सूरा अन-नबा
PDF —
40 आयत Meccan PDF
Built right in your browser — download starts automatically

सूरा अन-नबा pdf — डाउनलोड करा (मराठी)

सूरा अन-नबा pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अन-नबा भाषांतर. अन-नबा (Meccan) 40 आयत.



सूरा अन-नबा
40 आयत · Meccan · मराठी
bismillah
ﭑﭒﭓ
१. हे लोक कोणत्या गोष्टीची विचारपूस करीत आहेत
ﭔﭕﭖﭗ
२. त्या मोठ्या खबरीची
ﭘﭙﭚﭛﭜ
३. ज्याबाबत हे अनेक मत (विचार) राखतात
ﭝﭞﭟ
४. निश्चितपणे हे आताच जाणून घेतील
ﭠﭡﭢﭣ
५. पुन्हा निश्चितपणे त्यांना फार लवकर माहीत पडेल
ﭤﭥﭦﭧﭨ
६. काय आम्ही जमिनीला बिछाईत नाही बनविले
ﭩﭪﭫ
७. आणि पर्वतांना मेखा नाही बनविले
ﭬﭭﭮ
८. आणि आम्ही तुम्हाला जोडी जोडीने निर्माण केले
ﭯﭰﭱﭲ
९. आणि आम्ही तुमच्या झोपेला तुमच्या आरामाचे कारण बनविले
ﭳﭴﭵﭶ
१०. आणि रात्रीला आम्ही पडदा (आवरण) बनविले
ﭷﭸﭹﭺ
११. आणि दिवसाला आम्ही रोजी प्राप्त करण्याचा समय बनविले
ﭻﭼﭽﭾﭿ
१२. आणि तुमच्या वरती आम्ही सात मजबूत आकाश बनविले
ﮀﮁﮂﮃ
१३. आणि एक चकाकणारा तेजस्वी दीप निर्माण केला
ﮄﮅﮆﮇﮈﮉ
१४. आणि ढगांद्वारे आम्ही मुसळधार पर्जन्यवृष्टी केली
ﮊﮋﮌﮍﮎ
१५. यासाठी की त्याद्वारे अन्न (धान्य) आणि वनस्पती उगवाव्यात
ﮏﮐﮑ
१६. आणि घनदाट बागाही (उगवाव्या)
ﮒﮓﮔﮕﮖﮗ
१७. निःसंशय, निर्णयाचा दिवस निर्धारीत आहे
ﮘﮙﮚﮛﮜﮝﮞ
१८. ज्या दिवशी सूर (शंख) फुंकला जाईल, मग तुम्ही सर्व झुंडच्या झुंड बनून याल
ﮟﮠﮡﮢﮣ
१९. आणि आकाश उघडले जाईल, तेव्हा त्यात दारेच दारे बनतील
ﮤﮥﮦﮧﮨ
२०. आणि पर्वत चालविले जातील, तेव्हा ते पांढरी वाळू बनतील
ﮩﮪﮫﮬﮭ
२१. निःसंशय, जहन्नम टपून बसली आहे
ﮮﮯﮰ
२२. विद्रोही (उदंड) लोकांचे ठिकाण तेच आहे
ﮱﯓﯔﯕ
२३. त्यात ते युगानुयुगे (आणि शतके) पडून राहतील
ﯖﯗﯘﯙﯚﯛﯜ
२४. ना कधी त्यात शीतलतेची गोडी चाखतील, ना पाण्याची
ﯝﯞﯟﯠ
२५. गरम (उकळते) पाणी आणि वाहत्या पू-खेरीज
ﯡﯢﯣ
२६. (त्यांना) पूर्णपणे मोबदला मिळेल
ﯤﯥﯦﯧﯨﯩ
२७. त्यांना तर हिशोबाची आशाच नव्हती
ﯪﯫﯬﯭ
२८. ते निडरतेने आमच्या आयतींना खोटे ठरवित असत
ﯮﯯﯰﯱﯲ
२९. आम्ही प्रत्येक गोष्ट लिहून सुरक्षित ठेवली आहे
ﯳﯴﯵﯶﯷﯸ
३०. आता तुम्ही (आपल्या कर्मांचा) स्वाद चाखा. आम्ही तुमच्या शिक्षेतच वाढकरीत राहू
ﭑﭒﭓﭔ
३१. निःसंशय, अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता सफलता आहे
ﭕﭖﭗ
३२. बागा आहेत आणि द्राक्षे आहेत
ﭘﭙﭚ
३३. आणि नवयुवती कुमारिका समवयस्क स्त्रिया आहेत
ﭛﭜﭝ
३४. आणि भरून वाहणारे मद्याचे प्याले आहेत
ﭞﭟﭠﭡﭢﭣﭤ
३५. तिथे ना तर ते अश्लील गोष्टी ऐकतील आणि ना खोट्या गोष्टी ऐकतील
ﭥﭦﭧﭨﭩﭪ
३६. (त्यांना) तुमच्या पालनकर्त्यातर्फे (त्यांच्या सत्कर्मांचा) हा मोबदला मिळेल, जो फार मोठे बक्षीस असेल
ﭫﭬﭭﭮﭯﭰﭱﭲﭳﭴﭵﭶ
३७. (त्या) पालनकर्त्यातर्फे मिळेल, जो आकाशांचा आणि जमिनीचा, आणि जे काही त्यांच्या दरम्यान आहे, त्या सर्वांचा स्वामी व पालनकर्ता आहे, आणि मोठा दयावान आहे. कोणालाही त्याच्याशी बोलण्याचा अधिकार नसेल
ﭷﭸﭹﭺﭻﭼﭽﭾﭿﮀﮁﮂﮃﮄﮅﮆ
३८. ज्या दिवशी रुह (आत्मा) आणि फरिश्ते रांगा बांधून उभे असतील तेव्हा कोणी बोलू शकणार नाही, मात्र ज्याला अतिशय दयावान (रहमान) अनुमती देईल, आणि तो उचित गोष्ट तोंडातून काढील (बोलेल)
ﮇﮈﮉﮊﮋﮌﮍﮎﮏﮐﮑ
३९. हा दिवस सत्य आहे, आता ज्याची इच्छा असेल त्याने आपल्या पालनकर्त्याजवळ (सत्कर्मे करून) स्थान बनवावे
ﮒﮓﮔﮕﮖﮗﮘﮙﮚﮛﮜﮝﮞﮟﮠﮡ
४०. आम्ही तुम्हाला निकट भविष्यात घडून येणाऱ्या शिक्षा यातनेचे भय दाखविले (आणि सावध केले) ज्या दिवशी मनुष्य आपल्या हातांनी केलेल्या कमाई (कर्मा) ला पाहील आणि काफिर म्हणेल की, मी माती झालो असतो तर (बरे झाले असते)

पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers