PDF —
36 आयत Meccan PDF
Built right in your browser — download starts automatically

सूरा अल-मुतफ्फिफिन pdf — डाउनलोड करा (मराठी)

सूरा अल-मुतफ्फिफिन pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-मुतफ्फिफिन भाषांतर. सूरा अल-मुतफ्फिफिन (Meccan) 36 आयत.

← अल-इन्फितारसूरा अल-मुतफ्फिफिन अल-इनशिकाक →


36 आयत · Meccan · मराठी
bismillah
ﯖﯗﯘ
83:1 १. मोठी वाईट अवस्था आहे माप-तोलमध्ये कमी करणाऱ्यांसाठी
ﯙﯚﯛﯜﯝﯞﯟ
83:2 २. की जेव्हा लोकांकडून माप मोजून घेतात तेव्हा पुरेपूर मोजून घेतात
ﯠﯡﯢﯣﯤﯥ
83:3 ३. आणि जेव्हा त्यांना माप मोजून किंवा तोल करून देतात, तेव्हा कमी देतात
ﯦﯧﯨﯩﯪﯫ
83:4 ४. काय त्यांना आपल्या मृत्युनंतर जिवंत होऊन उठण्याबाबतचा विश्वास नाही
ﭑﭒﭓ
83:5 ५. त्या महान दिवसाकरिता
ﭔﭕﭖﭗﭘﭙ
83:6 ६. ज्या दिवशी सर्व लोक, सर्व विश्वांच्या पालनकर्त्यासमोर उभे असतील
ﭚﭛﭜﭝﭞﭟﭠ
83:7 ७. निःसंशय, दुराचारी लोकांचा कर्म-लेख ‘सिज्जीन’ मध्ये आहे
ﭡﭢﭣﭤﭥ
83:8 ८. तुम्हाला काय माहीत ‘सिज्जीन’ काय आहे
ﭦﭧﭨ
83:9 ९. (हा तर) लिखित ग्रंथ आहे
ﭩﭪﭫﭬ
83:10 १०. त्या दिवशी खोटे उठविणाऱ्यांची मोठी दुर्दशा आहे
ﭭﭮﭯﭰﭱ
83:11 ११. जे मोबदला आणि शिक्षेच्या दिवसाला खोटे ठरवितात
ﭲﭳﭴﭵﭶﭷﭸﭹ
83:12 १२. याला फक्त तोच खोटे ठरवितो, जो मर्यादेचे उल्लंघन करणारा आणि अपराधी असतो
ﭺﭻﭼﭽﭾﭿﮀﮁ
83:13 १३. जेव्हा त्याच्यासमोर आमच्या आयती वाचल्या जातात तेव्हा तो म्हणतो की हे तर पूर्वीच्या लोकांचे किस्से आहेत
ﮂﮃﮄﮅﮆﮇﮈﮉﮊﮋﮌ
83:14 १४. असे नाही, किंबहुना त्यांच्या मनावर त्यांच्या कर्मांमुळे गंज (चढलेला) आहे
ﮍﮎﮏﮐﮑﮒﮓ
83:15 १५. एवढेच नाही. हे लोक त्या दिवशी आपल्या पालनकर्त्याच्या दर्शनापासून वंचित ठेवले जातील
ﮔﮕﮖﮗﮘ
83:16 १६. मग या लोकांना निश्चितपणे जहन्नममध्ये फेकून दिले जाईल
ﮙﮚﮛﮜﮝﮞﮟﮠ
83:17 १७. मग त्यांना सांगितले जाईल की हेच आहे ते, ज्याला तुम्ही खोटे ठरवित राहिले
ﮡﮢﮣﮤﮥﮦﮧ
83:18 १८. निःसंशय, सत्कर्मी लोकांचा कर्म-लेख ‘इल्लियीन’ मध्ये आहे
ﮨﮩﮪﮫﮬ
83:19 १९. तुम्हाला काय माहीत की ‘इल्लियीन’ काय आहे
ﮭﮮﮯ
83:20 २०. (तो तर) लिखित ग्रंथ आहे
ﮰﮱﯓ
83:21 २१. अल्लाहचे निकटवर्ती (फरिश्ते) हजर असतात
ﯔﯕﯖﯗﯘ
83:22 २२. निःसंशय, नेक सदाचारी लोक (मोठ्या) सुखा-समाधानात असतील
ﯙﯚﯛﯜ
83:23 २३. आसनांवर बसून पाहात असतील
ﯝﯞﯟﯠﯡﯢ
83:24 २४. तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरूनच (अल्लाहच्या) कृपा देणग्यांची प्रफुल्लता ओळखाल
ﯣﯤﯥﯦﯧ
83:25 २५. या लोकांना शुद्ध निर्भेळ मद्य पाजले जाईल
ﯨﯩﯪﯫﯬﯭﯮﯯ
83:26 २६. ज्यावर कस्तुरीची मोहर लागली असेल. इच्छा करणाऱ्यांनी त्याचीच इच्छा केली पाहिजे
ﯰﯱﯲﯳ
83:27 २७. आणि त्यात ‘तस्नीम’चे मिश्रण असेल
ﯴﯵﯶﯷﯸ
83:28 २८. (अर्थात) तो झरा, ज्याचे पाणी, अल्लाहचे सान्निध्य लाभलेले लोक पितील
ﯹﯺﯻﯼﯽﯾﯿﰀﰁ
83:29 २९. निःसंशय, अपराधी लोक ईमान राखणाऱ्या लोकांची थट्टा उडवित असत
ﰂﰃﰄﰅﰆ
83:30 ३०. आणि त्यांच्या जवळून जाताना नेत्र कटाक्ष (व इशाऱ्याने) त्याचा अपमान करीत असत
ﰇﰈﰉﰊﰋﰌﰍ
83:31 ३१. आणि जेव्हा आपल्या लोकांकडे परत येत, तेव्हा थट्टा - मस्करी करीत असत
ﰎﰏﰐﰑﰒﰓﰔ
83:32 ३२. आणि जेव्हा त्यांना पाहत, तेव्हा असे म्हणत, निश्चितच हे लोक वाट चुकलेले आहेत
ﰕﰖﰗﰘﰙ
83:33 ३३. यांना, त्याच्यावर निरीक्षक बनवून तर नाही पाठविले गेले
ﭑﭒﭓﭔﭕﭖﭗ
83:34 ३४. तेव्हा आज ईमान राखणारे या इन्कारी लोकांवर हसतील
ﭘﭙﭚﭛ
83:35 ३५. आसनांवर विराजमान होऊन पाहत असतील
ﭜﭝﭞﭟﭠﭡﭢ
83:36 ३६. की आता या इन्कार करणाऱ्यांनी, जसे कर्म ते करीत होते, त्याचा पुरेपूर मोबदला प्राप्त करून घेतला

पवित्र कुराण


Wednesday, September 9, 2026

Don't forget us in your sincere prayers