PDF —
11 आयत Meccan PDF
Built right in your browser — download starts automatically

सूरा अल-आदियात pdf — डाउनलोड करा (मराठी)

सूरा अल-आदियात pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-आदियात भाषांतर. सूरा अल-आदियात (Meccan) 11 आयत.

← अज-झलझलासूरा अल-आदियात अल-कारिआ →


11 आयत · Meccan · मराठी
bismillah
ﮱﯓﯔ
100:1 १. धापा टाकीत धावणाऱ्या घोड्यांची शपथ
ﯕﯖﯗ
100:2 २. मग टाप मारून चिंगाऱ्या उडविणाऱ्यांची शपथ
ﯘﯙﯚ
100:3 ३. मग सकाळच्या वेळी हल्ला चढविणाऱ्यांची शपथ
ﯛﯜﯝﯞ
100:4 ४. तर त्या वेळी धूळ उडवितात
ﯟﯠﯡﯢ
100:5 ५. मग त्याचसोबत सैन्यांमध्ये घुसतात
ﭑﭒﭓﭔﭕ
100:6 ६. निःसंशय, मनुष्य आपल्या पालनकर्त्याशी मोठा कृतघ्न आहे
ﭖﭗﭘﭙﭚ
100:7 ७. आणि खात्रीने तो स्वतःही यावर साक्षी आहे
ﭛﭜﭝﭞﭟ
100:8 ८. आणि हा धनाच्या मोहातही मोठा सक्त (कठोर) आहे
ﭠﭡﭢﭣﭤﭥﭦﭧﭨ
100:9 ९. काय याला ती वेळ माहीत नाही जेव्हा कबरीमध्ये जे (काही) आहे, काढून घेतले जाईल
ﭩﭪﭫﭬﭭ
100:10 १०. आणि मनातल्या गुप्त गोष्टींना उघड केले जाईल
ﭮﭯﭰﭱﭲﭳ
100:11 ११. निःसंशय, यांचा पालनकर्ता त्या दिवशी यांच्या अवस्थेची पुरेपूर खबर राखणारा असेल

पवित्र कुराण


Wednesday, September 9, 2026

Don't forget us in your sincere prayers