सूरा अत-तारिक अरबी आणि मराठी

सूरा अत-तारिक संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (17 आयत — مكية). अत-तारिक ऐका, अत-तारिक भाषांतर, अत-तारिक mp3, अत-तारिक pdf.

सूरा अत-तारिक वाचा आणि ऐका

🎧 आयत
M Mishary Rashid Alafasy
M Mahmoud Khalil Al-Husary
A Abdurrahman As-Sudais
M Mohamed Siddiq Al-Minshawi
A Abdul Basit Abdul Samad
A Ali Al-Hudhaify
A Ahmed ibn Ali al-Ajamy
A Abu Bakr Ash-Shaatree
M Muhammad Ayyoub
A Abdullah Basfar
A Abdullah Al-Juhani
M Maher Al Muaiqly
x1
وَالسَّمَاءِ وَالطَّارِقِ ۝١
📖 भाषांतर आयत 1
१. शपथ आहे आकाशाची आणि अंधारात प्रकट होणाऱ्याची
وَمَا أَدْرَاكَ مَا الطَّارِقُ ۝٢
📖 भाषांतर आयत 2
२. तुम्हाला काय माहीत की तो रात्री प्रकट होणारा काय आहे
النَّجْمُ الثَّاقِبُ ۝٣
📖 भाषांतर आयत 3
३. तो एक तेजस्वी तारा आहे
إِن كُلُّ نَفْسٍ لَّمَّا عَلَيْهَا حَافِظٌ ۝٤
📖 भाषांतर आयत 4
४. असा कोणीही नाही, ज्याच्यावर संरक्षक फरिश्ता (नियुक्त) नसेल
فَلْيَنظُرِ الْإِنسَانُ مِمَّ خُلِقَ ۝٥
📖 भाषांतर आयत 5
५. माणसाने विचार केला पाहिजे की त्याला कोणत्या वस्तूपासून निर्माण केले गेले आहे
خُلِقَ مِن مَّاءٍ دَافِقٍ ۝٦
📖 भाषांतर आयत 6
६. त्याला एका उसळत्या पाण्यापासून निर्माण केले गेले आहे
يَخْرُجُ مِن بَيْنِ الصُّلْبِ وَالتَّرَائِبِ ۝٧
📖 भाषांतर आयत 7
७. जे पाठ आणि छाती यांच्या दरम्यानी भागातून निघते
إِنَّهُ عَلَىٰ رَجْعِهِ لَقَادِرٌ ۝٨
📖 भाषांतर आयत 8
८. निःसंशय, तो (अल्लाह) त्याला परत आणण्यावर निश्चितच सामर्थ्य राखणारा आहे
يَوْمَ تُبْلَى السَّرَائِرُ ۝٩
📖 भाषांतर आयत 9
९. ज्या दिवशी गुप्त रहस्यभेदांची जांच-पडताळ केली जाईल
فَمَا لَهُ مِن قُوَّةٍ وَلَا نَاصِرٍ ۝١٠
📖 भाषांतर आयत 10
१०. तेव्हा त्याचा ना काही जोर चालेल आणि ना कोणी मदतकर्ता असेल
وَالسَّمَاءِ ذَاتِ الرَّجْعِ ۝١١
📖 भाषांतर आयत 11
११. पर्जन्यवृष्टी करणाऱ्या आकाशाची शपथ
وَالْأَرْضِ ذَاتِ الصَّدْعِ ۝١٢
📖 भाषांतर आयत 12
१२. आणि दुभंगणाऱ्या जमिनीची शपथ
إِنَّهُ لَقَوْلٌ فَصْلٌ ۝١٣
📖 भाषांतर आयत 13
१३. निःसंशय, हा (कुरआन) काटेकोर फैसला करणारी भाषा आहे
وَمَا هُوَ بِالْهَزْلِ ۝١٤
📖 भाषांतर आयत 14
१४. ही हास्य-विनोदाची (आणि निरर्थक) गोष्ट नाही
إِنَّهُمْ يَكِيدُونَ كَيْدًا ۝١٥
📖 भाषांतर आयत 15
१५. तथापि इन्कारी लोक कट - कारस्थान करीत आहेत
وَأَكِيدُ كَيْدًا ۝١٦
📖 भाषांतर आयत 16
१६. आणि मी देखील एक डाव चालत आहे
فَمَهِّلِ الْكَافِرِينَ أَمْهِلْهُمْ رُوَيْدًا ۝١٧
📖 भाषांतर आयत 17
१७. तुम्ही या इन्कारी लोकांना सवड देऊन टाका, त्यांना काही दिवस मोकळीक द्या
← 85 अत-तारिक (86/114) 87 →
वाचा सूरा अत-तारिक मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ

86الطارق At-Tariq 📚 17 आयत مكية

आयतनिहाय – सूरा अत-तारिक — 17 आयत




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers