अल-आराफ · 149/206
भाषांतर उच्चार — अल-आराफ
وَلَمَّا سُقِطَ فِي أَيْدِيهِمْ وَرَأَوْا أَنَّهُمْ قَدْ ضَلُّوا قَالُوا لَئِن لَّمْ يَرْحَمْنَا رَبُّنَا وَيَغْفِرْ لَنَا لَنَكُونَنَّ مِنَ الْخَاسِرِينَ ۝١٤٩
Wa lammaa suqita feee aideehim wa ra aw annahum qad dalloo qaaloo la`il lam yarhamnaa Rabbunaa wa yaghfir lanaa lanakoonanna minal khaasireen
📖 मराठी अर्थ
१४९. आणि जेव्हा लज्जित झाले आणि जाणून घेतले की खरोखर ते लोक वाट चुकून बहकले, म्हणू लागले की जर आमच्या पालनकर्त्याने आमच्यावर दया केली नाही आणि आमचे अपराध माफ केले नाहीत तर खात्रीने आम्ही नुकसान भोगणाऱ्यांपैकी होऊ
🎧 ऐका

📜 आयत 147-151 — अल-आराफ

147وَالَّذِينَ كَذَّبُوا بِآيَاتِنَا وَلِقَاءِ الْآخِرَةِ حَبِطَتْ أَعْمَالُهُمْ ۚ هَلْ يُجْزَوْنَ إِلَّا مَا كَانُوا يَعْمَلُونَ
१४७. आणि ते लोक ज्यांनी आमच्या आयतींना आणि आखिरतच्या येण्याला खोटे ठरविले, त्यांचे सर्व आचरण वाया गेले, त्यांना तशीच यातना दिली जाईल, जसे कर्म ते करीत होते
148وَاتَّخَذَ قَوْمُ مُوسَىٰ مِن بَعْدِهِ مِنْ حُلِيِّهِمْ عِجْلًا جَسَدًا لَّهُ خُوَارٌ ۚ أَلَمْ يَرَوْا أَنَّهُ لَا يُكَلِّمُهُمْ وَلَا يَهْدِيهِمْ سَبِيلًا ۘ اتَّخَذُوهُ وَكَانُوا ظَالِمِينَ
१४८. आणि मूसाच्या जनसमूहाने त्यांच्या पश्चात आपल्या दागिन्यांनी एक वासरू बनवून त्याला उपास्य दैवत बनविले, जो एक आकार मात्र होता ज्यात एक आवाज (ध्वनी) होता. काय त्यांनी हे नाही पाहिले की ते (वासरू) त्यांच्याशी बोलतही नव्हते आणि ना त्यांना मार्गदर्शन करीत होते त्याला त्यांनी (दैवत) बनविले आणि मोठे अन्यायाचे कृत्य केले
149وَلَمَّا سُقِطَ فِي أَيْدِيهِمْ وَرَأَوْا أَنَّهُمْ قَدْ ضَلُّوا قَالُوا لَئِن لَّمْ يَرْحَمْنَا رَبُّنَا وَيَغْفِرْ لَنَا لَنَكُونَنَّ مِنَ الْخَاسِرِينَ
१४९. आणि जेव्हा लज्जित झाले आणि जाणून घेतले की खरोखर ते लोक वाट चुकून बहकले, म्हणू लागले की जर आमच्या पालनकर्त्याने आमच्यावर दया केली नाही आणि आमचे अपराध माफ केले नाहीत तर खात्रीने आम्ही नुकसान भोगणाऱ्यांपैकी होऊ
150وَلَمَّا رَجَعَ مُوسَىٰ إِلَىٰ قَوْمِهِ غَضْبَانَ أَسِفًا قَالَ بِئْسَمَا خَلَفْتُمُونِي مِن بَعْدِي ۖ أَعَجِلْتُمْ أَمْرَ رَبِّكُمْ ۖ وَأَلْقَى الْأَلْوَاحَ وَأَخَذَ بِرَأْسِ أَخِيهِ يَجُرُّهُ إِلَيْهِ ۚ قَالَ ابْنَ أُمَّ إِنَّ الْقَوْمَ اسْتَضْعَفُونِي وَكَادُوا يَقْتُلُونَنِي فَلَا تُشْمِتْ بِيَ الْأَعْدَاءَ وَلَا تَجْعَلْنِي مَعَ الْقَوْمِ الظَّالِمِينَ
१५०. आणि जेव्हा मूसा आपल्या जनसमूहाकडे परत आले क्रोध आणि दुःखात बुडालेले, तेव्हा म्हणाले, तुम्ही माझ्या पश्चातही मोठी वाईट हरकत केली. काय आपल्या पालनकर्त्याच्या आदेशापूर्वीच तुम्हीही घाई केली आणि त्वरेने तक्ते एका बाजूला टाकले आणि आपला भाऊ हारूनचे डोके धरून त्याला आपल्याकडे ओढू लागले. (हारून) म्हणाले, हे माझ्या मातेपासून जन्मलेले! या लोकांनी मला फार कमकुवत जाणले आणि बहुतेक त्यांनी मला ठार केले असते. तेव्हा तुम्ही माझ्या शत्रूंना हसवू नका आणि माझी गणना या अत्याचारी लोकांमध्ये करू नका
151قَالَ رَبِّ اغْفِرْ لِي وَلِأَخِي وَأَدْخِلْنَا فِي رَحْمَتِكَ ۖ وَأَنتَ أَرْحَمُ الرَّاحِمِينَ
१५१. (मूसा) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! माझ्या आणि माझ्या भावाच्या चुका माफ कर आणि आम्हा दोघांना आपल्या दयेत दाखल कर आणि तू दया करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक दया करणारा आहेस
अल-आराफकुराण यादी
206आयत
MeccanRevelation
149आयत

भाषांतर — अल-आराफ 149

सूरा अल-आराफ आयत 149 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४९. आणि जेव्हा लज्जित झाले आणि जाणून घेतले की खरोखर…

सूरा आयत 149/206 — अल-आराफ الأعراف (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-आराफ ऐका, अल-आराफ भाषांतर, अल-आराफ mp3, अल-आराफ pdf. आयत 147–151. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers