अल-बकरा · 216/286
भाषांतर उच्चार — सूरा अल-बकरा
كُتِبَ عَلَيْكُمُ الْقِتَالُ وَهُوَ كُرْهٌ لَّكُمْ ۖ وَعَسَىٰ أَن تَكْرَهُوا شَيْئًا وَهُوَ خَيْرٌ لَّكُمْ ۖ وَعَسَىٰ أَن تُحِبُّوا شَيْئًا وَهُوَ شَرٌّ لَّكُمْ ۗ وَاللَّهُ يَعْلَمُ وَأَنتُمْ لَا تَعْلَمُونَ ۝٢١٦
Kutiba alaikumulqitaalu wa huwa kurhullakum wa `asaaa an takrahoo shai`anw wa huwa khairullakum wa `asaaa an tuhibbo shai`anw wa huwa sharrullakum; wallaahu ya`lamu wa antum laa ta`lamoon
📖 मराठी अर्थ
२१६. तुमच्यावर जिहाद फर्ज (बंधनकारक कर्तव्य) केले गेले. जरी ते तुम्हाला अप्रिय वाटत असले तरीही, शक्य आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीला वाईट जाणावे आणि खरे पाहता तोच तुमच्यासाठी भली असावी आणि हेही शक्य आहे की तुम्ही ज्या गोष्टीला चांगली समजावे ती तुमच्यासाठी वाईट असावी. खरे ज्ञान तर अल्लाहलाच आहे. तुम्ही मात्र अजाण आहात

🎧 ऐका


📜 आयत 214-218 — सूरा अल-बकरा

214أَمْ حَسِبْتُمْ أَن تَدْخُلُوا الْجَنَّةَ وَلَمَّا يَأْتِكُم مَّثَلُ الَّذِينَ خَلَوْا مِن قَبْلِكُم ۖ مَّسَّتْهُمُ الْبَأْسَاءُ وَالضَّرَّاءُ وَزُلْزِلُوا حَتَّىٰ يَقُولَ الرَّسُولُ وَالَّذِينَ آمَنُوا مَعَهُ مَتَىٰ نَصْرُ اللَّهِ ۗ أَلَا إِنَّ نَصْرَ اللَّهِ قَرِيبٌ
२१४. काय तुम्ही अशी कल्पना करून बसलात की जन्नतमध्ये अगदी सहजपणे प्रवेश कराल? वास्तविक अजून तुमच्यावर ती अवस्था नाही आली, जी तुमच्या पूर्वीच्या लोकांवर आली होती. त्यांना सक्त गरीबी व रोगराईचा सामना करावा लागला. त्यांना इतके झिंजोडले गेले की रसूल (पैगंबर) आणि त्यांच्या सोबतचे ईमानधारक लोक म्हणून लागले की अल्लाहची मदत केव्हा येईल ? ऐका अल्लाहची मदत जवळच आहे
215يَسْأَلُونَكَ مَاذَا يُنفِقُونَ ۖ قُلْ مَا أَنفَقْتُم مِّنْ خَيْرٍ فَلِلْوَالِدَيْنِ وَالْأَقْرَبِينَ وَالْيَتَامَىٰ وَالْمَسَاكِينِ وَابْنِ السَّبِيلِ ۗ وَمَا تَفْعَلُوا مِنْ خَيْرٍ فَإِنَّ اللَّهَ بِهِ عَلِيمٌ
२१५. तुम्हाला ते विचारतात की त्यांनी कशावर खर्च करावा? तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही जो काही माल (धन) खर्च कराल तो माता-पित्याकरिता, नातेवाईकांकरिता, अनाथ व गोरगरीबांकरिता आणि प्रवाशांकरिता आहे. आणि तुम्ही जी काही भलाई कराल, अल्लाह ती चांगल्या प्रकारे जाणतो
216كُتِبَ عَلَيْكُمُ الْقِتَالُ وَهُوَ كُرْهٌ لَّكُمْ ۖ وَعَسَىٰ أَن تَكْرَهُوا شَيْئًا وَهُوَ خَيْرٌ لَّكُمْ ۖ وَعَسَىٰ أَن تُحِبُّوا شَيْئًا وَهُوَ شَرٌّ لَّكُمْ ۗ وَاللَّهُ يَعْلَمُ وَأَنتُمْ لَا تَعْلَمُونَ
२१६. तुमच्यावर जिहाद फर्ज (बंधनकारक कर्तव्य) केले गेले. जरी ते तुम्हाला अप्रिय वाटत असले तरीही, शक्य आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीला वाईट जाणावे आणि खरे पाहता तोच तुमच्यासाठी भली असावी आणि हेही शक्य आहे की तुम्ही ज्या गोष्टीला चांगली समजावे ती तुमच्यासाठी वाईट असावी. खरे ज्ञान तर अल्लाहलाच आहे. तुम्ही मात्र अजाण आहात
217يَسْأَلُونَكَ عَنِ الشَّهْرِ الْحَرَامِ قِتَالٍ فِيهِ ۖ قُلْ قِتَالٌ فِيهِ كَبِيرٌ ۖ وَصَدٌّ عَن سَبِيلِ اللَّهِ وَكُفْرٌ بِهِ وَالْمَسْجِدِ الْحَرَامِ وَإِخْرَاجُ أَهْلِهِ مِنْهُ أَكْبَرُ عِندَ اللَّهِ ۚ وَالْفِتْنَةُ أَكْبَرُ مِنَ الْقَتْلِ ۗ وَلَا يَزَالُونَ يُقَاتِلُونَكُمْ حَتَّىٰ يَرُدُّوكُمْ عَن دِينِكُمْ إِنِ اسْتَطَاعُوا ۚ وَمَن يَرْتَدِدْ مِنكُمْ عَن دِينِهِ فَيَمُتْ وَهُوَ كَافِرٌ فَأُولَٰئِكَ حَبِطَتْ أَعْمَالُهُمْ فِي الدُّنْيَا وَالْآخِرَةِ ۖ وَأُولَٰئِكَ أَصْحَابُ النَّارِ ۖ هُمْ فِيهَا خَالِدُونَ
२१७. लोक तुम्हाला आदर-सन्मानाच्या महिन्यात लढाईविषयी विचारतात. तुम्ही सांगा, त्या महिन्यात लढाई करणे फार मोठे अपराध कर्म आहे. परंतु अल्लाहच्या मार्गात रोखणे, अल्लाहचा इन्कार करणे, मस्जिदे हरामपासून रोखणे आणि तिथल्या रहिवाशांना तिथून बाहेर घालविणे, अल्लाहजवळ त्यापेक्षाही मोठा गुन्हा आहे, आणि फितना (फितूर माजवणे) हत्या करण्यापेक्षाही मोठा गुन्हा आहे. हे लोक तुमच्याशी लढाई करतच राहतील, येथपर्यंत की त्यांना शक्य झाल्यास तुम्हाला तुमच्या धर्मापासून फिरवतील आणि तुमच्यापैकी जे लोक आपल्या धर्मापासून परत फिरतील आणि त्याच कुप्र (इन्कारी) अवस्थेत मरण पावतील तर त्यांची या जगाची व आखिरतची सर्व कर्मे वाया जातील. हे लोक जहन्नमी असतील आणि नेहमीकरिता जहन्नममध्येच राहतील
218إِنَّ الَّذِينَ آمَنُوا وَالَّذِينَ هَاجَرُوا وَجَاهَدُوا فِي سَبِيلِ اللَّهِ أُولَٰئِكَ يَرْجُونَ رَحْمَتَ اللَّهِ ۚ وَاللَّهُ غَفُورٌ رَّحِيمٌ
२१८. परंतु ज्यांनी ईमान कबूल केले आणि स्थलांतर केले आणि अल्लाहच्या मार्गात जिहाद केले (धर्माच्या रक्षणासाठी अल्लाहच्या मार्गात लढले) तेच अल्लाहच्या दया-कृपेची आशा बाळगतात आणि अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे
अल-बकराकुराण यादी
286आयत
MedinanRevelation
216आयत

भाषांतर — अल-बकरा 216

सूरा अल-बकरा आयत 216 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २१६. तुमच्यावर जिहाद फर्ज (बंधनकारक कर्तव्य) केले गेले. जरी ते…

सूरा आयत 216/286 — सूरा अल-बकरा البقرة (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-बकरा ऐका, सूरा अल-बकरा भाषांतर, सूरा अल-बकरा mp3, सूरा अल-बकरा pdf. आयत 214–218. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, September 8, 2026

Don't forget us in your sincere prayers