PDF —
21 आयत Meccan PDF
Built right in your browser — download starts automatically

सूरा अल-लैल pdf — डाउनलोड करा (मराठी)

सूरा अल-लैल pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-लैल भाषांतर. सूरा अल-लैल (Meccan) 21 आयत.

← अश-शम्ससूरा अल-लैल अद-दुहा →


21 आयत · Meccan · मराठी
bismillah
ﮡﮢﮣﮤ
92:1 १. शपथ आहे रात्रीची जेव्हा ती पसरते
ﮥﮦﮧﮨ
92:2 २. आणि शपथ आहे दिवसाची जेव्हा तो प्रकाशमान होतो
ﮩﮪﮫﮬﮭ
92:3 ३. आणि शपथ आहे त्याची ज्याने नर व मादी निर्माण केले
ﮮﮯﮰﮱ
92:4 ४. निःसंशय, तुमचे प्रयत्न वेगवेगळ्या प्रकारचे आहेत
ﯓﯔﯕﯖﯗ
92:5 ५. तर जो (अल्लाहच्या मार्गात) देत राहिला आणि भय बाळगत राहिला
ﯘﯙﯚ
92:6 ६. आणि भलाईपूर्ण गोष्टीचे सत्य-समर्थन करीत राहिला
ﯛﯜﯝ
92:7 ७. तर आम्हीही त्याला सहज सुलभता प्रदान करू
ﯞﯟﯠﯡﯢ
92:8 ८. परंतु ज्याने कंजूसी केली आणि बेपर्वाई दाखविली
ﯣﯤﯥ
92:9 ९. आणि सत्कर्माच्या गोष्टींना खोटे ठरविले
ﭑﭒﭓ
92:10 १०. तर आम्हीही त्याच्यासाठी तंगी अडचणीची सामुग्री उपलब्ध करू
ﭔﭕﭖﭗﭘﭙﭚ
92:11 ११. त्याची धन-संपत्ती त्याला (तोंडघशी) पडतेवेळी काहीच उपयोगी पडणार नाही
ﭛﭜﭝﭞ
92:12 १२. निःसंशय, मार्ग दाखविण्याची जबाबदारी आमची आहे
ﭟﭠﭡﭢﭣ
92:13 १३. आणि आमच्याच हाती आखिरत आणि ही दुनिया आहे
ﭤﭥﭦﭧ
92:14 १४. मी तर तुम्हाला अंगारे(निखारे) मारणाऱ्या आगीपासून भयभीत केले आहे
ﭨﭩﭪﭫﭬ
92:15 १५. जिच्यात फक्त तोच कमनशिबी दाखल होईल
ﭭﭮﭯﭰ
92:16 १६. ज्याने खोटे ठरविले आणि (याचे अनुसरण करण्यापासून) तोंड फिरविले
ﭱﭲﭳ
92:17 १७. आणि या (आगी) पासून असा मनुष्य दूर ठेवला जाईल, जो अल्लाहचे मोठे भय राखून वागणारा असेल
ﭴﭵﭶﭷﭸ
92:18 १८. जो स्वच्छ शुद्धता (पाकी) प्राप्त करण्यासाठी आपले धन देतो
ﭹﭺﭻﭼﭽﭾﭿ
92:19 १९. कोणाचा त्याच्यावर काही उपकार नाही की ज्याची फेड केली जात असावी
ﮀﮁﮂﮃﮄﮅ
92:20 २०. किंबहुना, केवळ आपल्या अतिउच्च व सर्वश्रेष्ठ पालनकर्त्याची प्रसन्नता प्राप्त करण्याकरिता
ﮆﮇﮈ
92:21 २१. निःसंशय, तो (अल्लाह देखील) लवकरच राजी होईल

पवित्र कुराण


Wednesday, September 9, 2026

Don't forget us in your sincere prayers