अल-बकरा · 250/286
भाषांतर उच्चार — अल-बकरा
وَلَمَّا بَرَزُوا لِجَالُوتَ وَجُنُودِهِ قَالُوا رَبَّنَا أَفْرِغْ عَلَيْنَا صَبْرًا وَثَبِّتْ أَقْدَامَنَا وَانصُرْنَا عَلَى الْقَوْمِ الْكَافِرِينَ ۝٢٥٠
Wa lammaa barazoo liJaaloota wa junoodihee qaaloo Rabbanaaa afrigh `alainaa sabranw wa sabbit aqdaamanaa wansurnaa `alal qawmil kaafireen
📖 मराठी अर्थ
२५०. आणि जेव्हा त्यांचा जालूत आणि त्याच्या सैन्यांशी मुकाबला झाला तेव्हा त्यांनी दुआ (प्रार्थना) केली, ‘‘हे आमच्या पालनहार (अल्लाह)! आम्हाला धीर-संयम प्रदान कर आणि आमचे पाय स्थिर राख आणि इन्कारी जनसमूहाच्या विरोधात आमची मदत कर.’’
🎧 ऐका

📜 आयत 248-252 — अल-बकरा

248وَقَالَ لَهُمْ نَبِيُّهُمْ إِنَّ آيَةَ مُلْكِهِ أَن يَأْتِيَكُمُ التَّابُوتُ فِيهِ سَكِينَةٌ مِّن رَّبِّكُمْ وَبَقِيَّةٌ مِّمَّا تَرَكَ آلُ مُوسَىٰ وَآلُ هَارُونَ تَحْمِلُهُ الْمَلَائِكَةُ ۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَةً لَّكُمْ إِن كُنتُم مُّؤْمِنِينَ
२४८. त्यांचे पैगंबर पुन्हा त्यांना म्हणाले, त्याच्या मुलूखाची स्पष्ट निशाणी ही आहे की तुमच्याजवळ ती पेटी परत येईल, जिच्या तुमच्या पालनकर्त्यातर्फे मनाच्या शांतीची सामग्री आहे आणि मूसाच्या संततीने व हारूनच्या संततीने आपल्या मागे सोडलेले सामान आहे. फिरश्ते ती पेटी उचलून आणतील. निःसंदेह, ही तर तुमच्यासाठी स्पष्ट निशाणी आहे, जर तुम्ही ईमान बाळगत असाल
249فَلَمَّا فَصَلَ طَالُوتُ بِالْجُنُودِ قَالَ إِنَّ اللَّهَ مُبْتَلِيكُم بِنَهَرٍ فَمَن شَرِبَ مِنْهُ فَلَيْسَ مِنِّي وَمَن لَّمْ يَطْعَمْهُ فَإِنَّهُ مِنِّي إِلَّا مَنِ اغْتَرَفَ غُرْفَةً بِيَدِهِ ۚ فَشَرِبُوا مِنْهُ إِلَّا قَلِيلًا مِّنْهُمْ ۚ فَلَمَّا جَاوَزَهُ هُوَ وَالَّذِينَ آمَنُوا مَعَهُ قَالُوا لَا طَاقَةَ لَنَا الْيَوْمَ بِجَالُوتَ وَجُنُودِهِ ۚ قَالَ الَّذِينَ يَظُنُّونَ أَنَّهُم مُّلَاقُو اللَّهِ كَم مِّن فِئَةٍ قَلِيلَةٍ غَلَبَتْ فِئَةً كَثِيرَةً بِإِذْنِ اللَّهِ ۗ وَاللَّهُ مَعَ الصَّابِرِينَ
२४९. मग जेव्हा तालूत सैन्य घेऊन निघाले तेव्हा म्हणाले, ऐका, एका नदीच्याद्वारे अल्लाहला तुमची कसोटी घ्यायची आहे, तेव्हा जो कोणी त्या नदीतून पाणी पील तो माझा नव्हे आणि जो तिच्यातून पिणार नाही तो माझा आहे. आता ही गोष्ट वेगळी की जो आपल्या हाताने एक ओंजळभर घेईल ( तर हरकत नाही) तथापि काहींच्या खेरीज इतर सर्वांनी पाणी पिऊन घेतले. (हजरत) तालूत जेव्हा नदीला पार करून गेले आणि जे त्यांच्यासोबत ईमानधारक होते, तर ते म्हणाले की आज तर आमच्यात एवढे बळ नाही की जालूत आणि त्याच्या फौजांशी लढावे. परंतु ज्यांना अल्लाहच्या भेटीबाबत पूर्ण विश्वास होता ते म्हणाले, अनेकदा लहानसहान जमात, अल्लाहच्या हुकूमाने भारी भरकम (मोठ्या) जमातीवर विजय प्राप्त करते आणि अल्लाह सबुरी (धीर-संयम) राखणाऱ्यांच्या सोबत आहे
250وَلَمَّا بَرَزُوا لِجَالُوتَ وَجُنُودِهِ قَالُوا رَبَّنَا أَفْرِغْ عَلَيْنَا صَبْرًا وَثَبِّتْ أَقْدَامَنَا وَانصُرْنَا عَلَى الْقَوْمِ الْكَافِرِينَ
२५०. आणि जेव्हा त्यांचा जालूत आणि त्याच्या सैन्यांशी मुकाबला झाला तेव्हा त्यांनी दुआ (प्रार्थना) केली, ‘‘हे आमच्या पालनहार (अल्लाह)! आम्हाला धीर-संयम प्रदान कर आणि आमचे पाय स्थिर राख आणि इन्कारी जनसमूहाच्या विरोधात आमची मदत कर.’’
251فَهَزَمُوهُم بِإِذْنِ اللَّهِ وَقَتَلَ دَاوُودُ جَالُوتَ وَآتَاهُ اللَّهُ الْمُلْكَ وَالْحِكْمَةَ وَعَلَّمَهُ مِمَّا يَشَاءُ ۗ وَلَوْلَا دَفْعُ اللَّهِ النَّاسَ بَعْضَهُم بِبَعْضٍ لَّفَسَدَتِ الْأَرْضُ وَلَٰكِنَّ اللَّهَ ذُو فَضْلٍ عَلَى الْعَالَمِينَ
२५१. यास्तव, अल्लाहच्या हुकूमाने त्यांनी शत्रूला पराभूत केले आणि दाऊदने जालूतला ठार मारले आणि अल्लाहने त्याला राज्य आणि हिकमत तसेच जेवढे इच्छिले ज्ञानही प्रदान केले आणि जर अल्लाह, काही लोकांना इतर समूहाद्वारे हटवित राहिला नसता तर धरतीवर फसाद पसरला असता, परंतु अल्लाह या जगातील लोकांवर फार कृपा करणारा आहे
252تِلْكَ آيَاتُ اللَّهِ نَتْلُوهَا عَلَيْكَ بِالْحَقِّ ۚ وَإِنَّكَ لَمِنَ الْمُرْسَلِينَ
२५२. या अल्लाहच्या आयती आहेत, ज्या आम्ही तुम्हाला सत्याच्या आधारे वाचवून ऐकवित आहोत आणि निश्चितच तुम्ही पैगंबरांपैकी आहात.१
अल-बकराकुराण यादी
286आयत
MedinanRevelation
250आयत

भाषांतर — अल-बकरा 250

सूरा अल-बकरा आयत 250 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २५०. आणि जेव्हा त्यांचा जालूत आणि त्याच्या सैन्यांशी मुकाबला झाला…

सूरा आयत 250/286 — अल-बकरा البقرة (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-बकरा ऐका, अल-बकरा भाषांतर, अल-बकरा mp3, अल-बकरा pdf. आयत 248–252. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers