आल-इमरान · 155/200
भाषांतर उच्चार — आल-इमरान
إِنَّ الَّذِينَ تَوَلَّوْا مِنكُمْ يَوْمَ الْتَقَى الْجَمْعَانِ إِنَّمَا اسْتَزَلَّهُمُ الشَّيْطَانُ بِبَعْضِ مَا كَسَبُوا ۖ وَلَقَدْ عَفَا اللَّهُ عَنْهُمْ ۗ إِنَّ اللَّهَ غَفُورٌ حَلِيمٌ ۝١٥٥
Innal lazeena tawallaw minkum yawmal taqal jam`aani innamas tazallahumush Shaitaanu biba`di maa kasaboo wa laqad `afal laahu `anhum; innnal laaha Ghafoorum Haleem
📖 मराठी अर्थ
१५५. ज्या दिवशी दोन समूह एकमेकांशी मुकाबल्यासाठी भिडले, आणि त्या वेळी तुमच्यापैकी ज्या लोकांनी पाठ दाखवली, हे लोक आपल्या काही कर्मांमुळे सैतानाच्या बहकविण्यात आले, पण तरीदेखील अल्लाहने त्यांना माफ केले. निःसंशय अल्लाह माफ करणारा, सहनशिल (बुर्दबार) आहे
🎧 ऐका

📜 आयत 153-157 — आल-इमरान

153۞ إِذْ تُصْعِدُونَ وَلَا تَلْوُونَ عَلَىٰ أَحَدٍ وَالرَّسُولُ يَدْعُوكُمْ فِي أُخْرَاكُمْ فَأَثَابَكُمْ غَمًّا بِغَمٍّ لِّكَيْلَا تَحْزَنُوا عَلَىٰ مَا فَاتَكُمْ وَلَا مَا أَصَابَكُمْ ۗ وَاللَّهُ خَبِيرٌ بِمَا تَعْمَلُونَ
१५३. जेव्हा तुम्ही चढत जात होते आणि मागे वळून कोणाला पाहातही नव्हते, आणि अल्लाहचे रसूल (पैगंबर) तुम्हाला पाठीमागून हाक मारीत होते, तेव्हा तुम्हाला दुःखावर दुःख पोहचले, यासाठी की तुम्ही आपल्या हातून निसटलेल्या (विजया) वर दुःख न करावे आणि ना त्या (मानसिक आघात) वर, जो तुम्हाला पोहचला, आणि अल्लाह तुमच्या सर्व कर्मांना चांगले जाणतो
154ثُمَّ أَنزَلَ عَلَيْكُم مِّن بَعْدِ الْغَمِّ أَمَنَةً نُّعَاسًا يَغْشَىٰ طَائِفَةً مِّنكُمْ ۖ وَطَائِفَةٌ قَدْ أَهَمَّتْهُمْ أَنفُسُهُمْ يَظُنُّونَ بِاللَّهِ غَيْرَ الْحَقِّ ظَنَّ الْجَاهِلِيَّةِ ۖ يَقُولُونَ هَل لَّنَا مِنَ الْأَمْرِ مِن شَيْءٍ ۗ قُلْ إِنَّ الْأَمْرَ كُلَّهُ لِلَّهِ ۗ يُخْفُونَ فِي أَنفُسِهِم مَّا لَا يُبْدُونَ لَكَ ۖ يَقُولُونَ لَوْ كَانَ لَنَا مِنَ الْأَمْرِ شَيْءٌ مَّا قُتِلْنَا هَاهُنَا ۗ قُل لَّوْ كُنتُمْ فِي بُيُوتِكُمْ لَبَرَزَ الَّذِينَ كُتِبَ عَلَيْهِمُ الْقَتْلُ إِلَىٰ مَضَاجِعِهِمْ ۖ وَلِيَبْتَلِيَ اللَّهُ مَا فِي صُدُورِكُمْ وَلِيُمَحِّصَ مَا فِي قُلُوبِكُمْ ۗ وَاللَّهُ عَلِيمٌ بِذَاتِ الصُّدُورِ
१५४. मग त्या दुःखानंतर तुमच्यावर शांती अवतरित केली आणि तुमच्यापैकी एका समूहाला शांतीपूर्ण डुलकी येऊ लागली, तथापि काही लोक असेही होते ज्यांना केवळ आपल्या जीवाची धास्ती लागली होती. ते अल्लाहविषयी नाहक मूर्खतापूर्ण विचार करू लागले आणि म्हणू लागले की आम्हालाही काही हक्क (अधिकार) आहेत. तुम्ही त्यांना सांगा, काम तर सर्वच्या सर्व अल्लाहच्या अधिकारकक्षेत आहे. हे लोक आपल्या मनातले रहस्यभेद तुम्हाला नाही सांगत. ते म्हणतात की जर आम्हाला थोडासाही अधिकार असता तर या ठिकाणी जीवे मारले गेलो नसतो. तुम्ही सांगा, जर तुम्ही आपल्या घरांतही असते, तरीही ज्यांच्या नशिबी मारले जाणे लिहिले होते, ते वधस्थळाकडे चालत गेले असते. अल्लाहला तुमच्या मनातल्या गोष्टींची परीक्षा घ्यायची होती आणि जे काही तुमच्या मनात आहे त्यापासून तुम्हाला स्वच्छ-शुद्ध करायचे होते आणि अल्लाह अपरोक्ष (गैब) जाणणारा आहे. (मनात दडलेले रहस्यभेद तो चांगल्या प्रकारे जाणतो)
155إِنَّ الَّذِينَ تَوَلَّوْا مِنكُمْ يَوْمَ الْتَقَى الْجَمْعَانِ إِنَّمَا اسْتَزَلَّهُمُ الشَّيْطَانُ بِبَعْضِ مَا كَسَبُوا ۖ وَلَقَدْ عَفَا اللَّهُ عَنْهُمْ ۗ إِنَّ اللَّهَ غَفُورٌ حَلِيمٌ
१५५. ज्या दिवशी दोन समूह एकमेकांशी मुकाबल्यासाठी भिडले, आणि त्या वेळी तुमच्यापैकी ज्या लोकांनी पाठ दाखवली, हे लोक आपल्या काही कर्मांमुळे सैतानाच्या बहकविण्यात आले, पण तरीदेखील अल्लाहने त्यांना माफ केले. निःसंशय अल्लाह माफ करणारा, सहनशिल (बुर्दबार) आहे
156يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا لَا تَكُونُوا كَالَّذِينَ كَفَرُوا وَقَالُوا لِإِخْوَانِهِمْ إِذَا ضَرَبُوا فِي الْأَرْضِ أَوْ كَانُوا غُزًّى لَّوْ كَانُوا عِندَنَا مَا مَاتُوا وَمَا قُتِلُوا لِيَجْعَلَ اللَّهُ ذَٰلِكَ حَسْرَةً فِي قُلُوبِهِمْ ۗ وَاللَّهُ يُحْيِي وَيُمِيتُ ۗ وَاللَّهُ بِمَا تَعْمَلُونَ بَصِيرٌ
१५६. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, जे कृतघ्न झाले, आणि त्यांच्या बांधवांबद्दल, जेव्हा ते जमिनीवर प्रवासाला किंवा जिहादकरिता निघाले, तेव्हा म्हणाले की जर ते आमच्याजवळ राहिले असते तर मेले नसते, ना मारले गेले असते१ (त्यांच्या या विचाराचे कारण हे आहे की) अल्लाहने त्यांच्या मनात हळहळ निर्माण करावी. जीवन आणि मृत्यु केवळ अल्लाहच्या अवाख्यात आहे, आणि अल्लाह तुमच्या सर्व कर्मांना पाहत आहे
157وَلَئِن قُتِلْتُمْ فِي سَبِيلِ اللَّهِ أَوْ مُتُّمْ لَمَغْفِرَةٌ مِّنَ اللَّهِ وَرَحْمَةٌ خَيْرٌ مِّمَّا يَجْمَعُونَ
१५७. जर तुम्ही अल्लाहच्या मार्गात शहीद व्हाला किंवा मरण पावाल तर अल्लाहची माफी आणि दया कृपा त्या (धन-संपत्ती) पेक्षा चांगली आहे, जी ते जमा करीत आहेत.१
आल-इमरानकुराण यादी
200आयत
MedinanRevelation
155आयत

भाषांतर — आल-इमरान 155

सूरा आल-इमरान आयत 155 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १५५. ज्या दिवशी दोन समूह एकमेकांशी मुकाबल्यासाठी भिडले, आणि त्या…

सूरा आयत 155/200 — आल-इमरान آل عمران (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: आल-इमरान ऐका, आल-इमरान भाषांतर, आल-इमरान mp3, आल-इमरान pdf. आयत 153–157. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers