PDF —
15 आयत Meccan PDF
Built right in your browser — download starts automatically

सूरा अश-शम्स pdf — डाउनलोड करा (मराठी)

सूरा अश-शम्स pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अश-शम्स भाषांतर. सूरा अश-शम्स (Meccan) 15 आयत.

← अल-बलदसूरा अश-शम्स अल-लैल →


15 आयत · Meccan · मराठी
bismillah
ﭜﭝﭞ
91:1 १. शपथ आहे सूर्याची आणि त्याच्या उन्हाची
ﭟﭠﭡﭢ
91:2 २. शपथ आहे चंद्राची जेव्हा त्याच्या मागे येईल
ﭣﭤﭥﭦ
91:3 ३. शपथ आहे दिवसाची जेव्हा सूर्याला प्रकट करील
ﭧﭨﭩﭪ
91:4 ४. शपथ आहे रात्रीची जेव्हा त्याला झाकून टाकील
ﭫﭬﭭﭮ
91:5 ५. शपथ आहे आकाशाची आणि त्याला बनविण्याची
ﭯﭰﭱﭲ
91:6 ६. शपथ आहे जमिनीची आणि तिला समतल करण्याची
ﭳﭴﭵﭶ
91:7 ७. शपथ आहे प्राणा (आत्म्या) ची आणि त्याला योग्य बनविण्याची
ﭷﭸﭹﭺ
91:8 ८. मग समज दिली त्याला दुराचाराची आणि त्यापासून अलिप्त राहण्याची
ﭻﭼﭽﭾﭿ
91:9 ९. ज्याने या (आत्म्या) ला स्वच्छ शुद्ध केले, तो सफल झाला
ﮀﮁﮂﮃﮄ
91:10 १०. आणि ज्याने याला मातीत मिळवले तो असफल झाला
ﮅﮆﮇﮈ
91:11 ११. समूद जनसमूहाने आपल्या विद्रोहामुळे खोटे ठरविले
ﮉﮊﮋﮌ
91:12 १२. जेव्हा त्यांच्यातला एक मोठा अभागी उठून उभा राहिला
ﮍﮎﮏﮐﮑﮒﮓﮔ
91:13 १३. त्यांना अल्लाहच्या पैगंबराने फर्माविले होते की सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या सांडणीचे आणि तिच्या पिण्याच्या पाळीचे (रक्षण करा)
ﮕﮖﮗﮘﮙﮚﮛﮜ
91:14 १४. त्या लोकांनी आपल्या पैगंबरांना खोटे जाणून त्या सांडणीला मारून टाकले. तेव्हा त्यांच्या पालनकर्त्याने त्यांच्या अपराधापायी त्यांना विनाशात टाकले आणि मग विनाशाला सार्वत्रिक केले आणि त्या संपूर्ण वस्तीला भुईसपाट करून टाकले
ﮝﮞﮟﮠ
91:15 १५. तो या प्रकोपाच्या परिणामापासून निर्भय आहे

पवित्र कुराण


Wednesday, September 9, 2026

Don't forget us in your sincere prayers