PDF —
22 आयत Meccan PDF
Built right in your browser — download starts automatically

सूरा अल-बुरूज pdf — डाउनलोड करा (मराठी)

सूरा अल-बुरूज pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-बुरूज भाषांतर. सूरा अल-बुरूज (Meccan) 22 आयत.



22 आयत · Meccan · मराठी
bismillah
ﭛﭜﭝﭞ
85:1 १. बुरुजांवाल्या आकाशाची शपथ
ﭟﭠﭡ
85:2 २. वायदा केलेल्या दिवसाची शपथ
ﭢﭣﭤ
85:3 ३. हजर होणाऱ्या आणि हजर केल्या गेलेल्याची शपथ
ﭥﭦﭧﭨ
85:4 ४. (की) खंदकवाल्यांचा सर्वनाश केला गेला
ﭩﭪﭫﭬ
85:5 ५. ती एक आग होती इंधनाची
ﭭﭮﭯﭰﭱ
85:6 ६. जेव्हा ते लोक तिच्या जवळपास बसले होते
ﭲﭳﭴﭵﭶﭷﭸ
85:7 ७. आणि ईमानधारकांशी जे करीत होते, ते आपल्या समोर पाहात होते
ﭹﭺﭻﭼﭽﭾﭿﮀﮁﮂ
85:8 ८. हे लोक त्या ईमानधारकांच्या अन्य एखाद्या अपराधाचा सूड घेत नव्हते, याखेरीज की त्यांनी वर्चस्वशाली, सर्व प्रशंसेस पात्र अशा अल्लाहवर ईमान राखले होते
ﮃﮄﮅﮆﮇﮈﮉﮊﮋﮌﮍﮎ
85:9 ९. ज्याच्यासाठी आकाश आणि धरतीचे साम्राज्य व राज्यसत्ता आहे आणि प्रत्येक वस्तू सर्वश्रेष्ठ अल्लाहसमोर आहे
ﮏﮐﮑﮒﮓﮔﮕﮖﮗﮘﮙﮚﮛﮜﮝ
85:10 १०. निःसंशय, ज्या लोकांनी ईमानधारक पुरुषांना व स्त्रियांना सताविले, मग माफीही मागितली नाही तर त्यांच्यासाठी जहन्नमची शिक्षा-यातना आहे आणि जळण्याची शिक्षा
ﮞﮟﮠﮡﮢﮣﮤﮥﮦﮧﮨﮩﮪﮫﮬﮭ
85:11 ११. निःसंशय, ईमान कबूल करणाऱ्यांकरिता आणि सत्कर्म करणाऱ्यांकरिता त्या बागा आहे, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत. हीच मोठी सफलता आहे
ﮮﮯﮰﮱﯓ
85:12 १२. निःसंशय, तुमच्या पालनकर्त्याची पकड मोठी सक्त आहे
ﯔﯕﯖﯗﯘ
85:13 १३. तोच पहिल्यांदा निर्माण करतो आणि तोच दुसऱ्यांदा जिवंत करील
ﯙﯚﯛﯜ
85:14 १४. तो मोठा माफ करणारा आणि खूप स्नेह-प्रेम करणारा आहे
ﯝﯞﯟﯠ
85:15 १५. अर्शचा स्वामी, अत्याधिक महानता राखणारा
ﯡﯢﯣﯤ
85:16 १६. जे इच्छिल ते करून टाकणारा आहे
ﯥﯦﯧﯨﯩ
85:17 १७. काय तुम्हाला लष्करांची बातमीही मिळाली आहे
ﯪﯫﯬ
85:18 १८. (अर्थात) फिरऔन आणि समूदची
ﯭﯮﯯﯰﯱﯲ
85:19 १९. खरे तर हे इन्कारी लोक खोटे ठरविण्याच्याच मागे लागले आहेत
ﯳﯴﯵﯶﯷ
85:20 २०. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहनेही त्यांना सगळीकडून घेरले आहे
ﯸﯹﯺﯻﯼ
85:21 २१. किंबहुना हा कुरआन मोठी शान वैभव (प्रशंसा) राखणारा आहे
ﯽﯾﯿﰀ
85:22 २२. ‘लोहे महफूज’मध्ये (लिहिलेला)

पवित्र कुराण


Wednesday, September 9, 2026

Don't forget us in your sincere prayers