अन-नूर · 57/64
भाषांतर उच्चार — सूरा अन-नूर
لَا تَحْسَبَنَّ الَّذِينَ كَفَرُوا مُعْجِزِينَ فِي الْأَرْضِ ۚ وَمَأْوَاهُمُ النَّارُ ۖ وَلَبِئْسَ الْمَصِيرُ ۝٥٧
Laa tahsabannal lazeena kafaroo mu`jizeena fil ard; wa maawaahumun Naaru wa labi`sal maseer
📖 मराठी अर्थ
५७. तुम्ही असे कधीही समजू नका की काफिर (इन्कारी) लोक धरतीवर (सर्वत्र पसरून) आम्हाला पराभूत करतील. त्यांचे मूळ ठिकाण तर जहन्नम आहे जे निःसंशय मोठे वाईट ठिकाण आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 55-59 — सूरा अन-नूर

55وَعَدَ اللَّهُ الَّذِينَ آمَنُوا مِنكُمْ وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ لَيَسْتَخْلِفَنَّهُمْ فِي الْأَرْضِ كَمَا اسْتَخْلَفَ الَّذِينَ مِن قَبْلِهِمْ وَلَيُمَكِّنَنَّ لَهُمْ دِينَهُمُ الَّذِي ارْتَضَىٰ لَهُمْ وَلَيُبَدِّلَنَّهُم مِّن بَعْدِ خَوْفِهِمْ أَمْنًا ۚ يَعْبُدُونَنِي لَا يُشْرِكُونَ بِي شَيْئًا ۚ وَمَن كَفَرَ بَعْدَ ذَٰلِكَ فَأُولَٰئِكَ هُمُ الْفَاسِقُونَ
५५. तुमच्यापैकी ज्या लोकांनी ईमान राखले आहे आणि सत्कर्म केले आहे, अल्लाहने त्यांच्याशी वायदा केलेला आहे की तो त्यांना धरतीवर सत्ताधिकार प्रदान करील, ज्या प्रकारे त्या लोकांना प्रदान केला होता, जे यांच्यापूर्वी होऊन गेले आणि निःसंशय त्यांच्यासाठी त्यांच्या या धर्माला दृढतापूर्वक कायम करील ज्यास त्याने त्यांच्यासाठी पसंत केले आहे आणि त्यांच्या भय- दहशतीला, शांती सुबत्तेत बदलून टाकील. ते माझी उपासना करतील, माझ्यासोबत दुसऱ्या कोणाला सहभागी करणार नाहीत. त्यानंतरही जे लोक कृतघ्न बनतील आणि कुप्र (इन्कार) करतील तर निश्चित ते अवज्ञाकारी आहेत
56وَأَقِيمُوا الصَّلَاةَ وَآتُوا الزَّكَاةَ وَأَطِيعُوا الرَّسُولَ لَعَلَّكُمْ تُرْحَمُونَ
५६. आणि नमाज कायम करा, जकात अदा करा आणि अल्लाहच्या पैगंबराचे आज्ञापालन करीत राहा, यासाठी की तुमच्यावर दया केली जावी
57لَا تَحْسَبَنَّ الَّذِينَ كَفَرُوا مُعْجِزِينَ فِي الْأَرْضِ ۚ وَمَأْوَاهُمُ النَّارُ ۖ وَلَبِئْسَ الْمَصِيرُ
५७. तुम्ही असे कधीही समजू नका की काफिर (इन्कारी) लोक धरतीवर (सर्वत्र पसरून) आम्हाला पराभूत करतील. त्यांचे मूळ ठिकाण तर जहन्नम आहे जे निःसंशय मोठे वाईट ठिकाण आहे
58يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا لِيَسْتَأْذِنكُمُ الَّذِينَ مَلَكَتْ أَيْمَانُكُمْ وَالَّذِينَ لَمْ يَبْلُغُوا الْحُلُمَ مِنكُمْ ثَلَاثَ مَرَّاتٍ ۚ مِّن قَبْلِ صَلَاةِ الْفَجْرِ وَحِينَ تَضَعُونَ ثِيَابَكُم مِّنَ الظَّهِيرَةِ وَمِن بَعْدِ صَلَاةِ الْعِشَاءِ ۚ ثَلَاثُ عَوْرَاتٍ لَّكُمْ ۚ لَيْسَ عَلَيْكُمْ وَلَا عَلَيْهِمْ جُنَاحٌ بَعْدَهُنَّ ۚ طَوَّافُونَ عَلَيْكُم بَعْضُكُمْ عَلَىٰ بَعْضٍ ۚ كَذَٰلِكَ يُبَيِّنُ اللَّهُ لَكُمُ الْآيَاتِ ۗ وَاللَّهُ عَلِيمٌ حَكِيمٌ
५८. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुमच्या ताब्यात असलेल्या दासांनी आणि त्यांनीही जे तुमच्यापैकी पूर्ण वयास पोहोचले नसतील (आपल्या येण्याच्या) तीन वेळांमध्ये तुमच्याकडून अनुमती घेणे आवष्यक आहे. फज्र (प्रातःकालीन) च्या नमाजपूर्वी आणि जोहर (मध्यान्ह) च्या वेळी जेव्हा तुम्ही आपले कपडे उतरवून ठेवता आणि ईशा (रात्री) च्या नमाजनंतर, या तिन्ही वेळा तुमच्या (एकांत) आणि पडद्याच्या आहेत. या वेळांखेरीज, ना तुमच्यावर काही दोष आहे, ना त्यांच्यावर. तुम्ही सर्व आपसात जास्त करून एकमेकांच्या जवळ येणे-जाणे करणारे आहेत. अशा प्रकारे अल्लाह आपले आदेश अगदी स्पष्ट करून सांगत आहे आणि अल्लाह जाणणारा आणि हिकमत बाळगणारा आहे
59وَإِذَا بَلَغَ الْأَطْفَالُ مِنكُمُ الْحُلُمَ فَلْيَسْتَأْذِنُوا كَمَا اسْتَأْذَنَ الَّذِينَ مِن قَبْلِهِمْ ۚ كَذَٰلِكَ يُبَيِّنُ اللَّهُ لَكُمْ آيَاتِهِ ۗ وَاللَّهُ عَلِيمٌ حَكِيمٌ
५९. आणि तुमच्यापैकी जी मुले तरुण (जाणत्या) वयास पोहचतील तर ज्याप्रमाणे त्यांच्या पूर्वीचे (मोठे) लोक अनुमती मागतात, त्यांनी देखील अनुमती घेऊन आले पाहिजे. अल्लाह अशा प्रकारे तुम्हाला आपल्या आयती स्पष्टतः सांगतो. अल्लाहच जाणणारा आणि हिकमत बाळगणारा आहे
अन-नूरकुराण यादी
64आयत
MedinanRevelation
57आयत

भाषांतर — अन-नूर 57

सूरा अन-नूर आयत 57 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५७. तुम्ही असे कधीही समजू नका की काफिर (इन्कारी) लोक…

सूरा आयत 57/64 — सूरा अन-नूर النور (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नूर ऐका, सूरा अन-नूर भाषांतर, सूरा अन-नूर mp3, सूरा अन-नूर pdf. आयत 55–59. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers