सूरा अत-तारिक pdf — डाउनलोड करा (मराठी)
सूरा अत-तारिक pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अत-तारिक भाषांतर. सूरा अत-तारिक (Meccan) 17 आयत.
Related
More सूरा PDF
सूरा अत-तारिक

ﭑﭒﭓ
86:1
१. शपथ आहे आकाशाची आणि अंधारात प्रकट होणाऱ्याची
ﭔﭕﭖﭗﭘ
86:2
२. तुम्हाला काय माहीत की तो रात्री प्रकट होणारा काय आहे
ﭙﭚﭛ
86:3
३. तो एक तेजस्वी तारा आहे
ﭜﭝﭞﭟﭠﭡﭢ
86:4
४. असा कोणीही नाही, ज्याच्यावर संरक्षक फरिश्ता (नियुक्त) नसेल
ﭣﭤﭥﭦﭧ
86:5
५. माणसाने विचार केला पाहिजे की त्याला कोणत्या वस्तूपासून निर्माण केले गेले आहे
ﭨﭩﭪﭫﭬ
86:6
६. त्याला एका उसळत्या पाण्यापासून निर्माण केले गेले आहे
ﭭﭮﭯﭰﭱﭲ
86:7
७. जे पाठ आणि छाती यांच्या दरम्यानी भागातून निघते
ﭳﭴﭵﭶﭷ
86:8
८. निःसंशय, तो (अल्लाह) त्याला परत आणण्यावर निश्चितच सामर्थ्य राखणारा आहे
ﭸﭹﭺﭻ
86:9
९. ज्या दिवशी गुप्त रहस्यभेदांची जांच-पडताळ केली जाईल
ﭼﭽﭾﭿﮀﮁﮂ
86:10
१०. तेव्हा त्याचा ना काही जोर चालेल आणि ना कोणी मदतकर्ता असेल
ﮃﮄﮅﮆ
86:11
११. पर्जन्यवृष्टी करणाऱ्या आकाशाची शपथ
ﮇﮈﮉﮊ
86:12
१२. आणि दुभंगणाऱ्या जमिनीची शपथ
ﮋﮌﮍﮎ
86:13
१३. निःसंशय, हा (कुरआन) काटेकोर फैसला करणारी भाषा आहे
ﮏﮐﮑﮒ
86:14
१४. ही हास्य-विनोदाची (आणि निरर्थक) गोष्ट नाही
ﮓﮔﮕﮖ
86:15
१५. तथापि इन्कारी लोक कट - कारस्थान करीत आहेत
ﮗﮘﮙ
86:16
१६. आणि मी देखील एक डाव चालत आहे
ﮚﮛﮜﮝﮞ
86:17
१७. तुम्ही या इन्कारी लोकांना सवड देऊन टाका, त्यांना काही दिवस मोकळीक द्या
पवित्र कुराण
Wednesday, September 9, 2026
Don't forget us in your sincere prayers







