अल-मुम्तहिना · 2/13
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुम्तहिना
إِن يَثْقَفُوكُمْ يَكُونُوا لَكُمْ أَعْدَاءً وَيَبْسُطُوا إِلَيْكُمْ أَيْدِيَهُمْ وَأَلْسِنَتَهُم بِالسُّوءِ وَوَدُّوا لَوْ تَكْفُرُونَ ۝٢
Iny yasqafookum yakoonoo lakum a`daaa`anw wa yabsutooo ilaikum aydiyahum wa alsinatahum bissooo`i wa waddoo law takfuroon
📖 मराठी अर्थ
२. जर त्यांनी तुमच्यावर काबू मिळविला तर ते तुमचे (उघड) शत्रू होतील आणि वाईटरित्या तुमच्यावर हात उचलू लागतील आणि अपशब्द बोलू लागतील आणि (मनापासून) इच्छितील की तुम्हीही कुप्र करू लागावे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-4 — सूरा अल-मुम्तहिना

1يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا لَا تَتَّخِذُوا عَدُوِّي وَعَدُوَّكُمْ أَوْلِيَاءَ تُلْقُونَ إِلَيْهِم بِالْمَوَدَّةِ وَقَدْ كَفَرُوا بِمَا جَاءَكُم مِّنَ الْحَقِّ يُخْرِجُونَ الرَّسُولَ وَإِيَّاكُمْ ۙ أَن تُؤْمِنُوا بِاللَّهِ رَبِّكُمْ إِن كُنتُمْ خَرَجْتُمْ جِهَادًا فِي سَبِيلِي وَابْتِغَاءَ مَرْضَاتِي ۚ تُسِرُّونَ إِلَيْهِم بِالْمَوَدَّةِ وَأَنَا أَعْلَمُ بِمَا أَخْفَيْتُمْ وَمَا أَعْلَنتُمْ ۚ وَمَن يَفْعَلْهُ مِنكُمْ فَقَدْ ضَلَّ سَوَاءَ السَّبِيلِ
१. हे ईमान राखणाऱ्या लोकांनो! माझ्या आणि आपल्या शत्रूंना मित्र बनवू नका. तुम्ही तर मित्रत्वाने त्यांच्याकडे संदेश पाठविता आणि ते त्या सत्याचा, जे तुमच्याजवळ येऊन पोहोचले आहे, इन्कार करतात, पैगंबराला आणि स्वतः तुम्हाला केवळ या कारणास्तव (देशाबाहेर) काढतात की तुम्ही आपल्या पालनकर्त्यावर ईमान राखतात. जर तुम्ही माझ्या मार्गात जिहाद (धर्मयुद्धा) करिता आणि माझ्या प्रसन्नतेच्या शोधात निघाले आहात (तर त्यांच्याशी मैत्री करू नका). तुम्ही त्यांच्याजवळ लपून छपून प्रेमसंदेश पाठविता, आणि मला चागल्या प्रकारे माहीत आहे, जे तुम्ही लपविले आणि तेही जे तुम्ही जाहीर केले. तुमच्यापैकी जो कोणी हे काम करील, तो निःसंशय सरळ मार्गापासून विचलित होईल
2إِن يَثْقَفُوكُمْ يَكُونُوا لَكُمْ أَعْدَاءً وَيَبْسُطُوا إِلَيْكُمْ أَيْدِيَهُمْ وَأَلْسِنَتَهُم بِالسُّوءِ وَوَدُّوا لَوْ تَكْفُرُونَ
२. जर त्यांनी तुमच्यावर काबू मिळविला तर ते तुमचे (उघड) शत्रू होतील आणि वाईटरित्या तुमच्यावर हात उचलू लागतील आणि अपशब्द बोलू लागतील आणि (मनापासून) इच्छितील की तुम्हीही कुप्र करू लागावे
3لَن تَنفَعَكُمْ أَرْحَامُكُمْ وَلَا أَوْلَادُكُمْ ۚ يَوْمَ الْقِيَامَةِ يَفْصِلُ بَيْنَكُمْ ۚ وَاللَّهُ بِمَا تَعْمَلُونَ بَصِيرٌ
३. तुमचे नातेसंबंध आणि संतती तुम्हाला कयामतच्या दिवशी (काहीच) उपयोगी पडणार नाही. अल्लाह तुमच्या दरम्यान फैसला करील आणि तुम्ही जे काही करीत आहात अल्लाह ते चांगल्या प्रकारे पाहत आहे
4قَدْ كَانَتْ لَكُمْ أُسْوَةٌ حَسَنَةٌ فِي إِبْرَاهِيمَ وَالَّذِينَ مَعَهُ إِذْ قَالُوا لِقَوْمِهِمْ إِنَّا بُرَآءُ مِنكُمْ وَمِمَّا تَعْبُدُونَ مِن دُونِ اللَّهِ كَفَرْنَا بِكُمْ وَبَدَا بَيْنَنَا وَبَيْنَكُمُ الْعَدَاوَةُ وَالْبَغْضَاءُ أَبَدًا حَتَّىٰ تُؤْمِنُوا بِاللَّهِ وَحْدَهُ إِلَّا قَوْلَ إِبْرَاهِيمَ لِأَبِيهِ لَأَسْتَغْفِرَنَّ لَكَ وَمَا أَمْلِكُ لَكَ مِنَ اللَّهِ مِن شَيْءٍ ۖ رَّبَّنَا عَلَيْكَ تَوَكَّلْنَا وَإِلَيْكَ أَنَبْنَا وَإِلَيْكَ الْمَصِيرُ
४. (हे ईमान राखणाऱ्यांनो!) तुमच्याकरिता (हजरत) इब्राहीम आणि त्यांच्या साथीदारांमध्ये फार उत्तम नमुना आहे, जेव्हा त्या सर्वांनी आपल्या जनसमूहाला स्पष्ट शब्दांत सांगितले की आम्ही तुमच्यापासून आणि ज्यांची तुम्ही अल्लाहखेरीज आराधना करता, त्या सर्वांपासून पूर्णपणे विभक्त आहोत. आम्ही तुमच्या (श्रद्धेचा) इन्कार करतो आणि तोपर्यंत तुम्ही अल्लाहच्या एक असण्यावर ईमान राखत नाही (तोपर्यंत) आमच्या व तुमच्या दरम्यान नेहमीकरिता कपट आणि शत्रुत्व निर्माण झाले. परंतु इब्राहीम आपल्या पित्यास असे म्हणाले होते की मी तुमच्यासाठी क्षमा-याचना अवश्य करीन आणि तुमच्यासाठी मला अल्लाहसमोर कसलाही अधिकार नाही. हे आमच्या पालनकर्त्या! तुझ्यावरच आम्ही भरवसा राखला आहे१ आणि तुझ्याचकडे आम्ही रुजू होतो, आणि तुझ्याकडेच परतून यायचे आहे
अल-मुम्तहिनाकुराण यादी
13आयत
MedinanRevelation
2आयत

भाषांतर — अल-मुम्तहिना 2

सूरा अल-मुम्तहिना आयत 2 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २. जर त्यांनी तुमच्यावर काबू मिळविला तर ते तुमचे (उघड)…

सूरा आयत 2/13 — सूरा अल-मुम्तहिना الممتحنة (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुम्तहिना ऐका, सूरा अल-मुम्तहिना भाषांतर, सूरा अल-मुम्तहिना mp3, सूरा अल-मुम्तहिना pdf. आयत 1–4. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers