सूरा अत-तकवीर pdf — डाउनलोड करा (मराठी)
सूरा अत-तकवीर pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अत-तकवीर भाषांतर. सूरा अत-तकवीर (Meccan) 29 आयत.
Related
More सूरा PDF
सूरा अत-तकवीर

ﭙﭚﭛﭜ
81:1
१. जेव्हा सूर्य गुंडाळून घेतला जाईल
ﭝﭞﭟﭠ
81:2
२. आणि जेव्हा तारे निस्तेज होतील
ﭡﭢﭣﭤ
81:3
३. आणि जेव्हा पर्वतांना चालविले जाईल
ﭥﭦﭧﭨ
81:4
४. आणि जेव्हा गर्भधारक सांडणींना सोडून दिले जाईल
ﭩﭪﭫﭬ
81:5
५. आणि जेव्हा हिंस्र पशूंना एकत्रित केले जाईल
ﭭﭮﭯﭰ
81:6
६. आणि जेव्हा समुद्र भडकाविले जातील
ﭱﭲﭳﭴ
81:7
७. आणि जेव्हा प्राणांना (शरीराशी) जोडले जाईल
ﭵﭶﭷﭸ
81:8
८. आणि जेव्हा जिवंत गाडल्या गेलेल्या मुलींना विचारले जाईल
ﭹﭺﭻﭼ
81:9
९. की कोणत्या अपराधापायी त्यांची हत्या केली गेली
ﭽﭾﭿﮀ
81:10
१०. आणि जेव्हा कर्म-लेख उघडले जातील
ﮁﮂﮃﮄ
81:11
११. आणि जेव्हा आकाशाची चामडी (आवरण) उतरविली जाईल
ﮅﮆﮇﮈ
81:12
१२. आणि जेव्हा जहन्नम भडकविली जाईल
ﮉﮊﮋﮌ
81:13
१३. आणि जेव्हा जन्नतला जवळ आणले जाईल
ﮍﮎﮏﮐﮑ
81:14
१४. तेव्हा त्या दिवशी प्रत्येक मनुष्य जाणून घेईल, जे काही (सोबत) घेऊन आला असेल
ﮒﮓﮔﮕ
81:15
१५. मी शपथ घेतो मागे हटणाऱ्या
ﮖﮗﮘ
81:16
१६. चालणाऱ्या फिरणाऱ्या, लपणाऱ्या ताऱ्यांची
ﮙﮚﮛﮜ
81:17
१७. आणि रात्रीची जेव्हा ती जाऊ लागेल
ﮝﮞﮟﮠ
81:18
१८. आणि सकाळची जेव्हा चकाकू लागेल
ﮡﮢﮣﮤﮥ
81:19
१९. निःसंशय, हे एका सन्मानित संदेशवाहकाचे कथन आहे
ﮦﮧﮨﮩﮪﮫﮬ
81:20
२०. जो मोठा शक्तिशाली आहे. अर्शचा स्वामी (अल्लाह) च्या ठायी उच्च दर्जाचा आहे
ﮭﮮﮯﮰ
81:21
२१. ज्याचे तेथे (आकाशांमध्ये) आज्ञापालन केले जाते, (तो) अमानतदार आहे
ﮱﯓﯔﯕ
81:22
२२. आणि तुमचा साथीदार वेडा नाही
ﯖﯗﯘﯙﯚ
81:23
२३. त्याने त्या (फरिश्त्या) ला आकाशाच्या उघड्या किनाऱ्यावर पाहिलेही आहे
ﯛﯜﯝﯞﯟﯠ
81:24
२४. आणि हा परोक्षाच्या गोष्टी सांगण्यात कंजूसही नाही
ﯡﯢﯣﯤﯥﯦ
81:25
२५. आणि हा (कुरआन) धिःक्कारलेल्या सैतानाचे कथन नाही
ﯧﯨﯩ
81:26
२६. मग तुम्ही कोठे जात आहात
ﯪﯫﯬﯭﯮﯯ
81:27
२७. हे तर समस्त विश्ववासीयांकरिता बोधपत्र आहे
ﯰﯱﯲﯳﯴﯵ
81:28
२८. (खासकरून त्याच्यासाठी,) जो तुमच्यपैकी सरळ मार्गावर चालू इच्छितो
ﯶﯷﯸﯹﯺﯻﯼﯽﯾ
81:29
२९. आणि तुम्ही, सर्व विश्वांच्या पालनकर्त्या (अल्लाह) च्या (इच्छे) विना काहीच इच्छू शकत नाही
पवित्र कुराण
Wednesday, September 9, 2026
Don't forget us in your sincere prayers







