PDF —
42 आयत Meccan PDF
Built right in your browser — download starts automatically

सूरा अबसा pdf — डाउनलोड करा (मराठी)

सूरा अबसा pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अबसा भाषांतर. सूरा अबसा (Meccan) 42 आयत.



42 आयत · Meccan · मराठी
bismillah
ﭑﭒﭓ
80:1 १. त्याने तोंड आंबट केले आणि तोंड फिरविले
ﭔﭕﭖﭗ
80:2 २. (केवळ अशासाठी) की त्याच्याजवळ एक आंधळा आला
ﭘﭙﭚﭛﭜ
80:3 ३. तुम्हाला काय माहीत, कदाचित तो सुधारला असता
ﭝﭞﭟﭠﭡ
80:4 ४. किंवा त्याने उपदेश ऐकला असता आणि त्याला उपदेश लाभदायक ठरला असता
ﭢﭣﭤﭥ
80:5 ५. (परंतु) जो बेपर्वाईने वागतो
ﭦﭧﭨﭩ
80:6 ६. त्याच्याकडे तर तुम्ही पुरेपूर लक्ष देत आहात
ﭪﭫﭬﭭﭮ
80:7 ७. वास्तविक त्याच्या न सुधारण्याने तुमची काहीच हानी नाही
ﭯﭰﭱﭲﭳ
80:8 ८. आणि जो मनुष्य तुमच्याजवळ धावत येतो
ﭴﭵﭶ
80:9 ९. आणि तो भीत (ही) आहे
ﭷﭸﭹﭺ
80:10 १०. तर त्याच्याशी तुम्ही उपेक्षावृत्ती दाखविता
ﭻﭼﭽﭾ
80:11 ११. हे योग्य नाही.१ कुरआन तर बोध (दायक वस्तू) आहे
ﭿﮀﮁﮂ
80:12 १२. ज्याची इच्छा होईल (त्याने) यापासून बोध घ्यावा
ﮃﮄﮅﮆ
80:13 १३. (हा तर) आदर-सन्मान पूर्ण ग्रंथांमध्ये आहे
ﮇﮈﮉ
80:14 १४. जे उच्चतम व पवित्र आणि स्वच्छ शुद्ध आहेत
ﮊﮋﮌ
80:15 १५. अशा लिहिणाऱ्यांच्या हातात आहे
ﮍﮎﮏ
80:16 १६. जे उच्च दर्जाचे पवित्र आहेत
ﮐﮑﮒﮓﮔ
80:17 १७. अल्लाहची मार असो मानवावर, कसा कृतघ्न आहे
ﮕﮖﮗﮘﮙ
80:18 १८. याला (अल्लाहने) कोणत्या वस्तूपासून निर्माण केले
ﮚﮛﮜﮝﮞ
80:19 १९. (याला) एका वीर्यबिंदूपासून मग अनुमानावर राखले त्याला
ﮟﮠﮡﮢ
80:20 २०. मग त्याच्यासाठी मार्ग सोपा केला
ﮣﮤﮥﮦ
80:21 २१. मग त्याला मरण दिले आणि मग कबरीत गाडले
ﮧﮨﮩﮪﮫ
80:22 २२. मग जेव्हा इच्छा होईल, त्याला जिवंत करील
ﮬﮭﮮﮯﮰﮱ
80:23 २३. मुळीच नाही. त्याने आतापर्यंत अल्लाहच्या आदेशाचे पालन केले नाही
ﯓﯔﯕﯖﯗ
80:24 २४. माणसाने आपल्या भोजनावर नजर टाकली पाहिजे
ﯘﯙﯚﯛﯜ
80:25 २५. की आम्ही भरपूर पाणी वर्षविले
ﯝﯞﯟﯠﯡ
80:26 २६. मग जमिनीला चांगल्या प्रकारे फाडले
ﯢﯣﯤﯥ
80:27 २७. मग तिच्यातून अन्न (धान्य) उगविले
ﯦﯧﯨ
80:28 २८. आणि द्राक्ष व भाजीपाला
ﯩﯪﯫ
80:29 २९. आणि जैतून व खजूर
ﯬﯭﯮ
80:30 ३०. आणि घनदाट बागा
ﯯﯰﯱ
80:31 ३१. आणि मेवे व (गवत) चारा (देखील उगविला)
ﯲﯳﯴﯵ
80:32 ३२. तुमच्या वापराकरिता व फायद्याकरिता आणि तुमच्या चार पायांच्या जनावरांकरिता
ﯶﯷﯸﯹ
80:33 ३३. मग जेव्हा कान बधीर करून टाकणारी (कयामत) येईल
ﯺﯻﯼﯽﯾﯿ
80:34 ३४. त्या दिवशी माणूस पळ काढील आपल्या भावापासून
ﰀﰁﰂ
80:35 ३५. आणि आपल्या माता व पित्यापासून
ﰃﰄﰅ
80:36 ३६. आणि आपल्या पत्नी व आपल्या संततीपासून
ﰆﰇﰈﰉﰊﰋﰌ
80:37 ३७. त्यांच्यापैकी प्रत्येकाला त्या दिवशी अशी चिंता (लागून) राहील, जी त्याला (व्यस्त राखण्या) साठी पुरेशी असेल
ﰍﰎﰏﰐ
80:38 ३८. त्या दिवशी अनेक चेहरे उज्वल असतील
ﰑﰒﰓ
80:39 ३९. (जे) हसत आणि आनंदित असतील
ﰔﰕﰖﰗﰘ
80:40 ४०. आणि बहुतेक चेहरे त्या दिवशी धुळीने माखलेले असतील
ﭑﭒﭓ
80:41 ४१. त्यांच्यावर काळिमा आच्छादित असेल
ﭔﭕﭖﭗﭘ
80:42 ४२. हे तेच इन्कारी, दुराचारी लोक असतील

पवित्र कुराण


Wednesday, September 9, 2026

Don't forget us in your sincere prayers