अल-कसस · 29/88
भाषांतर उच्चार — अल-कसस
۞ فَلَمَّا قَضَىٰ مُوسَى الْأَجَلَ وَسَارَ بِأَهْلِهِ آنَسَ مِن جَانِبِ الطُّورِ نَارًا قَالَ لِأَهْلِهِ امْكُثُوا إِنِّي آنَسْتُ نَارًا لَّعَلِّي آتِيكُم مِّنْهَا بِخَبَرٍ أَوْ جَذْوَةٍ مِّنَ النَّارِ لَعَلَّكُمْ تَصْطَلُونَ ۝٢٩
Falammmaa qadaa Moosal ajala wa saara bi ahliheee aanasa min jaanibit Toori naaran qaala li ahlihim kusooo inneee aanastu naaral la `alleee aateekum minhaa bikhabarin aw jazwatim minan naari la `allakum tastaloon
📖 मराठी अर्थ
२९. जेव्हा (हजरत) मूसा (अलै.) यांनी मुदत पूर्ण केली आणि आपल्या कुटुंबियांना घेऊन निघाले, तेव्हा तूर नावाच्या पर्वताकडे आग पाहिली. आपल्या पत्नीला म्हणाले, थांबा! मी आग पाहिली आहे. फार संभव आहे की मी तेथून एखादी बातमी आणावी किंवा आगीचा निखारा (विस्तव) आणावा, यासाठी की तुम्ही शेकून घ्यावे
🎧 ऐका

📜 आयत 27-31 — अल-कसस

27قَالَ إِنِّي أُرِيدُ أَنْ أُنكِحَكَ إِحْدَى ابْنَتَيَّ هَاتَيْنِ عَلَىٰ أَن تَأْجُرَنِي ثَمَانِيَ حِجَجٍ ۖ فَإِنْ أَتْمَمْتَ عَشْرًا فَمِنْ عِندِكَ ۖ وَمَا أُرِيدُ أَنْ أَشُقَّ عَلَيْكَ ۚ سَتَجِدُنِي إِن شَاءَ اللَّهُ مِنَ الصَّالِحِينَ
२७. त्या (वृद्ध पित्या) ने म्हटले की मी आपल्या या दोन मुलींपैकी एकीला तुमच्या विवाह (बंधना) मध्ये देऊ इच्छितो या (महर- स्त्रीधना) वर की तुम्ही आठ वर्षां पर्यंत माझे कामकाज करावे, मात्र जर तुम्ही दहा वर्षां पर्यंत कराल तर हे तुमच्यातर्फे उपकार म्हणून आहे. मी कधीही असे इच्छित नाही की तुमच्यावर कशाही प्रकारची कष्ट- यातना टाकावी. अल्लाहने इच्छिले तर भविष्यात तुम्ही मला एक भला माणूस पाहाल
28قَالَ ذَٰلِكَ بَيْنِي وَبَيْنَكَ ۖ أَيَّمَا الْأَجَلَيْنِ قَضَيْتُ فَلَا عُدْوَانَ عَلَيَّ ۖ وَاللَّهُ عَلَىٰ مَا نَقُولُ وَكِيلٌ
२८. (मूसा अलै.) म्हणाले, ठीक आहे. ही गोष्ट तर माझ्या आणि तुमच्या दरम्यान निश्चित ठरली. मी या दोन्हीं मुदतींपैकी जी मुदत पूर्ण करेन, माझ्यावर जोरजबरदस्ती होऊ नये. आम्ही हे जे काही (आपसात) बोलत आहोत, त्यावर अल्लाह (साक्षी आणि) निरीक्षक आहे
29۞ فَلَمَّا قَضَىٰ مُوسَى الْأَجَلَ وَسَارَ بِأَهْلِهِ آنَسَ مِن جَانِبِ الطُّورِ نَارًا قَالَ لِأَهْلِهِ امْكُثُوا إِنِّي آنَسْتُ نَارًا لَّعَلِّي آتِيكُم مِّنْهَا بِخَبَرٍ أَوْ جَذْوَةٍ مِّنَ النَّارِ لَعَلَّكُمْ تَصْطَلُونَ
२९. जेव्हा (हजरत) मूसा (अलै.) यांनी मुदत पूर्ण केली आणि आपल्या कुटुंबियांना घेऊन निघाले, तेव्हा तूर नावाच्या पर्वताकडे आग पाहिली. आपल्या पत्नीला म्हणाले, थांबा! मी आग पाहिली आहे. फार संभव आहे की मी तेथून एखादी बातमी आणावी किंवा आगीचा निखारा (विस्तव) आणावा, यासाठी की तुम्ही शेकून घ्यावे
30فَلَمَّا أَتَاهَا نُودِيَ مِن شَاطِئِ الْوَادِ الْأَيْمَنِ فِي الْبُقْعَةِ الْمُبَارَكَةِ مِنَ الشَّجَرَةِ أَن يَا مُوسَىٰ إِنِّي أَنَا اللَّهُ رَبُّ الْعَالَمِينَ
३०. यास्तव, जेव्हा त्या ठिकाणी पोहचले तेव्हा त्या शुभ धरतीच्या मैदानाच्या उजवीकडील झाडामधून साद घातली गेली की, हे मूसा! निःसंशय, मीच अल्लाह आहे, सर्व विश्वांचा पालनकर्ता
31وَأَنْ أَلْقِ عَصَاكَ ۖ فَلَمَّا رَآهَا تَهْتَزُّ كَأَنَّهَا جَانٌّ وَلَّىٰ مُدْبِرًا وَلَمْ يُعَقِّبْ ۚ يَا مُوسَىٰ أَقْبِلْ وَلَا تَخَفْ ۖ إِنَّكَ مِنَ الْآمِنِينَ
३१. आणि हे की आपली काठी खाली टाका. मग जेव्हा तिला पाहिले, ती सापासारखी वळवळ करीत आहे तेव्हा पाठ फिरवून परतले आणि मागे वळून तोंडही दाखवले नाही. आम्ही फर्माविले, हे मूसा! पुढे या. भयभीत होऊ नका. निःसंशय, तुम्ही सर्व प्रकारे अगदी सुरक्षित आहात
अल-कससकुराण यादी
88आयत
MeccanRevelation
29आयत

भाषांतर — अल-कसस 29

सूरा अल-कसस आयत 29 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २९. जेव्हा (हजरत) मूसा (अलै.) यांनी मुदत पूर्ण केली आणि…

सूरा आयत 29/88 — अल-कसस القصص (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-कसस ऐका, अल-कसस भाषांतर, अल-कसस mp3, अल-कसस pdf. आयत 27–31. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers