अल-अनआम · 153/165
भाषांतर उच्चार — सूरा अल-अनआम
وَأَنَّ هَٰذَا صِرَاطِي مُسْتَقِيمًا فَاتَّبِعُوهُ ۖ وَلَا تَتَّبِعُوا السُّبُلَ فَتَفَرَّقَ بِكُمْ عَن سَبِيلِهِ ۚ ذَٰلِكُمْ وَصَّاكُم بِهِ لَعَلَّكُمْ تَتَّقُونَ ۝١٥٣
Wa annna haazaa Siraatee mustaqeeman fattabi`oohu wa laa tattabi`us subula fatafarraqa bikum `an sabeelih; zaalikum wassaakum bihee la`allakum tattaqoon
📖 मराठी अर्थ
१५३. आणि हाच माझा सरळ मार्ग आहे यास्तव त्यावरच चाला आणि इतर मार्गांवर चालू नका, अन्यथा तुम्हाला त्याच्या मार्गपासून दूर करतील त्याने (अल्लाहने) याचाच आदेश दिला आहे यासाठी की तुम्ही सुरक्षित राहावे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 151-155 — सूरा अल-अनआम

151۞ قُلْ تَعَالَوْا أَتْلُ مَا حَرَّمَ رَبُّكُمْ عَلَيْكُمْ ۖ أَلَّا تُشْرِكُوا بِهِ شَيْئًا ۖ وَبِالْوَالِدَيْنِ إِحْسَانًا ۖ وَلَا تَقْتُلُوا أَوْلَادَكُم مِّنْ إِمْلَاقٍ ۖ نَّحْنُ نَرْزُقُكُمْ وَإِيَّاهُمْ ۖ وَلَا تَقْرَبُوا الْفَوَاحِشَ مَا ظَهَرَ مِنْهَا وَمَا بَطَنَ ۖ وَلَا تَقْتُلُوا النَّفْسَ الَّتِي حَرَّمَ اللَّهُ إِلَّا بِالْحَقِّ ۚ ذَٰلِكُمْ وَصَّاكُم بِهِ لَعَلَّكُمْ تَعْقِلُونَ
१५१. तुम्ही सांगा की, या, मी वाचून ऐकवू की तुम्हाला तुमच्या पालनकर्त्याने कशापासून मनाई केली आहे. ते हे की त्याच्यासोबत कोणत्याही चीज-वस्तूला सहभागी करू नका आणि माता पित्याशी नेक वर्तन करा आणि आपल्या संततीची गरीबीमुळे हत्या करू नका. आम्ही तुम्हाला आणि त्यांना रोजी (आजिविका) प्रदान करतो आणि खुल्या व छुप्या निर्लज्जतेच्या जवळ जाऊ नका आणि त्या जीवाला ज्याबाबत अल्लाहने मनाई केली आहे, ठार मारू नका, परंतु धर्मशास्त्रीय (शरीअतच्या) कारणाने. तुम्हाला त्याने याचाच आदेश दिला आहे, यासाठी की तुम्ही समजून घ्यावे
152وَلَا تَقْرَبُوا مَالَ الْيَتِيمِ إِلَّا بِالَّتِي هِيَ أَحْسَنُ حَتَّىٰ يَبْلُغَ أَشُدَّهُ ۖ وَأَوْفُوا الْكَيْلَ وَالْمِيزَانَ بِالْقِسْطِ ۖ لَا نُكَلِّفُ نَفْسًا إِلَّا وُسْعَهَا ۖ وَإِذَا قُلْتُمْ فَاعْدِلُوا وَلَوْ كَانَ ذَا قُرْبَىٰ ۖ وَبِعَهْدِ اللَّهِ أَوْفُوا ۚ ذَٰلِكُمْ وَصَّاكُم بِهِ لَعَلَّكُمْ تَذَكَّرُونَ
१५२. आणि अनाथाच्या संपत्तीच्या जवळही जाऊ नका, तथापि खूप चांगल्या पद्धतीने, येथेपर्यंत की ते तारुण्यावस्थेस पोहोचावेत, आणि न्यायासह माप-तोल पूर्ण करा. आम्ही कोणावर त्याच्या कुवतीपेक्षा जास्त भार ठेवत नाही आणि जेव्हा बोलाल, तेव्हा न्याय करा, मग तो जवळचा नातेवाईक का असेना आणि अल्लाहशी केलेला वायदा पूर्ण करा. त्याने तुम्हा लोकांना याचाच आदेश दिला आहे यासाठी की तुम्ही स्मरण राखावे
153وَأَنَّ هَٰذَا صِرَاطِي مُسْتَقِيمًا فَاتَّبِعُوهُ ۖ وَلَا تَتَّبِعُوا السُّبُلَ فَتَفَرَّقَ بِكُمْ عَن سَبِيلِهِ ۚ ذَٰلِكُمْ وَصَّاكُم بِهِ لَعَلَّكُمْ تَتَّقُونَ
१५३. आणि हाच माझा सरळ मार्ग आहे यास्तव त्यावरच चाला आणि इतर मार्गांवर चालू नका, अन्यथा तुम्हाला त्याच्या मार्गपासून दूर करतील त्याने (अल्लाहने) याचाच आदेश दिला आहे यासाठी की तुम्ही सुरक्षित राहावे
154ثُمَّ آتَيْنَا مُوسَى الْكِتَابَ تَمَامًا عَلَى الَّذِي أَحْسَنَ وَتَفْصِيلًا لِّكُلِّ شَيْءٍ وَهُدًى وَرَحْمَةً لَّعَلَّهُم بِلِقَاءِ رَبِّهِمْ يُؤْمِنُونَ
१५४. आणि आम्ही (पैगंबर) मूसा यांना ग्रंथ प्रदान केला, त्याच्यावर आपली कृपा देणगी (नेमत) पूर्ण करण्यासाठी, ज्याने सत्कर्मे केलीत आणि प्रत्येक गोष्टीचा तपशील आणि मार्गदर्शन आणि दया कृपाकरिता, यासाठी की त्यांनी आपल्या पालनकर्त्याशी भेट होण्यावर ईमान राखावे
155وَهَٰذَا كِتَابٌ أَنزَلْنَاهُ مُبَارَكٌ فَاتَّبِعُوهُ وَاتَّقُوا لَعَلَّكُمْ تُرْحَمُونَ
१५५. आणि हा (पवित्र कुरआन) एक शुभ ग्रंथ आहे, जो आम्ही अवतरित केला, यास्तव तुम्ही याचे अनुसरण करा, यासाठी की तुमच्यावर दया केली जावी
अल-अनआमकुराण यादी
165आयत
MeccanRevelation
153आयत

भाषांतर — अल-अनआम 153

सूरा अल-अनआम आयत 153 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १५३. आणि हाच माझा सरळ मार्ग आहे यास्तव त्यावरच चाला…

सूरा आयत 153/165 — सूरा अल-अनआम الأنعام (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-अनआम ऐका, सूरा अल-अनआम भाषांतर, सूरा अल-अनआम mp3, सूरा अल-अनआम pdf. आयत 151–155. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers