सूरा अल-फज्र pdf — डाउनलोड करा (मराठी)
सूरा अल-फज्र pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-फज्र भाषांतर. सूरा अल-फज्र (Meccan) 30 आयत.
Related
More सूरा PDF
सूरा अल-फज्र

ﭤﭥ
89:1
१. शपथ आहे प्रातःकाळची
ﭦﭧﭨ
89:2
२. आणि दहा रात्रींची
ﭩﭪﭫ
89:3
३. आणि सम आणि विषम संख्येची
ﭬﭭﭮﭯ
89:4
४. आणि रात्रीची जेव्हा ती निघू लागावी
ﭰﭱﭲﭳﭴﭵﭶ
89:5
५. काय यात बुद्धिमानांसाठी पुरेशी शपथ आहे
ﭷﭸﭹﭺﭻﭼﭽ
89:6
६. काय तुम्ही नाही पाहिले की तुमच्या पालनकर्त्याने आदच्या लोकांशी काय व्यवहार केला
ﭾﭿﮀﮁ
89:7
७. मोठमोठे खांब बनविणाऱ्या इरमशी
ﮂﮃﮄﮅﮆﮇﮈ
89:8
८. ज्यांच्यासारखा (कोणताही जनसमूह) अन्य भूभागात निर्माण केला गेला नाही
ﮉﮊﮋﮌﮍﮎ
89:9
९. आणि समूदच्या लोकांशी, ज्यांनी दऱ्या-खोऱ्यात मोठमोठे पाषाण कोरले होते
ﮏﮐﮑﮒ
89:10
१०. आणि फिरऔनशी, जो मेखा बाळगणारा होता
ﮓﮔﮕﮖﮗ
89:11
११. या सर्वांनी धरतीवर उपद्रव पसरविला होता
ﮘﮙﮚﮛ
89:12
१२. आणि खूप उत्पात (फसाद) माजविला होता
ﮜﮝﮞﮟﮠﮡ
89:13
१३. शेवटी तुमच्या पालनकर्त्याने या सर्वांवर अज़ाबचा आसूड बरसविला
ﮢﮣﮤﮥ
89:14
१४. निःसंशय, तुमचा पालनकर्ता लक्ष ठेवून आहे
ﮦﮧﮨﮩﮪﮫﮬﮭﮮﮯﮰﮱ
89:15
१५. माणसा (ची ही दशा आहे की) जेव्हा त्याचा पालनकर्ता त्याची परीक्षा घेतो, आणि त्याला मान प्रतिष्ठा व कृपा देणग्या प्रदान करतो तेव्हा तो म्हणू लागतो की माझ्या पालनकर्त्याने मला सन्मानित केले
ﯓﯔﯕﯖﯗﯘﯙﯚﯛﯜﯝ
89:16
१६. आणि जेव्हा तो (अल्लाह) याची कसोटी घेतो, त्याची आजिविका तंग (कमी) करून टाकतो, तेव्हा तो म्हणू लागतो की माझ्या पालनकर्त्याने माझी अव्हेलना केली (आणि मला अपमानित केले)
ﯞﯟﯠﯡﯢﯣﯤ
89:17
१७. असे मुळीच नाही किंबहुना (खरी गोष्ट अशी) की तुम्ही लोक अनाथाचा मान-सन्मान राखत नाही.१
ﯥﯦﯧﯨﯩﯪ
89:18
१८. आणि गरिबांना जेवू घालण्याचे एकमेकांना प्रोत्साहन देत नाही
ﯫﯬﯭﯮﯯ
89:19
१९. आणि (मेलेल्यांची) वारस संपत्ती गोळा करून खातात
ﯰﯱﯲﯳﯴ
89:20
२०. आणि धन-संपत्तीशी जीवनापाड प्रेम राखता
ﯵﯶﯷﯸﯹﯺﯻﯼ
89:21
२१. निःसंशय, जमिनीला जेव्हा कुठून कुठून तिला अगदी सपाट केले जाईल
ﯽﯾﯿﰀﰁﰂ
89:22
२२. आणि तुमचा पालनकर्ता (स्वतः) प्रकट होईल आणि फरिश्ते रांगा बांधून (येतील)
ﭑﭒﭓﭔﭕﭖﭗﭘﭙﭚﭛ
89:23
२३. आणि ज्या दिवशी जहन्नमलाही आणले जाईल त्या दिवशी माणूस बोध ग्रहण करील. परंतु आता त्याच्या बोध ग्रहण करण्याचा काय लाभ
ﭜﭝﭞﭟﭠ
89:24
२४. तो म्हणेल की मी आपल्या या जीवनाकरिता काही सत्कर्मे, पहिल्यापासून करून ठेवली असती तर फार बरे झाले असते
ﭡﭢﭣﭤﭥﭦ
89:25
२५. तर आज अल्लाहच्या शिक्षा - यातनेसारखी शिक्षा - यातना अन्य कोणाचीही नसेल
ﭧﭨﭩﭪﭫ
89:26
२६. ना त्याच्या बंधनासारखे कोणाचे बंधन असेल
ﭬﭭﭮﭯ
89:27
२७. हे संतुष्ट आत्मा
ﭰﭱﭲﭳﭴﭵ
89:28
२८. तू आपल्या पालनकर्त्याकडे परत चल, अशा अवस्थेत की तू त्याच्याशी राजी, तो तुझ्याशी प्रसन्न
ﭶﭷﭸﭹ
89:29
२९. तेव्हा, माझ्या खास दासांमध्ये सामील हो
ﭺﭻﭼ
89:30
३०. आणि माझ्या जन्नतमध्ये प्रवेश कर
पवित्र कुराण
Wednesday, September 9, 2026
Don't forget us in your sincere prayers







