अल-बकरा · 179/286
भाषांतर उच्चार — सूरा अल-बकरा
وَلَكُمْ فِي الْقِصَاصِ حَيَاةٌ يَا أُولِي الْأَلْبَابِ لَعَلَّكُمْ تَتَّقُونَ ۝١٧٩
Wa lakum fil qisaasi hayaatuny yaaa ulil albaabi la `allakum tattaqoon
📖 मराठी अर्थ
१७९. बुद्धिमानांनो! किसास (हत्यादंडा) मध्ये तुमच्याकरिता जीवन आहे. या कारणाने तुम्ही (हत्या करण्यापासून) स्वतःला रोखाल.१

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 177-181 — सूरा अल-बकरा

177۞ لَّيْسَ الْبِرَّ أَن تُوَلُّوا وُجُوهَكُمْ قِبَلَ الْمَشْرِقِ وَالْمَغْرِبِ وَلَٰكِنَّ الْبِرَّ مَنْ آمَنَ بِاللَّهِ وَالْيَوْمِ الْآخِرِ وَالْمَلَائِكَةِ وَالْكِتَابِ وَالنَّبِيِّينَ وَآتَى الْمَالَ عَلَىٰ حُبِّهِ ذَوِي الْقُرْبَىٰ وَالْيَتَامَىٰ وَالْمَسَاكِينَ وَابْنَ السَّبِيلِ وَالسَّائِلِينَ وَفِي الرِّقَابِ وَأَقَامَ الصَّلَاةَ وَآتَى الزَّكَاةَ وَالْمُوفُونَ بِعَهْدِهِمْ إِذَا عَاهَدُوا ۖ وَالصَّابِرِينَ فِي الْبَأْسَاءِ وَالضَّرَّاءِ وَحِينَ الْبَأْسِ ۗ أُولَٰئِكَ الَّذِينَ صَدَقُوا ۖ وَأُولَٰئِكَ هُمُ الْمُتَّقُونَ
१७७. समस्त नेकी (सत्कर्म) केवळ पूर्व आणि पश्चिमेकडे तोंड करण्यातच नाही, किंबहुना वास्तविक भला माणूस तो आहे जो अल्लाहवर, कयामतच्या दिवसावर, फरिश्त्यांवर, अल्लाहच्या ग्रंथावर आणि पैगंबरावर ईमान राखणारा आहे. धन संपत्तीचा मोह असतानाही जो आपले धन नातेवाईकांवर, अनाथांवर, गोर गरीबांवर, प्रवाशांवर आणि याचकांवर खर्च करतो. बंदी झाले त्यांना मुक्त करतो. नमाज नियमितपणे पढतो आणि जकात (धर्म दान) अदा करतो. जेव्हा वायदा करतो तर त्याला पूर्ण करतो. धन संपत्तीची तंगी-अडचण, दुःख-यातना आणि लढाईच्या प्रसंगी धीर-संयम राखतो. हेच लोक सच्चे आहेत आणि हेच परहेजगार (अल्लाहचे भय राखून दुराचारापासून अलिप्त राहणारे) आहेत
178يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا كُتِبَ عَلَيْكُمُ الْقِصَاصُ فِي الْقَتْلَى ۖ الْحُرُّ بِالْحُرِّ وَالْعَبْدُ بِالْعَبْدِ وَالْأُنثَىٰ بِالْأُنثَىٰ ۚ فَمَنْ عُفِيَ لَهُ مِنْ أَخِيهِ شَيْءٌ فَاتِّبَاعٌ بِالْمَعْرُوفِ وَأَدَاءٌ إِلَيْهِ بِإِحْسَانٍ ۗ ذَٰلِكَ تَخْفِيفٌ مِّن رَّبِّكُمْ وَرَحْمَةٌ ۗ فَمَنِ اعْتَدَىٰ بَعْدَ ذَٰلِكَ فَلَهُ عَذَابٌ أَلِيمٌ
१७८. हे ईमानधारकांनो! तुमच्यावर हत्या केल्या गेलेल्या माणसाचा (रक्ताचा) मोबदला घेणे अनिवार्य केले गेले आहे, स्वतंत्र माणसाच्या मोबदल्यात स्वतंत्र माणूस, गुलामाच्या मोबदल्यात गुलाम, स्त्रीच्या बदल्यात स्त्री, मात्र जर एखाद्याला, त्याच्या भावा तर्फे माफ केले जाईल, त्याने भलेपणाचा आदर राखला पाहिजे आणि सहजपणे फिदिया (एखाद्याच्या खुनाची नुकसानभरपाई म्हणून दिले जाणारे धन) अदा केले पाहिजे. तुमच्या पालनकर्त्यातर्फे ही सूट (सवलत) आहे. आणि रहमत (दया-कृपा) आहे. त्यानंतरही जो मर्यादेचे उल्लंघन करील, तर त्याला अतिशय सक्त शिक्षा- यातनेला तोंड द्यावे लागेल
179وَلَكُمْ فِي الْقِصَاصِ حَيَاةٌ يَا أُولِي الْأَلْبَابِ لَعَلَّكُمْ تَتَّقُونَ
१७९. बुद्धिमानांनो! किसास (हत्यादंडा) मध्ये तुमच्याकरिता जीवन आहे. या कारणाने तुम्ही (हत्या करण्यापासून) स्वतःला रोखाल.१
180كُتِبَ عَلَيْكُمْ إِذَا حَضَرَ أَحَدَكُمُ الْمَوْتُ إِن تَرَكَ خَيْرًا الْوَصِيَّةُ لِلْوَالِدَيْنِ وَالْأَقْرَبِينَ بِالْمَعْرُوفِ ۖ حَقًّا عَلَى الْمُتَّقِينَ
१८०. तुमच्यासाठी हे बंधनकारक केले गेले आहे की जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याचे मरण जवळ येऊन ठेपेल आणि तो आपल्या मागे धन-संपत्ती सोडून जात असेल तर त्याने आपल्या माता-पित्यासाठी आणि नातेवाईकांसाठी भलेपणाने वसीयत (मृत्युपत्र) करून जावे. अल्लाहचे भय राखणाऱ्यांवर हे अनिवार्य कर्तव्य आहे
181فَمَن بَدَّلَهُ بَعْدَمَا سَمِعَهُ فَإِنَّمَا إِثْمُهُ عَلَى الَّذِينَ يُبَدِّلُونَهُ ۚ إِنَّ اللَّهَ سَمِيعٌ عَلِيمٌ
१८१. आता जो मनुष्य त्याला ऐकून घेतल्यानंतर त्यात बदल करील तर त्याचा गुन्हा, बदल करणाऱ्यावरच राहील. निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाह सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे
अल-बकराकुराण यादी
286आयत
MedinanRevelation
179आयत

भाषांतर — अल-बकरा 179

सूरा अल-बकरा आयत 179 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७९. बुद्धिमानांनो! किसास (हत्यादंडा) मध्ये तुमच्याकरिता जीवन आहे. या कारणाने…

सूरा आयत 179/286 — सूरा अल-बकरा البقرة (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-बकरा ऐका, सूरा अल-बकरा भाषांतर, सूरा अल-बकरा mp3, सूरा अल-बकरा pdf. आयत 177–181. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers