PDF —
20 आयत Meccan PDF
Built right in your browser — download starts automatically

सूरा अल-बलद pdf — डाउनलोड करा (मराठी)

सूरा अल-बलद pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-बलद भाषांतर. सूरा अल-बलद (Meccan) 20 आयत.

← अल-फज्रसूरा अल-बलद अश-शम्स →


20 आयत · Meccan · मराठी
bismillah
ﭽﭾﭿﮀﮁ
90:1 १. मी या शहराची शपथ घेतो
ﮂﮃﮄﮅﮆ
90:2 २. आणि तुम्ही या शहरात वास्तव्य करता
ﮇﮈﮉﮊ
90:3 ३. आणि (शपथ आहे) मानवी पिता आणि संततीची
ﮋﮌﮍﮎﮏﮐ
90:4 ४. निःसंशय, आम्ही मानवाला (मोठ्या) कष्ट-यातनेत निर्माण केले
ﮑﮒﮓﮔﮕﮖﮗ
90:5 ५. काय मनुष्य असे समजतो की तो कोणाच्या नियंत्रणाखाली नाही
ﮘﮙﮚﮛﮜ
90:6 ६. सांगत (फिरतो) की मी तर भरपूर धन-संपत्ती खर्च करून टाकली
ﮝﮞﮟﮠﮡﮢ
90:7 ७. काय, तो (असे) समजतो की कोणी त्याला पाहिलेच नाही
ﮣﮤﮥﮦﮧ
90:8 ८. काय, आम्ही त्याचे दोन डोळे नाही बनविले
ﮨﮩﮪ
90:9 ९. आणि एक जीभ व दोन ओठ (नाही बनविले)
ﮫﮬﮭ
90:10 १०. आणि त्याला दोन्ही मार्ग दाखवून दिले
ﮮﮯﮰﮱ
90:11 ११. तेव्हा, घाटीत प्रवेश करणे त्याला शक्य झाले नाही
ﯓﯔﯕﯖﯗ
90:12 १२. तुम्हाला काय माहीत की तो घाटी मार्ग काय आहे
ﯘﯙﯚ
90:13 १३. एखाद्याची मान (दास, दासी) मुक्त करणे
ﯛﯜﯝﯞﯟﯠﯡ
90:14 १४. किंवा भुकेल्या दिवशी पोटभर जेवु घालणे
ﯢﯣﯤﯥ
90:15 १५. एखाद्या नातेवाईक अनाथाला
ﯦﯧﯨﯩﯪ
90:16 १६. किंवा मातीस मिळालेल्या अतिशय गरीब माणसाला
ﯫﯬﯭﯮﯯﯰﯱﯲﯳﯴ
90:17 १७. मग त्या लोकांपैकी झाला असता, जे ईमान राखतात, आणि एकमेकांना धीर संयम व दया करुणा करण्याची ताकीद करतात
ﯵﯶﯷﯸ
90:18 १८. हेच लोक आहेत उजव्या बाजूचे
ﭑﭒﭓﭔﭕﭖﭗ
90:19 १९. आणि ज्या लोकांनी आमच्या आयतींचा इन्कार केला, तेच लोक डाव्या हाताचे आहेत
ﭘﭙﭚﭛ
90:20 २०. हेच आगीच्या कोंडीत असतील जी चारी बाजूंनी घेरलेली असेल

पवित्र कुराण


Wednesday, September 9, 2026

Don't forget us in your sincere prayers