PDF —
50 आयत Meccan PDF
Built right in your browser — download starts automatically

सूरा अल-मुरसलात pdf — डाउनलोड करा (मराठी)

सूरा अल-मुरसलात pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-मुरसलात भाषांतर. सूरा अल-मुरसलात (Meccan) 50 आयत.

← अल-इनसानसूरा अल-मुरसलात अन-नबा →


50 आयत · Meccan · मराठी
bismillah
ﮑﮒﮓ
77:1 १. मनमोहक, सतत चालणाऱ्या मंद हवेची शपथ
ﮔﮕﮖ
77:2 २. मग जोरात (वेगाने) वाहू लागणारींची शपथ
ﮗﮘﮙ
77:3 ३. आणि (ढगांना) पसरविणारींची शपथ
ﮚﮛﮜ
77:4 ४. मग सत्य - असत्याला वेगवेगळे करणारे
ﮝﮞﮟ
77:5 ५. आणि वहयी (प्रकाशना) आणणाऱ्या फरिश्त्यांची शपथ
ﮠﮡﮢﮣ
77:6 ६. जी (वहयी) आरोपाचे खंडन करण्यासाठी किंवा सचेत करण्यासाठी असते
ﮤﮥﮦﮧ
77:7 ७. निःसंशय, ज्या गोष्टीचा तुमच्याशी वायदा केला जात आहे ती अगदी निश्चितपणे घडून येणार आहे
ﮨﮩﮪﮫ
77:8 ८. तर जेव्हा तारे निस्तेज केले जातील
ﮬﮭﮮﮯ
77:9 ९. आणि आकाशाचा विध्वंस केला जाईल
ﮰﮱﯓﯔ
77:10 १०. आणि जेव्हा पर्वत तुकडे तुकडे करून उडविले जातील
ﯕﯖﯗﯘ
77:11 ११. आणि जेव्हा पैगंबरांना निर्धारित वेळेवर आणले जाईल
ﯙﯚﯛﯜ
77:12 १२. कोणत्या दिवसाकारीता (त्यांना) थांबविले गेले आहे
ﯝﯞﯟ
77:13 १३. निर्णयाच्या दिवसाकरिता
ﯠﯡﯢﯣﯤﯥ
77:14 १४. आणि तुम्हाला काय माहीत की निर्णयाचा दिवस काय आहे
ﯦﯧﯨﯩ
77:15 १५. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी दुःस्थिती (विनाश) आहे
ﯪﯫﯬﯭ
77:16 १६. काय आम्ही पूर्वी होऊन गेलेल्या लोकांना नष्ट नाही केले
ﯮﯯﯰﯱ
77:17 १७. मग आम्ही त्यांच्या पाठोपाठ नंतरच्या लोकांना आणले
ﯲﯳﯴﯵ
77:18 १८. आम्ही अपराधी लोकांशी असाच व्यवहार करतो
ﯶﯷﯸﯹ
77:19 १९. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांकरिता विनाश आहे
ﭑﭒﭓﭔﭕﭖ
77:20 २०. काय आम्ही तुम्हाला तुच्छ पाण्या (वीर्या) पासून निर्माण केले नाही
ﭗﭘﭙﭚﭛ
77:21 २१. मग आम्ही त्यास मजबूत (आणि सुरक्षित) स्थानी ठेवले
ﭜﭝﭞﭟ
77:22 २२. एका निर्धारित वेळे पर्यर्ंत
ﭠﭡﭢﭣ
77:23 २३. मग आम्ही अनुमान लावले, तर आम्ही किती चांगले अनुमान लावणारे आहोत
ﭤﭥﭦﭧ
77:24 २४. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे
ﭨﭩﭪﭫﭬ
77:25 २५. काय आम्ही जमिनीला संचयित करणारी नाही बनविले
ﭭﭮﭯ
77:26 २६. जिवंत असलेल्यांनाही आणि मेलेल्यांनाही
ﭰﭱﭲﭳﭴﭵﭶﭷ
77:27 २७. आणि आम्ही तिच्यात उंच (आणि वजनदार) पर्वत बनविले, आणि तुम्हाला सिंचित करणारे गोड पाणी पाजले
ﭸﭹﭺﭻ
77:28 २८. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे
ﭼﭽﭾﭿﮀﮁﮂ
77:29 २९. त्या (जहन्नम) कडे जा, जिला तुम्ही खोटे ठरवित होते
ﮃﮄﮅﮆﮇﮈﮉ
77:30 ३०. चला त्या सावलीकडे, जिला तीन शाखा आहेत
ﮊﮋﮌﮍﮎﮏﮐ
77:31 ३१. जी वास्तविक ना छाया देणारी आहे आणि ना ज्वालापासून वाचवू शकते
ﮑﮒﮓﮔﮕ
77:32 ३२. निःसंशय, (जहन्नम) महालासारख्या चिंगाऱ्या फेकते
ﮖﮗﮘﮙ
77:33 ३३. जणू काही ते पिवळे उंट आहेत
ﮚﮛﮜﮝ
77:34 ३४. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी दुर्दशा (विनाश) आहे
ﮞﮟﮠﮡﮢ
77:35 ३५. आज (चा दिवस) असा दिवस आहे की ते बोलूही शकणार नाहीत
ﮣﮤﮥﮦﮧ
77:36 ३६. ना त्यांना सबब मांडण्याची अनुमती दिली जाईल
ﮨﮩﮪﮫ
77:37 ३७. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांची दुःस्थिती ( खराबी ) आहे
ﮬﮭﮮﮯﮰﮱﯓ
77:38 ३८. हा आहे फैसल्याचा दिवस. आम्ही तुम्हाला आणि पूर्वी होऊन गेलेल्या लोकांना (सर्वांना) एकत्रित केले आहे
ﯔﯕﯖﯗﯘﯙ
77:39 ३९. तेव्हा जर तुम्ही माझ्याशी एखादी चाल खेळू शकत असाल तर खेळून पाहा
ﯚﯛﯜﯝ
77:40 ४०. दुःख आहे त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांकरिता
ﯞﯟﯠﯡﯢﯣ
77:41 ४१. निःसंशय, नेक सदाचारी लोक सावलीत असतील आणि वाहत्या झऱ्यांमध्ये
ﯤﯥﯦﯧ
77:42 ४२. आणि त्या फळांमध्ये, ज्यांची ते इच्छा करतील
ﯨﯩﯪﯫﯬﯭﯮ
77:43 ४३. (हे जन्नतमध्ये राहणाऱ्यांनो!) मजेत खा आणि प्या, आपल्या कृत-कर्मांच्या मोबदल्यात
ﯯﯰﯱﯲﯳ
77:44 ४४. निःसंशय, आम्ही सत्कर्म (नेकी) करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो
ﯴﯵﯶﯷ
77:45 ४५. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांकरिता मोठे दुःख आहे
ﯸﯹﯺﯻﯼﯽ
77:46 ४६. (हे खोटे ठरविणाऱ्यांनो!) तुम्ही (या जगात) थोडे खाऊन पिऊन घ्या आणि लाभ प्राप्त करून घ्या. निश्चितच तुम्ही अपराधी आहात
ﯾﯿﰀﰁ
77:47 ४७. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे
ﰂﰃﰄﰅﰆﰇﰈ
77:48 ४८. त्यांना जेव्हा सांगितले जाते की रुकूअ करा (झुका) तर करीत नाही
ﰉﰊﰋﰌ
77:49 ४९. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांचा विनाश आहे
ﰍﰎﰏﰐﰑ
77:50 ५०. आता या (कुरआना) नंतर कोणत्या गोष्टीवर ईमान राखतील

पवित्र कुराण


Wednesday, September 9, 2026

Don't forget us in your sincere prayers