خَيْلٍ وَلَا رِكَابٍ وَلَٰكِنَّ اللَّهَ يُسَلِّطُ رُسُلَهُ عَلَىٰ مَن يَشَاءُ ۚ وَاللَّهُ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ
६. आणि त्यांची जी संपत्ती अल्लाहने आपल्या पैगंबराच्या हाती दिली ज्यासाठी तुम्ही ना घोडे दौडविले आहेत ना ऊंट, किंबहुना अल्लाह आपल्या पैगंबराला, ज्याच्यावर इच्छितो वर्चस्वशाली करतो आणि अल्लाह प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे
7مَّا أَفَاءَ اللَّهُ عَلَىٰ رَسُولِهِ مِنْ أَهْلِ الْقُرَىٰ فَلِلَّهِ وَلِلرَّسُولِ وَلِذِي الْقُرْبَىٰ وَالْيَتَامَىٰ وَالْمَسَاكِينِ وَابْنِ السَّبِيلِ كَيْ لَا يَكُونَ دُولَةً بَيْنَ الْأَغْنِيَاءِ مِنكُمْ ۚ وَمَا آتَاكُمُ الرَّسُولُ فَخُذُوهُ وَمَا نَهَاكُمْ عَنْهُ فَانتَهُوا ۚ وَاتَّقُوا اللَّهَ ۖ إِنَّ اللَّهَ شَدِيدُ الْعِقَابِ
७. वस्त्यावाल्यांचे जे धन अल्लाहने तुमच्या लढण्याविनाच आपल्या पैगंबराच्या हाती दिले, ते अल्लाहचे आहे आणि पैगंबराचे आहे, जवळच्या नातेवाईकांचे, अनाथांचे, गोरगरीबांचे व प्रवाशांचे आहे यासाठी की तुमच्यातल्या धनवानांच्याच हातात हे धन फिरत राहू नये आणि तुम्हाला पैगंबर जे काही देईल ते घ्या आणि ज्यापासून रोखेल त्यापासून अलिप्त राहा आणि अल्लाहचे भय बाळगत राहा. निःसंशय, अल्लाह मोठी सक्त शिक्षा यातना देणारा आहे
8لِلْفُقَرَاءِ الْمُهَاجِرِينَ الَّذِينَ أُخْرِجُوا مِن دِيَارِهِمْ وَأَمْوَالِهِمْ يَبْتَغُونَ فَضْلًا مِّنَ اللَّهِ وَرِضْوَانًا وَيَنصُرُونَ اللَّهَ وَرَسُولَهُ ۚ أُولَٰئِكَ هُمُ الصَّادِقُونَ
८. हे धन त्या गरीब मुहाजिर लोकां (देशत्याग केलेल्या ईमानधारकां) करिता आहे, ज्यांना आपल्या घरातून आणि आपल्या संपत्तीतून बाहेर काढले गेले आहे. ते अल्लाहची दया कृपा व प्रसन्नता इच्छितात आणि अल्लाहची आणि त्याच्या पैगंबराची मदत करतात. हेच लोक सच्चे आहेत
9وَالَّذِينَ تَبَوَّءُوا الدَّارَ وَالْإِيمَانَ مِن قَبْلِهِمْ يُحِبُّونَ مَنْ هَاجَرَ إِلَيْهِمْ وَلَا يَجِدُونَ فِي صُدُورِهِمْ حَاجَةً مِّمَّا أُوتُوا وَيُؤْثِرُونَ عَلَىٰ أَنفُسِهِمْ وَلَوْ كَانَ بِهِمْ خَصَاصَةٌ ۚ وَمَن يُوقَ شُحَّ نَفْسِهِ فَأُولَٰئِكَ هُمُ الْمُفْلِحُونَ
९. आणि (त्यांच्याकरिता) ज्यांनी या घरात (अर्थात मदीनेत) आणि ईमान राखण्यात त्यांच्यापूर्वी स्थान बनवून घेतले आणि आपल्याकडे हिजरत (देशत्याग) करून येणाऱ्यांशी प्रेम राखतात आणि देशत्याग केलेल्यां (मुहाजिर लोकां) ना जे काही दिले जाते, त्याबद्दल ते आपल्या छातीत (मनात) कसलाही संकोच करीत नाहीत, उलट स्वतः आपल्यावर त्यांना प्राधान्य देतात, मग ते स्वतः कितीही गरजवंत असोत (खरी गोष्ट अशी की) जो कोणी आपल्या मनाच्या इच्छा अभिलाषांपासून वाचविला गेला, तोच सफलता प्राप्त करणारा आहे.१
अल-हश्रकुराण यादी
24आयत
MedinanRevelation
7आयत

भाषांतर — अल-हश्र 7

सूरा अल-हश्र आयत 7 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७. वस्त्यावाल्यांचे जे धन अल्लाहने तुमच्या लढण्याविनाच आपल्या पैगंबराच्या हाती…

सूरा आयत 7/24 — अल-हश्र الحشر (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-हश्र ऐका, अल-हश्र भाषांतर, अल-हश्र mp3, अल-हश्र pdf. आयत 5–9. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers