सूरा अल-मआरिज अरबी आणि मराठी
सूरा अल-मआरिज संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (44 आयत — مكية). अल-मआरिज ऐका, अल-मआरिज भाषांतर, अल-मआरिज mp3, अल-मआरिज pdf.सूरा अल-मआरिज वाचा आणि ऐका
🎧 आयत
M
Mishary Rashid Alafasy
✓
Mishary Rashid Alafasy
✓
M
Mahmoud Khalil Al-Husary
✓
Mahmoud Khalil Al-Husary
✓
A
Abdurrahman As-Sudais
✓
Abdurrahman As-Sudais
✓
M
Mohamed Siddiq Al-Minshawi
✓
Mohamed Siddiq Al-Minshawi
✓
A
Abdul Basit Abdul Samad
✓
Abdul Basit Abdul Samad
✓
A
Ali Al-Hudhaify
✓
Ali Al-Hudhaify
✓
A
Ahmed ibn Ali al-Ajamy
✓
Ahmed ibn Ali al-Ajamy
✓
A
Abu Bakr Ash-Shaatree
✓
Abu Bakr Ash-Shaatree
✓
M
Muhammad Ayyoub
✓
Muhammad Ayyoub
✓
A
Abdullah Basfar
✓
Abdullah Basfar
✓
A
Abdullah Al-Juhani
✓
Abdullah Al-Juhani
✓
M
Maher Al Muaiqly
✓
Maher Al Muaiqly
✓
—
x1
سَأَلَ سَائِلٌ بِعَذَابٍ وَاقِعٍ ١
📖 भाषांतर
आयत 1
१. एका मागणी करणाऱ्याने त्या अज़ाब (शिक्षा - यातने) ची मागणी केली जो घडून येणार आहे
تَعْرُجُ الْمَلَائِكَةُ وَالرُّوحُ إِلَيْهِ فِي يَوْمٍ كَانَ مِقْدَارُهُ خَمْسِينَ أَلْفَ سَنَةٍ ٤
📖 भाषांतर
आयत 4
४. ज्याच्याकडे फरिश्ते आणि आत्मा चढून जातात एका दिवसात, ज्याची मुदत पन्नास हजार वर्षांची आहे
يَوْمَ تَكُونُ السَّمَاءُ كَالْمُهْلِ ٨
📖 भाषांतर
आयत 8
८. ज्या दिवशी आकाश वितळलेल्या धातूसारखे होईल
يُبَصَّرُونَهُمْ ۚ يَوَدُّ الْمُجْرِمُ لَوْ يَفْتَدِي مِنْ عَذَابِ يَوْمِئِذٍ بِبَنِيهِ ١١
📖 भाषांतर
आयत 11
११. (जरी ते) एकमेकांना दाखविले जातील. अपराधी, त्या दिवसाच्या शिक्षा - यातनेच्या मोबदल्यात (दंड म्हणून) आपल्या पुत्रांना देऊ इच्छिल
وَفَصِيلَتِهِ الَّتِي تُؤْوِيهِ ١٣
📖 भाषांतर
आयत 13
१३. आणि आपल्या कुटुंबाला, जे त्याला आश्रय देत होते
وَمَن فِي الْأَرْضِ جَمِيعًا ثُمَّ يُنجِيهِ ١٤
📖 भाषांतर
आयत 14
१४. आणि जमिनीवरील समस्त लोकांना, यासाठी की यांनी त्याला मुक्ती मिळवून द्यावी
كَلَّا ۖ إِنَّهَا لَظَىٰ ١٥
📖 भाषांतर
आयत 15
१५. (परंतु) हे कदापि होणार नाही. निःसशय, तो (धगधगणाऱ्या) निखाऱ्यांची (आग) आहे
تَدْعُو مَنْ أَدْبَرَ وَتَوَلَّىٰ ١٧
📖 भाषांतर
आयत 17
१७. ती अशा त्या प्रत्येक माणसाला हाक मारील, जो मागे हटतो आणि विमुख होतो
۞ إِنَّ الْإِنسَانَ خُلِقَ هَلُوعًا ١٩
📖 भाषांतर
आयत 19
१९. निःसंशय, मनुष्य मोठ्या कच्च्या हृदयाचा बनविला गेला आहे
إِذَا مَسَّهُ الشَّرُّ جَزُوعًا ٢٠
📖 भाषांतर
आयत 20
२०. जेव्हा त्याला कष्ट - यातना पोहचते, तेव्हा भयचिंतीत होतो
وَإِذَا مَسَّهُ الْخَيْرُ مَنُوعًا ٢١
📖 भाषांतर
आयत 21
२१. आणि जेव्हा त्याला सुख प्राप्त होते, कंजूसपणा करू लागतो
الَّذِينَ هُمْ عَلَىٰ صَلَاتِهِمْ دَائِمُونَ ٢٣
📖 भाषांतर
आयत 23
२३. जे आपल्या नमाजचे वक्तशीर पालन करणारे आहेत.१
وَالَّذِينَ فِي أَمْوَالِهِمْ حَقٌّ مَّعْلُومٌ ٢٤
📖 भाषांतर
आयत 24
२४. आणि ज्यांच्या धन-संपत्तीत निर्धारित हिस्सा आहे
لِّلسَّائِلِ وَالْمَحْرُومِ ٢٥
📖 भाषांतर
आयत 25
२५. याचकांचाही आणि याचना करण्यापासून अलिप्त राहणाऱ्यांचाही
وَالَّذِينَ يُصَدِّقُونَ بِيَوْمِ الدِّينِ ٢٦
📖 भाषांतर
आयत 26
२६. आणि जे न्यायाच्या दिवसावर विश्वास राखतात
وَالَّذِينَ هُم مِّنْ عَذَابِ رَبِّهِم مُّشْفِقُونَ ٢٧
📖 भाषांतर
आयत 27
२७. आणि जे आपल्या पालनकर्त्याच्या शिक्षेचे भय बाळगत राहतात
إِنَّ عَذَابَ رَبِّهِمْ غَيْرُ مَأْمُونٍ ٢٨
📖 भाषांतर
आयत 28
२८. निःसंशय, त्यांच्या पालनकर्त्याची शिक्षा यातना, निर्धास्त होण्याची बाब नाही
وَالَّذِينَ هُمْ لِفُرُوجِهِمْ حَافِظُونَ ٢٩
📖 भाषांतर
आयत 29
२९. आणि जे लोक आपल्या लज्जास्थानां (गुप्तांगां) चे (हराम कृत्यापासून) रक्षण करतात
إِلَّا عَلَىٰ أَزْوَاجِهِمْ أَوْ مَا مَلَكَتْ أَيْمَانُهُمْ فَإِنَّهُمْ غَيْرُ مَلُومِينَ ٣٠
📖 भाषांतर
आयत 30
३०. पंरतु आपल्या पत्नींच्या आणि आपल्या दासींच्याखेरीज ज्यांचे ते मालक (स्वामी) आहेत, या बाबतीत ते निंदनीय नाहीत
فَمَنِ ابْتَغَىٰ وَرَاءَ ذَٰلِكَ فَأُولَٰئِكَ هُمُ الْعَادُونَ ٣١
📖 भाषांतर
आयत 31
३१. आता जो कोणी याच्याखेरीज (मार्ग) शोधेल, तर असे लोक मर्यादेचे उल्लंघन करणारे ठरतील
وَالَّذِينَ هُمْ لِأَمَانَاتِهِمْ وَعَهْدِهِمْ رَاعُونَ ٣٢
📖 भाषांतर
आयत 32
३२. आणि जे आपल्या अनामती (ठेवी) ची, आणि आपल्या वायद्या-वचनांची व प्रतिज्ञेची कास बाळगतात
وَالَّذِينَ هُم بِشَهَادَاتِهِمْ قَائِمُونَ ٣٣
📖 भाषांतर
आयत 33
३३. आणि जे आपल्या साक्षींवर सरळ (आणि अटळ) राहतात
وَالَّذِينَ هُمْ عَلَىٰ صَلَاتِهِمْ يُحَافِظُونَ ٣٤
📖 भाषांतर
आयत 34
३४. आणि जे आपल्या नमाजांचे संरक्षण करतात
أُولَٰئِكَ فِي جَنَّاتٍ مُّكْرَمُونَ ٣٥
📖 भाषांतर
आयत 35
३५. हेच लोक जन्नतमध्ये मान - प्रतिष्ठा राखणारे असतील
فَمَالِ الَّذِينَ كَفَرُوا قِبَلَكَ مُهْطِعِينَ ٣٦
📖 भाषांतर
आयत 36
३६. तेव्हा, या काफिरांना झाले तरी काय की ते तुमच्याकडे धावत येतात
عَنِ الْيَمِينِ وَعَنِ الشِّمَالِ عِزِينَ ٣٧
📖 भाषांतर
आयत 37
३७. उजव्या आणि डाव्या बाजूने, समूहासमूहाने
أَيَطْمَعُ كُلُّ امْرِئٍ مِّنْهُمْ أَن يُدْخَلَ جَنَّةَ نَعِيمٍ ٣٨
📖 भाषांतर
आयत 38
३८. काय त्यांच्यापैकी प्रत्येकजण असे इच्छितो की त्यांना देणग्यांनी युक्त (ऐश-आरामाच्या) जन्नतमध्ये प्रवेश लाभेल
كَلَّا ۖ إِنَّا خَلَقْنَاهُم مِّمَّا يَعْلَمُونَ ٣٩
📖 भाषांतर
आयत 39
३९. (असे) कदापि होणार नाही. आम्ही त्यांना त्या (वस्तू) पासून निर्माण केले आहे, जिला ते जाणतात
فَلَا أُقْسِمُ بِرَبِّ الْمَشَارِقِ وَالْمَغَارِبِ إِنَّا لَقَادِرُونَ ٤٠
📖 भाषांतर
आयत 40
४०. तेव्हा मला शपथ आहे दोन्ही पूर्व आणि पश्चिम (दिशां) च्या पालनकर्त्याची की आम्ही निश्चतपणे समर्थ आहोत
عَلَىٰ أَن نُّبَدِّلَ خَيْرًا مِّنْهُمْ وَمَا نَحْنُ بِمَسْبُوقِينَ ٤١
📖 भाषांतर
आयत 41
४१. या गोष्टीवर की त्यांच्याऐवजी त्यांच्यापेक्षा चांगले लोक आणावेत, आणि आम्ही लाचार विवश नाहीत
فَذَرْهُمْ يَخُوضُوا وَيَلْعَبُوا حَتَّىٰ يُلَاقُوا يَوْمَهُمُ الَّذِي يُوعَدُونَ ٤٢
📖 भाषांतर
आयत 42
४२. तेव्हा तुम्ही त्यांना भांडत-खेळत (असलेले) सोडा, येथे पर्यर्ंत की हे आपल्या त्या दिवसाला जाऊन मिळावेत, ज्याचा वायदा त्यांच्याशी केला जात आहे
يَوْمَ يَخْرُجُونَ مِنَ الْأَجْدَاثِ سِرَاعًا كَأَنَّهُمْ إِلَىٰ نُصُبٍ يُوفِضُونَ ٤٣
📖 भाषांतर
आयत 43
४३. ज्या दिवशी कबरीमधून हे धावत पळत बाहेर पडतील, जणू काही ते साध्य-चिन्हाकडे वेगाने जात आहेत
خَاشِعَةً أَبْصَارُهُمْ تَرْهَقُهُمْ ذِلَّةٌ ۚ ذَٰلِكَ الْيَوْمُ الَّذِي كَانُوا يُوعَدُونَ ٤٤
📖 भाषांतर
आयत 44
४४. त्यांचे डोळे (नजरा) झुकलेले असतील, त्यांच्यावर अपमानाचे सावट (पसरलेले) असेल. हाच तो दिवस, ज्याचा त्यांच्याशी वायदा केला जात होता
वाचा सूरा अल-मआरिज मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ
पवित्र कुराण
Tuesday, August 18, 2026
Don't forget us in your sincere prayers

