अल-बकरा · 194/286
भाषांतर उच्चार — सूरा अल-बकरा
الشَّهْرُ الْحَرَامُ بِالشَّهْرِ الْحَرَامِ وَالْحُرُمَاتُ قِصَاصٌ ۚ فَمَنِ اعْتَدَىٰ عَلَيْكُمْ فَاعْتَدُوا عَلَيْهِ بِمِثْلِ مَا اعْتَدَىٰ عَلَيْكُمْ ۚ وَاتَّقُوا اللَّهَ وَاعْلَمُوا أَنَّ اللَّهَ مَعَ الْمُتَّقِينَ ۝١٩٤
Ash Shahrul Haraamu bish Shahril Haraami wal hurumaatu qisaas; famani`tadaa `alaikum fa`tadoo `alaihi bimsisli ma`tadaa `alaikum; wattaqul laaha wa`lamooo annal laaha ma`al muttaqeen
📖 मराठी अर्थ
१९४. आदर-सन्मानवाल्या महिन्यांच्या मोबदल्यात आदर-सन्मानपूर्ण महिने आहेत, आणि आदर-सन्मानाच्या सर्व गोष्टींमध्ये बरोबरीचा विचार राखला पाहिजे. जो तुमच्यावर अत्याचार करील तर तुम्हीही त्याच्यावर तसाच जुलूम करा जसा तुमच्यावर केला गेला आहे आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहचे भय बाळगत राहा आणि चांगले ध्यानात ठेवा की अल्लाह, दुराचारापासून दूर राहणाऱ्यांच्या सोबत आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 192-196 — सूरा अल-बकरा

192فَإِنِ انتَهَوْا فَإِنَّ اللَّهَ غَفُورٌ رَّحِيمٌ
१९२. मग जर ते (लढणे) थांबवतील, तर अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे
193وَقَاتِلُوهُمْ حَتَّىٰ لَا تَكُونَ فِتْنَةٌ وَيَكُونَ الدِّينُ لِلَّهِ ۖ فَإِنِ انتَهَوْا فَلَا عُدْوَانَ إِلَّا عَلَى الظَّالِمِينَ
१९३. आणि त्यांच्याशी तोपर्यंत लढा, जोपर्यंत फितना (फसाद, उपद्रव) पूर्णपणे मिटत नाही आणि अल्लाहचा दीन (धर्म) कायम राहात नाही, परंतु जर ते (लढणे) थांबवतील तर (मग तुम्हीही थांबा). जुलूम अत्याचार केवळ अत्याचारी लोकांवर आहे
194الشَّهْرُ الْحَرَامُ بِالشَّهْرِ الْحَرَامِ وَالْحُرُمَاتُ قِصَاصٌ ۚ فَمَنِ اعْتَدَىٰ عَلَيْكُمْ فَاعْتَدُوا عَلَيْهِ بِمِثْلِ مَا اعْتَدَىٰ عَلَيْكُمْ ۚ وَاتَّقُوا اللَّهَ وَاعْلَمُوا أَنَّ اللَّهَ مَعَ الْمُتَّقِينَ
१९४. आदर-सन्मानवाल्या महिन्यांच्या मोबदल्यात आदर-सन्मानपूर्ण महिने आहेत, आणि आदर-सन्मानाच्या सर्व गोष्टींमध्ये बरोबरीचा विचार राखला पाहिजे. जो तुमच्यावर अत्याचार करील तर तुम्हीही त्याच्यावर तसाच जुलूम करा जसा तुमच्यावर केला गेला आहे आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहचे भय बाळगत राहा आणि चांगले ध्यानात ठेवा की अल्लाह, दुराचारापासून दूर राहणाऱ्यांच्या सोबत आहे
195وَأَنفِقُوا فِي سَبِيلِ اللَّهِ وَلَا تُلْقُوا بِأَيْدِيكُمْ إِلَى التَّهْلُكَةِ ۛ وَأَحْسِنُوا ۛ إِنَّ اللَّهَ يُحِبُّ الْمُحْسِنِينَ
१९५. आणि अल्लाहच्या मार्गात खर्च करा आणि आपल्याच हातांनी स्वतःला हलाखीत टाकू नका. भलाई (नेकी) करीत राहा. निःसंशय अल्लाह भलाई करणाऱ्यांशी प्रेम राखतो
196وَأَتِمُّوا الْحَجَّ وَالْعُمْرَةَ لِلَّهِ ۚ فَإِنْ أُحْصِرْتُمْ فَمَا اسْتَيْسَرَ مِنَ الْهَدْيِ ۖ وَلَا تَحْلِقُوا رُءُوسَكُمْ حَتَّىٰ يَبْلُغَ الْهَدْيُ مَحِلَّهُ ۚ فَمَن كَانَ مِنكُم مَّرِيضًا أَوْ بِهِ أَذًى مِّن رَّأْسِهِ فَفِدْيَةٌ مِّن صِيَامٍ أَوْ صَدَقَةٍ أَوْ نُسُكٍ ۚ فَإِذَا أَمِنتُمْ فَمَن تَمَتَّعَ بِالْعُمْرَةِ إِلَى الْحَجِّ فَمَا اسْتَيْسَرَ مِنَ الْهَدْيِ ۚ فَمَن لَّمْ يَجِدْ فَصِيَامُ ثَلَاثَةِ أَيَّامٍ فِي الْحَجِّ وَسَبْعَةٍ إِذَا رَجَعْتُمْ ۗ تِلْكَ عَشَرَةٌ كَامِلَةٌ ۗ ذَٰلِكَ لِمَن لَّمْ يَكُنْ أَهْلُهُ حَاضِرِي الْمَسْجِدِ الْحَرَامِ ۚ وَاتَّقُوا اللَّهَ وَاعْلَمُوا أَنَّ اللَّهَ شَدِيدُ الْعِقَابِ
१९६. आणि अल्लाहकरिता हज व उमरा पूर्ण करा जर मार्गात रोखले जाल तर जेदेखील कुर्बानीचे जनावर असेल, त्याची कुर्बानी करून टाका, आणि जोपर्यंत कुर्बानी, कुर्बानीच्या ठिकाणावर पोहचत नाही, तोपर्यंत आपल्या डोक्यावरील केस काढू नका. आणि तुमच्यापैकी जो आजारी असेल किंवा त्याच्या डोक्याला काही त्रास असेल ज्यामुळे तो डोक्यावरचे केस काढून घेईल तर त्यावर फिदिया (दंड) आहे की, वाटल्यास त्याने रोजा (व्रत) राखावा किंवा वाटल्यास सदका (दान) द्यावा, किंवा कुर्बानी करावी. परंतु शांतीपूर्ण अवस्था लाभताच जो उमरासह हज करण्याचा लाभ घेऊ इच्छिल तर त्याने, जीदेखील कुर्बानी हजर असेल, ती करून टाकावी. ज्याला हे सामर्थ्य नसेल, त्याने तीन रोजे हजच्या दिवसात राखावे आणि सात रोजे हज हून परतताना राखावेत, हे पूर्ण दहा झाले. हा आदेश त्यांच्यासाठी आहे, जे मस्जिदे हराम (मक्का) चे रहिवाशी नसावेत. (लोकांनो!) अल्लाहचे भय बाळगून राहा आणि जाणून असा की सर्वश्रेष्ठ अल्लाह फार कठोर शिक्षा-यातना देणारा आहे
अल-बकराकुराण यादी
286आयत
MedinanRevelation
194आयत

भाषांतर — अल-बकरा 194

सूरा अल-बकरा आयत 194 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १९४. आदर-सन्मानवाल्या महिन्यांच्या मोबदल्यात आदर-सन्मानपूर्ण महिने आहेत, आणि आदर-सन्मानाच्या सर्व…

सूरा आयत 194/286 — सूरा अल-बकरा البقرة (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-बकरा ऐका, सूरा अल-बकरा भाषांतर, सूरा अल-बकरा mp3, सूरा अल-बकरा pdf. आयत 192–196. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers